अननसाला सद्गती!
घरी, आमच्या परिचितांच्या शेतातून अननस आले. पहिले दोन दिवस दुर्लक्ष्य केल, कारण ते कापणे साफ करणे कधी करून माहित नाही. ;) टिनातल्या चकत्याच वापरल्या होत्या. दोन दिवसांनी अननसाचा घमघमाट सुटला स्वैपाकघरात. मग म्हटल ह्याला सद्गती द्यावीच. मास्टर शेफ चे सलग काही एपिसोड नुकतेच सलग पाहिल्याने काहितरी भरभक्कम नावाच , नाट्यपूर्ण कराव अस घाटत होतं ( मनातल्या मनातच हां ) पण मग नवर्याच्या बंगाली मित्राच्या घरी खाल्लेली एक चटणी / रायत आठवल. लगेच आंतर्जालावर साकड घातल. अन एक रेसिपी हाताला लागली.
करून पहायच ठरवल अन बरी झाल्यास फोटो टाकता यावेत म्हणून फोटो प्रपंच केला. प्रपंच म्हणजे ; आमच्या नेहेमीच्या हक्काच्या फोटोग्राफरनी साफ नकार दिल्यानी, करणे , अन फोटो काढणे आपापले. फोटोत इतर पसारा न येउ देण्याची दक्षता घेणे ;) वगैरे.
तर आता दोन वाक्याच्या रेसिपीला पुरेशी लांबड लाउन झाल्यानी पुढे, साहित्य फोटोतून कळेलच. माप अंदाजे.
अननस कापुन चकत्या बनवल्या. आल्याच्या लांब सळ्या कापून घेतल्या
मसाल्यासाठी लवंग , दालचिनी , बडीशेप, जिरं , सुक्या लाल मिरच्या अन मोहरीची डाळ
मग हे जरास भाजून भरड करून घेतल
अननसाचे सेंटिमिटर क्युब्स कापून घेतले
ह्याचा मधला भाग ( कोअर) काढणे अपेक्षित होते , पण माहित नसल्यानी तसेच तुकडे केले अन ते जरासे निबर लागतात रायत्यात.
मग तुपात पहिल्यांदा आल, मग भरड वाटलेला मसाला टाकला अन अननसाच्या फोडी पण.
जरास परतून घेतल .
पाणी घालून , पंधरा वीस मिनीट झाकण घालून शिजवल. मधेच आठवल् तेव्हा सहा सात चम्चे साखर टाकली . अननसाच्या चवी प्रमाणे ही अंदाजे घातली . फोडी मौ झाल्यावर अर्ध्या लिंबाचा रस पिळला.
अन झाल अस डिक्लेअर केल. गरम फुलक्यांबरोबर मस्त लागल.
पुढच्यास ठेच प्रशिक्षण ( सुगरणीनी/बल्लवांनी हे ऑप्शन ला टाकल तरी चालेल)
१) अननस कापायला येत नसेल तर टिनच बरा . किंवा तो नीट कापायला शिकल पाहिजे .
२) अननसाच्या फोडी अजून बारीक अथवा एकदा मिक्सर मधून फिरवून काढल्या असत्या तर कनिस्टन्सी रायत्या सारखी झाली असती.
३) तुपा ऐवजी सरसो च तेल बरं लागेल, मी खाल्लेल्या बंगाली पदार्थात असाव.
४) आंबट गोड तिखट अन मसाले ह्याची एक सुरेख चव तयार होते. मुळ बंगाली पदार्थाच्या ५-१० अंश सरकलेली असली तरी मस्त.
माहितीचा स्त्रोत- मैत्रीणीनी दिलेली लिंक , इतर आंतर्जालीय रेस्प्या , अन शेवटी हाताशी असलेली सामग्री.
मास्टर्शेफ टाइप कमेंट-
१) हिरो ऑफ द डिश इज पायनॅपल
२) अॅसिडिटी इज वेल बॅलन्स्ड विद जिंगर अॅन्ड अदर स्पाइसेस.
३) प्रेझेन्टेशन मॅटर्स , म्हणून अननसाच्या सगळ्या फोडी एकसारखे क्युब्स , आल्याचे ज्युलिअन्स, अन पिवळ्या अननसाला कॉन्ट्रास्ट लाल सुक्या मिरच्या
इती दोन वाक्याची रेसिपी पानभरात संपूर्ण :D
वाचने
15788
वाचनखूण
प्रतिक्रिया
37
व्वा मस्त एंजॉय केलं..
सुंडर!!
मस्त पाककृती. मुख्य म्हणजे
In reply to मस्त पाककृती. मुख्य म्हणजे by एस
मीही ढ च आहे एस :)
अननस स्वस्तात कुठे मिळतात?
In reply to अननस स्वस्तात कुठे मिळतात? by अभ्या..
पुण्यातील मार्केट यार्ड येथे
In reply to पुण्यातील मार्केट यार्ड येथे by बाप्पू
अभ्या, सोलापूर पुणे येऊन जाऊन
फोटू दिसत नाहीयेत
In reply to फोटू दिसत नाहीयेत by जगप्रवासी
+१
In reply to फोटू दिसत नाहीयेत by जगप्रवासी
कोणालाच नाही का दिसत फोटो?
In reply to कोणालाच नाही का दिसत फोटो? by इन्ना
फोटो दिसत नाहीयेत
In reply to कोणालाच नाही का दिसत फोटो? by इन्ना
नै
In reply to नै by रघुनाथ.केरकर
फोटो दिसत नाहीत
In reply to कोणालाच नाही का दिसत फोटो? by इन्ना
अरेच्चा! मघाशी मला फोटो दिसत
In reply to अरेच्चा! मघाशी मला फोटो दिसत by एस
उद्गार चिन्हासकट असेच म्हणतोय
In reply to उद्गार चिन्हासकट असेच म्हणतोय by उडन खटोला
माजा पण गणेशा झाला!
वा, सोपी पाकृ. कधी येऊ खायला.
हा तर मेथांबा - कैय्रांच्या
मस्त
फोठू नाय दिसत
In reply to फोठू नाय दिसत by लालगरूड
मला पण फोटु दिसत नायत
छान पाकृ इन्ना.
In reply to छान पाकृ इन्ना. by अजया
हो , अजया!
In reply to हो , अजया! by इन्ना
शेम हिअर ;)
सद्गती
पा.कृ. मस्त
फटु
फोटू नॉट दिसिंग.
फोटू वारले आहेत. ते जरा दाखवा
मस्त इन्ना
लोकांनी
भारीच आहे रेसीपी. आमच्या
छान!
मला फोटु दिसले नाहि :(
छान पाकृ. लिहायची श्टाईल बी
छान पाकृ. लिहायची श्टाईल बी
..