✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव
मिसळपाव मराठी साहित्य

Main navigation

  • मुख्य पान
  • पाककृती
  • कविता
  • नवीन लेखन
  • भटकंती

सेंडॉफ नंतरची शाळा...

ब
बिपिन कार्यकर्ते यांनी
Fri, 01/30/2009 - 06:46  ·  लेख
लेख
वर्गीकरण

प्रतिक्रिया द्या
14412 वाचन

💬 प्रतिसाद (51)

प्रतिक्रिया

मस्त

घाटावरचे भट
Fri, 01/30/2009 - 06:53 नवीन
झकास. शाळेच्या आठवणी काही निराळ्याच. वा!
  • Log in or register to post comments

मस्त बिपिनदा

सहज
Fri, 01/30/2009 - 07:12 नवीन
स्नेहसंमेलन वृतांत आवडला.
  • Log in or register to post comments

झकास

नंदन
Fri, 01/30/2009 - 07:24 नवीन
वृत्तांत झकास लिहिला आहे, बिकाकाका :). प्रत्यक्ष उपस्थित राहून सहभागी झाल्यासारखं वाटलं वृत्तांत वाचताना. बाकी बोकीलांच्या 'शाळा'बद्दलची निरीक्षणं तंतोतंत!

नंदन
मराठी साहित्यविषयक अनुदिनी

  • Log in or register to post comments

मस्त्त

भाग्यश्री
Fri, 01/30/2009 - 08:06 नवीन
मस्त्त लिहीलाय वृत्तांत!! काय मजा आली असेल.. २५ वर्षांनी बॅचमेट्सना भेटायचच असं मी ठरवलंय आता! http://bhagyashreee.blogspot.com/
  • Log in or register to post comments

जरूर भेट.

बिपिन कार्यकर्ते
Sat, 01/31/2009 - 13:41 नवीन
जरूर भेट. पण त्या साठी २५ वर्षे थांबायची गरज नाही. संपर्क तुटू देऊ नका. आम्ही केलेल्या चुका तुम्ही नका करू. आमच्याच शाळेतली, आमच्या खूप नंतरची मुलं आमच्या पेक्षा खूपच जास्त ऑर्गनाइझ्ड आहेत. बिपिन कार्यकर्ते
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: भाग्यश्री

चालेल

llपुण्याचे पेशवेll
Sat, 01/31/2009 - 19:32 नवीन
चालेल चालेल आपण भेटू २५ वर्षानी म्हणजे अजून १५ वर्षानी. :) (इयत्ता १०वी तुकडी 'ब') पुण्याचे पेशवे Since 1984
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: भाग्यश्री

मस्तच!

एकलव्य
Fri, 01/30/2009 - 08:13 नवीन
संमेलनाचा हेवा वाटला... सन्मानचिह्न तर अगदी मनात भरले आहे. अतिसुंदर!!
  • Log in or register to post comments

+१,

छोटा डॉन
Fri, 01/30/2009 - 08:16 नवीन
असेच म्हणतो. एकुण वॄत्तांत आणि संभेलन झकासच ..! इतक्या वर्षांनंतर आपल्या जुन्या दोस्तांना आणि शिक्षकांना भेटण्याचा अनुभव अद्वितीयच, बर्‍याच जुन्या गोष्टींना उजाळा मिळतो. गप्पांचाही थोडक्यात गोषवारा द्यावा ही विनंती ..! अवांतर : एखादी जुनी मनात भरुन राहिलेली व हवीहवीशी वाटणारे "व्यक्ती" भेटली काय ? असल्यास तो अनुभव कसा होता ? त्यानिमीत्ताने "हळवे" वगैरे झाल्याचा अनुभव आला काय ? ------ छोटा डॉन
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: एकलव्य

व्यक्त्या......

बिपिन कार्यकर्ते
Sat, 01/31/2009 - 13:45 नवीन
व्यक्तीचं काय घेऊन बसला राव? व्यक्त्या म्हण. ;) अरे पण त्या एका दिवसात इतकं काही घडलं की सगळं इथे लिहिणं अशक्य आहे. पुढच्या वेळी आलो की 'बसू', मग बोलण्याचा फ्लो पण नीट येईल. :) बिपिन कार्यकर्ते
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: छोटा डॉन

सन्मानचिन्हात

मधु मलुष्टे ज्…
Fri, 01/30/2009 - 11:18 नवीन
सन्मानचिन्हात २५ जानेवारी २००९ ह्या ऎवजी २५ जानेवारी २०९ असे आहे का? --(सुक्ष्मदर्शी)मधु मलुष्टे ज्यु.बी.ए.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: एकलव्य

२५ जानेवारी २०९ ?

प्रमोद देव
Fri, 01/30/2009 - 11:37 नवीन
मस्त वृत्तांत. खूप दिवसांनी भेटल्यावर साचलेल्या गप्पा मारतांना एक वेगळीच अनुभूती येते.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: मधु मलुष्टे ज्यु. बी. ए.

अरे वा!

लवंगी
Fri, 01/30/2009 - 08:35 नवीन
नंदादीपचा का रे तू.. मी अ. भी. गोरेगावकरची.. आम्हीपण २०१० मध्ये भेटतोय.. सध्या शोधाशोधी चालली आहे कोण कुठे आहे त्याची..
  • Log in or register to post comments

+१

अनिल हटेला
Fri, 01/30/2009 - 08:37 नवीन
वॄत्तांत आवडेच !! बैलोबा चायनीजकर !!! माणसात आणी गाढवात फरक काय ? माणुस गाढव पणा करतो,गाढव कधीच माणुस पणा करत नाही..
  • Log in or register to post comments

+२

अवलिया
Fri, 01/30/2009 - 09:23 नवीन
मस्तच --अवलिया काय तुम्ही संपर्कासाठी व्यनी वापरता? खव नाही? अरेरे!!! मग मिपाच्या गुढ इतिहासात कशी भर टाकणार? व्यनी सोडा खव वापरा.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: अनिल हटेला

छान..

स्वाती दिनेश
Fri, 01/30/2009 - 08:51 नवीन
मस्त मजा केलेली दिसते आहे.. शाळेतले मित्रमैत्रिणी आणि शिक्षक भेटायची गंमत वेगळीच असते.. स्वाती
  • Log in or register to post comments

स्न्हेहसंमेलनाचा

मधु मलुष्टे ज्…
Fri, 01/30/2009 - 09:22 नवीन
स्न्हेहसंमेलनाचा छान वृत्तांत. सगळ्यांनी मेहनत घेऊन सर्वांना एकत्र आणलेत. त्या उत्सुकतेला सलाम ! ’शाळा’ परत वाचायाला घेतोय आज. --मधु मलुष्टे ज्यु.बी.ए.
  • Log in or register to post comments

झक्कास रे मित्रा

संदीप चित्रे
Fri, 01/30/2009 - 09:28 नवीन
मी दोन वर्षांपूर्वी एकदा पुण्याला गेलो होतो.. तिथे पोचलो आणि समजलं संध्याकाळी शाळेचा पुनर्भेट सोहळा होता... लगेच संध्याकाळी तिथे पोचलो :) खूप खूप आठवणी जाग्या केल्यास रे.... त्याबद्दल वेगळे धन्स :) 'शाळा' कादंबरी तर खासच आहे.
  • Log in or register to post comments

मस्तच. परत

दशानन
Fri, 01/30/2009 - 10:12 नवीन
मस्तच. परत जुने दिवस एन्जॉय केलेत तुम्ही.... मज्जा आली :) ******* येथे काय लिहावे ह्याचा विचार करत जागा मोकळी केली पण, अजून योग्य पंच लाइन सापडली नाही... बघतो ! काय तरी सापडले तर टंकतोच.
  • Log in or register to post comments

मस्त !

जयवी
Fri, 01/30/2009 - 10:20 नवीन
बिपिन..... तुझे अनुभव वाचून मज्जा वाटली. सन्मानचिन्ह तर खासच आहे. खूप सा-या आठवणी मनात पिंगा घालायला लागल्या. आम्ही तर दरवर्षी भेटतो. आम्ही खरं तर दहावी पास होऊन आता २९ वर्ष झाली पण दरवर्षी अगदी आवर्जून भेटतो :) त्या वयातली मैत्री किती निरपेक्ष असते ना..... ! आता इतक्या वर्षानंतर प्रचंड शारिरिक बदल झालेत सगळ्यांमधे पण "दिल" अगदी तसंच बालीश होतं जेव्हा सगळे पुन्हा भेटतो :)
  • Log in or register to post comments

मस्तच रे बिपिना!

चतुरंग
Fri, 01/30/2009 - 10:37 नवीन
फारच समर्पक शब्दात वर्णन केले आहेस. सगळा घटनाक्रम अगदी इत्यंभूत उभा केलास. तुमचं सन्मानचिन्ह अत्यंत सुबक आणि देखणं झालं आहे. ह्या सगळ्या खटाटोपाचं चीज झाल्यासारखं वाटत असेल नाही आता? आमच्याही दहावीच्या बॅचचा समारंभ २००७ च्या जून मधे झाला. मी नेमका एप्रिलमधे मेव्हण्याच्या लग्नासाठी भारतवारी करुन नुकताच परतलेलो असल्याने जाता आले नाही. फार चुटपुट लागून राहिली. प्रत्यक्ष कार्यक्रमादिवशी मी इकडून तासभर फोनवर बोललो. काय काय धमाल चालू होती त्याचा 'आंखों देखा हाल' मला ऐकवण्यात येत होता. बर्‍याच जणांशी बोललो. एकदम नॉस्टेल्जिक झालेलो. आम्ही एक स्मरणिका काढली आहे. त्यात सर्वांची माहीती, फोटोसहित जतन केली आहे. ह्या वर्षीच्या भेटीत मला ती मिळेल. तुझ्या लेखाने परत एकदा त्या आठवणी उजळल्या. शतशः धन्यवाद!! चतुरंग
  • Log in or register to post comments

मस्तच

धनंजय
Fri, 01/30/2009 - 10:44 नवीन
धावपळ झाली, कष्ट बरेच पडले तरी सफल कार्यक्रम, भेटीगाठी, सगळ्याचे फळ मिळाले. वृत्तांत आवडला.
  • Log in or register to post comments

धन्यवाद

परिकथेतील राजकुमार
Fri, 01/30/2009 - 11:27 नवीन
स्नेहसंम्मेलनात आम्हालाही सामील करुन घेतल्या बद्दल धन्यवाद :) मजा आली खुपच. |!¤*'~` प्रसाद `~'*¤!| "समर्थाचिया सेवका वक्र पाहे । असा सर्व भूमंडळी कोण आहे ।।" आमचे राज्य
  • Log in or register to post comments

छान

आनंदयात्री
Fri, 01/30/2009 - 12:12 नवीन
छान वृत्तांत लिहला आहेस बिपिनदा !!
  • Log in or register to post comments

हे खरे स्नेह सम्मेलन...!

झेल्या
Fri, 01/30/2009 - 12:27 नवीन
फारच सुरेख..! पुढील पुनर्भेटीसाठी शुभेच्छा. -झेल्या मी लिहिलेलं.. (वाचा आणि कळवा आणि इतरांना वाचवा (वाचायला सांगा..)! )
  • Log in or register to post comments

हात आणि मन...

श्रावण मोडक
Fri, 01/30/2009 - 12:37 नवीन
दोन्ही मोकळे सुटले की असे लेखन होते. सुंदर वृत्तांत. आता थोडा हात आणि मन असेच आणखी मोकळे करीत त्या औपचारिक कार्यक्रमाच्या आत-बाहेर अनौपचारीक काय-काय घडलं ते सांगा.
  • Log in or register to post comments

स्नेहसंमेलन!

शशिधर केळकर
Fri, 01/30/2009 - 12:50 नवीन
सुरेख वर्णन! मजा आली. लहानपणी भाषण ठोकणे माहीत नव्हते तुम्हाला? पटत नाही!
  • Log in or register to post comments

झकास...

प्रभाकर पेठकर
Fri, 01/30/2009 - 13:19 नवीन
बिपिनराव मजा आली सर्व वृत्तात्त वाचताना. आम्ही अकरावी वाले (१९७०). गेल्या वर्षी भेटलो होतो. २३-२४ जणं जमलो होतो. माझ्यात आमुलाग्र बदल झाल्याने कोणी ओळखले नाही. (वर्ग मैत्रिणींनी ओळखले नाही ह्याचे दु:ख फार वाटते.) आपल्या स्मृतीतील मित्र-मैत्रीणींच्या प्रतिमा त्या काळात 'फ्रिझ' झालेल्या असतात. त्या आता एकदम 'जिवंत' झाल्यावर जी तफावत जाणवते ती विचलीत करणारी नसली तरी खास सुखावणारीही नसते. मुले आजोबा झालेली नसतात पण काही मुली आज्या झालेल्या असतात. त्या वयातले हेवे-दावे, वैर, खुन्नस एव्हाना पार विरून गेलेले असते. कौतुकाचे विषय अभिमानाने आठवले जातात. मुलांमधील काही 'खास' संदर्भ पुन्हा चर्चिले जातात. गॅदरिंग च्या आठवणी. कुणा शिक्षकांचे तसेच सहाध्यायींचे हे जग सोडून जाणे मनाला चुटपुट लावून जाते. पहिल्या स्नेहसंमेलनात मन भरत नाही. लवकरच पुन्हा एकवार भेटण्याचे ठरते आणि 'मुलं-मुली' पांगतात. पण आमच्यातले आम्ही खास ५-६ टवाळ त्याही पुढे तास-दीड तास बसलो. काही शालेय जीवनातल्या काही 'खास' क्षणांना पुन्हा जगलो. त्या आठवणी आज तुमच्या लेखाने पुन्हा जिवंत झाल्या, मजा आली. धन्यवाद. निष्कर्ष म्हणजे मेंदू थकल्याचे लक्षण!
  • Log in or register to post comments

>>वर्ग

दशानन
Fri, 01/30/2009 - 13:24 नवीन
>>वर्ग मैत्रिणींनी ओळखले नाही ह्याचे दु:ख फार वाटते =)) * काका काकु मिपावर भेट देते का :? नाय जेवणाचे वांदे होतील ;) ******* येथे काय लिहावे ह्याचा विचार करत जागा मोकळी केली पण, अजून योग्य पंच लाइन सापडली नाही... बघतो ! काय तरी सापडले तर टंकतोच.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: प्रभाकर पेठकर

नि:शब्द .... भावना विवश !

वाहीदा
Fri, 01/30/2009 - 13:34 नवीन
तुझे लिखाण म्हणजे तुझ्याच शब्दात क्लासिक..., जीवघेणं..., आरपार..., शप्पथ..., वेड..., पळापळ... नि:शब्द... याच्या पलिकडे काहीच नाही :-) Teacher, please don't look at me The answer is still a mystery :-(. I'm staring into empty air, I'm sliding underneath my chair. I'm making myself very small, I wish I wasn't here at all. Teacher, teacher, pass me by, Please pick on some other guy. Teacher, teacher, call on me I know the answer, can't you see? :-) This one's a wrap, a snap, a breeze. Just look in my direction, please! I'm almost bouncing off my chair. I'm waiving both hands in the air. Teacher, teacher, ask me first, 'Cause if you don't, I think I'll burst. ~ वाहीदा
  • Log in or register to post comments

कविता छान

दशानन
Fri, 01/30/2009 - 17:54 नवीन
कविता छान आहे, पण मराठी मध्ये नाही का देता आली असती ? हरकत नाही मी नानाकडून मराठी मध्ये भाषांतर करुन घेईन. धन्यवाद. ******* वाटते खरडावे इतके की कंटाळा तुला यावा वाचता वाचता एकाएकी तोल तुझा जावा धुमसत संतापाने लाखोली तू मला वहावी त्या शिव्यांची ती खरड मी जणू स्मृतीचिन्हांपरी जपावी -
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: वाहीदा

शाळा आवडली

शंकरराव
Sun, 02/01/2009 - 05:21 नवीन
शाळा आवडली छान कल्पना :-) अर्ज है... ऍ मेरे मिपाके बंदो, तुम ना मुझसे खफा होना जो बयां किया मैने मिपा के आलम मे उसे मेरी नादानी समज़ना.... है कौनसी वो मेरी जुबान ... ये मत पुछना शंकरगालिब
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: वाहीदा

मस्त

यशोधरा
Fri, 01/30/2009 - 13:43 नवीन
मस्त लिहिलं आहे बिपिनदा!
  • Log in or register to post comments

लेख मस्तच

भडकमकर मास्तर
Fri, 01/30/2009 - 14:18 नवीन
लेख मस्तच आहे... अधिक आठवणी लिहिल्या तरी आवडतील.. "तुम्ही २५ वर्षांनी मोठे झालात, मॅच्युअर झालात तसे आम्ही पण झालो. आज मला पश्चात्ताप होतोय की मी तुम्हाला खरंच खूप मारत होते. मी तुमची सगळ्यांची हात जोडून माफी मागते." हे वाक्य वाचून मीही सेंटि झालो :( ______________________________ पायाला घाण लागू नये म्हणून जपतोस, मनाला घाण लागू नये म्हणून जप हो श्याम.... ही आमची अनुदिनी ... http://bhadkamkar.blogspot.com/
  • Log in or register to post comments

बिपिनदादा,

शाल्मली
Fri, 01/30/2009 - 15:14 नवीन
बिपिनदादा, स्नेहसंमेलनाचा वृत्तांत फारच मस्त झाला आहे. कार्यक्रमाच्या २ दिवस आधी तुम्हाला आलेली एक्साईटमेंट तुमच्या लेखातूनही जाणवत आहे. :) हा लेख वाचताना मलाही माझी शाळा, सगळ्या मैत्रिणी आणि आमच्या बाई यांची आठवण आली. तुमचं पुढचं संमेलनही लवकर होऊदे आणि आम्हाला लवकरच तोही वृत्तांत वाचायला मिळूदे.. --शाल्मली.
  • Log in or register to post comments

आता अति झालं!!

प्रियाली
Fri, 01/30/2009 - 16:18 नवीन
यालाच जखमेवर मीठ चोळणे म्हणत असावेत. ;) गेले ४ दिवस सांगते आहे की फोटो टाक. लेख आला पण फोटो नाहीत. त्रिवार निषेध!! ;) नितिनने फोटो फक्त मित्रांसाठीच खुले ठेवले आहेत. मला दिसले नाहीत.
वैद्यसर म्हणजे एकदम टेरर माणूस. कितीही उनाड, निर्ढावलेला पोरगा असो त्यांच्या समोर अतिशय गरिब बनून उभा रहायचा. त्यांची छडी खाल्ली नाही असा विद्यार्थिच नाही शाळेत.
मी नाही खाल्ली बॉ कधी!!(हं, हं! विद्यार्थीच ना, विद्यार्थिनी नाही म्हणून असावे. यालाच काही मुलगे पार्श्यालिटी असं काहीसं म्हणायचे. ;) ) मस्त छड्या खाऊनही वैद्य सर सर्वांना आवडायचे यातच काय ते आले. :)
सगळ्यात पुढे एक बेंच होता जो त्यांच्या केबिन मधून व्यवस्थित दिसायचा. आमची रवानगी त्या बेंचवर. आता यात शिक्षा कसली? तर भानगड अशी की हा बेंच मुलींच्या लायनीत होता.
हा तर माझा १० वी "अ"च्या वर्गातला बाक. तिथे बसणार्‍या प्रत्येकाकडे वैद्यसर कॅबिनमधून निघाले की सूचना देण्याचे कॉंट्रॅक्ट असे. माझ्याकडेही होते. यासाठी वर्गात वटही होती बरं का! ;) वैद्यसरांनाही हे माहित होते. ते वैतागून मला म्हणायचे की तुझ्या चेहर्‍यावर गौतम बुद्धासारखं हसू का असतं? (याचा उल्लेख गबाळ्यामध्ये आहे.) "खेडेकरसर द ग्रेट" यांच्याबद्दल वाचून गंमत वाटली. रॉड्रिग्जसर, स्वामीबाई, परुळेकरबाई, मोरेसर इ. आहेत का शाळेत? आले होते का? स्वाती होती का? सुशील वालावलकर आणि मनिषाही होतेना तुमच्याच बॅचला. मला तिचे आडनाव का नाही आठवत देवजाणे.. असो. तू फोटो दाखव आणि मगच पुढे बोल माझ्याशी.
  • Log in or register to post comments

मिळाले

बिपिन कार्यकर्ते
Sat, 01/31/2009 - 14:19 नवीन
मिळाले फोटो? मी बोललो नितिनला. :) आणि सविस्तर वृत्तांतपण पाठवला आहे. बिपिन कार्यकर्ते
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: प्रियाली

मिळाले. :-)

प्रियाली
Sun, 02/01/2009 - 02:36 नवीन
हो, नितीनने ऑर्कुटात ऍड केल्याने सर्व फोटो दिसले. मस्त आहेत. खूप जुन्या आठवणी जाग्या झाल्या. सर्व शिक्षक थकलेले, वृद्ध झालेले पाहून किंचित वाईटही वाटले. :(
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: बिपिन कार्यकर्ते

.

ऍडीजोशी (verified= न पडताळणी केलेला)
Fri, 01/30/2009 - 16:52 नवीन
भारीच हो :)
  • Log in or register to post comments

क्या बात है !

प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
Fri, 01/30/2009 - 18:09 नवीन
वृत्तांत आवडला ! च्यायला माझ्या बॅचचे मित्र / मैत्रीणी कुठे असतील आता ? असा विचार डोकावून गेला. फोटो टाका राव !
  • Log in or register to post comments

मस्तच

शितल
Fri, 01/30/2009 - 18:34 नवीन
बिपीनदा, शाळेतील सवंगडी आणि शिक्षकांची पुर्नभेट आवडली :) एकदम सेन्टी करून टाकलेस:)
  • Log in or register to post comments

बिपिनदा

विसोबा खेचर
Fri, 01/30/2009 - 18:57 नवीन
बिपिनदा जियो..! लेख वाचून हळवा झालो! तात्या.
  • Log in or register to post comments

सही.... :)

वल्लरी
Sat, 01/31/2009 - 14:05 नवीन
शाळेचे दिवस काही औरच असतात ना... :) शाळेच्या आठवणी ताज्या झाल्या ... हा,,हा ,, म्हणता शाळा सोडुन १०वर्ष झाली याची अचानक जाणीव झाली.... लेख खुप खुप छान... ---वल्लरी
  • Log in or register to post comments

मस्तच!

शक्तिमान
Sat, 01/31/2009 - 14:12 नवीन
मस्तच!
  • Log in or register to post comments

धन्यवाद...

बिपिन कार्यकर्ते
Sat, 01/31/2009 - 14:25 नवीन
सर्व वाचकांचे आणि प्रतिसाद देणार्‍यांचे आभार. 'शाळा' हा विषय सर्वांच्याच जिव्हाळ्याचा आहे. :) बिपिन कार्यकर्ते
  • Log in or register to post comments

:)

मनस्वी
Sat, 01/31/2009 - 18:42 नवीन
मस्त मजा आली वाचायला. १० वी अ ब क (१९८३-८४), तुमचे सगळ्यांचे अभिनंदन.
  • Log in or register to post comments

फारच छान

रेवती
Sat, 01/31/2009 - 22:10 नवीन
फारच छान लेख! .....पण हा झाला कार्यक्रमाचा आढावा! बारकाव्यांनिशी पुढचा भाग (लोकाग्रहास्तव) कधी टाकणार? रेवती
  • Log in or register to post comments

आठवण

मयुरा गुप्ते
Sun, 02/01/2009 - 01:37 नवीन
अशीच एक आठवण तुमचा लेख वाचुन झाली....... आमच्या शाळेचा ठाण्याच्या मो ह विद्यालयाचा शतक महोत्सव झालेला १९९५ मध्ये.तेव्हा सर्व आजी माजी विद्यर्थ्याना आमंत्रण दिले होते. उद्घाटन सोहळ्याला वि वा शिरवाड्कर प्रमुख पाहुणे होते. तेव्हा माझे आजोबा आणि त्यांचे वर्ग बंधु -भगिनी (१९१८-१९२८ /१९२९) ह्यांचा अविस्मर्णीय कार्यक्रम झाला होता. आमचा शिरवाड्करांच्या कविते वर एक कार्यक्रम होता.'हसरा नाचरा जरासा लाजरा सुंदर साजरा श्रावण आला' ह्या कवितेवर. छान धोतर कोट ,नववारी लुगड घातलेले वर्ग मित्रांचे स्नेहसंमेलन फारच छान होते. त्याच वर्षि शतक सोहळा समाप्ती ला मा.बाबुजी ना आमंत्रित केले होते. दोन्ही मान्यवरां कडुन स्म्रुती चिन्ह दिल गेलं. छान लेख लिहुन आठवणींना चाळवल्या बद्दल धन्यवाद. मयुरा
  • Log in or register to post comments

छान लेख

चित्रा
Sun, 02/01/2009 - 03:04 नवीन
शाळेतल्या आठवणी खूपच छान. >'शाळा' हा विषय सर्वांच्याच जिव्हाळ्याचा आहे. हे अगदी खरे.
  • Log in or register to post comments

वा!

प्राजु
Sun, 02/01/2009 - 03:45 नवीन
बिपिनदा, खूप हळवं केलंस रे! वृत्तांत वाचताना आम्ही तो सोहळा अनुभवत आहोत असंच वाटत होतं. तुझ्या मनाच्या गाभार्‍यात ज्या आठवणी तू जपून, पूजुन ठेवल्या आहेस, त्या आठवणींना उजाळा मिळाल्यावर त्यांची लकाकी नक्कीच वाढली असणार यात शंकाच नाही. त्यातून तुझी लेखन शैली. समोर एखादं नाटक पहावं तसं वाटलं. सामंत बाईनी माफी मागून एकदम सेंटी होणं... माझा का गळा एकदम दाटून आला समजलं नाही. आम्ही १९९४ सालाच्या दहावीच्या बॅचचं स्नेहसंमेलन १९९९ ला केलं होतं. त्यानंतर मात्र कधी नाही जमलं. तुझ्या लेखामुळे एक नवी उर्मी मिळाली. आता भारतात जाण्याचा उद्देश हाच असेल माझा हे नक्की. सुंदर आणि मन भारून टाकणारा लेख. - (सर्वव्यापी)प्राजु http://praaju.blogspot.com/
  • Log in or register to post comments

खरच सुन्दर

अमोल नागपूरकर
Wed, 02/11/2009 - 17:12 नवीन
खरच सुन्दर लेख. मनात खूप आठवणी जाग्या झाल्यात.
  • Log in or register to post comments
  • 1
  • 2
  • ›
  • »

लेखन करा

लेखन करा

मिसळपाव वर स्वागत आहे.

प्रवेश करा

  • नवीन खाते बनवा
  • Reset your password
मिसळपाव.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Misalpav.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा