लेखककेडीयांनी मंगळवार, 26/07/2016 17:19 या दिवशी प्रकाशित केले.
एयर फ्रायर पाककृती ह्या शृंखलेतला हा शेवटचा लेख. एयर फ्रायर पाककृती बद्दल माहितीचा दुवा इथे वाचा. ह्या आधी दिलेल्या काही निवडक पाककृती खालील प्रमाणे :-
१. पिझ्झा क्रस्ट कृटॉन्स
२. मसाला मटार
३. भरलेला पापलेटसाहित्य
१/२ किलो चिकन विंग्स (पंखांचे २ तुकडे)
२ ते ३ मोठे चमचे रेड चिल्ली साँस
१/२ कप मैदा
२ चमचे टोमॅटो साँस
४ ते ५ लसूण पाकळ्या, बारीक चिरून
२ ते ३ चमचे व्हिनेगर
२ चमचे कुटलेली काळीमिरी
३ चमचे काश्मिरी लाल मिरची पावडर
१ पाकीट मिक्सड हर्ब्स (पिझ्झा बरोबर आलेलं सीझनिंग)
१ मोठा चमचा बटर
१ चमचा तेल किंवा ऑईल स्प्रे
चवीनुसार मीठ
कृती
चिकन स्वच्छ धुवून विंग्स कोरडे करून घ्या. चिकन ला २ चमचे काश्मिरी मिरची पावडर, १ चमचा मीठ आणि मिक्सड हर्ब्स लावून ठेवून द्या. एका प्लास्टिक च्या पिशवीत(झिपलॉक) मैदा, काळीमिरी पावडर आणि किंचित मीठ घालून ते सगळं नीट एकत्र करून घ्या. चिकन पिशवीत घालून पिशवी चे तोंड बंद करून पिशवी हलवून घ्या. विंग्स ना मैदा लागला पाहिजे.
विंग्स ताटात काढून साधारण २० मिनिटे फ्रिज मध्ये ठेवा.
एयर फ्रायर १८० डिग्री वर ५ मिनिटे प्रि-हिट करून घ्या. विंग्स ला दोन्ही बाजूने ऑईल स्प्रे मारून घ्या. विंग्स एयर फ्रायर मध्ये ठेऊन २५ ते ३० मिनिटे फ्राय करून घ्या अधून मधून बास्केट हलवून घ्या. विंग्स पूर्ण शिजले आहेत की नाही ते तपासून (काट्याने किंवा सुरीने टोचून), मग एयर फ्रायर २०० डिग्री ला सेट करून विंग्स अजून २ ते ३ मिनिटे लावा. ह्याने बाहेरील आवरण कुरकुरीत होईल.
विंग्स होत असे पर्येंत हॉट साँस करून घ्या.
एक पॅन मध्ये १ मोठा चमचा बटर गरम करून घ्या. त्यात बारीक चिरलेला लसूण घालून २ मिनिटे परतून घ्या. आता पॅन मध्ये चिली साँस, टोमॅटो साँस आणि व्हिनेगर घालून एकजीव करा. ह्यात १ चमचा काश्मिरी लाल मिरची पावडर आणि चवीनुसार मीठ घाला. साँस घट्ट होत आला की गॅस बंद करून त्यात चिकन विंग्स घालून व्यवस्थित घोळवून घ्या.
गरम गरम क्रिस्पी हॉट विंग्स सर्व्ह करा!
मस्तच. मी असेच चिकन लॉलिपॉप पण करते. मस्त लागतात एकदम. त्यात मी cornflour, बारीक चिरलेला लसुण, आले, हिरवी मिरची, सोया सॉस, रेड चिली सॉस, अंडे आणि मिठ टाकुन marinate करते. नंतर silver foil ठेवुन त्यावर लॉलिपॉप ठेवुन फ्राय करायचे.
प्रतिक्रिया
रेसिपी छान
तुम्ही कुठला एयर फ्रायर वापरता?
In reply to रेसिपी छान by पगला गजोधर
बरोबर. मी सगळे एअर फ्रायर चेक
In reply to तुम्ही कुठला एयर फ्रायर वापरता? by केडी
खतरनाक..
सही
ते पनीरवाले बाबा, सध्या त्रास देत नाहीत...
दिवाळी पर्येंत
In reply to ते पनीरवाले बाबा, सध्या त्रास देत नाहीत... by मुक्त विहारि
ओके
In reply to दिवाळी पर्येंत by केडी
पेस्टिज चा २.५ लिटर ४६०० ला
In reply to ओके by मुक्त विहारि
मस्त...
कसला कातील फोटू आहे......
मस्तच. मी असेच चिकन लॉलिपॉप
चायनीज भेळ
वाह, आयडिया भारी आहे
In reply to चायनीज भेळ by सप्तरंगी
हो, नूडल्स एअरफ्राय करून घेतल्या
In reply to वाह, आयडिया भारी आहे by केडी
झक्कास.....
In reply to हो, नूडल्स एअरफ्राय करून घेतल्या by सप्तरंगी
बाब्बो
पाकृ एकदम स्लssssssर्प आहे !
घ्यावा लागणार असं दिसतंय....
मस्त मस्त..