Skip to main content

बरे नाही

लेखक अविनाशकुलकर्णी यांनी बुधवार, 31/08/2016 12:02 या दिवशी प्रकाशित केले.
टपोरे पाणीदार नयन, त्यावर रेघ काजळाची, वर असे रोखून बघणे, बरे नाही * भिवया कोरलेल्या, शर नजरेचे घातक ह्या पारध्यास,असे घायाळ करणे, बरे नाही * ओष्ट पाकळ्या गुलाबी,खट्याळ हास्य शराबि, बहकवलेल्यास, बहकावणे साजणे, बरे नाही * रेशमी कुंतल,त्यावर गजरा,काय नखरा, लाविली आग,अंगास फुलांनी, हे, बरे नाही * गुलाबी रेखीव जिवणी, त्याचे विभ्रमी चाळे होतो जीव चोळा मोळा, असे करणे बरे नाही * तुझे अल्लड वय,वाट अशी नीसरडी अस भेटणं वेळी अवेळी,प्रिये बरे नाही. * खवळला तो सागर, सुटले पिसाट वारे तरी लोटतेस होडी वादळात ,सखे बरे नाही
लेखनविषय:

वाचने 1780
प्रतिक्रिया 9

प्रतिक्रिया

काका चक्क जीवणीखाली न सरकल्याच्या अत्यानंदात आज काकांचा जाहीर सत्कार शनिवारवाड्यावर करावा असा प्रस्ताव मांडतो =))