उदय हुसेन - इराक चा नरराक्षस
उदय सद्दाम हुसेन.. खरे तर असल्या कुप्रसिद्ध माणसावर लेख लिहायची आणि स्वतःचे व इतरांचे मन कलुषित करायची आवश्यकताच काय, परंतु माणूस किती चरित्रहीन असू शकतो हे सांगण्यासाठी हा लेखप्रपंच.
सामान्य इराकी लोकांनी काय कुणाचे वाकडे केले आहे तेच समजत नाही. यादवी व अस्थिरता कायम त्यांच्या पाचवीलाच पुजलेली असते. माणसाला जेवढा स्वतःचा इतिहास ज्ञात आहे तेवढ्या संपूर्ण काळात त्या देशाचीच नव्हे तर त्या संपूर्ण प्रांताची हीच अवस्था आहे. सद्दाम हुसेन नि १९७९ साली जेंव्हा संपूर्ण इराक वर आपले वर्चस्व प्रस्थापित केले तेंव्हा खरे तर इराक ला बरे दिवस आले होते. सद्दाम ची राजवट बऱ्यापैकी निधर्मी होती, इराक कडे तेलाचे अमाप साठे आहेत त्याच्याच जोरावर सद्दाम ना इराक ची पश्चिमी देशांप्रमाणे प्रगती करायची होती, त्यांनी तसे प्रयत्न सुरु केले. त्यांची फक्त एकाच मागणी होती "कधीही माझ्या विरोधात जायचे नाही" जे विरोधात गेले ते या पृथ्वीतलावरून नाहीसे झाले. हे ठीक होते परंतु १८ जून १९६४ साली त्यांच्या थोरल्या चिरंजीवाचे प्रताप सहन करणे इराकी जनतेच्या नशिबात होते.
उदय हुसेन
उदय हुसेन हा सद्दाम च्या पहिल्या पत्नी साजिदा पासून झालेला मुलगा. शाळेमध्ये असताना तो कायम वर्गात पहिल्या क्रमांकाने उत्तीर्ण होई,तो खूप हुशार होता असे वाटेल परंतु तसे नाही,तो फक्त सद्दाम हुसेन चा सुपुत्र होता म्हणून त्याला १००% मार्क द्यावे लागायचे नाही दिलेत तर शिक्षकांना आयुष्यातून उठण्याची भीती. पुढे त्याने बगदाद विद्यापीठातून इंजिनीरिंग ची पदवी घेतली. तेथील शिक्षकांच्या म्हणण्यानुसार तो पास सुद्धा होत नसे. कॉलेज मध्ये असताना तो त्याची porsche गाडी बास्केटबॉल च्या कोर्टवर लावे, एकदा त्याला शिक्षकांनी एवढेच सांगितले कि "उदय गाडी तिथे लावू नकोस पार्किंग मध्ये लाव" झाले ते शिक्षक पुन्हा कधीहि कोणालाही दिसले नाहीत, हि त्याची पहिली हत्या. त्यानंतर सुरु झाला हत्या, छळ आणि बलात्काराचा न थांबणारा सिलसिला.
सद्दाम चा राजप्रासाद
अतिशय शीघ्रकोपी उध्दट व इतरांना किड्यामुंगी इतकीही किंमत न देणारा हा एक नरराक्षस होता. त्याच्याकडे शेकडोंनी आलिशान गाड्या होत्या, रोल्स रॉयस, लंबोर्गिनी... त्याला हत्यारे बाळगायची आवड होती त्यातील काही हत्यारे सोन्याची होती,उंची महागडे कपडे, शेकडो प्रकारची मद्ये, स्विस घड्याळे, क्युबन सिगार, इतकेच काय चित्ते सिंह असलेला प्राण्यांचा स्वतःचा एक झू देखील होता. वेगात गाडी चालवणे, कर्कश्य पार्ट्या करणे आणि मुली व महिला याची त्याला भलतीच आवड. तो अमली पदार्थांचे सेवनच नाही तर त्याचा व्यापार देखील करत असे. क्रूरकर्मा सद्दाम च्या राजवटीच्या मापदंडानुसार देखील तो एक राक्षस होता. ते देखील त्याला आपला वारसदार होण्याच्या लायकीचा समजत नसत. त्याचे कर्तृत्वच तसे होते तर.
He runs his own dark underworld in Iraq.
सोन्याच्या बंदुका
ऑक्टोबर १९८८ मध्ये बगदाद मध्ये इजिप्त चे अध्यक्ष होस्नी मुबारक यांच्यासाठी एक पार्टी आयोजित केलेली होती तेथे सद्दाम चे अन्न निरीक्षक व त्यांचे जवळचे मित्र कामेल ह्मा यांची उदय ने एका किरकोळ कारणावरून चाकूने पोट फाडून हत्या केली. सद्दाम नि चिडून त्याला तुरुंगातच टाकले, तीन महिने तो तुरुंगात होता. पण शेवटी बापाचं हृदय ते पाघळायला वेळ लागला नाही.
त्यानंतर १९९० मध्ये त्याला स्वित्झर्लंड मधील इराकी दूतावासामध्ये काम पाहण्यासाठी पाठवले गेले परंतु तिथे कोठेही सततच्या त्याच्या भांडणांना स्विस सरकार वैतागले आणि त्याला तेथून हाकलून देण्यात आले.
त्यानंतर या महाशयांना इराकी ऑलिम्पिक कमिटी चे अध्यक्ष केले गेले, आणि मग सुरु झाला इराकी खेळाडूंच्या छळाचा न थांबणारा प्रवास. त्याला खेळाशी काही देणे घेणे नव्हते परंतु जे खेळाडू स्पर्धांमध्ये अयशस्वी ठरतील त्यांचा तो अतोनात छळ करत असे, त्यांना तो ३ बाय ३ च्या अंधाऱ्या खोलीत डांबून ठेवत असे, त्यांना इलेक्ट्रिक शॉक देत असे, सर्व अंगात सुया खुपसायचा, प्रचंड मारहाण करायचा, फुटबॉल पटूना कॉंक्रिट च्या फुटबॉल ला जोराने लाथ मारायला लावायचा, प्रचंड शिव्या द्यायचा व जखमांवर मीठ चोळायचा, त्यांचे मुंडन करून त्यांना टॉयलेट च्या सिवेज टाकीत बुडवायचा. जेंव्हा AFC कप फुटबॉल मध्ये जपान ने इराक चा पराभव केला तेंव्हा याने त्या फुटबॉल पटुंचा एवढा छळ केला कि ते पुन्हा खेळायच्या लायकीचेच राहिले नाहीत.
छळ करायची अवजारे
तो छळ करायच्या नवीन नवीन पद्धती शोधायचा, लोकांना जिवाच्या आकांताने ओरडताना पाहून याला असुरी आनंद व्हायचा. हबीब जाफर नावाच्या एका गायकाने सांगितले कि "एकदा का तुम्ही उदय च्या नजरेत आलात कि तो काही केल्या तुमचा पिच्छा सोडत नसे. गाणे आवडले नाही कि तो मला त्रास द्यायचा, माझ्या आयुष्याची दोरी त्याचाच हातात होती, फक्त एकदाच मी इराक च्या बाहेर गेलो होतो तेंव्हाच मला सुरक्षित वाटत होते"
एकदा एका लष्करी अधिकाऱ्याची त्याने सगळ्यांसमोर हत्या केली, का तर त्याने याला सोल्युट केले नाही. असेच एका पार्टीमध्ये दुसऱ्या एका लष्करी अधिकाऱ्याची याने हत्या केली त्याचा गुन्हा एवढाच कि त्याने उदय ला त्याच्या बायको बरोबर नाचू दयायला विरोध केला. उदय ला त्याला विरोध केलेले अजिबात सहन होत नसे, तसे केले कि तो प्रचंड संतापायचा. त्याच्या तोंडून निघालेल्या शब्दाला कोणी नाही म्हणण्याची सुतराम शक्यता नव्हती. लष्करातील काही लोक त्याचा खूप तिरस्कार करीत.
तो लोकांना प्रचंड दारू प्यायला लावायचा व मग त्यांची मजा बघत बसायचा. आणि तो आपल्या या उदंड कार्याची विडिओ शूटिंग करायचा. हा उदय ला भलताच छंद. त्याने सार्वजनिक व खाजगी कार्यक्रमांचे, केलेल्या प्रत्येक गुन्ह्याचे अगदी बलात्काराचे सुद्धा विडिओ बनवले होते.
उदय त्याच्या सुरक्षा रक्षकांबरोबर महाविद्यालयाच्या बाहेर थांबायचा आणि सुंदर मुलींचे निरीक्षण करायचा आणि जी मुलगी त्याला आवडेल तिच्याकडे बोट दाखवून तिला आणायला सांगायचा आणि मग राजवाड्यात नेऊन तिच्यावर बलात्कार करायचा, त्याला जितके दिवस वाटेल तितके दिवस तिला ठेवून घ्यायचा. बगदाद च्या गल्ली बोळांमधून आवडतील त्या मुली व महिलांना तो उचलायचा. तिने विरोध केला नाही तर ठीक नाहीतर बलात्कार करून तिची हत्या करायचा. मग उदय ची माणसं ते प्रेत गाडीत घालून दूर कुठेतरी नेऊन टाकायचे. अशा प्रकारे शेकडो मुली व महिला अदृश्य झाल्या आहेत.
त्याला जाब विचारायला गेलेल्या अनेक दुर्दैवी बापाची सुद्धा त्याने हत्या केली. एकदा एका हॉटेल मध्ये एक विवाह सोहळा चालू होता नवविवाहित जोडप्याच्या दुर्दैवाने उदय तेथे आला,त्याला वधू आवडली, लगेच आपल्या माणसांना तिला घेऊन येण्याचा त्याने आदेश दिला तिला हॉटेल च्या खोलीत नेले आणि थोड्याच वेळात तिचे जीवन उध्वस्त झाले तिच्यावर अत्याचार करून हा बाहेर आला आणि वाईन पीत बसला जणू काही झालेच नाही. इकडे त्या मुलीने हॉटेल च्या ६ व्या मजल्यावरून उडी मारून आत्महत्या केली. तिच्या नवऱ्याला काय वाटले असेल याची आपण कल्पनाही करू शकणार नाही. आत्तापर्यंत अनेक सत्ताधीशांनी जनतेवर केलेल्या अत्याचारांची अंगावर शहारे आणणारी उदाहरणे पाहिलेली आहेत परंतु हा प्रकार मात्र महाभयंकर असाच होता. उदय च्या क्रौर्याला काही मर्यादाच नव्हत्या. तो उघडपणे म्हणायचा मी माझ्या बापापेक्षा क्रूर आहे.
एके दिवशी असाच एकदा बगदाद च्या रस्त्यावरून शिकार शोधत जात असताना त्याच्यावर जीवघेणा हल्ला झाला कोणीतरी त्याच्यावर एक-४७ ने १७ गोळ्या झाडल्या पण तो त्यातून वाचला पण चांगलाच जायबंदी झाला नंतर त्याला धड नीट चालत सुद्धा येत नव्हते. आता एवढे गुन्हे केल्यावर हे तर होणारच होते.
लतीफ याहिया
इराकी लष्करामध्ये त्याच्यासारखाच दिसणारा एक जवान होता त्याचे नाव " लतीफ याहिया" एकदा उदय ची माणसे लतीफ कडे आली आणि त्याला उदय कडे घेऊन गेली. उदय ने त्याला सांगितले कि तुला माझा फिदाई व्हायचे आहे म्हणजे body double. हि विनंती नव्हतीच आदेश होता पण लतीफ नाही म्हणाला, झालं त्याचा छळ सुरु झाला त्याला ३ बाय ३ आकाराच्या खोलीत लाला भडक दिवा लावून कित्येक दिवस डांबून ठेवण्यात आलं. प्रचंड मारहाण करण्यात आली तरीही तो ऐकत नाही म्हटल्यावर उदय ने त्याच्या दोन्ही बहिणींचे नाव घेतले, मग काय त्याला ऐकावेच लागले. आणि मग त्याच्या जीवनातील काळ रात्र सुरु झाली. उदय ला जीवाची भीती होती, तो लतीफ ला त्याच्या ऐवजी कार्यक्रमांना पाठवायचा म्हणजे जर तिथे कोणी हल्ला तर काय व्हायचे ते लतीफ चे होईल. उदय जनतेवर करीत असलेले अत्याचार त्याला सहन होणे अशक्य होते तो कसाबसा इराक मधून निघून इंग्लंड ला पळाला. लतीफ याहिया ने उदय चे आयुष्य जवळून पाहिलेले आहे. आजही तो जेंव्हा स्वतःचा चेहेरा आरशात पाहतो तेंव्हा उदय ला पाहून घाबरतो.
२२ जुलै २००३ हा दिवस इराकी जनतेचा आनंदाचा दिवस होता. सद्दाम ना हटवण्यासाठी अमेरिकेने इराक वर हल्ला केला तेंव्हा त्यांच्या निशाण्यावर उदय व त्याचा भाऊ कुसे हे दोघे सुद्धा होते. मोसुल येथील महालात हे दोघे लपल्याची वार्ता अमेरिकन सैन्याला मिळाली. अमेरिकन सैन्याच्या टास्क फोर्स २० या तुकडीने मोसुल च्या या बंगल्यावर हल्ला केला ४ तास चाललेल्या या चकमकी मध्ये उदय आणि कुसे हे दोघेही ठार झाले. किती आईबापांचे शाप लागले असतील त्याला. उदय ची हि सगळी पापं त्याच्या मृत्यूनंतरच जगासमोर आली
मोसुल
इराक मध्ये आनंदाचे वातावरण पसरले बगदाद मध्ये त्या रात्री फटाके फुटले. परंतु हा आनंद फार काळ टिकला नाही त्यानंतर इराक मध्ये पुन्हा यादवी माजली आणि आता तर उदय आणि सद्दाम सारखे हजारो ISIS च्या रूपाने इराक च्या जनतेच्या जीवनाचा नरक बनवण्यासाठी तयार झाले आहेत.
याला काय म्हणायचं इराकी जनतेचं दुर्दैव... दुसरं काय...

वर्गीकरण
प्रतिक्रिया
खरंच जनतेचं दुर्दैव
100% सहमत
हे सगळे प्रकार थोर अकबराने
महाभयानक, राक्षसांना सुद्धा
बापरे !!
बराचसा लेख या दोन ठिकाणी
पण मराठीत वाचायला बरं वाटलं.
पण मराठीत वाचायला बरं वाटलं.येस्स.. हेच लेखकाचे परिश्रम आहेत. या कष्टाचे आणि लेखावर घेतलेल्या मेहनतीचे श्रेय फक्त त्यांनाच आहे. यासाठी लेखकाचे भरपूर आभार्स. उदय सद्दाम हुसेन च्या बॉडी डबलची एक डॉक्युमेंट्री आहे. त्यामध्ये त्याच्या क्रूरतेची पुरेपूर माहिती मिळते. ही आणखी एक डॉक्युमेंट्री..यासाठी लेखकाचे भरपूर आभार्स.
धन्यवाद मोदक राव
हाऊस ऑफ सद्दाम ही
+१
हा सैतानांचा सैतान होता.
सुंदर माहीतिपुर्ण लेख....
एक वेगळ्या विषयावरील माहीती
उदय हुसेन बद्दल वाचले होते...
मुवि, अशा गोष्टी जगात सर्वत्र
बाकी भारताबद्दलच्या तुमच्या
बाकी भारताबद्दलच्या तुमच्या सततच्या निगेटिव्ह प्रतिसादांकडे बघताहल्ली प्रमाण वाढले आहे.हल्ली प्रमाण वाढले आहे.
तुमच्या दॄष्टीने जगातला
तुमच्या दॄष्टीने....
काही देशांची प्राथमिक माहिती
काही देशांची प्राथमिक माहिती गोळा करत आहे.स्वतः तिथे जावून राहिल्याशिवाय आणि स्वानुभवाशिवाय खात्रीलायक माहिती देवू शकत नाही.मुवी हे नक्की गंभीरपणे लिहिले आहे..? किती दिवस कोणत्या देशात घालवणार आणि त्या देशाचा भारतासारखा काळा चेहरा कसा समजणार..?मुवी हे नक्की गंभीरपणे लिहिले आहे..?
मुवी ही बहुतेकजण उत्तरभारतीय
खाली वानगी दाखल ७ गोष्टी लिहिल्या आहेत...
+१
भारताबद्दलच्या तुमच्या सततच्या निगेटिव्ह प्रतिसादांकडे बघता.....
स्वातंत्र्यानंतर ...
ह्ये एक बेणं लै खतरन्नाक होतं
आता पहा बरे सारखे दिसतायत का.
अजिबात नाही...
जवळपास. नॉट परफेक्ट.
उदय सद्दाम हुसेन च्या बॉडी डबल
द डिक्टेटर
माहितीपूर्ण
फक्त एकच मर्डर अटेम्प्ट ??
बापरे
या विषयावरची डॉक्युमेंट्री
चांगला लेख.
पुढे बुश साहेब आणि त्यांच्या
लेखाला चांगला प्रतिसाद
नॅशनल जिओग्राफिकवरची
या विषयावर एक चित्रपट सुद्धा आला होता