✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव
मिसळपाव मराठी साहित्य

Main navigation

  • मुख्य पान
  • पाककृती
  • कविता
  • भटकंती
  • नवीन लेखन

२१ वे शतक आणि भारतीय संस्कृती

त
त्रास यांनी
Sun, 02/01/2009 - 13:06  ·  लेख
लेख
वर्गीकरण

प्रतिक्रिया द्या
6810 वाचन

💬 प्रतिसाद (21)

प्रतिक्रिया

रॉक

विनायक प्रभू
Sun, 02/01/2009 - 13:10 नवीन
रॉक शॉलेट्ट प्रिन्सिपॉल
  • Log in or register to post comments

मला असे

अविनाशकुलकर्णी
Sun, 02/01/2009 - 14:18 नवीन
मला असे वाटते कि भारतिय संस्क्रुतिने माणसाला पशु बनवले होते.....जन्मावर आधारित जातिव्यवस्था, बहुजन समाजाला मुलभुत मानवि हक्कापासुन वंचित ठेवणे..अंधश्रध्धेचे समाजरोपण करुन देवा धर्माचा धाक घालुन त्याम्च्या संपत्ति/बायका उपभोगणे..अनंत अत्याचार दलितांवर.. विज्ञान द्रुश्टीचा अभाव, परदेश गमन केले तर....शिक्षा,..स्त्रियांना अधिकारापासुन वंचित, केशवपन,सति असे अघोरि प्रकार....ईंग्रजांचे राज्य आले अन प्रकाश पडला..कायद्याचे राज्य आले...विज्ञान युगाचि ओळ्ख झाली....आणि सारे हळुहळु बदलु लागले..बहुजन समाजातिल समाज सुधारकांनि क्रंति केली.
  • Log in or register to post comments

ईंग्रजांचे राज्य

त्रास
Sun, 02/01/2009 - 15:30 नवीन
"ईंग्रजांचे राज्य" हा शब्दप्रयोगच असा वापरता येईल- "ईंग्रजांचा व्यवसाय". त्यांनी शेवटपर्यंत सगळ्या जगात फक्त व्यवसायासाठी आक्रमणे केली. त्यांची ब्रांच ऑफिसे, हेड ऑफिस, बिझनेस प्रोसेस, ई त्यांनी निर्माण केले व लोकांना ट्रेनिंग दिले. त्यालाच तुम्ही "प्रगती" म्हणता आहात का? असेलही. (मी इतिहास्कार नाही; मला जे वाचून माहित आहे ते असे-) सुरतेच्या वखारीनंतर त्यांनी तंजावूर भागात त्यांनी जम बसवला. तेथे कर वसुलीसाठी स्थानिक जमीनदारांना नेमले गेले व स्थानिकांनी त्यांचा फायदा पाहून ते मान्याही केले. तेच मॉडेल त्यांनी बिहारला वापरले व त्यांना जम बसवण्यासाठी स्थानिकांची मदत मिळु लागली. प्रत्यक्ष जाउन कर वसुलीपेक्षा त्रयस्थांकडून मदत केव्हांही चांगलीच होती त्यांच्यासाठी. वरील मॉडेल देशात सगळीकडे वापरले जाउ लागले. काही ठिकाणी प्रांत साहेब ते काम करु लागले. त्यांनी ज्यासुधारणा केल्या त्या तमाम भारतीय जनते साठी नव्हत्या- त्या त्यांचा बिझनेस चांगला चालावा म्हणुन केल्या होत्या.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: अविनाशकुलकर्णी

द्या रे याला पाठ्वून पारतंत्र्यात !

विटेकर
Tue, 02/03/2009 - 08:05 नवीन
संस्कृती म्हाणजे काय कळतयं का आपल्याला? प्रत्येक संस्कृतीमध्ये चांगल्या- वाईटाचे मिश्रण असते, १९२९ पर्यंत इंग्लंड मध्ये महिलांना मतदानाचा अधिकार नव्हता हे तुम्हाला माहित आहे का? चालले इंग्रजांचे गुणगान करायला....! ज्या संस्कृतीने सार्‍या जगाला शांततेची आणि सद्भावनेची शिकवण दिली त्याबद्द्ल बोलताना जरा विचार करायला हवा होता, कि उचलली जी भ लावली टाळ्याला? आपणांस आहे मरण! म्ह् णोन राखावें बरवेपण!!
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: अविनाशकुलकर्णी

तसेच, अमेरि

सुचेल तसं
Tue, 02/03/2009 - 08:38 नवीन
तसेच, अमेरिकेत ओबामांनी कार्यभार सांभाळल्यावर, स्त्रियांना पुरुषांइतकाच पगार मिळाला पाहिजे हा ठराव मांडला. (तो ठराव पास झाला की नाही ते माहित नाही.) Life is what happens to you while you are busy making other plans. -- John Lennon
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: विटेकर

मग

३_१४ विक्षिप्त अदिती
Sun, 02/01/2009 - 14:21 नवीन
मग भारतीयांनी जगाला काय दिले? संपूर्ण भारतीय बनावटीची जी.एम.आर.टी. दुर्बिण. जी.एम.आर.टी.ची वेबसाईट आणि त्यावर मराठीतला एक लेख. शून्य. इलेक्ट्रॉन्स आणि प्रोटॉन्सशिवाय अजूनही काही मूलभूत कण असू शकतील याचं प्रेडिक्शन. रामन इफेक्ट. अजून चिक्कार गोष्टी आहेत, पण टंकाळाही आहे. दोहोंचा योग्य संगम (त्यांचे विज्ञानज्ञान + आपली संस्कृती) आपल्याला जगात सर्वोत्तम करु शकते. 'गजनी' पिच्चरमधलं एक वाक्य फार आवडलं, "अमुक एक गोष्ट मी करू शकतो/ते हा विश्वास आहे; ती गोष्ट मीच करु शकतो/ते ही प्रौढी आहे आणि त्या दुसर्‍या गोष्टीची काही गरज नाही." (या वाक्यालाही भारतीय म्हणायला हरकत नाही, एका भारतीयानेच 'गजनी'चे संवाद लिहिले असावेत.) अदिती आमच्यात बौद्धीक संपदेचा कॉपीराईट घेण्याची पद्धत नाही आणि मी त्याला अपवादही नाही.
  • Log in or register to post comments

"अमुक एक

त्रास
Sun, 02/01/2009 - 15:04 नवीन
"अमुक एक गोष्ट मी करू शकतो/ते हा विश्वास आहे; ती गोष्ट मीच करु शकतो/ते ही प्रौढी आहे" ह्यासम वाक्य इंटेलिजन्स आणि विसड्म ह्यातील फरक दाखवण्यासाठी नेहमी वापरला जातो. कदाचित ह्यावाक्यात् वरील वाक्याचे मुळ दडले असावे- ""Intelligence tells you what the problem is and how to solve it, wisdom tells you whether or not you should."
  • Log in or register to post comments

दुर्बिण

त्रास
Sun, 02/01/2009 - 15:13 नवीन
"संपूर्ण भारतीय बनावटीची जी.एम.आर.टी. दुर्बिण. जी.एम.आर.टी.ची वेबसाईट आणि त्यावर मराठीतला एक लेख." मला ही प्रतिक्रीया तुम्ही जे म्हणताय ते खोडून काढण्यासाठी लिहायची नाहीए. तुम्ही दिलेला संदर्भ योग्यच आहे. पुर्वी ऋषींनी ग्रह आणि तारे ह्याचे वास्तव्य दुर्बिणींशिवाय दाखवले होते असा मा़झा समज आहे. (त्यातुनच ज्योतिषशास्त्र निर्माण झाले). समोर दिसतो तो तारा आणि तो ग्रह हा फरक दाखवू शकणारे अभ्यासूच त्याकाळचे!
  • Log in or register to post comments

मला ही

३_१४ विक्षिप्त अदिती
Sun, 02/01/2009 - 15:30 नवीन
मला ही प्रतिक्रीया तुम्ही जे म्हणताय ते खोडून काढण्यासाठी लिहायची नाहीए. सहमत. तुम्ही दिलेला संदर्भ योग्यच आहे. पुर्वी ऋषींनी ग्रह आणि तारे ह्याचे वास्तव्य दुर्बिणींशिवाय दाखवले होते असा मा़झा समज आहे. (त्यातुनच ज्योतिषशास्त्र निर्माण झाले). समोर दिसतो तो तारा आणि तो ग्रह हा फरक दाखवू शकणारे अभ्यासूच त्याकाळचे! ते तेव्हाचे ऋषी हे आजच्या दृष्टीने अभ्यासक, आणि तारे-ग्रहांपलिकडे अफाट विश्व आहे त्याचा अभ्यास करण्यासाठी एवढं प्रचंड उपकरण बांधणारे आजचे ऋषी, प्रा. गोविंदस्वरूप आणि त्यांचे सहकारी! अदिती आमच्यात बौद्धीक संपदेचा कॉपीराईट घेण्याची पद्धत नाही आणि मी त्याला अपवादही नाही.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: त्रास

ग्रीक

सुनील
Tue, 02/03/2009 - 08:29 नवीन
त्यातुनच ज्योतिषशास्त्र निर्माण झाले हे खरे नाही. बारा राशींची संकल्पना भारतीयांनी ग्रीकांकडून घेतली. आणि त्याच सुमारास चीनमध्ये एक वेगळेच खगोलशात्र विकसीत झालेले होते. Doing what you like is freedom. Liking what you do is happiness.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: त्रास

"अमुक एक

सखाराम_गटणे™
Sun, 02/01/2009 - 15:28 नवीन
"अमुक एक गोष्ट मी करू शकतो/ते हा विश्वास आहे; ती गोष्ट मीच करु शकतो/ते ही प्रौढी आहे" हे वाक्य मला ही आवडते
  • Log in or register to post comments

"अमुक एक

त्रास
Sun, 02/01/2009 - 15:41 नवीन
"अमुक एक गोष्ट मी करू शकतो/ते हा विश्वास आहे; ती गोष्ट मीच करु शकतो/ते ही प्रौढी आहे" वाक्या छान आहे. मला ते असे असते तर जास्त पटले असते- अमुक एक गोष्ट मी करू शकतो/ते हा विश्वास आहे; ती गोष्ट मीच करु शकतो/ते हाआत्मविश्वास आहे; ते दुसर्या कोणालाही करता येणार नाही, ही प्रौढी आहे
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: सखाराम_गटणे™

>> ती गोष्ट

llपुण्याचे पेशवेll
Tue, 02/03/2009 - 08:15 नवीन
>> ती गोष्ट मीच करु शकतो/ते हाआत्मविश्वास आहे; ते दुसर्या कोणालाही करता येणार नाही, ही प्रौढी आ सुधारणा आवडली... पुण्याचे पेशवे एरवी सगळे कागद सारखेच. फक्त कागदाला अहंकार चिकटला की त्याचे सर्टीफिकेट होते. Since 1984
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: त्रास

:) मस्त् रे पेशव्या

टारझन
Tue, 02/03/2009 - 08:21 नवीन
एरवी सगळे कागद सारखेच. फक्त कागदाला अहंकार चिकटला की त्याचे सर्टीफिकेट होते.
वा !!!! :) - टारझन एरवी सगळे पेशवे सारखेच. फक्त पेशव्याला खडूसपणा चिटकला की त्याचा पुण्याचा पेशवा होतो .
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: llपुण्याचे पेशवेll

णिषेध णिषेद णिशेद..

llपुण्याचे पेशवेll
Tue, 02/03/2009 - 08:50 नवीन
ही प्रतिक्रिया टार्‍याच्या अवांतर प्रतिसादाच्या यादीत नसल्याने, यादीबाहेरची प्रतिक्रिया टाकल्याबद्द्ल त्याचा जाईर णिषेद आणि त्याला वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा. (खडूस) पुण्याचे पेशवे एरवी सगळे कागद सारखेच. फक्त कागदाला अहंकार चिकटला की त्याचे सर्टीफिकेट होते. Since 1984
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: टारझन

अमुक एक

सखाराम_गटणे™
Sun, 02/01/2009 - 15:42 नवीन
अमुक एक गोष्ट मी करू शकतो/ते हा विश्वास आहे; ती गोष्ट मीच करु शकतो/ते हाआत्मविश्वास आहे; ते दुसर्या कोणालाही करता येणार नाही, ही प्रौढी आहे हेच गजनी मध्ये आहे.
  • Log in or register to post comments

ग्रेट

मराठी शब्द
Sun, 02/01/2009 - 15:44 नवीन
ग्रेट माइंडस थिंक अलाइक
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: सखाराम_गटणे™

रास्त

अनंत छंदी
Sun, 02/01/2009 - 16:00 नवीन
लेखाच्या मूलभूत गाभ्याशी सहमत
  • Log in or register to post comments

लेखावरच्य

स्वानन्द
Sun, 02/01/2009 - 17:16 नवीन
लेखावरच्या प्रतीक्रिया वाचून असं वाटतंय की हा लेख गजनी मधल्या डायलॉगबद्दल चालू आहे. असो. मूळ लेखकाचेविचार पटले. अविनाश चे विचार पूर्णपणे नाही पटले. मला वाटतं की त्यांनी संगितलेल्या गोष्टी या मुळ्च्या नाहीत तर कालानुरुप कोणी ना कोणी सोयीसाठी चालू केल्या. ज्या सतत अंगीकारल्याने संस्कृतीचा भाग बनल्या. --भारतानन्द
  • Log in or register to post comments

थोडे अविनाशरावांच्या विचारांविषयी

llपुण्याचे पेशवेll
Tue, 02/03/2009 - 08:25 नवीन
पेशवाईत नाना फडणवीसाने एका पुलाच्या बांधकामाचे वेळी पुलाचा पायाचा भराव टिकत नव्हता तेव्हा रुद्राच्या अनुष्ठानाला बसविलेले ब्राम्हण उठवून त्या खर्चात ते काम इंग्रज इंजिनयराकडून करून घेतले होते असे वाचनात आले. तसेच पेशव्यांच्या वापरातही इंग्रजानी भेट दिलेले घड्याळ होते असा उल्लेख सापडतो. तसेच कवायती फौजेचे महत्व ओळखून महादजी शिंद्यांनी मराठ्याना कवायती फौजेचे प्रशिक्षण द्यायला आणलेला फ्रेंच अधिकारी 'जनरल पेराँ' आणि त्याच्या बंगल्यावरच्या चौकीमुळे पुण्यात असलेली पेरूगेट पोलिस चौकी याणि अशा इतर अनेक खूणा सुधारणेबद्दल असलेला सकारात्मक दृष्टीकोण दाखवतात. यावरून ज्या सुधारणा ब्रिटीशानी आणल्या त्या इथली राज्यव्यवस्था आणू शकली नाही असे नाही. त्याही कदाचित पुढील काळात येऊ शकल्या असत्या. फक्त काळ जरा जास्त गेला असता इतकेच. बाकी मूळ लेखकाशी सहमत. पुण्याचे पेशवे एरवी सगळे कागद सारखेच. फक्त कागदाला अहंकार चिकटला की त्याचे सर्टीफिकेट होते. Since 1984
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: स्वानन्द

कालानुरुप सोयीसाठी चालू केल्या

त्रास
Mon, 02/02/2009 - 17:12 नवीन
"मला वाटतं की त्यांनी संगितलेल्या गोष्टी या मुळ्च्या नाहीत तर कालानुरुप कोणी ना कोणी सोयीसाठी चालू केल्या. ज्या सतत अंगीकारल्याने संस्कृतीचा भाग बनल्या." पुर्णपणे सहमत.
  • Log in or register to post comments

मिसळपाव वर स्वागत आहे.

प्रवेश करा

  • नवीन खाते बनवा
  • Reset your password
मिसळपाव.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Misalpav.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा