Skip to main content

तसे पाहिले तर....

लेखक दिपाली पोटे यांनी गुरुवार, 04/08/2016 14:32 या दिवशी प्रकाशित केले.
तसे पाहिले तर मिसळपाव मला काही नवीन नाही...पण कधी वाटले नाही आपण यावर लिहावे...काल अचानकच सुचले...आता का हे तुम्ही नक्की विचारणार नाही...तर सुचले...लवकरच घेऊन येईन तुमच्यासाठी एक खुमासदार लेखन...तोवर...
लेखनविषय:
लेखनप्रकार

वाचने 6478
प्रतिक्रिया 51

प्रतिक्रिया

In reply to by सनईचौघडा

टेम्पो नाय चाल्णार का? नायतं यखांदं जीपडं??

In reply to by किसन शिंदे

किसन्या ते झा आणि ग च्या मधले दोन एस्स्स्स कशे टायपले रे? मला येतच नाही ते. :(

In reply to by नीलमोहर

नाय नाय... या चाव्या डेल, आय्बॉल, एच्पी, चायना, इंडियन सगळ्यावं हायेत.

In reply to by संजय पाटिल

मराठी किबोर्ड असेल तर कदाचित जमणार नाही, पण गूगलचा इनस्क्रिप्ट किबोर्ड असेल तर जमेल बहुदा

किसन देवा तुम्ही म्हनाल तसं चला आज येतांव काय तलावपालीला ? वाईच फिरुन येवुया संद्याकाली.

In reply to by सनईचौघडा

यिवू की.. सांच्याला सहाला "एक कप चाय" पाशी भ्यॅटा मंग

तोवर तुम्ही बाहेरच थांबायच. दरवाजा ठोकुन लवकर बाहेर या असे बोंबलायचे नाही. आता तर कुठे कळ आलीय, मोकळ व्हायला वेळ लागणारच. तोवर दम धारा. सब्रका फळ मिठा होता है. थोड थांबा अन मग बघा तुम्हाला कसा ताज्या ताज्या सुगंधी जिलबीचा आनंद लुटता येइल ते. आता पर्यंत लोक मिपावर डायरेक्ट मोकळे व्हायला येत असत. अशी कळ आली म्हनुन कोनी झैरात केली नव्हती. पैजारबुवा,

In reply to by किसन शिंदे

देवा उगा येता जाता दंडवत घालु नका. आमाला आमच्या पायरीने राहुद्या. बहुरुप्याचा पुढचा भाग कधी लिवताय? पैजारबुवा,

In reply to by ज्ञानोबाचे पैजार

देवांना भरपूर (रिकामा) वेळ दिसतोय हाताशी, पैजारबुवा, तुम्हाला दंडवत घालून थकलो आम्ही :) लेखिकाबाई, अत्यंत उत्कंठावर्धक लेखन.. व्हॉट अ सस्पेंन्स..

In reply to by नीलमोहर

तर..तर मास्तरच्या म्हागं माझाच नंबर हाय, आन अजून जिल्बी यायला येळ हाय तोवर...

In reply to by ज्ञानोबाचे पैजार

>>> सब्रका फळ मिठा होता है. 'काना' टाकला नाहीत हे बरं केलंत. कुठं म्हणून बुवा विचारणार नाहीत बरं. ;)

In reply to by मोहनराव

माश्या मारताना हात सांभाळा. माशी जायची उडुन आणि हात जायचा बुडुन आणि माश्या मारल्यावर हात साबण लावुन स्वच्छ धुवा. मगच किबोर्डाला हात लावा. पैजारबुवा,

आणि शिंची ही कळ साधी नाहीये हो, अचानक सुचलं म्ह्णत्येय लेखिका म्हणजे जिल्बी बरोबर मठ्ठा पण असणार. गुरुजीss ओ गुरु sजीss तांब्या आणा बरे.

प्लीज चिकोल्या नका आणू ? डोळे भरून येतील असंही नको. काही तरी खुसखुशीत, म्हणजे आपलं लेखन मोबाइलवर वाचतांना मी सारखा गालातल्या गालात हसलो पाहिजे, आणि आजुबाजुचे लोक.. कसला बावळट म्हातारा आहे, अशा नजरेने लोकांनी माझ्याकडे पाहिलं पाहिजे. ;) -दिलीप बिरुटे

In reply to by प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

ओ ताई तुम्ही यांच्या वरलिया रंगा भुलून त्यांच्या फर्माईशी पूर्ण करायच्या फंदात पडू नका. तुम्हाला अजून यांनी पाहिले देखिल नसेल पण खुशाल काकु म्हणुन मोकळे झाले. या खवचट म्हातार्याच्या काकु या नात्याने आम्ही तुम्हाला ताई म्हणुन संबोधले. पैजारबुवा,

In reply to by ज्ञानोबाचे पैजार

काकू या शब्दात अतीव रिस्पेक्ट आहे, काकू शब्दातून एक जिव्हाळा, आपुलकी, प्रेम दिसतं, सतत कुटुंबाची काळजी करणारं प्रसंगी चुका पोटात घेणारं ते एक व्यक्तिमत्व वाटतं. तै अशा शब्दात जालावर भीती दिसते, उगा रिस्क नको असा भाव त्या शब्दात दिसतो ;) -दिलीप बिरुटे

In reply to by प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

ताई म्हणते की कशी एक वात्सल्यमुर्ती डोळ्यासमोर उभी रहाते. आपली सतत काळजी घेणारी. आपल्या घासातला एक घास लहानग्या भावासाठी काढुन ठेवणारी. आईने घातलेले धपाटे स्वत:च्या पाठीवर झेलणारी. अशी ताई असावी अशी प्रत्येक भावाची इच्छा असते. म्हणुनच एका प्रसिध्द कवीने लिहिले आहे प्रेम स्वरुप ताई,वात्सल्य सिंधु ताई, बोलावु तुज आता मी कोणत्या उपायी कोणाला ताई म्हणण्यात आम्हाला तर कोणतीच रिस्क दिसत नाही. उलट काकु म्हटल्याने चार फटके पडायची शक्यता जास्त दिसते. (पुण्यात येउन कोणत्याही वयाच्या आणि आकाराच्या बाईला (तोंडावर) काकु म्हणुन दाखवा. लकडीपुलावर मी तुमचा पुणेरी पगडी घालुन शाल आणि श्रीफळ देउन (पाणी असलेला नारळ वाजवुन) सत्कार करेन. जर तुम्ही सत्काराला येउ शकलात तर. पैजारबुवा,

In reply to by ज्ञानोबाचे पैजार

वास्तव जगातील ताई आणि आभासी जगातील ताई यात फरक आहे हो, जाल काकू आणि वास्तव काकू या सारख्या वाटतात. जाऊ द्या....जाल काकू लेखन घेऊन आल्यावर सांगतील खरं काय ते.... :) -दिलीप बिरुटे

In reply to by प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

जाल काकू आणि वास्तव काकू या सारख्या वाटतात.
जाल काकू असे म्हणाल्यावर आमच्या डोळ्या समोर राष्ट्रकाकू गिरीजा उभ्या रहातात. आणि मग दुसर्या कोणाला काकू म्हणावेसे वाटत नाही. या उलट तै म्हटले की आपल्या शरदिनीताई डोळ्यासमोर येतात. याच कारणाने मी सर्व स्त्री सदृष्य आयडींना ताई असे संबोधतो. कोणी कोणाला काय म्हणावे हे माझ्या हातात नाही. मी केवळ एक निरिक्षण नोंदवले इतकेच. पैजारबुवा,

"कळ"ल्यावाचून लिहू नये,"बो"लावल्याशिवाय जाऊ नये.... मी नक्की कुणाचा या त्यांच्या आगामी चोरोळी संग्रहातून साभार.

In reply to by ५० फक्त

पोटो दिसत नैत अन्ना तुम्हाला. मला तर दिसतेत की. . अभ्या चिंताकिंदी (कन्ना चौक)

भाषा शैली सुरेख आहे. पुढचे सगळे 100 भाग एकदम टाकले तरी चालतील तुम्हाला मिपा नवीन नाही हे कळलेच म्हणूनच तुम्ही असा धागा काढलात

आधी एक पोटे होते (या त्यांच्या प्रतिक्रियांचा नमुना, बघा ओळख पडतीय का ? ;) ) आंतरजालावरदेखील लोकांची सामाजिक स्मृती क्षीण असते असे मानणारे असतात म्हणायचं. (अर्थात या आयडीचा त्या आयडीशी संबंध असेल असं म्हणणं घाईचं असेल. वाट बघेगे आणि देखेंगे पुढे काय काय होताय ते. )

बॉलरचा फॉलोथ्रू संपायच्या आधीच सेहेवाग स्टंप कव्हर करत ऍक्रोस यायचा. बॅट थर्डमॅनच्या दिशेला उचलली जायची. आता झणकेदार पुल बसणार म्हणून आम्ही सरसावून बसायचो. पैजारबुवांचं नाव प्रतिसादांत बघून तसंच काहीसं झालं.