हलकेचं आलीस आयुष्यात
वाऱ्याच्या झुळूकीसारखी
मनात मात्र माझ्या
वादळासारखी राहिलीयेस
तुझं हसणं, तुझं दिसणं
कोरलय माझ्या अस्तित्वावर
रात्रीच्या आकाशात
ध्रुव चमकत रहावा
तसा गुणगुणत राहतो
तुझा आवाज माझ्या कानात
त्या क्षणी जवळ असतीस तर
मिठीत घेतली असती तुला
किती आवडतेस तू मला
मीही सांगितलं असत मग
पण नाही सांगता आलं
तेव्हाही आणि आताही
आता फक्त स्वप्नं पाहतो
त्या स्वप्नातही तू भेटतेस
तेही दूर जाण्यासाठीच
मग भेटतेस तरी का
ते तुलाच माहीत
तुझ्याचंजवळ हरवून आलोय
मी स्वतःला बेमालूमपणे
पण तुझ्या नाही येतं लक्षात
आणि माझ्याजवळ असलेला
मी अजूनच अगतिक होतो
पण यातलं काहीही
तुला कळून उपयोग नाही
कारण तुला सगळी उत्तरं माहितीयेत
आणि मला आता कुठे
प्रश्न पडायला सुरुवात झालीये.
| लेखनविषय: |
|---|
वाचने
2030
प्रतिक्रिया
9
मिसळपाव
प्रतिक्रिया
सुरेख!
सुरेख!
भावना सुरेख मांडल्या आहेत. पण
भावना सुरेख मांडल्या आहेत. पण कविता म्हणून काहीतरी चुकत आहे अस वाटत.
धन्यवाद रातराणी आणि ज्योती
In reply to भावना सुरेख मांडल्या आहेत. पण by ज्योति अळवणी
धन्यवाद रातराणी आणि ज्योती अलवनि. पहिला प्रयत्न फसलेला दिसतोय.
जबरदस्त!
फारच आवडली कविता! लिहित रहा!
Sandy
सुंदर कविता !
सुंदर कविता !
आवडली..
पहिला प्रयत्न, मस्त लिहिले आहे.
आभार!
आभार!
चांगली आहे
.
छान
आवडली आपल्याला