Skip to main content

खजुराचं लोणचं

लेखक केडी
Published on रवीवार, 07/08/2016
Khajur Pickle साहित्य १ १/२ वाटी खजूर २ खडे हिंग १ चमचा काळीमिरी १/२ चमचा मेथ्या (दाणे) ३ चमचे मोहरी २ चमचे हळकुंड (नसेल तर हळद पावडर) ६ चमचे लाल मिरची पावडर (३ चमचे काश्मिरी किंवा ब्याडगी आणि ३ चमचे चवीला तिखट असलेली) २ लिंबं १ वाटी तेल (अधिक थोडे मसाले भाजायला) मीठ, चवीनुसार कृती खजूर चिरून बी काढून टाका. खजुराचे उभे बारीक काप करून घ्या. Step1 एक पॅन मध्ये एक चमचा तेल टाकून त्यात एक एक करून मेथ्या, काळीमिरी, मोहरी, हळकुंड आणि हिंग वेगवेगळं मंद आचेवर भाजून घ्या. त्याच पॅन मध्ये १ वाटी तेल गरम करायला ठेवा. तेल गरम झालं (थोडा धूर यायला लागला की लगेच) गॅस बंद करून बाजूला ठेवा. Step2 Step3 Step4 Step5Step6 Step7 भाजलेल्या मसाल्यांची मिक्सर मधून बारीक पूड करून घ्या. चिरलेल्या खजूरा मध्ये आपण तयार केलेला मसाला, लाल मिरची पावडर, (हळद, वापरत असलात तर), २ लिंबांचा रस आणि चवीनुसार मीठ घालून मिश्रण एकत्र करून घ्या. गरम केलेले तेल घालून लोणचं एकजीव करून घ्या. Step8 Step9Step10 Step11Step12 Step13 एक कोरड्या काचेच्या किंवा लोणच्याच्या बरणीत भरून दोन ते तीन दिवस लोणचं मुरू द्या व मग खायला घ्या!

वाचन संख्या 19204
प्रतिक्रिया 37

प्रतिक्रिया

एकदा कशातरी खजूराच्या वड्या केल्या होत्या. आजकाल त्या पण करता येत नाहीत.कधी वड्यांची आठवण झाली तर, ती पा.कृ. वाचून मनाची समजूत काढावी लागते.

केदार, फोटो आणि लोंचं आवडलं. टीव्हीच्या कोणत्या वाहिनीवर असतो हा पाककृतीचा कार्यक्रम आणि किती वाजता ? पाहीन म्हणतो. पुपाशु. -दिलीप बिरुटे

In reply to by प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

वर कसल्या कार्येक्रमाबद्दल आपण म्हणत आहात? माझी स्वतःची एक वेबसाईट आहे, त्यावर मी माझे पाककलेचे प्रयोग टाकत असतो। प्रतिसादाबद्दल धन्यवाद!

In reply to by केडी

>>>> माझी स्वतःची एक वेबसाईट आहे, त्यावर मी माझे पाककलेचे प्रयोग टाकत असतो। अरे वा. लिंक द्या ना. पुपाशु. -दिलीप बिरुटे

In reply to by केडी

जियो यार... चक्कर मारुन आलो. भन्नाट आहे. मिपावर एकापेक्षा एक सरस पाककृत्या येतील अशी अपेक्षा. -दिलीप बिरुटे

In reply to by एस

१५ दिवसांपूर्वी केले आहे। अजून थोडं उरलंय आणि उत्तम टिकून आहे। माझ्या अंदाजानुसार साधारण 1 महिना टिकेल, अर्थात तुम्ही म्हणताय तसं खाऊन संपवलं नाही तर. प्रतिसादाबद्दल धन्यवाद!

अप्रतिम सुंदर पाकृ! फोटो तर खासच!

भारीच!! आणि मिपावर चालू असलेल्या सांप्रत फ्याशनीनुसारः वीकांती करुन बघणेत येईल.

कॆडी, कहर आहेस रे बाबा. कधी कट्टा होईल, आन कधी कॆडी च्या हातचे एकसे एक पदार्थ खायला मिळतील कोण जाणे. भारी आहे वेबसाईट. ____/\____ वाट बघणारा, बाबा योगीराज.

पण तेल कुठलं चांगलं लागेल ह्याच्यात ? मोहोरीचं ??

सुद्धा चांगलं लागेल, त्याला एक स्वतःचाच एक तिखट स्वाद असतो.

२ सेकंद 'खजुराहो'चं लोणचं असं वाचून कंफ्युज झालो राव!

आपल्या प्रतिसादांनबद्दल आणि प्रोत्साहनाबद्दल मनापासून आभार!