✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव
मिसळपाव मराठी साहित्य

Main navigation

  • मुख्य पान
  • पाककृती
  • कविता
  • भटकंती
  • नवीन लेखन

मी आयफोन-कर

व
विश्वेश यांनी
Sun, 08/14/2016 - 00:08  ·  लेख
लेख
तुम्हाला कोण व्हायचे आहे आयफोन-कर, एनड्रोइड-कर कि विंडोज-कर ... आता तुम्हाला आयफोन-कर व्हायचं का? जरूर व्हा. आमचे काही म्हणणे नाही. पण मुख्य सल्ला असा, की पुन्हा विचार करा अगदी आग्रहच असेल, तर मात्र कंबर कसून तयारी केली पाहिजे, आणि एकदा तयारी झाली, की त्या सारखी मजा नाही ,तुम्हाला सांगतो. पहिली गोष्ट म्हणजे- कसलाही न्यूनगंड बाळगू नका. आणि प्रत्येक फोन च्या फिचर वरून मतभेद करायला शिका. म्हणजे आपल्या फोन मध्ये आहे का, आपल्या फोनमधील फिचरचा दर्जा काय, एकूण उपयोग काय, याचा अजिबात विचार न करता मत ठोकून द्यायचं. म्हणजे आता "स्मार्ट-फोन खरा कसा असला पाहिजे?" या विषयावरती, आपण फ़क़्त फोन करणे, लघु संदेश करणे इतकाच फोन वापरता, हे विसरून मत ठणकावता आले पाहिजे. स्मार्ट-फोन खरा कसा असला पाहिजे? - ठोका. दिवसातून एकदा तरी "स्टीव जॉब्स होता तेव्हा ..." हे म्हणायलाच पाहिजे. हे वाक्य म्हणायला वयाची अट नाही. इथे म्हणजे दहा वर्षाचा मुलगा सुद्धा चाळीशीच्या अनुभवाचे गाठोडं असल्यासारखं ते चारचौघांपुढे उघडत असतो. त्यामुळे "च्यायला, स्टीव जॉब्सच्या वेळी हे असलं नव्हतं" हे वाक्य कॉलेज, ऑफिस, दुर्गा, के एफ सी, सी सी डी, आणि युरो किड्स, कुठेही ऐकायला मिळेल, "स्टीव जॉब्सच्या वेळी ते तस नव्हतं!" आयफोन-कर व्हायला कसल्यातरी गोष्टीचा जाज्ज्वल्य अभिमान हवा- नुसता नाही, जाज्ज्वल्य अभिमान. मग तो अगदी स्टीव्ह जॉब्स चा, किंवा एपल चाच असला पाहिजे असे काही नाही. म्हणजे आपण आयफोन किती महाग घेतला, किती वेळ रांगेत उभे होतो, सीम कार्ड कसे कट केले ह्या पर्यंत कुठल्याही गोष्टीचा असला तरी चालेल. पण जाज्ज्वल्य अभिमान हवा. मतभेद व्यक्त करायला या जाज्ज्वल्य अभिमानाची फार मदत होते. म्हणजे ब्लू-टूथ किवा डाऊनलोडच्या ऐवजी, आय-ट्युन्स मधून उगाच गाणी विकत घेणे, वायरलेस सिन्क सतत करणे, एस डी कार्ड च्या ऐवजी आय-क्लाऊड वर गोष्टी ठेवणे - अशी त्या त्या अभिमानाची नीट वाटणी करता येते आपल्याला. आपला मतभेद केवळ खासगी मध्ये व्यक्त करून आयफोन-कर थांबत नाहीत. अधून मधून फेसबुक वर, आपल्या ब्लोग वर आयफोन बद्दल स्तुती लिहावी लागते इतर ओ एस चा अपमान करावा लागतो. इमेल ला मुद्दाम "सेंट फ्रॉम आयफोन !" अशी स्वाक्षरी द्यावी लागते. त्यासाठी लेखनाची स्वातंत्र्य शैली कमवायची, हे अत्त्यंत आवश्यक आहे. थोडक्यात म्हणजे आयफोन-कर व्हायचं असेल, तर म्हातारपणा पर्यंत सगळे सोफ्टवेअर आणि अभिमान विकत घेऊन वापरणाच्या दिशेने वाटचाल करायच धोरण सांभाळावे लागते.
वर्गीकरण
लेखनविषय (Tags)
विनोद
लेखनप्रकार (Writing Type)
मत

प्रतिक्रिया द्या
8114 वाचन

💬 प्रतिसाद (29)

प्रतिक्रिया

हा हा... मस्त

नेत्रेश
Sun, 08/14/2016 - 01:08 नवीन
चांगले जमले आहे. - पुर्वाश्रमीचा आयफोन-कर, सद्ध्याचा एनड्रोइड-कर
  • Log in or register to post comments

:-)))

मिसळपाव
Sun, 08/14/2016 - 01:38 नवीन
जम्या, जम्या! टिपः माझा आयडी 'मिसळपाव' असला, मिपाच्या बाल्यावस्थेत तत्कालीन चालकांच्या संमतीने घेतलेला, तरी मी एक सामान्य सभासद आहे. या आयडीचा आणि या संस्थळाच्या चालकांचा / संपादकांचा काहीही संबंध नाही.
  • Log in or register to post comments

हाहाहा! पण थोडक्यात आटोपलेत.

एस
Sun, 08/14/2016 - 08:20 नवीन
हाहाहा! पण थोडक्यात आटोपलेत. जरा एकदोन किस्सेबिस्से टाकायचे ना आयफोनकरांचे.
  • Log in or register to post comments

एका नवीन बाँड सिनेमात आहे

कंजूस
Sun, 08/14/2016 - 08:43 नवीन
एका नवीन बाँड सिनेमात आहे म्हणतात किस्सा आइफोनवरून प्रिंटरला फाइल सेंड करून प्रिंट करण्याचा.
  • Log in or register to post comments

आय फोन का मजा तुम क्या जानोगे

सतिश गावडे
Sun, 08/14/2016 - 10:07 नवीन
आय फोन का मजा तुम क्या जानोगे एंड्रोइड और विंडोज बाबू. आय फोनमध्ये आयच्या प्रेमाचा जिव्हाळा आहे, जो एंड्रोइड और विंडोज फोनमध्ये नाही.
  • Log in or register to post comments

आइचा अहम आहे तो.दादा कोंडकेची

कंजूस
Sun, 08/14/2016 - 10:17 नवीन
आइचा अहम आहे तो.दादा कोंडकेची आय नव्हं. मान'सापरीस एनढ्रं बरी.
  • Log in or register to post comments

ये आय-फोन क्या हय?

मुक्त विहारि
Sun, 08/14/2016 - 10:43 नवीन
सध्या तरी आमच्याकडे नोकियाचे जुने मॉडेल आहे आणि ते अद्याप तरी बोलणे-ऐकणे व्यवस्थित करत आहे. शिवाय सुडोकू पण आहे आणि बोनस म्हणून घड्याळ आणि ते पण अलार्म सकट. शिवाय ते पोकेमॉन सारखी भानगड नाही आणि लगेच चार्ज होतो. शिवाय चार्जिंग टिकते पण २-३ दिवस. (अज्ञानी) मुवि
  • Log in or register to post comments

टॉर्च नै का त्यात?

टवाळ कार्टा
Tue, 08/16/2016 - 02:22 नवीन
टॉर्च नै का त्यात?
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: मुक्त विहारि

टॉर्च पण आहे....

मुक्त विहारि
Tue, 08/16/2016 - 15:56 नवीन
पण जास्त वापरायची वेळ येत नाही.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: टवाळ कार्टा

हाहाहा !

गामा पैलवान
Sun, 08/14/2016 - 12:25 नवीन
समोरचा फोन विंडोज किंवा सिम्बियनचा असला तरी 'तुमच्या अँड्रॉईडछाप फोनचं ...' अशा तुकड्याने संभाषणाची सुरुवात करावी. मात्र फार डिटेलमध्ये जाऊ नये. नाहीतर कोणी अँड्रॉईडवाला तुम्हाला रूट अॅक्सेस मिळवायचे सत्राशेसाठ प्रकार ऐकवेल. वर तुमचा फोन कारामुक्त (=जेलब्रोकन) आहे का असंही विचारेल. ही मात्र खरोखरंच आणीबाणीची परिस्थिती आहे. अशा वेळेस 'कारामोचन करून काय माझ्या आयफोनास जनरल अँड्रॉईडछाप बनवू का', असं बोलून एक तु.क. टाकावा. -गा.पै.
  • Log in or register to post comments

मस्त..

योगी९००
Sun, 08/14/2016 - 13:03 नवीन
मस्त लेख जमलाय.. हा प्रतिसाद ही खूपच छान..!!!
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: गामा पैलवान

ब्लॅकब्री ची सर कुणालाच नाही

कंजूस
Sun, 08/14/2016 - 13:39 नवीन
ब्लॅकब्री ची सर कुणालाच नाही हे आइफोनवालेही जाणून असतात.त्या दुख:वर मीठ म्हणून एक मि डॅालरस मोजून हॅकरकडून आरोपीचा आइफोन ब्रेक करवून घेतला न्यु पोलिसांनी.
  • Log in or register to post comments

लेख आवडला

बेकार तरुण
Mon, 08/15/2016 - 07:15 नवीन
लेख आवडला
  • Log in or register to post comments

आय-ला!

सरनौबत
Mon, 08/15/2016 - 10:46 नवीन
आय-ला! मस्त जमलाय लेख
  • Log in or register to post comments

मस्त.

मराठी_माणूस
Mon, 08/15/2016 - 10:54 नवीन
मस्त. बाकी हे दुर्गा काय आहे ?
  • Log in or register to post comments

बहुतेक हॉटेल आहे या नावाचं

असंका
Mon, 08/15/2016 - 11:17 नवीन
बहुतेक हॉटेल आहे या नावाचं टिळक रोड वर...(पुणे..)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: मराठी_माणूस

झक्कास लिहिलंय, विश्वेशभाऊ,

चौथा कोनाडा
Mon, 08/15/2016 - 17:37 नवीन
झक्कास लिहिलंय, विश्वेशभाऊ, म्हन्जे मस्तच जमलंय ! बघुयात तुमच्या लेखणीतून कोण कोण बाहेर येतयं ! पुलेप्र !
  • Log in or register to post comments

मस्तच..

निर्धार
Mon, 08/15/2016 - 23:38 नवीन
छान लेख.. पुलेप्र
  • Log in or register to post comments

जमलय जमलय

श्रीरंग_जोशी
Mon, 08/15/2016 - 23:51 नवीन
=)) बाकी आम्हा बीबी१० वाल्यांची याबाबत भूमिका म्हणजे, "आग लगे बस्ती में, हम अपनी मस्ती में". - रंगा करवंदीकर
  • Log in or register to post comments

करवंदी नाय हो

चतुरंग
Tue, 08/16/2016 - 00:54 नवीन
"काळीबेरी" ;) (एकदशकापूर्वीकाळीबेरीलाचिप्सपुरवणारा)रंगा
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: श्रीरंग_जोशी

तेच ते

श्रीरंग_जोशी
Tue, 08/16/2016 - 01:19 नवीन
तेच ते =)) .
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: चतुरंग

हेहेहे!

पैसा
Tue, 08/16/2016 - 13:39 नवीन
मस्त लिहिलंय! पण थोडक्यात आवरतं घेतलंत!
  • Log in or register to post comments

मस्त जमलाय..

चिनार
Tue, 08/16/2016 - 13:55 नवीन
मस्त जमलाय.. अजून वाचायला आवडेल.. आमची स्मार्ट फोनची व्यथा खालील दोन लेखात मंडळी आहे.. http://www.misalpav.com/node/27462 http://www.misalpav.com/node/36533
  • Log in or register to post comments

आमची स्मार्ट फोनची व्यथा

चिनार
Tue, 08/16/2016 - 13:55 नवीन
आमची स्मार्ट फोनची व्यथा खालील दोन लेखात मांडली* आहे
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: चिनार

छान जमलंय.

गिरिजा देशपांडे
Tue, 08/16/2016 - 14:41 नवीन
छान जमलंय.
  • Log in or register to post comments

आय-ट्युन्स मधून उगाच गाणी

अनुप ढेरे
Tue, 08/16/2016 - 16:50 नवीन
आय-ट्युन्स मधून उगाच गाणी विकत घेणे,
च्यायला, पायरसी न करता गाणी विकत घेणे याबद्दल थट्टा?
  • Log in or register to post comments

मस्त

मी-सौरभ
Wed, 08/17/2016 - 12:55 नवीन
कल्पना विस्तार मस्त केलाय. अजुन थोडा मोठा लेख असता तर जास्त मज्जा आली असती.
  • Log in or register to post comments

मी आयफोन-कर..............मी

अविनाशकुलकर्णी
Wed, 08/17/2016 - 17:30 नवीन
मी आयफोन-कर..............मी आयप्याड -कर
  • Log in or register to post comments

तुम्हाला कोण व्हायचे आहे आयफोन-कर, एनड्रोइड-कर कि विंडोज-कर

बब्बा
Wed, 08/17/2016 - 17:49 नवीन
मुंबईकर, पुणेकर कि नागपूरकर ह्या पु ल च्या मूळ कथाकथानातील...... "पुणेकर" ह्या स्वभावविशेषाचा छान वापर केलाय.
  • Log in or register to post comments

लेखन करा

लेखन करा

मिसळपाव वर स्वागत आहे.

प्रवेश करा

  • नवीन खाते बनवा
  • Reset your password
मिसळपाव.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Misalpav.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा