Skip to main content

हमखास हिट - दाल बाटी!

लेखक पिलीयन रायडर यांनी शनिवार, 30/07/2016 07:10 या दिवशी प्रकाशित केले.
कधी कधी माणसाला साधी सोपी पोळी-भाजी सोडून सुखाचा जीव भयानक कटकटीच्या गोष्टीत गुंतवायची हुक्की येते. आज तसाच एक दिवस होता.. दाल बाटीचा! तर त्याचं असं झालंय की माझ्या आईच्या वडीलांकडुन, अण्णांकडुन, माझ्याकडे असंख्य गुण आलेत. त्यातला एक म्हणजे दाल बाटीची आवड! जगात अ‍ॅक्चुअली दालबाटी एका पद्धतीने करतात, माझी आई दुसर्‍या पद्धतीने करते, सासुबाई तिसर्‍या पद्धतीने करतात आणि मी... अंदाजपंचे करते! लोक निखार्‍यात वगैरे भाजुन कसल्या कसल्या जीवघेण्या बाट्या करतात. आपल्याला तसलं काही येत नाही. कारण आपल्याला एका लेकराला सांभाळून स्वयंपाक करायचा असेतो किनई.. मग असले टाईमपास परवडत नसतेत! तर अंदाजपंचे थोडी कणिक, मक्याच पीठ आणि रवा घ्या. त्यात चवीपुरतं मीठ टाका आणि घ्या तिंबुन. तिंबलेल्या पीठाचे गोळे करुन घ्या. एका गोळ्याला तेल लावुन त्याची लंबुळक्या आकाराची पोळी लाटा. ह्या पोळीला तेल लावुन तिचा रोल करुन घ्या. रोलची दोन टोके एकत्र आणुन त्याची घडी घाला. ही झाली बाटी! (पहा फोटो!) ही बाटी करण्याची आमच्या माहेरची पद्धत. सासरी डायरेक्ट गोळाच बाटी म्हणुन घेतात. काही ठिकाणी बहुदा त्याला बाफले म्हणतात. kanik bati 1 आता इथुन पुढे तुमच्याकडे दोन पर्याय आहेतः- हेल्दी किंवा सेक्सी...! हेल्दी रेसेपी आमच्या मातोश्रींची आहे. ह्यात बाट्यांना कुकरमध्ये उकडुन घ्या. आणि मग तुपात परतुन घ्या. कमी तेला/तुपात केलेली सात्विक डाएट बाटी! सेक्सी रेसेपी आमच्या सासुबाईंची आहे. ह्यात काय करायचं की बाट्या डायरेक्ट उकळत्या पाण्यात टाकायच्या. नीट शिजल्या आहेत हे कसं कळणार? तर त्यात सुरी खुपसुन उचलुन पहायची. बाटी त्यावरुन निसटून खाली पडली आणि सुरीवरही बाटी लागलेली दिसली नाही तर शिजली म्हणायची. पण हा त्याचा सेक्सीनेस कोशंट नाहीये!! cooking bathi cooling ह्या बाट्यांना चांगलं निथळुन घ्यायचं. मग थंड करुन त्यांचे तुकडे करुन घ्यायचे. आणि हे तुकडे कुरकुरीत "तळुन" घ्यायचे. ही झाली सेक्सी बाटी! frying हा सगळा उद्योग चालु असताना बाजुला चिंच गुळाचं आंबट वरण करुन घ्यायचं. (आणि तळलेल्या बाट्या खायला आलेल्यांना हाकलुन लावायचं!) ह्या बाट्या वडा सांबार सारख्या वरणात डुंबत टाकुन खायला मजा येते! माहेरी साध्या वरणासोबत खातात. किंवा गुळ तुपात कुस्करुनही खातात. Daal Bati कशाही खा, बाट्या कधीच चुकत नाहीत हे माझ्यासाठी महत्वाचं! ;)

वाचने 49664
प्रतिक्रिया 175

प्रतिक्रिया

In reply to by गवि

पातोळे/पातोळ्या हे पानगीपेक्षा खंप्लीट वेगळे प्रकार आहेत. पानग्या हा अगदी सोपा साधा प्रकार. आणि हळदीची पाने उपलब्ध नसतील तर केळीची पाने वापरायची. फणसाच्या पानातही पातोळ्या, इडल्या वाफवतात. चिक्कार प्रकार आहेत.

In reply to by पैसा

पातोळे/पातोळ्या हे पानगीपेक्षा खंप्लीट वेगळे प्रकार आहेत.
हेच म्हणण्याचा उद्देश आहे. डो. साहेबांच्या प्रतिसादवरुन मला पातोळ्यालाच पानगी म्हटल्यासारखं वाटलं म्हणून. पातोळे बरेच जास्त कॉम्प्लिकेटेड असतात. काकडीच्या रसात पीठ भिजवून वगैरे. पानगी केळ्याच्या / कर्दळीच्या पानातच पाहिली होती. हळदीच्या पानात पानगी पाहण्यात आली नव्हती. हळदीचं पान पातोळ्यासाठीच असं समीकरण होतं. शिवाय पातोळा फक्त वाफवतात आणि पानगी तव्यावर भाजतात हा मुख्य फरक माहिती होता.

In reply to by गवि

पण हळदीच्या पानाबद्दल ते म्हणाले ते बरोबर. पानगी करताना सुद्धा हळदीची पाने असतील तर त्यानाच प्रेफरन्स असतो.

In reply to by गवि

पातोळे बरेच जास्त कॉम्प्लिकेटेड असतात. काकडीच्या रसात पीठ भिजवून वगैरे. पानगी केळ्याच्या पानातच यु आर "राईट्ट" गवि शेट थोडा गोंधळ झाला होता. आता तुम्ही सांगितले तेंव्हा हा गोंधळ दूर झाला. धन्यवाद

In reply to by कंजूस

हे हळदीचे पान. डॉक्टर म्हणतात तसे हळदीच्या पानात किंवा केळीच्या पानात करतात. पानगी/पानगा दोन्ही ऐकले आहे.

In reply to by पैसा

एक वेगळा धागा होऊ दे सोवळा ( सेक्सीच्या शिक्क्याने पाचशे प्रतिसाद नाही झाले तरी चालतील) एक रेकॅार्ड होईल कोकणातल्या या वानग्यांचे.पुढची पिढी हे खाणार नाहीच अथवा फेसबुकातल्या पोस्टीपर्यंतच लाइक्स. पातोळे,पानग्या,खांडस: काजू मनुका खोबरे ओली हळद घालून,पहिल्या पावसात वाडीला नेवेद्य करतात तो वाडुलं गोडुलं,कोळाचे पोहे- फोटो भरपूर टाका.

In reply to by कंजूस

पैताई, प्रीमो, गवि। आणि जे कुणी कोंकणी पदार्थ जाणत असतील ते यांनी 1 मस्त धागा काढा त्यासाठी

In reply to by पैसा

मास्टरशेफ़ इंडियाच्या एका एपिसोड्मध्ये स्वीटकॉर्नची पाने वापरून पानगी केलेली पाहिली. आयडिया आवडली होती.

In reply to by आनंदी गोपाळ

(स्वीट कॉर्नचे कणीस सोलून जी पाने निघतात ती. मक्याच्या झाडाचे पान नव्हे. )

In reply to by आनंदी गोपाळ

तमाले नावाचे असे इथे समजले

In reply to by पैसा

हो, पानगे शब्द ऐकलाय रोडग्यासाठी नागपूरला. अर्थात फक्त म्हणत असतील. यांचा आणि पानांचा तसा काही संबंध येत नाही..

In reply to by टामोलीयन

नका हो अशा नाजुक, गोल वळणाच्या टुमटुमीत बाट्यांना असा मेदाचा शाप देऊ. 'मादक'च राहू दे. 'मेदक' नका करू!

In reply to by आनंदी गोपाळ

बाट्यांवरील राख झाडायची गुजराती/राजस्थानी पद्धत बाट्या झगरातून (विस्तवातून) काढल्या की एका स्वच्छ सुती कापडात ठेऊन त्याचे गाठोडे करावे अन ते खसाखस हलवावे, सगळ्या बाट्या स्वच्छ होऊन जातात पूर्ण राख निघून जाते

In reply to by कैलासवासी सोन्याबापु

बाप्पू गावची याद आली मले, गावाकडं हनुमान जयंतीच्या भंडारा असे तेव्हा मंदिरावर म्हणून रोडगे, वांग्याची रस्सा भाजी, वरण आणि गावरान तूप असायचं. त्या टायमाले बम्म खायचो रोडगे. आता हनुमान जयंती ले जाण होत नाही राजेहो गावाले. या सायच्या कामानं सगळी जिनगानी बर्बाद करून टाकली.

In reply to by प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

त्यांना बहुतेक चुरमा म्हणायचाय. आमच्या मारवाडी मित्राकडे दाल बाटी चुरमा असा टिपिकल बेत असतो.

In reply to by आनंदी गोपाळ

कुरमा नव्हे ते चुरमा हवे. बाटीचे मोठे गोळे केले की आत कच्चे राहू शकतात म्हणून चुरमा प्रकार करत असावेत.सोळा सोमवारच्या व्रताला जो चुरमा करतात तो बाटीच्या आत भरतात.राजस्थान /मप्र कडे जेवण मागवले तर दोन प्रकारचे असते.एकात नेहमीच्या जेवणात दोन बाटी आणि पंचरत्न डाळ( पाच डाळींचं घट्ट वरण, माउंट अबू )देतात अथवा सहा बाट्यांची वेगळी थाळी मिळते.दोन बाटीवाली थाळीच घ्यावी,आवडल्यास आणखी बाटी घ्यायची.नवख्यांनी शक्यतो थंडीतच खावी.मप्रतल्या बाटींना बाफलेच म्हणतात त्यात चुरमा नसतो. रोडगा: लहानपणी सांगलीत गेलेलो देवळात.तिथला हत्ती पाहाताना पो पडल्यावर एक माणूस ते गोळा करून ठेवत होता त्याला विचारले तर म्हणाला " हे वाळवून ठेवतो आणि ते जाळून त्यावर रोडगे भाजतो. ते जाड असतात आणि हत्तीला फार आवडतात.नुसत्या केळ्या, उसाने काम भागत नाही.

In reply to by कंजूस

मी राजस्थानात मारवाड मध्ये ( जोधपुरला) असताना तेथे दाल बाटी बऱ्याच ठिकाणी खाल्ली आहे ती नीलकांत यांनी लुइहिलेल्या लेखातील असते तशीच आहे. दाल बाटी खाण्याची पद्धत म्हणजे बाटी फोडायची त्यावर तुपाची धार धरायची. बाटी तुपात पूर्ण भिजली कि त्यात घट्ट डाळ ओतायची आणि मग ते मिश्रण खायचे. हीच पद्धत मेवाड मध्ये हि आहे( उदयपूर चित्तोड गढ कडे). चुरमा हा गव्हाच्या जाड पिठाचा शिरा सारखा असतो किंवा त्याचे लाडू बांधले तर चुरमे के लड्डू हा प्रकार गोड असतो आणि त्यात भरपूर तूप घातलेले असते. लाडू पिळला तर तुपाची धार लागेल इतके. http://www.tarladalal.com/Churma-Ladoo-2045r एकदा दोन दाल बाट्या आणि एक चुरमे का लड्डू मारवाडी पद्धतीने( भरपूर तूप घालून) खाल्ल्यावर दुसऱ्या दिवशी सकाळ पर्यंत तुपाची ढेकर येत होती. जोधपूरला मिरची वडे मिळतात आणि त्याबरोबर माव्याची कचोरी. हि कचोरी म्हणजे गुलाबजामचा खवा मैद्याच्या कचोरीत भरून शुद्ध तुपात तळलेली असते एक मिरची वडा आणि अर्धी कचोरी संध्याकाळी खाल्ली आणि त्यानंतर दुसऱ्या दिवशी सकाळीही मला भूक लागली नव्हती. तरी बरं महिना डिसेंबरचा होता. एकंदर मारवाडी लोक तुपकटच

दाल-बाटीचं आणि आमचं कनेक्शन कधीच जुळलं नाही. गव्हा-ज्वारी-बाजरी-नाचणीच्या पोळी-भाकरीबरोबर शक्यतो भाज्या-कालवण इ. पदार्थ आणि डाळीबरोबर तांदळासारखे पिष्टमय पदार्थ असावेत असा माझा दंडक. पाकृ छान आहे. आनंदी गोपाळ यांचीही पाकृ छान.

पिराने हामरिकेत सेक्सी का काय ती दालबाटी केली बुवा! अजून अशाच पाकृंच्या प्रतीक्षेत ;)

@आनन्दी गोपाळ , याला एम्पीत बाफ्ले म्हणतात. तिकडे विशेषतः मालवा प्रान्तात याची प्रचण्ड क्रेझ आहे. भण्डारा , सुन्दरकाण्ड पूजा , लग्न समारंभ ई. प्रत्येक ठिकाणी दाल बाफ्ले मस्ट. उज्जैनला बसस्टॅण्डजवळ फ्क्त दाल बाफल्याचे २५-३० हॉटेल आहेत.

In reply to by मितभाषी

हाँ जी. इंदौर की याद आ गयी भिया. पिरा बाटी बढीया है.मांडू मे दाल पानिये मिलते है जी.ते पण हळदीच्या पानात गुंडाळून शिजवतात.

चामायला कुठे मिळेल हा प्रकार, आत्ताचच्या आत्ता पपायजेल, गोपाळराव जितके खवट बोलतात तितक्याच कडक पाक्रु करतात

In reply to by स्पा

पुण्यात हवा असेल तर रामदेवबाबा का ढाबा आहे निगडी ला.. मस्त आहे.. चुरमा तर जबरदस्त असतो.. https://www.zomato.com/pune/baba-ramdev-dhaba-nigdi

आता राजस्थानी लाल मास वर पण एक पाकृ येउद्या .. बाकी डाल बाटी विवियाना ठाणे मध्ये राजधानी ला चांगला मिळतो

सप्टेबरात अहमदाबादेत जाणार अहे. तिथे मिळतात

आमच्या इथे एक राजस्थानी हॉटेल आहे. प्रत्येक संडेला दालबाटी असा बोर्ड करुन दिलेला त्याला. नाव काय आवडले नाही पदार्थ्याच्चे. पण भलताच देसी दिसतोय. आता खाउन बघणे आले. एनीवे हे राजस्थानी दालबाटी आणि खान्देशी/वैदर्भीय दालबाटी एकच ना? नैतर तिथे परत बल्ल्या.

In reply to by अभ्या..

खान्देशी माहिती नाही पण वैदर्भी वेगळ्या असतात खूप, आमच्याकडे बाटी म्हणजे बाफलेच असतात राजस्थानी असतात तसेच फक्त आकाराने मोठे, कोंड्यासाहित पीठ इत्यादी वरीअशन असतात

आता असंय की वरणफळ किंवा चिकुल्या / चिकोल्या - कणिक तिंबुन तिच्या मोठ्या पोळ्या लाटुन घ्यायच्या. त्याचे शंकरपाळ्या सारखे तुकडे करुन ते उकळत्या फोडणीच्या वरणात (आम्ही कांदा इ काही घालत नाही, नुसते आंबट वरण) सोडायच्या. बाफले - सरळ गोळे घेतले बाटीचे आणि उकडले की बाफले. एका बंगाल्याकडेही असेच पाहिले होते. बाटी - आनंदीगोपाळरावांचीच मला जाम भीती होती, वाटलंच होतं की ह्यांनी १००% निखार्‍यांवर केली असणार. आता इथे कुठुन निखारे आणायचे हो! जीव गेला इथेच तुमचे फोटो बघुन! ह्यांनी केलेली ही खरी बाटी.. मी निखारे नसले की घरात कशी करता येते हे सांगितलय. रोडगा - मी सुद्धा ह्याच भारुडात हा शब्द ऐकलाय. कधीतरी त्याचे वर्णनही वाचले होते. पण ती बाटी नव्हे हे नक्की. लिट्टी - गोपाळरावांनी जशी केली आहे तशीच पण आतमध्ये सत्तुच्या पिठाचे तिखट सारण असते. हा पदार्थ बिहारकडे जास्त बनवतात आणि चोखा नावाच्या वांग्याच्या भाजी सोबत खातात. मी फक्त लिट्टीच खाल्ली आहे, जी उच्च असते! दाल-ढोकली - नाव ऐकलंय, कधी खाल्ली नाही. बाट्या करण्याची ही पद्धत नक्की मला कशी माहिती हे आता आठवत नाही. पण नुसते गोळे कच्चे रहातात म्हणुन ही अशी गुंडाळत न्यायची. कारण मग त्याला पदर सुटतात आणि जास्त नीट शिजते असा माझा अनुभव. माझ्या डोक्यात बाटी आणि आजुबाजुच्या पदार्थांविषयी ही आणि अशीच माहिती फीड आहे. तसं बघितलं तर शेवटी वरणात कणीक टाकुनच खायची हो! पण प्रत्येक गोष्टीची चव वेगवेगळी असते. प्रत्येकाची पद्धत वेगवेगळी असते. :)

In reply to by पिलीयन रायडर

हाय हाय! काय आठवण! रच्याकने चोखा हा बटाट्याच्या भाजीचा असतो.वांगं मी तरी खाल्लं नाहीये त्यात. झारखंडमध्ये प्रत्येक गोष्टीत बटाटे घालतातच. कदाचित वरती बिहारमध्ये वांगी पण घालत असतील. बाकी डालबाटीचू्रमा खायचा तर जोधपूरला किंवा अहमदाबादच्या जवळ हिंमतनगरला हायवेवर. अप्रतिम असतो. तूप तर असं ओततात की नुसत्या त्या वासानेच भूक लागते.

In reply to by पिलीयन रायडर

आनंदीगोपाळरावांचीच मला जाम भीती होती, वाटलंच होतं की ह्यांनी १००% निखार्‍यांवर केली असणार.
आग्यावेताळ नांव पडलंय की काय माझं? ;) निखारे नसलेत तर स्पेशल बाटी कुकर मिळतो, किंवा ओव्हनमधेही करता येतील की! पण त्या डायरेक्ट निखार्‍यात भाजल्याची मजा इतर कशात येत नाही हेच खरे. वरण-बट्टीचा बेत स्पेशली वनभोजनाला जाऊन केला जाई. लहानपणी गावाबाहेरच्या देवळात "ट्रिप" जायची. तिथे जाऊन वरणबट्टी बनवली जायची. बट्ट्यांसाठी आम्ही मुलांनी आजूबाजूच्या गायरानातून गोळा केलेल्या रानशेण्या. त्याचा पेटवायचा विस्तव. त्यात बट्ट्या भाजणे, अन त्याच निखार्‍यावर तीन दगडांची चूल करून त्यावर वरण, भाजी शिजवणे. हे सगळे होत असताना त्या निखार्‍यात भाजलेले कांदे-बटाटे खायची मजा अजून वेगळी असायची. मस्त आठवण.. रोडगा नीलकांतांच्या लेखात आहे तोच. साधारणतः ५-६ लोकांसाठी पोळ्यांची कणीक भिजवता ना? तितक्या साईजचा एकच गोळा भाजला की तो रोडगा. याला विस्तव अत्यंत मंद व भाजायचा वेळ भरपूर असतो. घरी रूटीनली करण्यासारखा उद्योग नाही. पारंगत आचारी काही कार्यक्रमाच्या मेजवानीनिमित्त करतील तेव्हा खायला मिळणार. ती वेगळीच मजा.

In reply to by आनंदी गोपाळ

वरण-बट्टीचा बेत स्पेशली वनभोजनाला जाऊन केला जाई. लहानपणी गावाबाहेरच्या देवळात "ट्रिप" जायची. तिथे जाऊन वरणबट्टी बनवली जायची. बट्ट्यांसाठी आम्ही मुलांनी आजूबाजूच्या गायरानातून गोळा केलेल्या रानशेण्या. त्याचा पेटवायचा विस्तव. त्यात बट्ट्या भाजणे, अन त्याच निखार्‍यावर तीन दगडांची चूल करून त्यावर वरण, भाजी शिजवणे. हे सगळे होत असताना त्या निखार्‍यात भाजलेले कांदे-बटाटे खायची मजा अजून वेगळी असायची.
गतःप्राण पिरा!

In reply to by आनंदी गोपाळ

आत्ता गूगलत होतो, खांदेशी बाटी चांगली दिसते, म्हणजे चकोल्याल्या बाटी म्हणावं असा प्रकार दिसत नाही. जरा तपशीलवार खांदेशी डालबट्टी येऊ देत..... -दिलीप बिरुटे

In reply to by आनंदी गोपाळ

निखारे नसलेत तर स्पेशल बाटी कुकर मिळतो,
काय म्हणतात त्याला? बाटी कुकर असंच नाव आहे का? दुकानात गेल्यावर काय मागायचं?

मस्त दिसतिये दालबाटी!मी ओव्हनमध्ये करते आणि तुपात भिजवते.तशिहि छान लागते.तूप हव तस (झेपेल तस)घेता येत.

मस्त दिसतिये दालबाटी!मी ओव्हनमध्ये करते आणि तुपात भिजवते.तशिहि छान लागते.तूप हव तस (झेपेल तस)घेता येत.

मस्त दिसतिये दालबाटी!मी ओव्हनमध्ये करते आणि तुपात भिजवते.तशिहि छान लागते.तूप हव तस (झेपेल तस)घेता येत.

पिरा मस्त लिहिले आहेस... लवकरच धागा शतक गाठो ;) मग त्याचे सेलिब्रेशन म्हणुन तु परत हीच अशीच दाल बाटी करावी :)

In reply to by विशाखा राऊत

आतापत्तुर अंदाज आला आसन की... जरा आजून गोजिरी करत्याल. चालनार न्हाय काय???

In reply to by कंजूस

दालबाटी तसा अवघड एटम नाही, कोणाही माणसाला सहज जमनारा हा प्रकार, त्यामुळे जवळ जवळ कोणत्याही आचा-यला सांगितलं तर दाल बट्टी करून देत असावा, पण प्रत्येक वेळी ती बट्टी टेष्टीच होईल याची खात्री नसते म्हणून अशी प्रसिद्ध नावँ नसावीत असे वाटते. पण अशी नावं असतील तर वाचायला आवड़तील. -दिलीप बिरुटे

In reply to by कंजूस

काका, मी असं ऐकलय की निगडीत - ट्रान्सपोर्ट नगर मध्ये रामदेव बाबाका धाबा इथे चांगली मिळते. पण कधी खाल्लेली नाही. फार पुर्वी आकुर्डी स्टेशन समोर एक बालाजी नावाचं लहानंस हॉटेल होतं. तिथेही चांगली मिळायची. आताच माहित नाही. मी एकदा माऊंट अबुलाही खाल्लेली आहे. पण त्यानंतर आमच्या घरातले सगळे दणकुन आजारी पडले! बाकी आमच्याकडे मक्याचं पीठ घालुन कुरकुरीत तळलेलीच बाटी "हमखास हिट" आहे :)

In reply to by कंजूस

काका, मी असं ऐकलय की निगडीत - ट्रान्सपोर्ट नगर मध्ये रामदेव बाबाका धाबा इथे चांगली मिळते. पण कधी खाल्लेली नाही. फार पुर्वी आकुर्डी स्टेशन समोर एक बालाजी नावाचं लहानंस हॉटेल होतं. तिथेही चांगली मिळायची. आताच माहित नाही. मी एकदा माऊंट अबुलाही खाल्लेली आहे. पण त्यानंतर आमच्या घरातले सगळे दणकुन आजारी पडले! बाकी आमच्याकडे मक्याचं पीठ घालुन कुरकुरीत तळलेलीच बाटी "हमखास हिट" आहे :)

In reply to by पिलीयन रायडर

काय राम नै त्या रामदेव बाबात.नका जावू. त्यापेक्षा माझ्याकडे या खान्देशी बट्टी खायला.

In reply to by पिलीयन रायडर

चिंचवड गावात आदित्य बिर्लासमोरच्या रस्त्याला एक रस्ता समांतर जातो त्या रस्त्यावर रंगोली म्हणून एक ठिकाण आहे. तेथे राजवाडी बाटी खाऊन बघ. अर्र.. तू तर डॉलरच्या देशात आहेस.. मी एखाद्या वीकांताला जावून खातो आणि तुला फोटो पाठवतो. ;)

In reply to by किसन शिंदे

धन्यवाद! वीकांताला टाकलेली साधीशी पाकृ कोणत्याही हाणामार्‍या न होता सुद्धा १०० गाठेल असं मला स्वप्नातही वाटलं नव्हतं. बाटी ह्या विषयावर एवढी रोमहर्षक चर्चा केल्या बद्दल, अस्सल निखार्‍यात भाजलेल्या आणि तुपात मुरवलेल्या बाटीचे फोटो टाकल्या बद्दल, बाट्यांना वरण आणि कणिक ह्या समान घटकांमुळे पार चिकोल्या (अर्र्र्र्र्र्र्र्र्र्र्र्र्र...) म्हणल्याबद्दल आणि सगळ्यात महत्वाचे म्हणजे, पाकृ "सेक्सी" आहे की नाही.. आणि मग मुळातच सेक्सी म्हणजे काय ह्याबद्दल एवढा तळमळीने विचार केल्याबद्दल सर्व प्रतिसादकांचे त्या त्या कॅटेगरीत आभार! कुणी कधी करुन खाल्लीत ह्या पद्धतीने तर कळवा. परत एकदा धन्यवाद!

फाष्ट १०० साठी धाग्यावर हजेरी लावणाऱ्या सर्व काका, मामा, आत्याबाईंचा सत्कार हेल्दी वरणफळे देऊन करण्यात येत आहे.

In reply to by किसन शिंदे

मला आपले पथ्याचे खाणे बरे वाटते रे! आता वयानुसार ते सेक्सी बिक्सी पचायला अंमळ जड की रे! खाऊन नंतर त्रिफळा चूर्ण घ्यायची वेळ यायची! कसें?

In reply to by चंपाबाई

आवडली बट्टी. भरपेट, दाबून हाना अन एक मस्त ताणुन द्या. सालं सूख, सूख हेच दुसरं काही नाही. आमच्याकड़े चिकन होतं. सालं श्रावण लागला की नॉनव्हेज बंद होऊन जातं. आमचं घरी बंद असतं मित्रांब्रोबर सुरु असतं ;) -दिलीप बिरुटे -दिलीप बिरुटे