Skip to main content

एल ई डी प्रकारातला टी व्ही

लेखक सुनिल साळी यांनी गुरुवार, 25/06/2015 15:31 या दिवशी प्रकाशित केले.
राम राम मंडळी, गेली 12 वर्षे ते आतापर्यंत माझा एल जी कंपनीचा सी आर टी टेलीव्हिजन संच काहीही बिघाड न होता खूप चांगल्या प्रकारे चालत होता. पण सध्या सुरुवातीला दणका दिल्या शिवाय टेलीव्हिजन संच चालू होत नाही :-( असो आम्ही ह्या नीर्णयाप्रत आलो आहोत की नवीन एल ई डी प्रकारातला टी व्ही विकत घ्यावा. आपल्या मिपा सदस्यापैकी बहुतेक लोक वेग वेगळ्या कंपन्याची एल सी डि, एल ए डी वापरत असणारच. आपला बहुमोल सल्ला द्यावा. अटी: > 32 इंच ते 40 इंच > कींमत: रु. 18000 ते 25000 > स्पष्ट चित्र - कोणत्याही बाजूने बघीतल्यास

वाचने 40372
प्रतिक्रिया 87

प्रतिक्रिया

In reply to by प्रदीप

साहेबचा शॉर्टफॉर्म असावा ;) बाबासाहेब --> बाबासो. तसं. खरं तर त्यात एक जास्तीचा काना असतो, पण तो युनिकोडात कुठून देणार?

सोनी ब्राविया केडीएल ४८डब्ल्यू७००सी ४८" फुल एचडी एलईडी टीव्ही घ्यायचा विचार करतोय. दुकानात ७८ ते ८० हजारात मिळतोय. पण फ्लिकआर्टला ८२९०० दर्शनी किमतीचा रू.७५२८९ ला मिळतोय. तर प्लिक आर्टमधून घ्यावा का? दुकानांपेक्षा ४-५ हजारांनी स्वस्त मिळतोय म्हणून उगीचच शंका आली की, यांना कसे बरे स्वस्त विकायला जमतय? का ४८ इंचाचे सोनीचे एखादे नवीन मॉडेल येतेय? मला ४८ इंचापेक्षा मोठा नकोय.

In reply to by किसन शिंदे

अरे बापरे. मग कोणता चांगला आहे? ४८ इंची पाहीजे. बजेटचा मुद्दा नाहीय्ये.

In reply to by शाम भागवत

एलजी किंवा पॅनॉसोनिक पैकी निवडू शकता. त्याआधी गूगलवर सर्च करा दोन्हीपैकी कुठले चांगले पडेल. सोनीवरचा भरवसा उडाल्याने गेल्याच महिन्यात मी एलजीचा ३२ इंची एलईडी विकत घेतला.

आम्ही आताच मायक्रोमॅक्स चा 40" LED टीव्ही घेतला अजून पर्यंत तरी चांगला आहे किंमत 20000 rs फक्त !!!!

In reply to by कंजूस

खरच खूप फायदा झाला तुम्ही दिलेल्या लिंकचा. पुष्कळ गोष्टी स्पष्ट झाल्या. आता निर्णय घेणे सोपे जाणार आहे.

Tcl कंपनीचे टीव्ही अमेझॉन वर लॉन्च होत आहेत, कोणी उसगावकर ह्या कंपणीबद्दल माहिती देईल का, अमेरिकेतली नुंबर ओने कुंपनी आहे म्हणे,

In reply to by संदीप डांगे

ही टिसिएल कंपनी बजेट टिव्ही बनवणारी कंपनी दिसत आहे. माझ्या निरिक्षणाप्रमाणे टिव्हीबाबत उसगावात सॅमसंगच आघाडीची कंपनी आहे. एलजी अन सोनी यांच्यात दुसर्‍या क्रमांकासाठी चढाओढ असते. व्हिझिओ ही पण बजेट टिव्हीमध्ये आघाडीची कंपनी आहे. २०००-२००१ साली टिसीएलच्या आपल्याकडच्या वृत्तपत्रात पानभर जाहिराती असायच्या. ओनिडाचा सर्वात स्वस्त टिव्ही ₹११,००० असल्यास टिसीएलचा ₹६९९० ला वगैरे असायचा. आयवा वगैरे पण याच किमतीला टिव्ही विकायची. या प्रतिसादामुळे आयवा, अकाई, शिवाकी, सॅनसुई या कंपन्या आठवल्या.

In reply to by श्रीरंग_जोशी

टीसीएल ही OEM Manufacturer आहे. म्हणजे पूर्वी पिक्चर ट्युब बनवणारी ही एकमेव कंपनी होती. बाकी कंपन्या त्यांच्याकडून पॅनेल घेऊन बाकी असेंब्ली स्वतः बनवत असत. एखादा जुना बंद पडलेला टीव्ही उघडून पाहिल्यास टीसीएलची ट्य़ुब दिसून येईल. आताही ८०% फ्लॅटस्क्रीन (एलईडी/एलसीडी) टेलिव्हिजन्समध्ये पॅनेल सॅमसंगचे असतात.

स्कायवर्थ घ्या.. क्वालीटी आणि मस्त डिज़ाईन.. सोबत याचे मोडेल्स पण खिशाला परवडनारे आहेत .. 2 वर्ष झाली घेउन... फर्मास चालु आहे

बय्राच टिव्ही स्क्रीनमध्ये spherical aberation (चित्रं/अक्षरे वाकडी होणे) असते.आरशातल्या प्रतिमा वाकड्या होतात तसे.आणखीही खोड्या असतात.फिलिप्स,सोनीमध्ये हे कमी केलेलं असतं.