Skip to main content
मिसळपाव

Main navigation

  • मुख्य पान
  • पाककृती
  • कविता
  • भटकंती
  • नवीन लेखन
Submitted by दिपाली पोटे on Mon, 08/29/2016 - 16:32
लेखनविषय (Tags)
वावर
लेखनप्रकार (Writing Type)
प्रकटन

हुश्श. दररोजची माझी सीट पकडली आजपण. समोरची ओळखीचे हसली. तसे तिचे तिरकस हसणे सोडून तिच्या बद्दल मला काहीच माहित नाही मात्र सकाळी तिचे दर्शन नाही झाले तर दिवसाची चांगली सुरुवात होत नाही असा माझा वेडा समज आहे. नवरा, सासू, आई आणि दररोजची ट्रेन मधली सखी साऱ्यांना फोन लावून सगळे ठीक आहे तपासून घेतले. शांत होते कुठे ते पुढचे स्टेशन आले. आणि दुसरी फौज चढली ट्रेन मध्ये. कोण कुठे उतरणार चौकशी करून आपापल्या सीट राखून ठेवल्या. मग पुढचे स्टेशन आणि तिसरी फौज, आणि अशा ट्रेन मध्ये फौजा चढू लागल्या आणि उतरू हि लागल्या. खारघर ला एक हिरकणी चढते, आणि फर्मान सोडते खारघर, नेरूळ, कोपर्रखैराने...मग जी मावळण उतरणार असेल ती इशारा करते आणि ही शांत होते. आणि मग सुरुवात होते सगळ्याचे किस्से ऐकायला.
माझा ट्रेन मध्ये ग्रुप नाही. मुद्दामून नाही केला. मला आवडत नाही म्हणून नाही तर ट्रेन मधला वेळ हा फक्त माझा असावा म्हणून. कारण सकाळ संध्याकाळ घरच्यांचे करताना मला माझा असा वेळच नसतो. सकाळी सगळे करा, ऑफिस मध्ये पण अप टू डेट रहा आणि संध्याकाळी पण घरच्यांचे करा यात मी कुठेच नसते. दररोज प्रश्न पडतो का करायचे हे सारे मी. का नाही स्वतःला वेळ द्यायचा. मला आवडते मस्त बिछान्यावर पडून तास न तास पुस्तक वाचायला, एखादा मस्त 80 तला सिनेमा पाहताना क्रोचे करायला, मस्त गरमागरम भजी खाताना गाणी ऐकायला.....पण असे काही करायला मिळतच नाही. मग चिडचिड होते, माझेच नशीब वाईट म्हणून बोलणे होते..
मग हळूहळू ट्रेन मधल्या गप्पा कानावर येऊ लागतात..घरोघरी च्या मातीच्या चुली जाणवू लागतात.. ट्रेन मधल्या आम्हा प्रत्येकीला वाटत राहते की मीच फक्त एवढा त्रास सहन करून या आयुष्यातल्या धावण्याच्या शर्यतीत उतरलं आहेे. पण मग पटते की इथे प्रत्येक जणीला एक इतिहास आणि भूगोल आहे. इतिहासात बाजी नी घोडखिंड अडवली आणि महाराज विशाळगडावर पोहोचले मात्र इथे दररोज आम्ही आपापली घोडखिंड लढवत असतो आणि इथे एक नाही घरातल्या प्रत्येक शिवाजी च्या विशाळगडावर पोहोचण्याची वाट पाहत असतो. तिथून फोन ची इशारत आली की आम्ही बाजींच्या लेकी निश्वास सोडतो पुन्हा संध्याकाळची घोडखिंड लढायला...

  • Log in or register to post comments
  • 8008 views

प्रतिक्रिया

Submitted by मोदक on Mon, 08/29/2016 - 16:41

Permalink

जब्बरदस्त पोटेंशिअल असणारा

जब्बरदस्त पोटेंशिअल असणारा धागा... वाचतो आहे..
  • Log in or register to post comments

Submitted by अजया on Mon, 08/29/2016 - 16:47

Permalink

फार छान लिहिलंय. पहिलं स्टेशन

फार छान लिहिलंय. पहिलं स्टेशन पनवेल की काय!
  • Log in or register to post comments

Submitted by बोका-ए-आझम on Mon, 08/29/2016 - 17:56

In reply to फार छान लिहिलंय. पहिलं स्टेशन by अजया

Permalink

बोरिवली, विरार, कर्जत

कुठलंही असू शकतं. सगळ्याच लोकल गाड्यांचे पीक अवरचे प्रवास म्हणजे हाल आहेत. लेख उत्तम. अजून वाचायला आवडेल.
  • Log in or register to post comments

Submitted by अजया on Mon, 08/29/2016 - 18:28

In reply to बोरिवली, विरार, कर्जत by बोका-ए-आझम

Permalink

खारघर ला एक हिरकणी चढते, आणि

खारघर ला एक हिरकणी चढते, आणि फर्मान सोडते खारघर, नेरूळ, कोपर्रखैराने..
यावरून हो! शिवाय रोज बसायला मिळतंय!
  • Log in or register to post comments

Submitted by एस on Mon, 08/29/2016 - 17:00

Permalink

छान आहे.

बायकोला विचारून प्रतिसाद देतो.
  • Log in or register to post comments

Submitted by सस्नेह on Mon, 08/29/2016 - 17:25

Permalink

छान लिहिले आहे. आणखी लिहा.

छान लिहिले आहे. आणखी लिहा.
  • Log in or register to post comments

Submitted by जव्हेरगंज on Mon, 08/29/2016 - 18:18

Permalink

हेच म्हणतो . मस्त लिहीलंय!

हेच म्हणतो . मस्त लिहीलंय!
  • Log in or register to post comments

Submitted by कपिलमुनी on Mon, 08/29/2016 - 18:23

Permalink

बाजीप्रभूच्या प्रतीक्षेत

बाजीप्रभूच्या प्रतीक्षेत ! काही स्पेसीज ना स्वतःचा काम ग्लोरीफाय करायला आवडता . त्यातला लेख आहे.
  • Log in or register to post comments

Submitted by गणामास्तर on Mon, 08/29/2016 - 19:56

In reply to बाजीप्रभूच्या प्रतीक्षेत by कपिलमुनी

Permalink

काही स्पेसीज ना स्वतःचा काम

काही स्पेसीज ना स्वतःचा काम ग्लोरीफाय करायला आवडता एकदम बरोबर मुनिवर ! आता मोदींचच बघा की. .
  • Log in or register to post comments

Submitted by संदीप डांगे on Mon, 08/29/2016 - 20:59

In reply to बाजीप्रभूच्या प्रतीक्षेत by कपिलमुनी

Permalink

आणि काही स्पीसीज ना गुपचूप

आणि काही स्पीसीज ना गुपचूप तंगड्या पसरुन आरडरी सोडायला आवडतं.. =))
  • Log in or register to post comments

Submitted by पक्षी on Mon, 08/29/2016 - 18:36

Permalink

स्वीट अँड शॉर्ट

वाह, खुपच छान लिहिलं आहे...
  • Log in or register to post comments

Submitted by अमितसांगली on Mon, 08/29/2016 - 20:46

Permalink

मस्त लिहलय.......

खुप छान......
  • Log in or register to post comments

Submitted by अभिदेश on Mon, 08/29/2016 - 20:51

Permalink

मला वाटलं

की 'बाजी' चित्रपटातल्या बाजीच्या मुली .... वाटलं बापरे बाजीचा पुढचा भाग येतीय की काय...हुश्श्य ... तास काही नाहीये..
  • Log in or register to post comments

Submitted by साधा मुलगा on Mon, 08/29/2016 - 21:22

Permalink

लेख आवडला

मला आवडत नाही म्हणून नाही तर ट्रेन मधला वेळ हा फक्त माझा असावा म्हणून. कारण सकाळ संध्याकाळ घरच्यांचे करताना मला माझा असा वेळच नसतो.
असा वेळ परत येताना जास्त चांगल्या पद्धतीने वापरता येतो. अर्थात घरी लवकर यायची घाई नसेल तर. मी कित्येकदा असा एख्याद्या दादर लोकल मध्ये बसून मिपावरचे कित्येक लेख वाचले आहेत. दिवसभर काम करून संध्याकाळी एखादी अशी मोकळी लोकल पकडायची, पटकन जाऊन खिडकीची जागा पकडायची, मग चणे-शेंगदाणे किंवा भेळवाला येतो, आणि मग मस्तपैकी एखादा 'मोसाद'चा नवीन भाग वाचायचा, सुख म्हणजे वेगळे काय असतं!! अवांतर : बोका भाऊ 'मोसाद' चा पुढील भाग कधी?
  • Log in or register to post comments

Submitted by अभिजीत अवलिया on Tue, 08/30/2016 - 06:59

Permalink

सकाळ संध्याकाळ घरच्यांचे

सकाळ संध्याकाळ घरच्यांचे करताना मला माझा असा वेळच नसतो. -- कधी तरी ऑफिसला जायला म्हणून घरातून बाहेर पडा आणी ऑफिस मध्ये फोन करून 'आजारी आहे येऊ शकत नाही' असे सांगा. आणी तो दिवस तुम्हाला हवा तसा घालवा.
  • Log in or register to post comments

Submitted by चंपाबाई on Tue, 08/30/2016 - 07:58

Permalink

...

पनवेल ते दादर बसचा मार्ग सुंदर आहे.... ट्रेनपेक्षा बस प्रेफर करतो
  • Log in or register to post comments

Submitted by नाखु on Tue, 08/30/2016 - 08:22

In reply to ... by चंपाबाई

Permalink

ट्रेनपेक्षा बस प्रेफर करतो

ट्रेनपेक्षा बस प्रेफर करतो मग नाव का बाई माणसांच घेतलं बुवा तुम्ही? अखिल मिपा डु आय्डीचा उगम आणि वंशावळी निरिक्षण संघ
  • Log in or register to post comments

Submitted by चंपाबाई on Tue, 08/30/2016 - 09:06

In reply to ट्रेनपेक्षा बस प्रेफर करतो by नाखु

Permalink

....

तुकाई , ज्ञानाई , हातिमताई या सगळ्या स्त्रीया होत्या का ?
  • Log in or register to post comments

Submitted by पक्षी on Tue, 08/30/2016 - 15:46

In reply to .... by चंपाबाई

Permalink

अगदी बरोबर चंपाबाई

अगदी बरोबर चंपाबाई
  • Log in or register to post comments

Submitted by बोका-ए-आझम on Tue, 08/30/2016 - 16:37

In reply to ट्रेनपेक्षा बस प्रेफर करतो by नाखु

Permalink

चंपा हे पुरुषाचं नाव असू शकतं.

पाहा - माझे खाद्यजीवन - पु.ल.देशपांडे. मुगभाटात एकेकाळी चंपाचे हाटेल होते. चंपा हे पुरूषाचे नाव आहे. इथल्यसारखी बटर बिस्किटे त्रिभुवनात मिळत नसावीत. हे बिस्किट चहाच्या कपात असे फुगून येत असे की हंटलेपामरने चंपाच्या पायाशी बसून ते शिकावे. -(पुराव्याने शाबीत करणारा हरितात्या) बोका-ए-आझम.
  • Log in or register to post comments

Submitted by नाखु on Wed, 08/31/2016 - 08:54

In reply to चंपा हे पुरुषाचं नाव असू शकतं. by बोका-ए-आझम

Permalink

बोकाभाऊ

इथे सुनो चंपा सुनो तारा हा प्रश्न नाहीच्च है मुळी, पुढे बाई का लावावे लागले त्याचा उल्गडा त्यांनी.. तुकाई = तुका-आई यांचा संयोग होऊन तुकाई ज्ञानेश्वारांनाही माऊली असे संबोधले जातेच आणि वरील सर्व उदाहरणातील @@ई हा आई या अर्थछटा दाखवणारा आहे इअतकाच माझा बापड्याचा समज आहे. बिरूटे सरांचा,आणि रंगाण्णांचा भाषेविषयक अभ्यास असल्याने त्यांनी निराकरण करावे हि विनंती.. (सध्या मिपावर शंकासमाधानाचे वारे वाहत आहे,तेव्हा संधीचा फाय्दा घेणे हा मिपा वाचकाचे कर्तव्य्च आहे) मिपा वाचक नाखु
  • Log in or register to post comments

Submitted by सिरुसेरि on Wed, 08/31/2016 - 22:05

In reply to चंपा हे पुरुषाचं नाव असू शकतं. by बोका-ए-आझम

Permalink

बटर बिस्किटे

पोटात चिकटा धरणारी बटर बिस्किटे आठवली . नोकरदार स्त्रियांचे रोजचे जीवन दाखवणारा छान लेख .
  • Log in or register to post comments

Submitted by अजया on Tue, 08/30/2016 - 16:37

Permalink

चंपाई=)))

चंपाई=))) चंपाई पनवेलीत असतात की काय! माझ्या माहितीत निघायच्यात हां!
  • Log in or register to post comments

Submitted by संदीप डांगे on Tue, 08/30/2016 - 18:17

In reply to चंपाई=))) by अजया

Permalink

व फोटो नाही बघितला का त्यांचा

व फोटो नाही बघितला का त्यांचा, अमिताभ बच्चन सोबत, चंपाबाई म्होटी हस्ती बाबा!
  • Log in or register to post comments

Submitted by मुक्त on Wed, 08/31/2016 - 08:39

In reply to व फोटो नाही बघितला का त्यांचा by संदीप डांगे

Permalink

म्होटी हस्ती

म्होटी हस्ती
द्विरुक्ती झाली.
  • Log in or register to post comments

Submitted by संदीप डांगे on Wed, 08/31/2016 - 10:33

In reply to म्होटी हस्ती by मुक्त

Permalink

=))

=))
  • Log in or register to post comments
Profile picture for user गामा पैलवान

Submitted by गामा पैलवान on Tue, 08/30/2016 - 18:06

Permalink

स्त्रीलिंगी ओकारान्ति क्रियापदे

नाखु, आमच्या ठाण्याच्या घरी शकू कोळीण यायची. ती 'मी आलो, मी जातो, आता बसलो होतो' वगैरे भाषा बोलायची. चंपाबाई तशीच दिसतेय. आ.न., -गा.पै.
  • Log in or register to post comments

Submitted by नीलमोहर on Tue, 08/30/2016 - 18:25

Permalink

:)

छान लिहिलेय, पुलेशु
  • Log in or register to post comments

Submitted by पैसा on Tue, 08/30/2016 - 18:26

Permalink

लेख आवडला

तुम्ही छान लिहिता आहात. जरा मोठा लेख येऊ दे.
  • Log in or register to post comments

Submitted by निओ on Tue, 08/30/2016 - 22:40

Permalink

बाजीच्या लेकींना

बाजीच्या लेकींना एक कडक सॅल्यूट !
  • Log in or register to post comments

Submitted by रुपी on Wed, 08/31/2016 - 00:05

Permalink

छान लिहिले आहे.. बाकी

छान लिहिले आहे.. बाकी प्रतिसादांशी सहमत.. अजून मोठे लेख येऊ द्या :)
  • Log in or register to post comments

Submitted by रुस्तम on गुरुवार, 09/01/2016 - 18:31

Permalink

खारघर, नेरूळ, कोपर्रखैराने

म्हणजे पनवेल ठाणे फास्ट ट्रेन का?
  • Log in or register to post comments

Submitted by निखिल निरगुडे on Mon, 09/05/2016 - 06:13

Permalink

मस्त!

बाजींच्या लेकींना मुजरा.... तुम्ही आहात म्हणून अनेक शिवाजी आहेत आणि स्वराज्य शाबूत आहे!
  • Log in or register to post comments

प्रवेश करा

  • नवीन खाते बनवा
  • Reset your password

© 2026 Misalpav.com