असं म्हणतात गझल अनुभवण्याची गोष्ट आहे. मानवी मनाचं प्रतिबिंब गझलेत कायम दिसत आलं आहे.
मीर तकी मीर, गालिब यांसारख्या कित्येक मोठ्या शायरांनी गझल रुजवली. मुघल काळात गझलेला राजाश्रय लाभला, एवढे भाग्य क्वचितच कोणत्या काव्य प्रकाराला लाभले असेल. पुढे दुष्यन्त कुमार, बशीर बद्र, निदा फाजली यांसारख्या लोकप्रिय शायरांनी हिंदुस्तानी भाषेत गझल लिहून ती अधिकच लोकप्रिय केली. आधुनिक काळात राजेश रेडडी हे नाव याच यादीत घेतलं जात. त्यांची उर्दू भाषेवर तेवढीच पकड आहे जेवढी हिंदीवर. त्यामुळे मातृभाषा उर्दू नसतांना त्यांनी उर्दू गझलेत जे मानाचं स्थान प्राप्त केलंय ते निश्चितच कौतुक करण्याजोगं आहे.
राजेश रेड्डींचा जन्म २२ जुलै १९५२ चा नागपूरचा, आकाशवाणी मधून संचालक पदावरून निवृत्त झालेल्या या जिंदादिल माणसाने १९८० च्या दशकात त्यांनी आपल्या वेगळ्या अंदाजात शेर म्हणायला सुरवात केली आणि लौकरच लोकप्रिय पण झाले आतपर्यंत त्यांचे तीन ग़झलसंग्रह हिन्दी-उर्दूत प्रकाशित झाले आहेत. ‘उडान’ (१९९६), ‘वजूद’ (२०११), ‘आस्मा से आगे’ (२०१५). राजेश रेड्डींची गझल अत्यंत सोपी आणि सुटसुटीत भाषा वापरते कदाचित त्यामुळेच आज ते दुष्यन्तकुमार यासारख्या महान गझलकारांच्या पंक्तीत विराजमान झाले आहेत. त्यांची गझल रोजच्या अनुभवातून येते. आज मिसरा, रदीफ, काफ़िये यांच्या या तांत्रिकतेच्या जंजाळातहि अत्यंत सहजपणे त्यांचे शब्द सामान्य रसिकाकडे पोचतात आणि त्याला आपलेसे वाटतात.
त्यामुळेच सामान्य माणूस रोज थकून जेव्हा घरी जातो याच वर्णन करतांना ते म्हणतात,
शाम को जिस वक़्त ख़ाली हाथ घर जाता हूँ मैं
मुस्कुरा देते हैं बच्चे और मर जाता हूँ मैं
जीवन, मैत्री, बंडखोरी, माणूस, समाज यांसारख्या विविध विषयांवर त्याने अत्यंत कुशलतेने लिहिलं आहे.
त्यापैकी काही शेर.
मनातून अहं दूर रहावा असं त्यांना वाटते.म्हणून ते म्हणतात
ये कब चाहा कि मै मशहूर हो जाऊ,
बस अपने आप को मंजूर हो जाऊ
रोज आपल्याला आयुष्यत वेगवेगळे अनुभव येत असतात कधी कधी अशी वेळ येते एक वेळ शत्रू परवडले पण मित्र नको अशी स्थिती येते, मैत्रीच्या त्याना आलेल्या प्रत्ययात ते म्हणतात
दोस्तों का ख़ौफ़ ही काफ़ी है अब
मेरे दिल से दुष्मनों का डर गया
काही झालं तरी हार न मानण्याचा, आपल्या स्वप्नांना पुन्हा जगण्याचा आशावाद त्याच्या खालच्या शेरात दिसतो, ते म्हणतात,
रोज इन आँखों के सापाने तूट जाते है तो क्या,
रोज इन आँखो में सपने सजाने चाहिए !!!
इस अहद के इन्साँ में वफ़ा ढूँढ रहे हैं,
हम ज़हर की शीशी में दवा ढूँढ रहे हैं
माझा सर्वात आवडता शेर
दोस्तों का क्या है वो तो यूँ भी मिल जाते हैं मुफ़्त
रोज़ इक सच बोल कर दुश्मन कमाने चाहिएँ
राजेश रेड्डींची गझल माणसाला कायमच विचारत करायला लावणारी आहे.
गीता हूँ कुरआन हूँ मैं,
मुझको पढ़ इन्सान हूँ मैं
अशा या माणस वाचणाऱ्या शायराला सलाम.....
वाचने
3767
प्रतिक्रिया
15
मिसळपाव
प्रतिक्रिया
शाम को जिस वक़्त ख़ाली हाथ घर
आहाहा! क्या बात!
अप्रतिम आणि समजायला सोपी भाषा
+१
In reply to अप्रतिम आणि समजायला सोपी भाषा by एस
हे नाहि कळलं
अर्धवटराव, कोणता स्वाभिमानी
In reply to हे नाहि कळलं by अर्धवटराव
छान
राजेश रेड्डींच्या गजलांचं
यशो तै उडान’ (१९९६), ‘वजूद’
In reply to राजेश रेड्डींच्या गजलांचं by यशोधरा
हि लिंक सगळ्या पुस्तकांची
In reply to यशो तै उडान’ (१९९६), ‘वजूद’ by महासंग्राम
धन्यवाद मंदार, पाहते.
In reply to यशो तै उडान’ (१९९६), ‘वजूद’ by महासंग्राम
सुंदर ओळख.
माझा सर्वात आवडता शेर आहे हा.
In reply to सुंदर ओळख. by पद्मावति
माणसं वाचणारा शायर : राजेश रेड्डी
शानदार जबरदस्त