✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव
मिसळपाव मराठी साहित्य

Main navigation

  • मुख्य पान
  • पाककृती
  • कविता
  • भटकंती
  • नवीन लेखन

आजकाल जुने हिंदी सिनेमे थियेटर मध्ये बघायला मिळतात का ?

I
IT hamal यांनी
Fri, 07/29/2016 - 16:30  ·  लेख
लेख
२००० सालानंतर मी थियेटर ला जाऊन जुना हिंदी वा मराठी सिनेमा बघितला नाहीये... आजकाल पिक्चरचं आयुष्य थिएटरमध्ये फक्त १ वा २ वीकएंड एवढेच असते . हायस्कुल व कॉलेजला असतांना बच्चन , धर्मेंद्र , सनी देवल,मिथुन, नाना , अनिल कपूर ई . हिरोंचे कित्येक पिक्चर मित्रांबरोबर टॉकीजमध्ये बघायला जी मजा यायची ती मजा घरी कॉम्पुटर वर CDya बघण्यात नाहीच... मुंबईत होस्टेलला असतांना १९९५ च्या दरम्यान वरळी नाक्याची गीता , डिलाईल रोड ची दीपक , मराठा मंदिर, मिनर्व्हा पासून पार रेड लाईट एरिया मधील Alexandra ला जाऊन आमची gang मिळेल ते जुने सिनेमे बघत असे ....त्या आधी नाशकात 12-15 वर्ष सगळ्याच टॉकीजमध्ये खूप सिनेमे पहिले.. मालेगावात तर त्याकाळी हिंदी सिनेमाची खूप च क्रेझ होती.. शुक्रवारी खास "मुंबई बरोबर मालेगावात रिलीज " अश्या जाहिराती पेपरात येत.आणि गाजलेले पिक्चर तर वर्षानुवर्षे चालत .. कदाचित अजूनही तिथे जुने पिक्चर थिएटरमध्ये लागत असावेत असे वाटते ...मुंबई / पुणे/ नाशिक / मालेगाव मध्ये कुठल्या थियेटर ला जुने हिंदी पिक्चर अजूनही लागतात का ?
वर्गीकरण
लेखनविषय (Tags)
मौजमजा
लेखनप्रकार (Writing Type)
चौकशी

प्रतिक्रिया द्या
5443 वाचन

💬 प्रतिसाद (23)

प्रतिक्रिया

आमच्या गावात (पुणे,

चौथा कोनाडा
Fri, 07/29/2016 - 17:40 नवीन
आमच्या गावात (पुणे, पिंचिंवाडी) इथे तर लागत नाहीत जुने सिनेमे. कधी काळी रंगीत मोगले आझम अन नंतर त्रिमि शोले वाजत गाजत प्रदर्शित झाले होते. इतर ठिकाणच्या परिस्थितीवर बुजुर्ग मिपाकर सांगतीलच.
  • Log in or register to post comments

दीपक टॉकीजच्या आठवणीने अं ह

आदूबाळ
Fri, 07/29/2016 - 18:27 नवीन
दीपक टॉकीजच्या आठवणीने अं ह झालो. काय एर्‍या आहे बॉस! ------- मंगला टॉकीज जेव्हा एकपडदा होतं तेव्हा रोज सकाळी ९ वाजता जुने सिनेमे लागायचे. तिकीट रु. १५. फक्त प्रॉब्लेम असा होता, की आयत्या वेळी मिळेल ती रिळं लावायचे. त्यामुळे कोणतेही चित्रपट बघायला मिळायचे (लागायचे?)
  • Log in or register to post comments

आयत्या वेळी मिळेल ती रिळं लावायचे.

मुक्त विहारि
Fri, 07/29/2016 - 18:31 नवीन
हे असे फक्त पुण्यनगरीतच होवू शकत असेल नाही. कदाचित तशी पाटी पण लावली असेल. १. एकदा तिकिट घेतल्या नंतर, आम्ही दाखवू तोच सिनेमा बघायला लागेल. २. आम्ही सिनेमे दाखवतो, बनवत नाही. ३. एकदा विकलेले तिकिट परत घेणार नाही. वगैरे वगैरे
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: आदूबाळ

कॉलेजचे काही मित्र तंदुरस्त

मार्मिक गोडसे
Fri, 07/29/2016 - 19:09 नवीन
कॉलेजचे काही मित्र तंदुरस्त रहाण्यासाठी 'मॉर्निंग वॉच'ला जायचे. स्वस्त आणि 'मस्त' सिनेमे बघायला, स्थळ : अशोक टॉकीज ठाणे.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: आदूबाळ

अशोक सारखेच अजून एक थियेटर ह्या साठी फेमस होते...

मुक्त विहारि
Fri, 07/29/2016 - 19:15 नवीन
डोंबिवलीतील रामचंद्र टॉकीज.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: मार्मिक गोडसे

अशोकपेक्षा खोपटचे प्रताप

किसन शिंदे
Fri, 07/29/2016 - 19:41 नवीन
अशोकपेक्षा खोपटचे प्रताप टाॅकीज या शोजसाठी कित्येक वर्षे फेमस होते. :)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: मार्मिक गोडसे

प्रभात विसरलात काय

माम्लेदारचा पन्खा
Fri, 07/29/2016 - 22:51 नवीन
तसली पोस्टरं पहायला गर्दी करायचे लोक !
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: किसन शिंदे

>>तसली पोस्टरं पहायला गर्दी

किसन शिंदे
Sat, 07/30/2016 - 00:16 नवीन
>>तसली पोस्टरं पहायला गर्दी करायचे लोक ! त्यात एमएचची पोरंही बरीच असायची ;) आमचा बापलेकर एकदा माॅर्निंग शो ही पाहून आलता. =))
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: माम्लेदारचा पन्खा

एखाद्या शोला तुरळक प्रेक्षक

मार्मिक गोडसे
Sat, 07/30/2016 - 11:34 नवीन
एखाद्या शोला तुरळक प्रेक्षक असले की अर्ध्या तासानंतर अचानक शो थांबवून धाड पडल्याचे नाटक केले जायचे व एक दोन प्रेक्षकांना(त्यांचीच माणसे) पकडल्याचे नाटक केले जायचे. त्यामुळे बाकीचे घाबरून पळून जायचे. शो कॅन्सल व्हायचा.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: किसन शिंदे

तुमच्या बापलेकरचं पुढे काय झालं म्हणे ?

माम्लेदारचा पन्खा
Sat, 07/30/2016 - 13:54 नवीन
लिखाण पूर्ण करा की राव !
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: किसन शिंदे

गिरगावातील इंपिरिअल ला माॅर्निंग शो असायचा.

बोका-ए-आझम
Fri, 07/29/2016 - 19:47 नवीन
त्यात मुघल-ए-आझम,तेरे घर के सामने आणि तीसरी मंझिल हे पाहिल्याचं आठवतंय. १९९९ सालची गोष्ट. डोंबिवली पूर्वेस असलेल्या टिळक मध्ये प्यासा; साहिब, बीबी और गुलाम; आरपार आणि सी.आय.डी. हे पाहिले होते. पण त्याला बरीच वर्षे झाली.
  • Log in or register to post comments

च्यामारी, हा धागा डोंबिठाणे

चौथा कोनाडा
Fri, 07/29/2016 - 23:53 नवीन
च्यामारी, हा धागा डोंबिठाणे मिपाकरानी हायजॅक केला की ! हळूच अभ्यादा पण घुसनार सोलापुरकरा ना घेवून. आता कुठलं नाशिक मालेगाव ?
  • Log in or register to post comments

राह्यलं, गप्प बसतो.

अभ्या..
Sat, 07/30/2016 - 10:58 नवीन
राह्यलं, गप्प बसतो.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: चौथा कोनाडा

:-)))

चौथा कोनाडा
Tue, 08/02/2016 - 16:21 नवीन
:-))) बस्स का राव ? तुमी इथं खेळायला यावं म्हणुनच असं लिहिलयं या घुसा बिनधास !
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: अभ्या..

पुर्वी एका चित्रपटाबद्दल

सिरुसेरि
Sat, 07/30/2016 - 10:48 नवीन
पुर्वी एका चित्रपटाबद्दल "ट्रॉली निस्ती गार्र गार्र फिरावली आहे" असा उल्लेख वाचला होता . तो चित्रपट "गॉन विथ द विंड" तर नव्हे ?
  • Log in or register to post comments

नाशकातही नसतात हो हल्ली. बाकी

vcdatrange
Sat, 07/30/2016 - 13:46 नवीन
नाशकातही नसतात हो हल्ली. बाकी जेव्हा रिळं यायची तेव्हा,गुरुवारी रात्री ऊशीराचे खाजगी शोज कोणी पाहिलेत काय? नाशिकरोडच्या अनुराधा कडे कायम दुस-या थेटरातले रिळ यायची, एक रिक्षावाला ठरलेला, दोन्हीकडची रिळं इकडुन तिकडे घेऊन जाण्यासाठी.त्यामुळे शोज् च्या वेळापण अर्धा पाऊणतास उशिराच्या असायच्या
  • Log in or register to post comments

नाशकातही नसतात हो हल्ली. बाकी

vcdatrange
Sat, 07/30/2016 - 13:47 नवीन

Sat, 07/30/2016 - 13:48 नवीन

आयला

vcdatrange
Sat, 07/30/2016 - 13:56 नवीन
फोन गंडला राव,घ्या आता एडजेस करुन
  • Log in or register to post comments

औरंगाबादला 'गुलजार'

एस.योगी
Sat, 07/30/2016 - 16:58 नवीन
औरंगाबादला 'गुलजार' मध्ये लावायचेत जुने सिनेमे ... सध्या माहीत नाही... प्रा. डॉ.साहेब तुम्हाला काही आयडिया ?
  • Log in or register to post comments

लेखन करा

लेखन करा

मिसळपाव वर स्वागत आहे.

प्रवेश करा

  • नवीन खाते बनवा
  • Reset your password
मिसळपाव.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Misalpav.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा