Skip to main content

अननसाला सद्गती!

लेखक इन्ना यांनी बुधवार, 03/08/2016 14:59 या दिवशी प्रकाशित केले.
घरी, आमच्या परिचितांच्या शेतातून अननस आले. पहिले दोन दिवस दुर्लक्ष्य केल, कारण ते कापणे साफ करणे कधी करून माहित नाही. ;) टिनातल्या चकत्याच वापरल्या होत्या. दोन दिवसांनी अननसाचा घमघमाट सुटला स्वैपाकघरात. मग म्हटल ह्याला सद्गती द्यावीच. मास्टर शेफ चे सलग काही एपिसोड नुकतेच सलग पाहिल्याने काहितरी भरभक्कम नावाच , नाट्यपूर्ण कराव अस घाटत होतं ( मनातल्या मनातच हां ) पण मग नवर्‍याच्या बंगाली मित्राच्या घरी खाल्लेली एक चटणी / रायत आठवल. लगेच आंतर्जालावर साकड घातल. अन एक रेसिपी हाताला लागली. करून पहायच ठरवल अन बरी झाल्यास फोटो टाकता यावेत म्हणून फोटो प्रपंच केला. प्रपंच म्हणजे ; आमच्या नेहेमीच्या हक्काच्या फोटोग्राफरनी साफ नकार दिल्यानी, करणे , अन फोटो काढणे आपापले. फोटोत इतर पसारा न येउ देण्याची दक्षता घेणे ;) वगैरे. तर आता दोन वाक्याच्या रेसिपीला पुरेशी लांबड लाउन झाल्यानी पुढे, साहित्य फोटोतून कळेलच. माप अंदाजे. अननस कापुन चकत्या बनवल्या. आल्याच्या लांब सळ्या कापून घेतल्या 1 मसाल्यासाठी लवंग , दालचिनी , बडीशेप, जिरं , सुक्या लाल मिरच्या अन मोहरीची डाळ 2 मग हे जरास भाजून भरड करून घेतल 3 अननसाचे सेंटिमिटर क्युब्स कापून घेतले 4 ह्याचा मधला भाग ( कोअर) काढणे अपेक्षित होते , पण माहित नसल्यानी तसेच तुकडे केले अन ते जरासे निबर लागतात रायत्यात. मग तुपात पहिल्यांदा आल, मग भरड वाटलेला मसाला टाकला अन अननसाच्या फोडी पण. जरास परतून घेतल . 5 पाणी घालून , पंधरा वीस मिनीट झाकण घालून शिजवल. मधेच आठवल् तेव्हा सहा सात चम्चे साखर टाकली . अननसाच्या चवी प्रमाणे ही अंदाजे घातली . फोडी मौ झाल्यावर अर्ध्या लिंबाचा रस पिळला. limbo अन झाल अस डिक्लेअर केल. गरम फुलक्यांबरोबर मस्त लागल. final पुढच्यास ठेच प्रशिक्षण ( सुगरणीनी/बल्लवांनी हे ऑप्शन ला टाकल तरी चालेल) १) अननस कापायला येत नसेल तर टिनच बरा . किंवा तो नीट कापायला शिकल पाहिजे . २) अननसाच्या फोडी अजून बारीक अथवा एकदा मिक्सर मधून फिरवून काढल्या असत्या तर कनिस्टन्सी रायत्या सारखी झाली असती. ३) तुपा ऐवजी सरसो च तेल बरं लागेल, मी खाल्लेल्या बंगाली पदार्थात असाव. ४) आंबट गोड तिखट अन मसाले ह्याची एक सुरेख चव तयार होते. मुळ बंगाली पदार्थाच्या ५-१० अंश सरकलेली असली तरी मस्त. माहितीचा स्त्रोत- मैत्रीणीनी दिलेली लिंक , इतर आंतर्जालीय रेस्प्या , अन शेवटी हाताशी असलेली सामग्री. मास्टर्शेफ टाइप कमेंट- १) हिरो ऑफ द डिश इज पायनॅपल २) अ‍ॅसिडिटी इज वेल बॅलन्स्ड विद जिंगर अ‍ॅन्ड अदर स्पाइसेस. ३) प्रेझेन्टेशन मॅटर्स , म्हणून अननसाच्या सगळ्या फोडी एकसारखे क्युब्स , आल्याचे ज्युलिअन्स, अन पिवळ्या अननसाला कॉन्ट्रास्ट लाल सुक्या मिरच्या इती दोन वाक्याची रेसिपी पानभरात संपूर्ण :D

वाचने 15841
प्रतिक्रिया 37

प्रतिक्रिया

अननस स्वस्तात कुठे मिळतात? चक्क १०० रुपये म्हणला ओ लक्ष्मी मार्केटात. आमच्या गुर्जीनी १०० मध्ये ३ का ५ वगैरे आणलेले. मला आवडते खायला पण मिळतच नै ना. :( अननसाच्या क्युब फोडींवर नुसते चाट मसाला आणि दही टाकून छान रायते होते.

In reply to by अभ्या..

पुण्यातील मार्केट यार्ड येथे फळांचा बाजार भरतो .. सकाळी ९ - ११ या वेळेत जा. खूप स्वस्त मिळतील अननस. १२० रुपये डझन पासून ३०० रुपये डझन पर्यंत च्या भावाने मिळतात.

In reply to by बाप्पू

अभ्या, सोलापूर पुणे येऊन जाऊन केवढ्याला पडेल? ;) इन्नाअण्णा पाकृ भारी ओ!

हा तर मेथांबा - कैय्रांच्या ऐवजी अननस.विनोदी फोडणी भारी पण कॅचवर्ड टाकला नाय मग शंभरी कशी गाठणार?

मुळ बंगाली पदार्थाच्या ५-१० अंश सरकलेली असली तरी मस्त.
मूळ बंगाली मसाल्यामधे कदाचित कलौन्जी व मेथ्या सुद्धा असवा.. असा माझा एक गेस बर्का ... रेसिपि हे वे सा न ल

छान पाकृ इन्ना. मास्टरशेफ आॅस्ट्रेलिया का! माझ्यावर पण सध्या त्याचंच गारुड आहे! उगाच आमटीवर नारळ कोथिंबीर सजावट करायला लागलेय;)

In reply to by अजया

हो , अजया! एकदा त्या अन्लिमिटेड पॅन्ट्री अन बेस्ट ऑफ अप्लायन्सेस ! अश्या किचन मधे कैतरी खूड्बूड करायचीय. मी अजिबात फूडी नाही अन बनवायचा सोस /आवड ही नाही खरतर ;०

सद्गती महटल्यावर आधि घाबरलो, मग वाटलं जास्त पिकलेल्या अननसाला वाईन बनवून सद्गती देणार की काय. पण सासव/सासम चं हे भावंड पण करून बघणयात येईल.

फटु च्या जागी एक मायनस खूण किंवा एक बुरखाधारी स्त्रीचा चेहेरा दिसतोय.

फोटो पळ्वलेत का रायता खलास झाला हे कळेना. असो वर्णनावरून करून बघण्यासारखी (आणि जमण्यासारखी ) वाटत आहे. अननन्स आणावा काय? अननसासाठी १/४ मतात असलेला संसारी नाखु

भारीच आहे रेसीपी. आमच्या ब्याचलर आयुक्षात आम्ही सेम अस कैरीच करुन भाताबरोबर खायचो. खर खडा मसाल्याऐवजी मातोश्रींनी दिलेला मसाला वापरायचो ज्यात हे सगळे इन्ग्रेडिएंट्स आहेत

रेसिपी आणि ती लिहिण्याची स्टाइल दोन्ही छान! स्वाती