Skip to main content

कळले मला ना........

लेखक मानसी मनोजजोशी यांनी शुक्रवार, 30/01/2009 16:13 या दिवशी प्रकाशित केले.
कळले मला न केव्हा तूझ्यात गून्तले मी पापणीत साठले पाणी प्रीतीत नाहले मी ओठ जरा थरथरले अंग अंग शहारले नकळत सारे घडले पण गूपित तुला कळले कळले मला न केव्हा मेघ दाटून आले नयनात जमली स्वप्ने रात्रीत जागले मी गीत जरा स्मरले सप्तसूर जूळले तूझ्या डोळ्यात पाहून मलाच मी विसरले कळले मला न केव्हा फूल उमलून आले आसवांची झाली फूले गंधात दंगले मी
लेखनविषय:

वाचने 1485
प्रतिक्रिया 2

प्रतिक्रिया

वाह ... तूझ्या डोळ्यात पाहून मलाच मी विसरले कळले मला न केव्हा फूल उमलून आले खुप सुन्दर लाइन आहे.

गून्तले हे कदाचित गुंतले असे हवे बाकी कविता अप्रतिम