साहित्य
१ १/२ वाटी खजूर
२ खडे हिंग
१ चमचा काळीमिरी
१/२ चमचा मेथ्या (दाणे)
३ चमचे मोहरी
२ चमचे हळकुंड (नसेल तर हळद पावडर)
६ चमचे लाल मिरची पावडर (३ चमचे काश्मिरी किंवा ब्याडगी आणि ३ चमचे चवीला तिखट असलेली)
२ लिंबं
१ वाटी तेल (अधिक थोडे मसाले भाजायला)
मीठ, चवीनुसार
कृती
खजूर चिरून बी काढून टाका. खजुराचे उभे बारीक काप करून घ्या.
एक पॅन मध्ये एक चमचा तेल टाकून त्यात एक एक करून मेथ्या, काळीमिरी, मोहरी, हळकुंड आणि हिंग वेगवेगळं मंद आचेवर भाजून घ्या. त्याच पॅन मध्ये १ वाटी तेल गरम करायला ठेवा. तेल गरम झालं (थोडा धूर यायला लागला की लगेच) गॅस बंद करून बाजूला ठेवा.
भाजलेल्या मसाल्यांची मिक्सर मधून बारीक पूड करून घ्या. चिरलेल्या खजूरा मध्ये आपण तयार केलेला मसाला, लाल मिरची पावडर, (हळद, वापरत असलात तर), २ लिंबांचा रस आणि चवीनुसार मीठ घालून मिश्रण एकत्र करून घ्या. गरम केलेले तेल घालून लोणचं एकजीव करून घ्या.
एक कोरड्या काचेच्या किंवा लोणच्याच्या बरणीत भरून दोन ते तीन दिवस लोणचं मुरू द्या व मग खायला घ्या!
१५ दिवसांपूर्वी केले आहे। अजून थोडं उरलंय आणि उत्तम टिकून आहे। माझ्या अंदाजानुसार साधारण 1 महिना टिकेल, अर्थात तुम्ही म्हणताय तसं खाऊन संपवलं नाही तर.
प्रतिसादाबद्दल धन्यवाद!
कॆडी,
कहर आहेस रे बाबा. कधी कट्टा होईल, आन कधी कॆडी च्या हातचे एकसे एक पदार्थ खायला मिळतील कोण जाणे.
भारी आहे वेबसाईट.
____/\____
वाट बघणारा,
बाबा योगीराज.
प्रतिक्रिया
आमच्याकडे ह्या कामासाठी खजूर उरत नाही,
आयला,
In reply to आमच्याकडे ह्या कामासाठी खजूर उरत नाही, by मुक्त विहारि
छान.
टीव्ही....
In reply to छान. by प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
फोटो वर इट लाइव्ह कूक ?
In reply to टीव्ही.... by केडी
लिंक
In reply to फोटो वर इट लाइव्ह कूक ? by प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
क्या बात है.
In reply to लिंक by केडी
प्रोत्साहनाबद्दल.....
In reply to क्या बात है. by प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
किती दिवस टिकतं हे लोणचं?
मी हे लोणचे
In reply to किती दिवस टिकतं हे लोणचं? by एस
सोपे आहे.
मस्तय लाॅन्च. फोटो तर खतरी
मस्त पाकृ.सर्व साहित्य घरात
आहा, खूपच मस्तं!
खारकेचे खाल्ले होते पण
भा री ये.वेबसाइटही आवडली.
मस्त.
वाहवा!
मला या लोणच्याची रेसिपी हवीच
सुंदर पाकृ व फोटो !
धन्यवाद.....
भारीच!!
बाब्बो
धन्यवाद.....
In reply to बाब्बो by बाबा योगिराज
काहीतरी नविन चव मस्तच
काहीतरी नविन चव मस्तच
रेसिपी छान
मोहरीचं तेल
हायला...
खजुराच लोन्च हे १ स्ट ताइम च
फोटो आणि वेबसाईट छान आहे
भारिये लोणचं आणि वेबसाइट पण.
तोंपासू आहे!
धन्यवाद.....
फोटो पाहुन तोंडाला पाणी सुटल.
मी घरात असलेला
In reply to फोटो पाहुन तोंडाला पाणी सुटल. by जागु
ओके धन्यवाद.
In reply to मी घरात असलेला by केडी