आज मिसळपाव वरील एक चर्चा वाचल्यानंतर हे लिहावेसे वाटले.
आपण जेव्हा २१ व्या शतकात जगायचा प्रयत्न करतो, म्हणजे नक्की काय करतो?
माझ्यामते, आपण विज्ञान-तंत्रज्ञानाने पुढारलेल्या समाजाचे प्रतिनीधीत्व करतो. हे मी आत्ता लिहीलेले तुम्ही वेबवर वाचू शकता ते त्याच वैज्ञानिक प्रगतीने.
मेडीकल सायन्स (मानवाच्या जीनचा संगणक आराखडा तयार होणे), संगणक, अंतराळ, इ अनेक क्षेत्रातील भरारी थक्क करते.
ह्यात भारतीयांचा वाटा जो काही आहे त्याबद्दल वेगवेगळी मते असू शकतील, पण सगळेच मान्य करतील की, सकाळी डोळे उघडल्यापासून "टूथपेस्ट" पासुन सुरु होणारा आपला प्रवास रात्री "लाईट स्विच-ऑफ" करे पर्यंत जे काही आपण करतो त्यात अनेक तंत्र हे मुळ भारतीय शोध नाही. पण ह्यासगळ्या झाल्या वस्तु (things). मग भारतीयांनी जगाला काय दिले?
भारतीय संस्कृतीत पुर्वीपासुनच मानवाच्या मनाचा, शरीराचा (आयुर्वेद), आरोग्याचा (योग), विश्वाचा, निसर्गाचा, जगण्यासंबधी नियमांचा (वेद), संस्कृतीचा (विवाहसंस्था, सण, शेती, काव्य, संगीत, साहित्य, काम, शिल्पकला, चित्रकला, इ) सर्वांगीण अभ्यास झाला व त्यामुळे जंगली माणूस, "मानव" झाला. ती सर्व तत्वे आजही तितकीच लागू पडतात. ती rock-solid priciples आहेत. माणूस म्हणून माणसाने कसे जगावे हेच भारतीयांनी जगाला दिले. आणि हाच तो महत्वाचा फरक मला नेहमीच पाश्चात्य आणि भारतीय संस्कृतीत दिसत आला आहे.
त्यामुळे २१ व्या शतकात जायचे असेल असेल तर त्याचा अर्थ इतर संस्कृतींची नक्कल करणे ह्यात पुढारलेपण नसुन, त्या विज्ञानात प्रगत झालेल्या समाजाने जे शोध लावले तसे नवे शोध भारतीयांनी लावायला हवेत. त्यासाठी आपली मुळ संस्कृती (वर वर्णन केलेली) सोडण्याचे प्रयोजन मला तरी दिसत नाही. दोहोंचा योग्य संगम (त्यांचे विज्ञानज्ञान + आपली संस्कृती) आपल्याला जगात सर्वोत्तम करु शकते.
सकाळी ६ वाजता आपण भजन, इ न ऐकता जर आयटम सॉंग ऐकले तर त्याचा तिटकारा येतो. "प्रेम" इश्वरावरील असेल तर ती पवित्र भक्ती असते आणि मानवाच्या देहावर असेल तर भावना असते. आपल्याला सकाळी ६ वाजता इश्वरभक्तीची आस असते; आयटम सॉंगमधून व्यक्त होणाऱ्या भावनेची नसते, हे त्या तिटकाऱ्याचे कारण असते. हे आपल्या मनाला समजते तेच भारतीय संस्कृतीचे आपल्याला देणे.
वाचने
6835
प्रतिक्रिया
21
मिसळपाव
प्रतिक्रिया
रॉक
मला असे
ईंग्रजांचे राज्य
In reply to मला असे by अविनाशकुलकर्णी
द्या रे याला पाठ्वून पारतंत्र्यात !
In reply to मला असे by अविनाशकुलकर्णी
तसेच, अमेरि
In reply to द्या रे याला पाठ्वून पारतंत्र्यात ! by विटेकर
मग
"अमुक एक
दुर्बिण
मला ही
In reply to दुर्बिण by त्रास
ग्रीक
In reply to दुर्बिण by त्रास
"अमुक एक
"अमुक एक
In reply to "अमुक एक by सखाराम_गटणे™
>> ती गोष्ट
In reply to "अमुक एक by त्रास
:) मस्त् रे पेशव्या
In reply to >> ती गोष्ट by llपुण्याचे पेशवेll
णिषेध णिषेद णिशेद..
In reply to :) मस्त् रे पेशव्या by टारझन
अमुक एक
ग्रेट
In reply to अमुक एक by सखाराम_गटणे™
रास्त
लेखावरच्य
थोडे अविनाशरावांच्या विचारांविषयी
In reply to लेखावरच्य by स्वानन्द
कालानुरुप सोयीसाठी चालू केल्या