देवदासच्या निमित्ताने....
लेखनविषय (Tags)
आजच आंतरजालावर नेहमीप्रमाणे काहीबाही शोधत असताना समोर बातमी दिसली....
मराठीतल्या देवदासचा पहिला टिझर लाँच..
नेहमीप्रमाणे उत्सुकता चाळवली गेली अन मी त्या लिंकवर क्लिक केलं...
'तुझं लग्न हे माझं स्वप्न होतं आणि ते मी पाहिलंही पण तुझ्या रुपाच्या आणि मनाच्या सौंदर्यात इतका वाहुन गेलो कि नवर्याच्या रुपात मलाच पाहायला विसरुन गेलो. आता तर साठलेल्या अश्रुंना पाउलवाटही सापडत नाही ग.त्या अश्रुंची विहीर कधी तुला पाहायला मिळाली असती तर माझ्या दु:खांचा अंदाज तुला लावता आला असता.....मी काय करेन माहिती आहे, मी नक्कि न रडताच श्वास सोडेन. कारण मेल्यानंतर माझा आत्मा जेव्हा त्या देवांशी समोरासमोर भांडेल ना तेव्हा माझे साठलेली अश्रु त्या देवांना भारावून टाकणारे आणि कधीही न संपणारे प्रश्न विचारतील आणि कदाचित तेव्हा तरी तो मला उत्तर देउ शकेल कि माझं लग्न तुझ्याशी का नाही लावून दिलं....'
असा पल्लेदार संवाद म्हणत एक एक पाउल सावकाशपणे टाकत पुढे जाणार्या त्या नायकाबरोबर, कुठल्याश्या एका नदीवर हा प्रवास थांबतो.... पाठुन मोठ्यानं हाक येते.....'देवाssssssssss' आणि नायक बघतो त्या आवाजाकडे नि आपल्याकडेसुद्धा...
देवदास...शरदचंद्र चटोपाध्याय यांची गाजलेली कादंबरी......एक प्रेमकहाणी...अर्धी-अपुर्ण! कथा सांगण्याची गरज नाही इथं...ती तर जवळपास सगळ्यांना ठाउक आहे.. १९१७ च्या दरम्यान ही कादंबरी प्रसिद्ध झाली. शंभर वर्ष होतिल पुढच्या वर्षी तरीही जादु काही कमी होण्याच नाव घेत नाही.. असं काय आहे त्यात ठाउक नाही पण काहीतरी आहे हे नक्की..ते असल्याशिवाय का उगाच याच कथेवर १९२७ ते २०१३ या ९५ वर्षांच्या काळात तब्बल सोळा चित्रपट येउन गेले...कथा तिच पण तरीही प्रत्येक वेळी वेगळ्या बाजुनं भेटलेली....असं म्हणतात कि जेव्हा देवदास शरदबाबुंनी लिहिली तेव्हा ते फक्त सतरा वर्षांचे होते...अर्थात तेव्हा ती प्रसिद्ध नाही झाली. जेव्हा झाली तेव्हा ते ४१ वर्षंचे होते..अस्तु.
हा चित्रपत २०१७ मधे प्रदर्शित होइल असा अंदाज आहे कारण टिझरमधे ही तसच म्हटलयं.... देवदास प्रकाशित झाल्यापासुन बरोबर १०० वर्षांनी.....काय अपूर्व योगायोग आहे हा!!
रुतुराज धालगडे हा नवखा दिग्दर्शक हे दिव्य पेलण्याचा प्रयत्न करतोय...याआधी त्यांन स्लॅमबूक हा चित्रपट लिहिला होता...दिग्दर्शनात पदार्पण करत असताना देवदाससारखी कलाक्रुती आपल्या मराठीत बनवण्याची घेतलेली रिस्क कौतुकास पात्र आहे हे नक्की. या चित्रपटात भूमिका कोण करताहेत हे अद्याप उलगडलेलं नाही शिवाय एक सोडुन...
चित्रपटाचं मुख्य पात्र अर्थात देवदास मराठीतला एक उत्तम नट साकारतोय. त्याचं नाव मी इथ सांगत नाही ते तुम्ही पाहालच पण इतर पात्र अजुन तरी गुलदस्त्यात आहेत..
आता हा चित्रपट नक्की कसा आहे, कलाकार त्यांची काम वगैरे सगळं येणारा काळच सांगेल.
तोपर्यंत वाट पाहणे उत्तम....!!
लिंकःhttps://www.youtube.com/watch?v=K3bbg90LQVU
प्रतिक्रिया
अरे वा!
टीज़र तर चांगला वाटतोय. पण
एवढ गटणे टाइप मराठी बोलत असेल
तीन बाबतीत कुतूहल आहे.