यापूर्वीचे लेखनः
अमेरिकन अध्यक्षीय निवडणुक-२०१६ (भाग २)
नमस्कार मंडळी,
१८ जुलैपासून ओहायो राज्यात क्लिव्हलँड येथे रिपब्लिकन पक्षाचे राष्ट्रीय अधिवेशन सुरू झाले. या अधिवेशनात डॉनल्ड ट्रम्प यांची पक्षाचे उमेदवार म्हणून अधिकृतपणे निवड झाली. आजच डॉनल्ड ट्रम्प यांनी इंडिआना राज्याचे गव्हर्नर माईक पेन्स यांची उपाध्यक्षपदाचे उमेदवार म्हणून निवड जाहिर केली.
हे अधिवेशन त्यामानाने बरेच वादग्रस्त ठरत आहे.अशा अधिवेशनांमध्ये पक्षाचे यापूर्वीचे अध्यक्ष आणि अध्यक्षपदाचे पराभूत उमेदवार आवर्जून उपस्थित असतात.पण माजी अध्यक्ष जॉर्ज बुश थोरले आणि धाकले या दोघांनीही या अधिवेशनास उपस्थित राहणे टाळले.२००८ मधील पराभूत उमेदवार जॉन मॅककेन आणि २०१२ मधील पराभूत उमेदवार मिट रॉमनी यांनीही अधिवेशनापासून आपल्याला दूर ठेवले. केवळ १९९६ मधील पराभूत उमेदवार बॉब डोल उपस्थित होते. अध्यक्षपदासाठीच्या उमेदवारीच्या शर्यतीत असलेले ओहायो राज्याचे गव्हर्नर जॉन कॅसिक अधिवेशन स्वतःच्याच राज्यात होत असूनही तिथे फिरकले नाहीत.नोव्हेंबरमध्ये अध्यक्षपदासाठीच्या निवडणुकांबरोबरच एक तृतीयांश सिनेटच्या जागांसाठीही मतदान होणार आहे.ज्या सिनेटरना मतदारांना सामोरे जायचे आहे त्यापैकी बरेच गैरहजर राहिले.डॉनल्ड ट्रम्पबरोबर खूप जवळीक दाखवली तर त्याचा आपल्या निवडून यायच्या शक्यतेवर परिणाम होईल अशी भिती त्यांना वाटली असे बोलले जात आहे.टेक्ससचे सिनेटर टेड क्रुझ यांनी ट्रम्प यांना उघडपणे 'एन्डोर्स' केले नाही.याबद्दल त्यांचे भाषण चालू असताना काही प्रमाणावर आरडाओरडाही केला.या सगळ्या प्रकारामुळे रिपब्लिकन पक्ष एकत्रपणे निवडणुकांना सामोरा जाणार का हा प्रश्न नक्कीच उभा राहिला आहे.
त्याचप्रमाणे वेल्स फार्गो बँक, मोटोरोला, जे.पी मॉर्गन इत्यादी पारंपारिक प्रायोजकांनीही अधिवेशनाकडे पाठ फिरवली.
भाप्रवे आज सकाळी उपाध्यक्षपदाचे उमेदवार म्हणून माईक पेन्स यांनी उमेदवारी स्विकारत असल्याबद्दलचे अधिकृत भाषण प्रथेप्रमाणे केले. त्यात त्यांनी इस्लामिक स्टेट प्रणित इस्लामिक दहशतवादाविरूध्द खंबीर पावले उचलणारा अध्यक्ष हवा असेल तर डॉनल्ड ट्रम्प यांना मत द्या असे आवाहन करून 'पोलिटिकली करेक्ट' बोलायची परंपरा मात्र खंडित केली.हे नक्कीच उल्लेखनीय आहे.
अधिवेशनाच्या पहिल्या दिवशी डॉनल्ड ट्रम्प यांच्या पत्नी मेलानिआ ट्रम्प यांचे भाषण झाले.त्यांचे हे भाषण २००८ मध्ये मिशेल ओबामांनी केलेल्या भाषणाचीच कॉपी होती असे अनेक ठिकाणी म्हटले जात आहे आणि त्यात तथ्यही आहे.मेलानिआ ट्रम्प या युगोस्लाव्हियात जन्मलेल्या आहेत.इतकी वर्षे अध्यक्षपदाच्या उमेदवाराबरोबरच त्यांचा 'स्पाऊस' सुध्दा जन्माने अमेरिकन नागरिक असावा लागतो असे मला वाटत होते. पण तसे काही नाही असे दिसते.
भाप्रवे उद्या सकाळी डॉनल्ड ट्रम्प यांचे अध्यक्षपदाची उमेदवारी स्विकारत असल्याचे भाषण होईल.ते नक्की काय म्हणतात याकडे लक्ष लागले आहे.
डेमॉक्रॅटिक पक्षाचे राष्ट्रीय अधिवेशन पेन्सिल्व्हेनिया राज्यात फिलाडेल्फिया या ऐतिहासिक महत्वाच्या शहरात २५ ते २८ जुलै रोजी होणार आहे.या अधिवेशनात २६ जुलै रोजी (भाप्रवे २७ जुलै रोजी सकाळी) बिल क्लिंटन यांचे तर २७ जुलै रोजी (भाप्रवे २८ जुलै रोजी सकाळी) अध्यक्ष बराक ओबामांचे भाषण होणार आहे. दोन्ही भाषणे नक्कीच ऐकायची आहेत.
एकूणच या निवडणुका रंगतदार होत आहेत. एकूणच सर्वत्र प्रस्थापित राजकीय व्यवस्थेबाहेरचा कोणी उमेदवार आला की तेवढ्यापुरता तो उमेदवार मोठ्या प्रमाणावर मते घेऊ शकतो.डॉनल्ड ट्रम्प यांना हा फायदा नक्कीच घ्यायची संधी आहे. ते कधी सिनेटर वगैरे सोडाच कुठल्या म्युनिसिपालटीच्या निवडणुकांसाठीही उभे राहिलेले नाहीत.त्यामुळे राजकीय क्षेत्रात पूर्वी केलेली पापे हात धुऊन त्यांच्यामागे लागायची शक्यता नाही.हिलरींंनी इराक युध्दाच्या बाजूने मत दिले आणि सिरियात घोडचूक केली हे मुद्दे लागू शकतात.उद्योगक्षेत्रात ट्रम्प यांचे कारनामे म्हटले तर अमेरिकेत ही गोष्टी तितक्या प्रमाणावर "टॅबू" नाही.तसेच गेल्या काही महिन्यात पॅरिस,ब्रसेल्स, इस्तंबूल, नीस इथे इस्लामिक दहशतवादी हल्ले झालेच पण ते खुद्द अमेरिकेतही ऑरलॅन्डो येथेही असा हल्ला झाला. अशावेळी डॉनल्ड ट्रम्प जर इस्लामिक दहशतवादाविरूध्द उघड भूमिका घेत असतील आणि हिलरी जर "पोलिटिकली करेक्ट" राहायचा प्रयत्न करत असतील तर त्याचा फायदाही ट्रम्प यांना मिळू शकेल. त्यातून पुढील काही महिन्यात असे आणखी हल्ले झाले आणि अमेरिकेतही एखादा अजून हल्ला झाला तर ती शक्यता अजून वाढेल. अशातून २० जानेवारी २०१७ रोजी डॉनल्ड ट्रम्प यांनी अमेरिकेचे ४५ वे अध्यक्ष म्हणून सुत्रे हाती घेतली तरी फार आश्चर्य वाटू नये.
वर्गीकरण
वाचने
13581
प्रतिक्रिया
27
मिसळपाव
प्रतिक्रिया
राजकारण ह्या विषयात जास्त रस नाही....
उत्तम विश्लेषण , एकुणात किचकट
माझे मत
सी.ई.ओ. वि. गुळमुळीत नेते
बॉब डोल अजून आहेत तर. १९९६
डानल्ड ट्रंप हा अगदी साधा,
ट्रंपचे आधीचे मत...
In reply to डानल्ड ट्रंप हा अगदी साधा, by राजाभाऊ
रोचक आहे. वाचतेय.
येऊ घातलेली निवडणुक...
उपराष्ट्रपती उमेदवार
कटकारस्थान!
डेमॉक्रॅटिक पक्षातील घडामोड
In reply to कटकारस्थान! by हुप्प्या
डेमोक्रॅटीक घडामोड
In reply to डेमॉक्रॅटिक पक्षातील घडामोड by गॅरी ट्रुमन
नॅफ्टा करार
In reply to डेमोक्रॅटीक घडामोड by विकास
छान विश्लेषण
अंशतः सहमत
In reply to छान विश्लेषण by मराठमोळा
>>पण ट्रंपने आजतागायत एकही
In reply to अंशतः सहमत by विकास
जय भारत.
अमेरिकन अध्यक्षीय निवडणुक-२०१६ (भाग ३)
ट्रंपला बडवायची फ्याशन!
ट्रंप आणि हिलरी
ट्रंप.
In reply to ट्रंप आणि हिलरी by रंगासेठ
जमाना बदल गया ?
सगळ्या कष्टकर्यांचा नव्हे!
In reply to जमाना बदल गया ? by गामा पैलवान
रिपब्लिकन पक्ष गरीब तारणहार
In reply to सगळ्या कष्टकर्यांचा नव्हे! by हुप्प्या
CLINTON CASH OFFICIAL DOCUMENTARY MOVIE ( FULL )
मदनबाण.....
आजची स्वाक्षरी :- याद आ रहा है तेरा प्यार...कहा हम कहा तुम, हुए तुम कहा गुम... :- Disco Dancerहिलरी आणि घोटाळे
मदनबाण.....
आजची स्वाक्षरी :- तेनु काला चश्मा जचदा ए...जचदा ए गोरे मुखडे ते.... ;) :- Baar Baar Dekho