✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव
मिसळपाव मराठी साहित्य

Main navigation

  • मुख्य पान
  • पाककृती
  • कविता
  • नवीन लेखन
  • भटकंती

जिओ मिपा! ....अर्थात्, जियो मिपा!

ब
बहुगुणी यांनी
Tue, 10/07/2014 - 01:20  ·  लेख
लेख
नमस्कार मंडळी! बरेच दिवस मिपाला (म्हणजे मिपाकरांना, त्यांच्या विविध कट्ट्यांना, त्यांच्या भटकंतीला) जागतिक दृश्य स्वरुपात कसं एकत्र आणता येईल याचा विचार करीत असता या सर्वांना real-time, geosynchronous अशा रुपात नकाशावर मांडावं, असा विचार डोक्यात आला. त्याचं जिओ मिपा हे पहिलं दृश्य स्वरूप. हे "जिओ मिपा" पुढे चालू रहिलं तर 'जियो मिपा' म्हणुयात! मी केवळ सुरूवात करून देतो आहे, यात प्रत्येक मिपाकराने आणि मिपाकरणीने आपापल्या परीने भर घालावी ही अपेक्षा आणि विनंती! उदाहरणार्थ, महाराष्ट्रातील काही मिपा-कट्टे (हिरवे झेंडे) आणि काही भटकंती (निळे झेंडे) असे दिसतीलः Mipa1 युरोपातील मिपाकरांचे काही मिपा-कट्टे (हिरवे झेंडे) आणि काही भटकंती (निळे झेंडे) असे दिसतीलः mipa2 अमेरिका आणि आफ्रिका खंडातील मिपाकरांचे काही मिपा-कट्टे (हिरवे झेंडे) आणि काही भटकंती (निळे झेंडे) असे दिसतीलः Mipa3 मिपाकरांनी आपापले सद्य-स्थान या नकाशात आपल्या आय-डी सह दर्शवले की ते नकाशावर असे पोपटी रंगातल्या झेंड्यात दिसेलः Mipa4 या झेंड्यावर 'क्लिक' केले असता एक बॉक्स उघडेल ज्यात त्या मिपाकराच्या मिपावरील लेखनाचे दुवे असतीलः Mipa5 Mipa6 तुम्हाला तुमच्या भटकंतीच्या लेखाविषयी वाचकांची उत्सुकता वाढवण्यासाठी प्रकाशचित्रांपैकी एखाद्या खास चित्राचा दुवा द्यायचा असेल तर तोही तुम्ही देऊ शकाल; त्यासाठी 'website' अशी बॉक्स असेल त्यात आपल्या प्रकाशचित्राचा असा दुवा द्या: Mipa7 म्हणजे ते प्रकाशचित्र असं दिसेलः Mipa8 आता हे करणं अगदी सोपं आहे, त्यासाठीच्या सूचना पुढे देतो आहे:
  • सुरूवातीला आपल्याला हवा तो लेख निवडून त्याचं शीर्षक आणि मिपावरील दुवा हे जमा करून ठेवावेत. मग खालीलप्रमाणे नकाशावर जाऊन हे दुवे add करावेतः Mipa11 Mipa12
  • यातील Marker या pull-down box मध्ये झेंड्याचा योग्य रंग निवडा: म्हणजे मिपाकरांच्या स्थानासाठी green, मिपाकरांच्या कट्ट्यासाठी Teal तर मिपाकरांच्या भटकंतीसाठी Blue हे रंग निवडा.
वर लिहिल्याप्रमाणे मी केवळ सुरूवात करून देतो आहे. मला सहज सापडले असे कट्टे आणि भटकंतींचे लेख सध्या या नकाशावर समाविष्ट आहेत. वाचकांनी आणि मिपा लेखकांनी आपापल्या आणि इतरांच्या आवडलेल्या भटकंतींची आणि कट्ट्यांची इथे नोंद करावी. हा नकाशा open access असा आहे, त्यामुळे नोंदी करण्यासाठी सभासदत्व लागत नाही. कधी कधी दोन भटकंती एकाच गावी झाल्याने असे लेख एकाच झेंड्याने नकाशावर दाखवले जातील, उदाहरणार्थ 'किल्ले हरिहर' आणि 'हरिहर - एक ट्रेक कथा' हे दोन्ही लेख 'त्रिंबक' या एकाच झेंड्याखाली लपलेले असतील. Mipa9 अशावेळी view--> Search करून 'किल्ले हरिहर' हे शब्द असे शोधावेतः Mipa10 म्हणजे हवा तो नेमका लेख सापडेल. मी संगणक-तज्ञ अजिबातच नाही, त्यामुळे मला जमेल तशी मांडणी केली आहे, आणि मला जमली म्हणजे इतर कोणालाही ती सहजच जमू शकेल अशी खात्री आहे :-) आता आपण सर्व वाचक-लेखक जिओ मिपाला आणखीन समृद्ध कराल अशी आशा आहे, मग करा तर सुरुवात, इथे भेट देऊन!
वर्गीकरण
लेखनविषय (Tags)
मांडणी
लेखनप्रकार (Writing Type)
प्रकटन

प्रतिक्रिया द्या
58163 वाचन

💬 प्रतिसाद (164)

प्रतिक्रिया

सुपर्ब ... आवडली कल्पना

सुहास झेले
Tue, 10/07/2014 - 10:25 नवीन
सुपर्ब ... आवडली कल्पना :)
  • Log in or register to post comments

अरे वा काय झकास कल्पना आहे

दिपक.कुवेत
Tue, 10/07/2014 - 10:41 नवीन
निव्वळ स्तुत्य. आता ते कसं करायचं हे जरा सावकाश वाचुन मग मी माझा हि झेंडा रोवतो....
  • Log in or register to post comments

माझ्या ठिकाणाचा झेंडा रोवलाय

किसन शिंदे
Tue, 10/07/2014 - 11:07 नवीन
माझ्या ठिकाणाचा झेंडा रोवलाय पण मला माझ्या लेखनाचे दुवे देता येत नाहीयेत, त्याचबरोबर राजगड, देवगिरी आणि कर्नाळा किल्ल्यांची ठिकाणं दाखवायची आहेत.
  • Log in or register to post comments

किसनदेवा, लेखनाचे दुवे टाकले आहेत

बहुगुणी
Tue, 10/07/2014 - 16:44 नवीन
किल्ल्यांची नेमकी (किंवा नकाशावर जवळपासच्या गावांची)लोकेशन्स मिळाली की तीही टाकेन. धन्यवाद!
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: किसन शिंदे

धन्यवाद जी!

किसन शिंदे
Tue, 10/07/2014 - 23:25 नवीन
धन्यवाद जी!
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: बहुगुणी

छान उपक्रम

मार्मिक गोडसे
Tue, 10/07/2014 - 11:29 नवीन
मार्कर टाकलाय. लोकेशन दाखवत नाही. (ठाणे)
  • Log in or register to post comments

मार्मिक

बहुगुणी
Tue, 10/07/2014 - 16:48 नवीन
तुम्ही हरवले नाही आहात :-) झेंडा आहे, वेस्ट ठाणे या भागात, ढोकली आणि कैलाश नगर यांच्या मध्ये झूम केल्यावर दिसतो. तुमच्या लेखनाचा दुवा दिला आहे.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: मार्मिक गोडसे

धन्यवाद.

मार्मिक गोडसे
Wed, 10/08/2014 - 09:35 नवीन
धन्यवाद.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: बहुगुणी

झेंडा रोवला! मस्तच उपक्रम!!

अजया
Tue, 10/07/2014 - 11:45 नवीन
झेंडा रोवला! मस्तच उपक्रम!!
  • Log in or register to post comments

कल्पना आणि उपक्रम एकदम मस्त

आतिवास
Tue, 10/07/2014 - 11:52 नवीन
कल्पना आणि उपक्रम एकदम मस्त आहे. पण तंत्रज्ञानातलं कळायला जरासा वेळ लागतो, त्यामुळे सावकाश बघते प्रत्यक्ष काय करता येईल ते.
  • Log in or register to post comments

नकाशात झेंडा लावला आहे. बाकी

आतिवास
Tue, 10/07/2014 - 16:46 नवीन
नकाशात झेंडा लावला आहे. बाकी ते लेखाचे दुवे वगैरे जमले नाहीत अजून - बघू कधी जमतंय ते!
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: आतिवास

आतिवासताई, दुवे दिले आहेत

बहुगुणी
Tue, 10/07/2014 - 17:08 नवीन
आफ्रिकेत पहिला झेंडा रोवल्याबद्दल धन्यवाद! (ते गणपाशेठ अजून उमटले ना।हीयेत नकाशावर!) लेखनाचा दुवा देण्यास अडचण येत असेल अशा सर्वांच्याच माहितीसाठी: झेंड्यावर क्लिक केल्यावर Change Entry चा बॉक्स उघडेल, त्यातील Details या टॅबवर क्लिक केल्यास Description ही बॉक्स उघडते. त्यात आपल्या लेखनाचा दुवा http://misalpav.com/user/इंग्लिशमधून सभासद क्रमांक/authored असा द्यावा, आणि Submit हे बटन दाबावे.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: आतिवास

अफलातून

सविता००१
Tue, 10/07/2014 - 11:54 नवीन
मस्तच आहे आयडिया
  • Log in or register to post comments

भन्नाट आयडिया आहे !

डॉ सुहास म्हात्रे
Tue, 10/07/2014 - 12:00 नवीन
भन्नाट आयडिया आहे !
  • Log in or register to post comments

खरच उल्लेखनिय उपक्रम आहे

जागु
Tue, 10/07/2014 - 12:40 नवीन
खरच उल्लेखनिय उपक्रम आहे तुमचा.
  • Log in or register to post comments

मस्त आयडिया!

पैसा
Tue, 10/07/2014 - 14:34 नवीन
मार्कर लावला आहे. तसे आमचे अनाहिता कट्टे पण होतात. मात्र ते या नकाशात मार्क करायचे का यावर आधी चर्चा करू आणि मग सांगू! ;)
  • Log in or register to post comments

अपडेट केलेलं आहे!

आदूबाळ
Tue, 10/07/2014 - 14:36 नवीन
अपडेट केलेलं आहे!
  • Log in or register to post comments

खरोखरच बहुगुणी आहात !

सुहास..
Tue, 10/07/2014 - 14:36 नवीन
खरोखरच बहुगुणी आहात !
  • Log in or register to post comments

मस्त उपक्रम

ज्ञानोबाचे पैजार
Tue, 10/07/2014 - 14:51 नवीन
झेंडा रोवला आहे पैजारबुवा,
  • Log in or register to post comments

भारीच.

यसवायजी
Tue, 10/07/2014 - 16:12 नवीन
भारीच. माझ्या या भटकंतीची ज्यायरात केल्या गेली आहे. :)
  • Log in or register to post comments

मस्त उपक्रम

मधुरा देशपांडे
Tue, 10/07/2014 - 17:19 नवीन
मस्त उपक्रम. आवडला. भटकंतीचे दुवे अ‍ॅड केलेत. :)
  • Log in or register to post comments

+१

सखी
Tue, 10/07/2014 - 18:07 नवीन
चांगला उपक्रम, बहुगुणी अनेक धन्यवाद तुम्हाला.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: मधुरा देशपांडे

सहीच.

सौंदाळा
Tue, 10/07/2014 - 17:45 नवीन
सहीच. वल्लीबुवांच्या शेजारीच झेंडा रोवला आहे.
  • Log in or register to post comments

जब्री !

अर्धवटराव
Tue, 10/07/2014 - 18:10 नवीन
एकदम अभिनव उपक्रम.
  • Log in or register to post comments

भ-न्ना-ट कल्पना!

संदीप चित्रे
Tue, 10/07/2014 - 18:33 नवीन
ही आयडिया खूपच आवडली..
  • Log in or register to post comments

जमलं

दिपक.कुवेत
Tue, 10/07/2014 - 18:51 नवीन
हिरवा झेंडा मार्क केला आहे. जरा बघता का बहुगुणी साहेब?
  • Log in or register to post comments

अपंगांसाठीही मदत करा आणि माझा

कंजूस
Tue, 10/07/2014 - 19:55 नवीन
अपंगांसाठीही मदत करा आणि माझा झेंडा कुणीतरी लावून टाका ही विनंती. बाकी महाराष्ट्रात पश्चिम आणि पूर्व, विदर्भावर अन्याय इत्यादी निवडणुकीच्या भाषणबाजीत ऐकायला मिळत आहे ते झेंड्यांची याबाजुची गर्दी पाहून खरे वाटते आहे. तरुण आणि होतकरू मिपाकरांनी तिकडे कमीतकमी ताडोबा, नागझिरा, पवनार, हेमलकलसा इथे जाऊन झेंडे लावावेत आणि महाराष्ट्राला शोधून १४ ऑक्टोबरपर्यँत योग्य जागी आणून ठेवावा.
  • Log in or register to post comments

डोंबिवलीत झेंड्यांची गर्दी व्हायला लागल्याने

बहुगुणी
Tue, 10/07/2014 - 23:29 नवीन
तुम्हाला पश्चिम डोंबिवलीत बसवलंय :-) तुमच्या लेखनाचा दुवाही अ‍ॅड केलाय, आता तुमच्या भटकंतींचे दुवे त्या-त्या ठिकाणी योग्य त्या रंगात (blue) जोडून टाका म्हणजे झालं.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: कंजूस

धन्यवाद!

कंजूस
Wed, 10/08/2014 - 09:23 नवीन
धन्यवाद!
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: बहुगुणी

आमचा लाल तारा लागला. चुकला का

प्यारे१
Tue, 10/07/2014 - 20:50 नवीन
आमचा लाल तारा लागला. चुकला का बरोबर आहे?
  • Log in or register to post comments

प्यारे१

बहुगुणी
Tue, 10/07/2014 - 22:13 नवीन
धन्यवाद!, तुमच्या लेखनाचा दुवा Description मध्ये जोडला आहे. तसंच तुमचा झेंड्याचा रंग ठीकठाक केलाय (व्हेन इन रोम, बी अ रोमन!) :-)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: प्यारे१

रोमलो रोमलो. आभारी आहोत.

प्यारे१
Wed, 10/08/2014 - 13:53 नवीन
रोमलो रोमलो. आभारी आहोत.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: बहुगुणी

मस्त!

मेघवेडा
Tue, 10/07/2014 - 21:04 नवीन
मस्त!
  • Log in or register to post comments

मेवे: तुमचे झेंडे कुठे आहेत?

बहुगुणी
Tue, 10/07/2014 - 23:35 नवीन
लावून टाका!
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: मेघवेडा

मी आलो आहे, योग्य प्रकारे आलो

दशानन
Tue, 10/07/2014 - 22:29 नवीन
मी आलो आहे, योग्य प्रकारे आलो आहे का तेवढे पहा प्लीज :)
  • Log in or register to post comments

अगदी योग्य प्रकारे!

बहुगुणी
Tue, 10/07/2014 - 23:03 नवीन
धन्यवाद! आता आणखी ते 'भटकंतीं'चे झेंडे लावून टाका ('तिकोना' आणि 'राजमाची' मला वाटतं मी टाकले आहेत, श्रवणबेळगोळ, बेल्लुर वगैरे झेंडे योग्य रंगात लावा.)
  • Log in or register to post comments

एकदम तोडू आयडिया!!

अंतु बर्वा
Tue, 10/07/2014 - 23:09 नवीन
एकदम तोडू आयडिया!! मार्कर टाकण्यात आलेला आहे!
  • Log in or register to post comments

तुमच्या लेखनाचा दुवा दिला आहे

बहुगुणी
Tue, 10/07/2014 - 23:19 नवीन
आणि झेंड्याच्या रंगात किंचित करेक्शन केलंय. तुमच्या भटकंती (The Windy City...) चा देखील दुवा नकाशावर दिला आहे.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: अंतु बर्वा

बहुत धन्यवाद बहुगुणी सर!

अंतु बर्वा
गुरुवार, 10/09/2014 - 22:56 नवीन
बहुत धन्यवाद बहुगुणी सर!
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: बहुगुणी

+१

सही रे सई
Fri, 09/02/2016 - 00:06 नवीन
माझापण मार्कर टाकला आहे.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: अंतु बर्वा

धन्यवाद...

मुक्त विहारि
Wed, 10/08/2014 - 00:21 नवीन
बहुगुणींनी मदत केली आणि नकाशावर आमचे पण निशाण लागले.
  • Log in or register to post comments

मि आलो पण झेंडा अलग कलरचा

वैभव जाधव
Wed, 10/08/2014 - 09:57 नवीन
मि आलो पण झेंडा अलग कलरचा दिसतोय. :( पोपट टी करा की :)
  • Log in or register to post comments

केला पोपटी झेंडा!

बहुगुणी
Wed, 10/08/2014 - 21:07 नवीन
ज्या कोणाला हीच माहिती हवी असेलः Pull-down menu मधून green निवडायचं.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: वैभव जाधव

मी पण केलं...!!!

पिलीयन रायडर
Wed, 10/08/2014 - 10:40 नवीन
मी पण केलं...!!! कान्हा नॅशनल पार्क, भोरमदेव आणि रामटेक...!
  • Log in or register to post comments

मी स्वतःला टॅग केलय तर पत्ता

पिलीयन रायडर
Wed, 10/08/2014 - 12:00 नवीन
मी स्वतःला टॅग केलय तर पत्ता - Mukki, Madhya Pradesh, India 481111 असा दिस्तोय.. टॅग तर पुण्यावर केलय...
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: पिलीयन रायडर

दुरूस्त केलं आहे

बहुगुणी
Wed, 10/08/2014 - 21:16 नवीन
प्रवासवर्णनं टॅग केल्याबद्दल धन्यवाद! आणखी असतीलच, तीही टाका.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: पिलीयन रायडर

जमलं !

खेडूत
Wed, 10/08/2014 - 13:58 नवीन
जमलं !
  • Log in or register to post comments

मीही आलो झेंडे लावून

प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
Wed, 10/08/2014 - 18:29 नवीन
गंगापूर आणि औरंगाबाद. -दिलीप बिरुटे
  • Log in or register to post comments

धन्यवाद, प्रा डॉ

बहुगुणी
गुरुवार, 10/09/2014 - 09:26 नवीन
तुमच्या वैयक्तिक झेंड्याचा दुरूस्त केलाय (पोपटी), बिबी का मकबर्‍याच्या भटकंतीचा दुवा टाकल्याबद्दल धन्यवाद.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

आलो!

धमाल मुलगा
Wed, 10/08/2014 - 19:44 नवीन
लय भारी आयडिया हो बहुगुणी. :)
  • Log in or register to post comments
  • «
  • ‹
  • 1
  • 2
  • 3
  • 4
  • ›
  • »

लेखन करा

लेखन करा

मिसळपाव वर स्वागत आहे.

प्रवेश करा

  • नवीन खाते बनवा
  • Reset your password
मिसळपाव.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Misalpav.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा