आपुन पद्या. जग आपल्याला पद्या म्हणतं. का म्हणतं? WE DONT NO.
आपल्याला ल्ह्यायला भौतेक जमणार नाय. आपुन निसता हिंडतो. सायबाला फोन करुन "सायेब कामधंदा कसा काय चाललाय?" म्हणून इचारतो. आपुन सायबाचे फेवरेट. आपल्याशिवाय लाईन चालणारंच नाय. आपल्याला मशनीतलं सगळं जमतं. नुसतं चालवतंच नाय. नट बोल्ट खोलून मेंटेनस बी ठेवतो.
दुपारी आपण कन्वेयरच्या साईडला झोपतो. सायेब काय बोलत नाय. आपण सायबाचे फेवरेट.
चार दिवस सुट्टी मारायची तर आपुन आठ दिवस मारतो. तवा सायेब बोंबलतं. आपुन ऐकूण घेतो. पण आपण सायबाचे फेवरेटंच.
आपण गँगचे लीडर. पोरांना काय दुखलं खुपलं, आपण निस्तारतो.
सकाळी उठलो. दात घासलं. आंघुळ केली. आपण पेश्शल खादी वापरतो. दत्ताच्या देवळात जाऊन नामाटी वढली. सकाळी सातच्या आत कंपनीत हाजर.
मशीन पुसली. सायेब आलं. सायबाला म्हणलं, सायेब पगारवाढ द्या. सायेब म्हणला बघतो. म्हणलं मग बघ.
मशनीवर जॉब आणलं. वळीनं लावलं. शेटींग केलं आणि बसलो मारत. पुडी काढली. मळून खाल्ली. छावीला चार म्यासेज टाकले.
आपली येक छावीपण हाय. आजून तिला कधी बघितलं बी न्हाय. पण आपुन रातरात बोलतो. कधी म्हणते मंबईला हाय. कधी नाशिक. तर कधी तिकडं पार कोल्हापुरची. अशा लय झाल्यात पर ही लय दिवस टिकून हाय.
आपण चायना मोबाईल कानाला लाऊन पोरांना जाळत बसतो. आपलाबी ब्यालन्स लय जळतो. एकदा मीटर लागलं की आपण गायछापला महाग.
दिवसभर काम केलं.
संध्याकाळी सायबाला म्हणलं, सायेब बाय बाय,
मग सायेब बी म्हणलं, बाय बाय रे भावा.
रात्री उशिरा आपण चौकात जातो. वश्या आणि सोम्या आपल्या बरोबर आसतात. मोबाईलची रिंगटोन वाजवत पुलावर बसलो. छावीनं मिसकॉल द्यायला सुरु केलं. मग आकड हाणत माणसात जाऊन "पुना करतू, आता जरा बीजी हाय" म्हणून फोन कट केला. सोम्या 'परत चलै' म्हणून बोंबलंत होता. मग त्येचाच 'गोवा' खाऊन पिचकाऱ्या मारत बसलो. वश्या आपला शेपटासारखा जाईल तिकडं मागं असतो. फिरत फिरत मग जेवण करुन रात्री अकरा बाराला रुमवर गेलो. मग छावीसंगं बोलत दोन वाजोस्तोर टेरेसवर. कधी कधी तर रात रात जागून तसाच कंपनीत जातो.
सकाळी उठलो. दात घासलं. आंघुळ केली. पेश्शल खादी. दत्ताच्या देवळात नामाटी. सातच्या आत कंपनीत हाजर.
मशीन पुसली. सायेब आलं. सायबाला म्हणलं, सायेब पगारवाढ?
सायेब म्हणला, बघतो.
आता सहा महिनं होत आलं. कसला बघतूय पुच्चीचा.
आपण गँगचे लीडर. बाळ्याला म्हणलं, 'याक्वा'ला जा. आपल्या वळखीवर. तिकडं पर डे जास्त हाईत.
पण बाळ्या गेला नाय. शम्नं सालं.
तंबाखू काढली. छावीला चार म्यासेज टाकले. सुपरवायझरला म्हणलं, कंत्राट दुसरीकडं लावा. परवडत न्हाय. तो म्हणला, आता हितंच आय घालायची. तिकडं जाऊन कुणाकुणाचं XXXXX.
सुपरवायजर हांडगा आहे.
सायबानं मला सकाळी सकाळी झाडास्नी पाणी द्यायचं काम लावलं. नळी घीऊन सगळी कंपनी पालथी घातली. हे येगळं काम होतं. म्हणलं हे बरंय. पण दस्तुरखुद्द पद्माकरला हे आसलं बुळगांड काम देऊन सायबानं बरं न्हाय केलं. म्हणलं त्येजायचा पुच्चा. आपल्याला हे कामंच नगं. मग घोगऱ्याला फोन लावला. घोगऱ्या आपला मेन कंत्राटदार. म्हणलं, घोगरे सायेब. आपुन 'ठिस्को'त जातो. हितं काय परवडत न्हाय. बुलून बघा तितल्या एच्चारला.
घोगऱ्या म्हणला, येवढा सीझन काढ. मग तुला आपल्या मेन हाफीसला घेतो. फुल एसीतलं काम.
म्हणलं हेज्याबी आयचा पुच्चा. गेलं चार वर्षे हेच ऐकतोय.
दुपारी पोरं जमवली. म्हणलं उद्या कुणीबी कामावर यायचं न्हाय. कुणी दिसलं तर गेटवरंच कापून टाकतो. पगारवाढ करुनंच घ्यायची. पोरंबी उसाळली. जंगी संप करायचा ठरवून टाकला.
मग बार भरुन सायबाकडं गेलो. म्हणलं, सायेब जेवण झालं का?
सायेब म्हणाला, मस्त मस्त.
मग आपणबी कॉलर टाईट करुन तिथून सटाकलो.
छावीला फोन लावला. जनरेटरच्या बाजूला टेकून निवांत बोलत बसलो. तिकडून एच.आर. येताना दिसला. लांबूनच उभ्या उभ्या माझा फोटो काढला. आणि निघून गेला.
दस्तुरखुद्द पद्माकरचा फोटो? म्हणलं बघतोच याला. एखादा रॉड बीड दिसतोय का बघितलं. मग तावातंच हॉफिसमधे गेलो. एच.आर.म्हणला, "हिकडे रे, हिकडे ये तू, उद्यापस्नं कामावर फोन आणायचा न्हाय. न्हायतर जप्त करीन"
म्हणलं, सायेब घरचा फोन हुता.
तो म्हणला, आता आमाला XXXX शिकवू नको.
संध्याकाळी रुमवर गेलो. चौकात भटकलो. रिंगटोन वाजवत फिरत फिरत टेरेसवर. मग छावीला फोन. शेवटी झोपलो.
सकाळी उठलो. दात घासलं. आंघुळ केली. पेश्शल खादी. दत्ताच्या देवळात नामाटी. सातच्या आत कंपनीच्या गेटवर हाजर.
सगळी पोरं आलती. म्हणलं, कुणीबी आत जायचं न्हाय. गेटवर बसायचं.
पोरं म्हणली, आता नगं. बघू नंतर. कडकी चालूय.
म्हणलं ह्यांनाच गरंज न्हाय तर आपण आपली कशाला घासा. ह्यांच्याबी XXX XX.
मग कंपनीत गेलो. मशीन पुसली. जॉब आणलं. वळीनं लावलं. शेटींग केलं. मारत बसलो. पुडी काढली. मळून खाल्ली. छावीला चार म्यासेज धाडून दिले.
मग सायेब आलं. सायबाला म्हणलं, गुड मॉर्निंग.
सायेब म्हणला, व्हेरी गुड मॉर्निंग.
वाचने
17993
प्रतिक्रिया
77
मिसळपाव
प्रतिक्रिया
वोव!
मस्त
शिव्या देऊच नये ह्या मताचा मी
+1 पण shopfloor ला असचं
In reply to शिव्या देऊच नये ह्या मताचा मी by अभ्या..
:(
In reply to शिव्या देऊच नये ह्या मताचा मी by अभ्या..
lol
लसूण नाव का दिलं
बाकी अर्ध समजून घ्या की
In reply to लसूण नाव का दिलं by लालगरूड
arrrr कळलं
In reply to बाकी अर्ध समजून घ्या की by गणामास्तर
व्यक्तिचित्रण जबराचं ! शॉप
अभ्याराजे आणि इतर
जव्हेरभाव अशा शिव्या वाचून
In reply to अभ्याराजे आणि इतर by जव्हेरगंज
संस्कृतीरक्षक!
In reply to जव्हेरभाव अशा शिव्या वाचून by अभ्या..
ज्ञानात भर!
*घाकून!
In reply to ज्ञानात भर! by साती
+१००
In reply to ज्ञानात भर! by साती
जव्हेर भाऊ,
शिव्या. ..
In reply to जव्हेर भाऊ, by अभिजीत अवलिया
+१
In reply to शिव्या. .. by मुक्त
पद्माकरगंज भाऊंची कथा
खूब भालो...
खल्लास लिहिलंय हो जव्हेरभाऊ!!
पदम्जी
In reply to खल्लास लिहिलंय हो जव्हेरभाऊ!! by कैलासवासी सोन्याबापु
वास्तवदर्शी आणि ओघवतं लिखाण.
जहबहरी....!!! आवडली
खास जव्हेरगंज टैप :)
सहमत आहे.
In reply to खास जव्हेरगंज टैप :) by संदीप डांगे
कैच्याकै कॉमेंट! मस्तराम
In reply to सहमत आहे. by प्रभाकर पेठकर
मिपा समाज.
In reply to कैच्याकै कॉमेंट! मस्तराम by कैलासवासी सोन्याबापु
मस्तरामच्या कथा ज्येष्ठांसमोर
In reply to सहमत आहे. by प्रभाकर पेठकर
100 टक्के सहमत संदीप.
In reply to मस्तरामच्या कथा ज्येष्ठांसमोर by संदीप डांगे
ब्वाॅररर..
In reply to 100 टक्के सहमत संदीप. by अभ्या..
स्वतंत्र विभाग.
In reply to मस्तरामच्या कथा ज्येष्ठांसमोर by संदीप डांगे
भारीच... लसूण म्हटल्यावरच
भारी
ग्वाल्हेरकरांचा हत्ती चौफेर उधळलाय!!
मस्त लेख, 2 वर्ष शॉप फ्लोअरवर
कथेचे नाव बघुन शंका आली होती.
मस्त हो जव्हेरभाउ !!! .
जबरदस्त..!! _/\_
लेखन अस्सल आहे. अभ्याच्या
+१ प्रतिसादाशी सहमत.
In reply to लेखन अस्सल आहे. अभ्याच्या by उडन खटोला
शीर्षकही पूर्णच टाकायला हवं
ह्यावर इथे चर्चा करत नाही,
ललित लेखनात शिव्या असाव्यात
In reply to ह्यावर इथे चर्चा करत नाही, by संदीप डांगे
डांगेसाहेब
In reply to ललित लेखनात शिव्या असाव्यात by मुक्त
लेख सापडला नाही,
In reply to डांगेसाहेब by मुक्त
try
In reply to लेख सापडला नाही, by संदीप डांगे
शीर्षक जबराट..
तुमचं नाव वाचून लेख उघडला की ...
खर तर तुमच लेखन आवडत मला. पण
लय भारी जव्हेर भाऊ,अगदी
लसुण
दर्जा....
मस्त हो...जव्हेरगंज
छान, इतका निरागसपणा सर्वत्र
In reply to मस्त हो...जव्हेरगंज by मयुरा गुप्ते
क्लास.
:-)
कडक
बहोत खूब लिखे हो. एकदम
भारी..लैच भारी...
मस्त!! आवडलं!
सही !!!
मस्तं लिहिलय. शॉप फ्लोरावर
एकदम जबरदस्त
झ्याक!
लेखात शिव्या आल्यामुळे शंभरी
मस्तच लिहिलय. मनात आलेले
एरवी मला शिव्या खटकतात पण
राहू द्याच!
In reply to एरवी मला शिव्या खटकतात पण by पिलीयन रायडर
सातींना विचारा.
In reply to एरवी मला शिव्या खटकतात पण by पिलीयन रायडर
"सायबाला फोन करुन "सायेब
जबरदस्त
ही ही ही !!
आणि हो,
गूगल करुन बघा
जग्गात एक नंबर...