थोड्क्यात वळख
लेखनविषय (Tags)
सुरुवात कराय्च्या आधी थोड्क्यात वळख करुन देतो. काही महीन्यान पुर्वी जाला वर 'मीसळ' वर माहीती गोळा करत होतो.चुकुन हीथ आलो, आन लागली चटक इथली. ईथला भट्कन्ती हा विषय एव्ढा आवडला की तिथली सगळी पान वाचुन काढली. मी सवता हाडाचा भटक्या असल्यामुळ हावर्यागत ते वाचुन टाकल. हळुहळु त्याच्या बाजुला असलेल चर्चा, पाकक्रुती, साहीत्य वाचाय लगलो. इथ्ल्या चर्चा बी चान्गल्याच रन्ग्त्यात.
जमल तेवढ वाचल. मग मला बी कायतरी ल्ह्याव वाटु लागल. पन माझ अस वाट्न म्हन्जे एखाद्या ५० किलो च्या नवशिक्या पैल्वान नी डायरेक्ट खुल्या गटाच्या पैल्वानाला खिजवल्या सारख झाल. ल्ह्याव का नाय चाल्ल होत. मग इचार केला मायला, १०वी फ ची पोर एवढा इचार कधी पासुन कराय लागली.
तर असय की, मिपा वर म्हनन्या पेक्षा, शाळा कॉलेज चे पेपर, ब्यानकेचे काही रटाळ अर्ज सोडुन काहितरी वेगळ लिहायचा हा पहिलाच टाईम. तस म्हनल तर परिक्षेचे पेपर खरडन्याचा दान्डगा अनुभव हाय, एव्ढा की पेपर मधल काय येउ की नको कमीत २ पुरवन्या कम्पल्सरी लागल्याच पाहीजे, मग भले तो पेपर अकाउन्ट चा का असेना. एकदा तर एव्ढा कळस गाठला की, सरानी मला आनी त्या गोड्बोले ला वर्गात उभ राहायला सान्गितल. गोड्बोले बरोबर माझ नाव घेतल्यामुळ सगळेच गोन्धळ्ले. कारण गोड्बोले पहिल्या बाकावरच हुशार पोरग आनि माझा बद्द्ल न बोललेलच बर.
मला २ मिनिट वाट्ल च्याआईला ह्या वेळेस बाण लागला बहुतेक बरोबर. सर सुरु झाले, '' परिक्षेचे पेपर दोन प्रकारे लिहीतात'' पोर शान्त आइकत होती. ''कसा असावा आणी कसा नसावा, कसा असावा ते अर्थातच गोड्बोले सारखा, आणि कसा नसावा म्हनत माझा कड मारक्या म्हशी गत बघाय लागले'' झाल, माझी टुब पेटली, मी खाली बसायला लागलो. तशी पहिल्या बेन्च वरची दोन चार पोर दात काढाय लागली.मध्ल्या सुटीत आपली पोर बोल्ली '' च्यायला या गोड्बोले च्या, याला आनी कुनी कुनी दात काढ्ले होते त्या सगळ्याना कोपर्यात घेउ रे'' पोर दोस्ती खातर बोलत होती. पन मी काय पेपर लिहीला होता ते मला आनी सरालाच माहीत होत.त्यामुळ मला सरा बद्दल काय राग न्हव्ता आनी त्या गोड्बोले बद्दल बी न्हवता. तर अस आप्ल लिखान.
भटकायची लई आवड हाये. लहान असल्या पासुन गड, किल्ले, जन्गल फिरायची सवय. थोड मोठ झाल्यावर जरा सोफेस्टिकेटेड पोरात राहताना ट्रेकिन्ग ट्रेकिन्ग हा शब्द सारखा कानावर येउ लागला मग कळाल की आपन जे बोम्ब्ल्लत फिरतोय त्यालाच ट्रेकिन्ग म्हन्त्यात. फिरायच म्हन्जे कसही आनि कुठ बी. सायकल, रिक्शा, कार, चालत्,ट्रेन, विमान, दुचाकी काय मिळल त्याने.
सगळच नवीन असल्यामुळ ल्ह्यायला जरा अवघड वाटतय. काही शब्द सापडत न्हायियेत. मदत भेट्ली तर बर व्हील.
प्रतिक्रिया
बाकी समदं जाऊन द्या,
हेहे
हेहे
मिपावर ओळख नावाचे सदर सुरू
हो आधी ते संत घोडेकर आले आणि
अंहं ते असं आहे ..
अहं ते असं आहे..
धन्स..
कबाली च्या गेट अप ची कल्पना
अहो मग नवीन मेम्बरांनी काय
नवीन मेम्बरांनी डायरेक लेख
+१ सहमत आहे.
ताजमहाल पाहायला कित्येक जातात
गोडबोल्या सारखे चतुर रामलिंगम
भेटनार की, काय लागंल ती मदत
मिपावर स्वागत!!
प्रतीसादा बद्दल धन्यवाद !
हे वाचा!
आभारी आहे
चांगलं लिहील आहात. भटकंती