Skip to main content

मोबाईलच्या देवा तुला.....

लेखक विप्लव यांनी सोमवार, 08/08/2016 23:45 या दिवशी प्रकाशित केले.
मोबाईलच्या देवा तुला टचिंग टचिंग होऊ दे नेटवर्कची माया तुझी, आम्हावरी राहु दे जरि लेनं गरिबीचं घेऊ हाती स्मार्टफोनचं असल जरि चायना तरि दिसायला अॅपल किंवा, अँड्रॉयडवानी असु दे मोबाईलच्या बॅटरिची कांडी होई वरखाली स्विचऑफ आता होईल देवा चार्जर मातुर बारिक पिनचा, युनिवर्सल होऊ दे चॅट थोडे कॉल थोडे करतो आम्ही कधीमधी मॅसेज येती मॅसेजवरी वाचायला, पचायला अंगी बळ येऊ दे नेटवर्कची माया तुझी, आम्हावरी राहु दे ------अकस्मात हल्ला विप्लव
काव्यरस
लेखनविषय:

वाचने 3225
प्रतिक्रिया 15

प्रतिक्रिया

मोबाईलच्या बॅटरिची कांडी होई वरखाली
आणि शेवटचंकस्डवं खासंच. सुलोचनादीदी हातात मोबल्या घेऊन हे गाणं म्हणताहेत असं चित्र डोळ्यासमोर आलं.:)

चायटी* माणसं सिनेमात शोभेल असं गाणं आवडलं.
चायटी हा चहापानी लोकांचा वर्ग नसून चॅटींग आणि मोबल्याग्रस्त लोकांसाठीचा खास नाव आहे.