✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव
मिसळपाव मराठी साहित्य

Main navigation

  • मुख्य पान
  • पाककृती
  • कविता
  • भटकंती
  • नवीन लेखन

रेनफॉरेस्ट

स — स्वामी संकेतानंद, Tue, 08/09/2016 - 09:17
आज जिथे आहे सहरा म्हणजेच वाळवंट, रेग, सैफ़, बरचन (म्हणजे काय हे गुगलून घ्या) वगैरे भूवैशिष्टये असणारे, तिथे होते लॉन्ग लॉन्ग एगो (म्हणजे रियल लॉन्ग लॉन्ग एगो सहस्रावधि नव्हे लक्षावधि नव्हे कोट्यावधि वर्षांपूर्वी) सहस्र योजन विस्तार असलेले ओलेचिंब, घनदाट, निबिड रेनफॉरेस्ट! रोज दुपारी दोनतीन वाजता गड़गडाट करायचे अजस्र काळेकभिन्न क्युमुलोनिम्बस् ! अन् झरझर बरसायचे जीवनामृतरस! त्या विशाल निबिड़ जंगलात होते अथांग एक सरोवर शतशत योजन विक्राळ.. होत्या विशाल राक्षसी मगरी आणि हत्तीचे चिमुकले पूर्वज आणिक होते चित्रविचित्र प्राणी झाडेझुडुपे,नद्यानाले,डोंगरदऱ्या........ दिवसरात्र चालायच्या अद्भुत निसर्गलीला बाहेरच्याला वाटायचे, किती हां केऑस! पण केऑसमध्येही काहीतरी विलक्षण सौंदर्य असते पोरांनो जस्ट लाइक योर मेटल ऑर पंक रॉक! मी शिकवतो माझ्या स्टूडंट्सना ते डोळे विस्फारुन ऐकतात त्यांच्या डोक्यात रिमझिमणारा प्रश्नांचा पाऊस मलाही ओला करत असतो पण तासिका संपली असते ( तसेही पोट्टे Quora, WikiAnswers वर उत्तरे विचारतील, किंवा गुगलुन काढतील Video lecture on Rainforest..) मी घरी परततो झेपावून माझ्यावर विचारतो छकुला "Dad, what should I write in the column of mothertongue?" "You should write ENGLISH." "But you speak some indian language With grampa granny......" आता त्याला मी सांगतो माझ्या माइग्रेशनची काम्प्लेक्स हिस्ट्री म्हणजे जी लैंग्वेज तो घरी यूज़ करतो ती वेगळी आहे माझ्या मातृभाषेपेक्षा अना मोरो मायअजी बोलsसेती तिसरीच भासा They all used to speak the same language बेटा पर सबनं विचार कऱ्या आपलो भासा ला नाहाय भविस्य अना वा भासा दुइतीन पीढ़ी मा कसी मरी उनलाच नहीं मालुम पड्यो तं तिच्या जागी आली अलगच भाश्या पर आता लोकाइले वाटू लागली ते बी गावठी एकाच पीढ़ीत! फिर हवा चली तीसरी भाषा की..... तुला सांगतो बाळा, लिंगविस्टिक सक्सेशन इज पर्फेक्टली नॉर्मल पण ते एब्नार्मल रेट ने झाले तर कुछ तो गड़बड़ है दया! Just like global warming Driving up rate of desertification Now a days! प्रत्येक केऑसमध्ये आपण शोधू नये सौन्दर्य. मला माहीत असते बरेचसे त्याच्या डोक्यावरून गेले आहे पण तो कानावर पडलेले गूगल करणार असतो... निवांत बसून समजून घ्यायला. दुसऱ्या दिवशी मी परत लेक्चरला जातो एक पोरगा प्रश्न करतो, "सर काय झाले त्या रेनफॉरेस्टचे वाळवंट होताना?" "तुमचे पूर्वज जेव्हा इथे आले दोनशे सव्वादोनशे वर्षांपूर्वी तेव्हा हा देश झाला होता एक लिंगविस्टिक रेनफॉरेस्ट त्यांची सगळ्यांची भाषा निराळी प्रत्येकाची टेरिटरी आखीवरेखीव पण कुठेतरी सरमिसळ होत होती त्या सैलेड बाउलमध्ये बदल होत गेले त्यांच्याही नकळत मेल्टिंग पॉट मध्ये.. आणि आज माझ्यापुढे विस्तारलाय हां अजस्र भाषिक सहरा. त्या प्राण्यांना जाणवले नाही रे... निसर्गाचे घड्याळ असते ब्रम्हाच्या wristवर.." दुसरा फेकतो वर्गातला सकलेन "एमेजॉन पण होणार काय सहरा?" मी टोलावून लावतो, "आज जिथे आहे एमेजॉन ते खंड मुळी तिथे राहीलच ह्याचीही खात्री नाही.... शेवटी कनवर्जेंट बाउंड्री आहे नाज़का प्लेटसोबत....." -- स्वामी संकेतानंद

प्रतिक्रिया द्या
4919 वाचन

💬 प्रतिसाद (34)

अन् झरझर बरसायचे

यशोधरा
Tue, 08/09/2016 - 09:19 नवीन
अन् झरझर बरसायचे जीवनामृतरस! त्या विशाल निबिड़ जंगलात होते अथांग एक सरोवर शतशत योजन विक्राळ.. होत्या विशाल राक्षसी मगरी आणि हत्तीचे चिमुकले पूर्वज आणिक होते चित्रविचित्र प्राणी झाडेझुडुपे,नद्यानाले,डोंगरदऱ्या........ दिवसरात्र चालायच्या अद्भुत निसर्गलीला बाहेरच्याला वाटायचे, किती हां केऑस! पण केऑसमध्येही काहीतरी विलक्षण सौंदर्य असते पोरांनो
सुरेख!
  • Log in or register to post comments

सोलीड्स एकदम वेगळा जॉनर

स्पा
Tue, 08/09/2016 - 09:25 नवीन
सोलीड्स एकदम वेगळा जॉनर
  • Log in or register to post comments

!!!

पैसा
Tue, 08/09/2016 - 09:29 नवीन
!!!!!! _/\_
  • Log in or register to post comments

ज्योग्राफी ऑप्शनल उर्फ भूगोल

कैलासवासी सोन्याबापु
Tue, 08/09/2016 - 09:40 नवीन
ज्योग्राफी ऑप्शनल उर्फ भूगोल वैकल्पिकचा अभ्यास जोरात झालेला दिसतोय स्वामु!
  • Log in or register to post comments

साला चार वर्षांपासून वाचून

स्वामी संकेतानंद
Tue, 08/09/2016 - 09:41 नवीन
साला चार वर्षांपासून वाचून रायलो बे. आता कवितेत बी थेच येऊन जाते.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: कैलासवासी सोन्याबापु

ऑल द बेस्ट बालको!!

कैलासवासी सोन्याबापु
Tue, 08/09/2016 - 09:44 नवीन
ऑल द बेस्ट बालको!!
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: स्वामी संकेतानंद

_/\_

स्वामी संकेतानंद
Tue, 08/09/2016 - 09:45 नवीन
_/\_
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: कैलासवासी सोन्याबापु

स्वामीजी मस्त भौगोलिक

उडन खटोला
Tue, 08/09/2016 - 09:53 नवीन
स्वामीजी मस्त भौगोलिक प्रागैतिहासिक वैश्विक कविता.
  • Log in or register to post comments

स्वामी तू लै बेफाट इसम हायस.

अभ्या..
Tue, 08/09/2016 - 10:16 नवीन
स्वामी तू लै बेफाट इसम हायस.
  • Log in or register to post comments

स्वाम्या घाग आहे!

कैलासवासी सोन्याबापु
Tue, 08/09/2016 - 10:49 नवीन
स्वाम्या घाग आहे!
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: अभ्या..

घाग म्हणजे रे काय बापू?

अभ्या..
Tue, 08/09/2016 - 11:22 नवीन
घाग म्हणजे रे काय बापू? स्पेशल काही?
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: कैलासवासी सोन्याबापु

घाग: मुरलेला

संदीप डांगे
Tue, 08/09/2016 - 11:34 नवीन
घाग: मुरलेला बाकी कविता झिंगाट!!!!!
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: अभ्या..

ओके संदीपराव,

अभ्या..
Tue, 08/09/2016 - 11:44 नवीन
ओके संदीपराव, तुम्ही सगळे वर्हाडी लैच घाग आहात राव.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: संदीप डांगे

हॅहॅहॅ. थँक्यू!

स्वामी संकेतानंद
Wed, 08/10/2016 - 09:02 नवीन
हॅहॅहॅ. थँक्यू!
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: अभ्या..

सुंदरच आहे.

अंतरा आनंद
Tue, 08/09/2016 - 11:18 नवीन
सुंदरच आहे.
  • Log in or register to post comments

बेफाट लिहिलंय स्वाम्या !!!

सतिश गावडे
Tue, 08/09/2016 - 11:26 नवीन
बेफाट लिहिलंय स्वाम्या !!!
  • Log in or register to post comments

कविता आहे का धड़ा ?

प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
Tue, 08/09/2016 - 11:31 नवीन
पहिल्या चार पाच ओळी नंतर तर वाचायचाही कंटाळा आला, पूर्ण लेखन वाचले नाही. पुभाशु. -दिलीप बिरुटे
  • Log in or register to post comments

+१

प्रसाद गोडबोले
Tue, 08/09/2016 - 13:40 नवीन
+१
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

तुम्हाला आवडेल अशी कविता

स्वामी संकेतानंद
Wed, 08/10/2016 - 08:59 नवीन
तुम्हाला आवडेल अशी कविता टाकली आहे आज. :D :D
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

जबरदस्त लिहलय बराच भाग

विप्लव
Tue, 08/09/2016 - 11:40 नवीन
जबरदस्त लिहलय बराच भाग डोक्यावरुनच काय पुर्ण बिल्डिंग वरुन गेला.
  • Log in or register to post comments

हाहाहा! दोनतीनदा वाचून पहा!

स्वामी संकेतानंद
Wed, 08/10/2016 - 09:01 नवीन
हाहाहा! दोनतीनदा वाचून पहा! भाष्य आहे कशावर तरी. येईल लक्षात.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: विप्लव

स्वामिज्जी की महान रचनॉंएं..

अत्रुप्त आत्मा
Tue, 08/09/2016 - 11:43 नवीन
स्वामिज्जी की महान रचनॉंएं..
  • Log in or register to post comments

आवडलं. आधी जंगल असतं. मग

एस
Tue, 08/09/2016 - 12:55 नवीन
आवडलं. आधी जंगल असतं. मग 'सिव्हिलायझेशन' येते. आणि मग वाळवंट बनतं...
  • Log in or register to post comments

मस्त..

नीलमोहर
Tue, 08/09/2016 - 13:30 नवीन
अफाट आहे हे !!
  • Log in or register to post comments

मस्त हो....

मुक्त विहारि
Tue, 08/09/2016 - 13:38 नवीन
झक्कास...
  • Log in or register to post comments

जबरदस्त!

अजया
Tue, 08/09/2016 - 13:52 नवीन
जबरदस्त!
  • Log in or register to post comments

अफाट लिहिलंय _/\_

पद्मावति
Tue, 08/09/2016 - 15:36 नवीन
अफाट लिहिलंय _/\_
  • Log in or register to post comments

मी जास्त कविता वाचत नाही पण

खटपट्या
Tue, 08/09/2016 - 21:34 नवीन
मी जास्त कविता वाचत नाही पण असं काही येणार असेल तर मज्जा येते. नुसतं यमकं जुळवण्यासाठी केलेली कवीता नाही आवडत. पण हा प्रयोग जबरदस्त आहे...अजुन येउद्या...
  • Log in or register to post comments

धन्यवाद!

स्वामी संकेतानंद
Wed, 08/10/2016 - 09:00 नवीन
धन्यवाद!
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: खटपट्या

आवडली.

आतिवास
Wed, 08/10/2016 - 08:31 नवीन
रचना किंचित क्रिप्टीक वाटली. अशा कविता वाचायलाही एक निवांतपणा पाहिजे हे पुन्हा एकदा लक्षात आलं. (नेहमीप्रमाणेच) कविता आवडली.
  • Log in or register to post comments

संकु, तू आमच्या थोपू भिताडावर

शिव कन्या
Sat, 08/20/2016 - 14:03 नवीन
संकु, तू आमच्या थोपू भिताडावर येऊन झैरात करण्याआधी वाचली होती ही कविता. आवडली हे सांगाया आज निवांत वेळ मिळाला. लिहित रा.
  • Log in or register to post comments

लै भारी!!

जव्हेरगंज
Sat, 08/20/2016 - 14:29 नवीन
लै भारी!!
  • Log in or register to post comments

आवडली !

डॉ सुहास म्हात्रे
Sat, 08/20/2016 - 14:37 नवीन
आवडली ! असंच होता राहिलं आहे या जगात... सहारा असो, अरबास्थानातले रब अल् खाली असो, मध्य ऑस्ट्रेलियातले वाळवंट असो किंवा जगभरची भाषांची खिचडी असो ! :) तसं बघितलं तर बहुतांश युरोप आणि उत्तर अमेरिकाही फार काळ बर्फाळ वाळवंटेच होती ;)
  • Log in or register to post comments

आवडेश

प्रीत-मोहर
Sun, 08/21/2016 - 23:26 नवीन
आवडेश
  • Log in or register to post comments

मिसळपाव वर स्वागत आहे.

प्रवेश करा

  • नवीन खाते बनवा
  • Reset your password
मिसळपाव.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Misalpav.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा