ज्येष्ठ साहित्यिक वि. ग. कानिटकर यांचे निधन
नव्वदीचे वय. निसर्गक्रम कुणाला चुकलाय पण बातमी वाचून वाईट वाटले.
युद्धस्य कथा रम्यः म्हणतात.
तेव्हा आम्ही आठवी नववीत असू. अर्ध्या कच्च्या वयात लहाना मधले प्रौढ अशी गणना होउ लागल्यावर हातात पडलेले पहीले पुस्तक.
त्याकाळी तासगाव सारख्या ठिकाणी आम्हा सर्वांच्या घरी पुस्तके खूप असायची. भा.रा. भागवतांची फास्टर फेणे सिरियल पुस्तके,मित्रांच्या मुंजीत भेट म्हणून मिळालेली पुस्तके, श्यामची आई, इसापनिती,चादोंबा वैगेरेचे आकर्षण कमी होत असताना, 'नाझी भस्मासराचा उदयास्त' हातात पडले,सर्वच नविन होते. बघता बघता पुस्तकाचा फडशा पाडला, त्यातल्या त्यात मोठ्या असलेल्या शाम सोवनीसारख्या मित्रांबरोबर गप्पा, वादावादी असे खुप इटिरेशन्स झाले.
भस्मासूर ही उपाधीच मुळात भारतीय त्यामुळे माज आल्यावर कसा स्वतःचा सर्वनाश ओढवतो याचे चपखल उदाहरण.
आता बेढब वाटतील पण युरोप नकाशे आणि काही फोटो. दोस्त राष्ट्रे कोणती, जपान नक्की कुणाच्या बाजूचा, असा जुजुबी जी के पण वाढला होता.
तिकडे जवान जिवाची बाजी लावताहेत आणि आपण इकडे बशीभर चिवडा खात खात पुस्तके वाचतोय असा एक गिल्ट पण यायचा.
नंतर ईस्त्राईल-युद्ध, युद्ध आणि युद्धच‘ वाचून काढले पण भस्मासूर तो भस्मासूरच.
विश्वास पाटीलांचे महानायक वाचताना, (किंवा इव्हन श्री ना पेंडसेंचे ऑक्टोपस वाचताना सुद्धा) हमखास मनातला भ्स्मासूर आठवायचा
अजूनही ' रेड ऑन एन्टेबे, बॅन्ड ऑफ ब्रदर्स, ब्रिज ऑन रिव्हर क्वॉय किंवा वॉर्नर चा कोणताही युद्धपट पहताना हमखास 'नाझी भस्मासराचा उदयास्त' हे पुस्तक आठवतेच.
अशा आमचे लहानपण समृद्ध करणार्या या महान लेखकाला मानाचा मुजरा.
इश्वर त्यांच्या आत्म्यास शांती देवो.
नाझी भस्मासुराचा उदयास्त हे तर फार गाजलेलं पुस्तक आहे. त्यांना श्रद्धांजली!
ता.क.-
पण उदयास्त लिहिताना कानिटकरांनी विल्यम शिररच्या द राईज अँड फाॅल आॅफ द थर्ड राईश मधल्या माहितीचा अनुवाद केला, पण शिररच्या मूळ पुस्तकाला द्यायला पाहिजे होतं तेवढं श्रेय दिलं नाही - ही एक खटकणारी गोष्ट आहे आणि राहील. शिररच्या पुस्तकाचं नाव संदर्भग्रंथ म्हणून येतं पण उदयास्त मधला बराच भाग शिररच्या पुस्तकातून भाषांतरित केलेला आहे. विशेषतः न्यूरेंबर्ग खटल्याचं प्रकरण. कानिटकरांनी हे श्रेय द्यायला हवं होतं असं वाटतं. असो.
त्यांचे अजुन एक आवडलेले पुस्तक फार वर्षांपुर्वी वाचलेले आठवतय ,
फाळणी टाळणारा महापुरुष अब्राहम लिंकन .
महात्मा आणि महापुरुष यातला फरक तेव्हा खुप भावला होता .
कानिटकरांना श्रद्धांजली. '... उदयास्त' मध्ये कानिटकरांनी नात्झी जर्मनीच्या पाडावामध्ये तत्कालिन सोवियेत रशियाच्या भूमिकेवर तितकासा प्रकाश पाडला नाही असं ते पुस्तक वाचताना सतत वाटत राहिलं.
माझे बालपण, भा रा भागवत म्हण्जेच ज्यूल व्हर्न, एडगर राईज बरोज, इसापनीती,इंद्रजाल कॉमिक्स यानी जसे समॄद्ध केले तसे तरूण पण रत्नाकर मतकरी, फ्रेडरिक फोर्सिथ पुल, नवरे . अरूण साधु .ह मो मराठे यानी केले त्यात भर पडली, मेहता, कानिटकर , विस वाळीम्बे, दि वि गोखले यांची. माझी ही कानिटकराना आदरांजली. मला १८५७ च्या अगोदरच्या इतिहासात जायला फारसा रस नाही.
वि.ग. कानिटकर चांगले लेखक यात वादच नाही
लेखकाला मानाचा मुजरा. इश्वर त्यांच्या आत्म्यास शांती देवो.
कानिटकरांना श्रद्धांजली. '...
धाग्याशी सहमत.....
भावपूर्ण श्रद्धांजली :-(