Skip to main content

गुलाबाचे काटे

लेखक पुष्कराज यांनी बुधवार, 28/01/2009 18:50 या दिवशी प्रकाशित केले.
तुझे माझे गुलाबाचे जुळ्लेच नाही नाते गुलाबाच्या गंधाहून काट्याचीच ओढ वाटे मैत्री मध्ये आपुल्या या भांडणच होती फार रुसुनिया कित्येकदा शब्दांचीच मारामार गुलाबाचे फुल देता काटे तुला बोचतात शब्द तुझे प्रेममय रातदिन टोचतात शब्दाविना फुलाविना तुझे माझे आहे नाते म्हणुनच गुलाबाच्या काट्यांचीही ओढ वाटे
Taxonomy upgrade extras
लेखनविषय:

वाचने 1178
प्रतिक्रिया 1

प्रतिक्रिया

शब्दाविना फुलाविना तुझे माझे आहे नाते म्हणुनच गुलाबाच्या काट्यांचीही ओढ वाटे. खुप र्च सुन्दर . फार आवडल्या ह्या ओळी......!