टपोरे पाणीदार नयन, त्यावर रेघ काजळाची,
वर असे रोखून बघणे, बरे नाही
*
भिवया कोरलेल्या, शर नजरेचे घातक
ह्या पारध्यास,असे घायाळ करणे, बरे नाही
*
ओष्ट पाकळ्या गुलाबी,खट्याळ हास्य शराबि,
बहकवलेल्यास, बहकावणे साजणे, बरे नाही
*
रेशमी कुंतल,त्यावर गजरा,काय नखरा,
लाविली आग,अंगास फुलांनी, हे, बरे नाही
*
गुलाबी रेखीव जिवणी, त्याचे विभ्रमी चाळे
होतो जीव चोळा मोळा, असे करणे बरे नाही
*
तुझे अल्लड वय,वाट अशी नीसरडी
अस भेटणं वेळी अवेळी,प्रिये बरे नाही.
*
खवळला तो सागर, सुटले पिसाट वारे
तरी लोटतेस होडी वादळात ,सखे बरे नाही
| लेखनविषय: |
|---|
वाचने
1780
प्रतिक्रिया
9
मिसळपाव
प्रतिक्रिया
मला पण आज जरा बरे नाही.
गुलाबी का हिरवट?
In reply to मला पण आज जरा बरे नाही. by अभ्या..
बरं बाबा, पिवळसर
In reply to गुलाबी का हिरवट? by प्रचेतस
तो रंग दुसर्यांकडे राखीव आहे
In reply to बरं बाबा, पिवळसर by अभ्या..
शेवटचे कडवे वाचून लै
नीच मास्तराने सॉलिड काडी/होडी
In reply to शेवटचे कडवे वाचून लै by गणामास्तर
+१
In reply to नीच मास्तराने सॉलिड काडी/होडी by अभ्या..
छान आहे कविता.
काका चक्क जीवणीखाली न