कधी कधी माणसाला साधी सोपी पोळी-भाजी सोडून सुखाचा जीव भयानक कटकटीच्या गोष्टीत गुंतवायची हुक्की येते. आज तसाच एक दिवस होता.. दाल बाटीचा!
तर त्याचं असं झालंय की माझ्या आईच्या वडीलांकडुन, अण्णांकडुन, माझ्याकडे असंख्य गुण आलेत. त्यातला एक म्हणजे दाल बाटीची आवड! जगात अॅक्चुअली दालबाटी एका पद्धतीने करतात, माझी आई दुसर्या पद्धतीने करते, सासुबाई तिसर्या पद्धतीने करतात आणि मी... अंदाजपंचे करते!
लोक निखार्यात वगैरे भाजुन कसल्या कसल्या जीवघेण्या बाट्या करतात. आपल्याला तसलं काही येत नाही. कारण आपल्याला एका लेकराला सांभाळून स्वयंपाक करायचा असेतो किनई.. मग असले टाईमपास परवडत नसतेत!
तर अंदाजपंचे थोडी कणिक, मक्याच पीठ आणि रवा घ्या. त्यात चवीपुरतं मीठ टाका आणि घ्या तिंबुन. तिंबलेल्या पीठाचे गोळे करुन घ्या. एका गोळ्याला तेल लावुन त्याची लंबुळक्या आकाराची पोळी लाटा. ह्या पोळीला तेल लावुन तिचा रोल करुन घ्या. रोलची दोन टोके एकत्र आणुन त्याची घडी घाला. ही झाली बाटी! (पहा फोटो!) ही बाटी करण्याची आमच्या माहेरची पद्धत. सासरी डायरेक्ट गोळाच बाटी म्हणुन घेतात. काही ठिकाणी बहुदा त्याला बाफले म्हणतात.
आता इथुन पुढे तुमच्याकडे दोन पर्याय आहेतः- हेल्दी किंवा सेक्सी...!
हेल्दी रेसेपी आमच्या मातोश्रींची आहे. ह्यात बाट्यांना कुकरमध्ये उकडुन घ्या. आणि मग तुपात परतुन घ्या. कमी तेला/तुपात केलेली सात्विक डाएट बाटी!
सेक्सी रेसेपी आमच्या सासुबाईंची आहे. ह्यात काय करायचं की बाट्या डायरेक्ट उकळत्या पाण्यात टाकायच्या. नीट शिजल्या आहेत हे कसं कळणार? तर त्यात सुरी खुपसुन उचलुन पहायची. बाटी त्यावरुन निसटून खाली पडली आणि सुरीवरही बाटी लागलेली दिसली नाही तर शिजली म्हणायची. पण हा त्याचा सेक्सीनेस कोशंट नाहीये!!
ह्या बाट्यांना चांगलं निथळुन घ्यायचं. मग थंड करुन त्यांचे तुकडे करुन घ्यायचे. आणि हे तुकडे कुरकुरीत "तळुन" घ्यायचे. ही झाली सेक्सी बाटी!
हा सगळा उद्योग चालु असताना बाजुला चिंच गुळाचं आंबट वरण करुन घ्यायचं. (आणि तळलेल्या बाट्या खायला आलेल्यांना हाकलुन लावायचं!)
ह्या बाट्या वडा सांबार सारख्या वरणात डुंबत टाकुन खायला मजा येते! माहेरी साध्या वरणासोबत खातात. किंवा गुळ तुपात कुस्करुनही खातात.
कशाही खा, बाट्या कधीच चुकत नाहीत हे माझ्यासाठी महत्वाचं! ;)

वाचने
49664
प्रतिक्रिया
175
मिसळपाव
प्रतिक्रिया
झाली असतीलच छान पण
In reply to संडे स्पेशल by चंपाबाई
अहो,
In reply to झाली असतीलच छान पण by बोका-ए-आझम
..
In reply to झाली असतीलच छान पण by बोका-ए-आझम
धागाकर्त्यानीही तसेच केले आहे
In reply to .. by चंपाबाई
ओके
In reply to धागाकर्त्यानीही तसेच केले आहे by चंपाबाई
सर, कनेक्ट झालंय.
In reply to ओके by प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
अरे वा! छानच दिसतेय. तुमच्या
In reply to संडे स्पेशल by चंपाबाई
वा मस्त मस्त रेसेपि :)
In reply to संडे स्पेशल by चंपाबाई
हो
In reply to वा मस्त मस्त रेसेपि :) by पियुशा
अहमदाबादला खाल्ली होती.
..
In reply to अहमदाबादला खाल्ली होती. by चंपाबाई
पाककृती आवडली. वरण, आमटी अशा
ह्याला आम्ही दाळबट्टी म्हणतो.
सेक्सी!!
आता कुणी १)दाल - पकवान (सिंधी
ठाण्यात कोपरी येथे अप्रतिम
In reply to आता कुणी १)दाल - पकवान (सिंधी by कंजूस
कोपरीत कुठे ?पुर्वेला?फक्त
In reply to ठाण्यात कोपरी येथे अप्रतिम by वेदांत
होय..
In reply to कोपरीत कुठे ?पुर्वेला?फक्त by कंजूस
..
In reply to आता कुणी १)दाल - पकवान (सिंधी by कंजूस
चांगलंय ! करून बघायला पाहिजे
नंबर १ - राजस्थान ढाबा, भारत
रामदेव बाबा ढाबा निगडी
In reply to नंबर १ - राजस्थान ढाबा, भारत by ५० फक्त
पाकृ वाचली, पाहिली. चवीला
चुरमा आणि गूळ हे पण काँबिनेशन.....
In reply to पाकृ वाचली, पाहिली. चवीला by रेवती
अग्गो बाई!!!
सेक्सी!!
पिरातैच्या रेशेपीने काल
My Air Fryer attempt for Bati
वेळ आणि टेंपरेचर काय वापरले ?
In reply to My Air Fryer attempt for Bati by पगला गजोधर
Hello
In reply to वेळ आणि टेंपरेचर काय वापरले ? by स्मिता_१३
धन्यवाद ! :)
In reply to Hello by पगला गजोधर
मी फक्त राजधानीत खाल्लाय हा
मस्त..
पिराकाकू
नागपंचमीला तुमची आठवण आली
In reply to पिराकाकू by प्रा.डॉ.दिलीप बिरुटे