Skip to main content

कळले मला ना........

लेखक मानसी मनोजजोशी यांनी शुक्रवार, 30/01/2009 16:13 या दिवशी प्रकाशित केले.

कळले मला न केव्हा तूझ्यात गून्तले मी
पापणीत साठले पाणी प्रीतीत नाहले मी

ओठ जरा थरथरले अंग अंग शहारले
नकळत सारे घडले पण गूपित तुला कळले
कळले मला न केव्हा मेघ दाटून आले
नयनात जमली स्वप्ने रात्रीत जागले मी

गीत जरा स्मरले सप्तसूर जूळले
तूझ्या डोळ्यात पाहून मलाच मी विसरले
कळले मला न केव्हा फूल उमलून आले
आसवांची झाली फूले गंधात दंगले मी

लेखनविषय:

वाचने 1498
प्रतिक्रिया 2

प्रतिक्रिया

वाह ...
तूझ्या डोळ्यात पाहून मलाच मी विसरले
कळले मला न केव्हा फूल उमलून आले

खुप सुन्दर लाइन आहे.