✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव
मिसळपाव मराठी साहित्य

Main navigation

  • मुख्य पान
  • पाककृती
  • कविता
  • नवीन लेखन
  • भटकंती

चेन्नई भेट

उ
उमेश पाटील यांनी
Wed, 07/27/2016 - 21:27  ·  लेख
लेख
नमस्कार मंडळी, कार्यालयीन कामानिमित्त चेन्नई ला १५ दिवस राहण्याचा योग आला आहे. कोणी मिपाकर चेन्नई ला असतील तर कृपया कळवा. उमेश. ८७६७४६८७६८
वर्गीकरण

प्रतिक्रिया द्या
13903 वाचन

💬 प्रतिसाद (30)

प्रतिक्रिया

तुमचा मो. न. भारी हाय भौ.

सुंड्या
गुरुवार, 07/28/2016 - 00:21 नवीन
आठशे छहात्तर सात-४६-आठशे छहात्तर आठ.
  • Log in or register to post comments

छहात्तर ?

विटेकर
गुरुवार, 07/28/2016 - 09:35 नवीन
छहात्तर ? छहात्तर नाही हो ..... शहात्तर ! लिहा आता १० वेळा शहात्तर ..... शहात्तर आणिओ चोप्य पोस्त करायचे नाही !
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: सुंड्या

म्हणजे 'चुक' बरोबर होती

सुंड्या
गुरुवार, 07/28/2016 - 10:50 नवीन
आधी 'श'च होता हो,पण हिंदी-मराठीची सरमीसळ झाली ...धन्स. श-शाळेचा, ह-हत्तीचा (च्या**) 'ह'ला काना -हाss! त-तलवारीचा 'त' ला अर्धा त -त्तं ! र-रथाचा श...हा...त्त...रं...(गीरवतो आता) शहात्तर शहात्तर शहात्तर शहात्तर शहात्तर शहात्तर शहात्तर शहात्तर शहात्तर ...
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: विटेकर

हाहाहाहा

उमेश पाटील
गुरुवार, 07/28/2016 - 11:39 नवीन
नंबर साठी आणि शहात्तर साठी
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: विटेकर

चेन्नई च्या महाराष्ट्र मंडळ

कबीरा
गुरुवार, 07/28/2016 - 08:27 नवीन
चेन्नई च्या महाराष्ट्र मंडळ ला भेट द्या. मी तिथे 6 महिने राहिलो होतो. शांत, निवांत ठिकाण आहे. आणि हो, रात्री जेवायला तिकडे गेलात तर पोळी खायला मिळेल :)
  • Log in or register to post comments

धन्यवाद

उमेश पाटील
गुरुवार, 07/28/2016 - 11:38 नवीन
माहिती साठी आभारी आहे. नक्की भेट देतो
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: कबीरा

चेन्नई महाराष्ट्र मंडळ

सिरुसेरि
गुरुवार, 07/28/2016 - 12:48 नवीन
चेन्नई महाराष्ट्र मंडळ हे चेन्नई मध्यवर्ती ( सेंट्रल ) रेल्वे स्थानकापासुन रिक्षाने साधारणपणे २० मिनीटावर आहे . रिक्षाने ३० ते ४० रुपये होतात जे आधीच ठरवावे लागतात . चेन्नई महाराष्ट्र मंडळ हे वेपेरी या भागात आहे . पत्ता सांगताना " जी व्ही के संपत रोड , वेपेरी " असे सांगावे . या मंडळाचे बहुतेक संचालक मंडळ , सभासद हे जरी मराठी असले , तरी अ‍ॅडमिन स्टाफ हा नॉन मराठी आहे . पण त्यांना हिंदी येते . तुम्हाला तिथे राहायचे असल्यास आधीच बुकिंग करुन ठेवणे बरे पडेल .
  • Log in or register to post comments

कशाला रिक्षाला पैसे घालवता?

मुक्त विहारि
गुरुवार, 07/28/2016 - 13:09 नवीन
चेनै स्टेशन पासून "बीच" स्टेशनला चालत यायचे. वेळ ५ ते ६ मिनिटे. "बीच" स्टेशन पासून तांबारम लोकल पकडायची. २रे किंवा ३रे स्टेशन म्हणजे "एगमोर". ५ रु. तिकीट आहे. एगमोर स्टेशन पासून चालत ३-४ मिनिटे आहे. रेल्वे नको असेल तर, चेनै स्टेशन पासून एग्मोरला जायला दर ५ मिनिटांनी बस आहे. बादवे, विमानाने जाणार असाल तर, विमानतळ ते "त्रिशूलम" स्टेशन चालत, १०-१२ मिनिटे. तिशूलम ते बीच लोकल पकडायची (ही लोकल तांबारम हून येते.) आणि एगमोरला उतरायचे. १० रुपयात जाल. रिक्षा आणि टॅक्सी चालकांसाठी मी माझा घाम गाळत नाही. गूगल मॅप देत आहे. https://www.google.co.in/maps/place/Maharashtra+Mandal,+Mahaveer+Colony+Rd,+Mahaveer+Colony,+Periyamet,+Chennai,+Tamil+Nadu+600007/@13.0874616,80.2552008,15z/data=!4m5!3m4!1s0x3a5265e2108d8db5:0xc104b7f05dd2fd69!8m2!3d13.082712!4d80.2608013
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: सिरुसेरि

वरील प्रतिसाद...

मुक्त विहारि
गुरुवार, 07/28/2016 - 13:12 नवीन
धागाकर्त्याला आहे. "सिरुसेरी" ह्यांना नाही. चुकी बद्दल क्षमस्व
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: मुक्त विहारि

धन्यवाद

उमेश पाटील
गुरुवार, 07/28/2016 - 14:30 नवीन
माहिती साठी खूप खूप आभारी आहे, खास करून फोनवर उत्तम मार्गदर्शन मिळाले
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: मुक्त विहारि

खास करून फोनवर उत्तम मार्गदर्शन मिळाले....

मुक्त विहारि
गुरुवार, 07/28/2016 - 16:42 नवीन
कधीही फोन करा. आता चेनैला जाणारच आहात तर, चेनैच्या आसपासची आणि खूद्द चेनै मधली, जमतील तितकी ठिकाणे पाहून या आणि इथे पण त्याची माहिती दिलीत तर उत्तम. ही लिंक बघीतलीत तर उत्तम. (http://www.trawell.in/chennai/200kms?more=2) चेनै रेल्वे स्टेशन पण बघण्यासारखे आहे, अगदी आपल्या बोरीबंदर सारखेच.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: उमेश पाटील

इतकी मोठी लिंक देण्यापेक्षा

टीपीके
Fri, 07/29/2016 - 15:06 नवीन
इतकी मोठी लिंक देण्यापेक्षा पुढच्यावेळी असा पत्ता द्या की 7M5237M6+38 ;)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: मुक्त विहारि

धन्यवाद

उमेश पाटील
गुरुवार, 07/28/2016 - 14:29 नवीन
माहिती साठी खूप खूप आभारी आहे
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: सिरुसेरि

तामसिक आहार करत असाल तर

कबीरा
गुरुवार, 07/28/2016 - 16:56 नवीन
तामसिक आहार करत असाल तर चेट्टीनाड चिकन अवश्य चाखून बघा. वा वा, बाकी हा धागा चालू करून जुन्या दिवसात घेऊन गेलात बघा तुम्ही. लौट आए हम वो गलिया...
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: उमेश पाटील

+11. लौट आए हम वो गलिया..

अमितदादा
गुरुवार, 07/28/2016 - 17:25 नवीन
+11. लौट आए हम वो गलिया...बाकी लेखक महाशय वेळ मिळाल्यास कांचीपुरम आणि महाबलीपुराम ला भेट द्या..
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: कबीरा

धन्यवाद,

उमेश पाटील
Sat, 07/30/2016 - 18:03 नवीन
आता चाललोच आहे तर जेवढे जमेल तेवढे फिरणार च आहे
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: अमितदादा

धन्यवाद,

उमेश पाटील
Sat, 07/30/2016 - 18:01 नवीन
बरेच ऐकून आहे चेट्टीनाड चिकन बद्दल या वेळी खाऊन च बघतो
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: कबीरा

सिरुसेरीजी तुम्हाला कशी हो

अभ्या..
गुरुवार, 07/28/2016 - 16:01 नवीन
सिरुसेरीजी तुम्हाला कशी हो ईतकी माहीती? उपरोधाने नव्हे तर खरेच उत्सुकतेने विचारतोय. तमिळ गाणी, मुव्हीज सगळ्या माहीत असतात, कोल्हापूर, सोलापूर, उस्मानाबाद पण माहीती आहे, अगदी डिट्टेल खदाड्या आणि पत्ते पण माहीती असतात, कन्नड, तेलुगु पण माहीत असते. खूप फिरला आहात का कामानिमित्त? सिरुसेरी हे चैन्नैच्या सबर्बचेच नाव आहे ना?
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: सिरुसेरि

धन्यवाद,

उमेश पाटील
Sat, 07/30/2016 - 17:54 नवीन
आधी बुकिंग करूनच जाणार आहे, बघुया चेन्नई कस आहे ते
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: सिरुसेरि

हो. सिरुसेरी हे चैन्नैच्या सबर्बचेच नाव आहे .

सिरुसेरि
गुरुवार, 07/28/2016 - 17:27 नवीन
धन्यवाद . सिरुसेरि या नावामुळे मी तामिळनाडु/तंजावुरी भागातला आहे असा कोणाचाही समज होणे साहजिक आहे . सिरुसेरी येथे चेन्नईमधील एक आयटी पार्क (सेझ) आहे . तिथे कामानिमित्त होतो . तेव्हाच मिपाचा आयडी या नावाने मिळाला . मी साधारण ३ वर्षांसाठी (त्यापेक्षा जास्त नाही) कामानिमित्ताने चेन्नई , हैदराबाद , बंगलोर या ठिकाणी राहिलो आहे . त्यामुळे वाण नाही पण गुण लागला आहे . हि ३ वर्षे सोडली तर बाकी सर्व वर्षे मी महाराष्ट्रामध्येच राहिलो आहे . राहत आहे. तंजावुरी मराठीबद्दल मी ऐकुन आहे . पण माझा फारसा त्या भाषेशी संबंध आला नाही . एके काळी सोलापुरच्या भागवत थिएटरला रविवारी रात्री ९ ते १२ चा शो बघायचा आणी मग हैद्राबादला जाणारी बस पकडायची असे टाईम टेबल होते. त्यामुळे सोलापुरला जाणे येणे होते .
  • Log in or register to post comments

भारीच.

अभ्या..
Fri, 07/29/2016 - 15:11 नवीन
भारीच. या आता एकदा सोलापूरला. भागवतमध्येच आता दोन मल्टीप्लेक्स झालेत. जुनी थियेटर पण आहेतच. चित्रमंदीर वगैरे.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: सिरुसेरि

मद्रासेत आता रिक्षा मीटर ने

Jayanti
गुरुवार, 07/28/2016 - 17:56 नवीन
मद्रासेत आता रिक्षा मीटर ने धावतात
  • Log in or register to post comments

चेन्नई भेट

पी. के.
Sat, 07/30/2016 - 15:09 नवीन
सरावांना भवन ला अल्पउपाहार जरुर करा. मांसाहारी असाल तर चेन्नई मध्ये बऱ्याच हॉटेल मध्ये रॅबिट (ससा) मसाला भेटतो जरुर खा. चेन्नई मध्ये संग्रहालय हि खूप छान आहे. मरिना बीच ला तर जाल च जवळचं विवेकानंद हौस ( आईस हौस) ला सुद्धा जा आणि टी नगर ला खरेदी तर झालीच पाहिजे. टीप:- भात चमच्याने खायचा टाळा.
  • Log in or register to post comments

धन्यवाद,

उमेश पाटील
Sat, 07/30/2016 - 17:57 नवीन
ससा मला पण फार आवडतो नक्की खाणार आणि खरेदी च्या टीप देऊ नका अजून नाहीतर बायकोचा प्लॅन तयार होईल चेन्नई जाण्याआधी
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: पी. के.

T नगर ला शॉपिंग +१

वरुण मोहिते
Sat, 07/30/2016 - 16:11 नवीन
बाकी एग्मोर ला पण फिश छान मिळत वेळ असला जरूर जा ...तिथून पुढे अंदमान ला बोटी जातात आमचे कामगार असायचे मग त्यांचा उपडेट घेणं आणि ७०mm नावाचा बार होता तिथे रोज बसणं .. हा कार्यक्रम होता ..फिश जरूर खा खात असलात तर
  • Log in or register to post comments

धन्यवाद,

उमेश पाटील
Sat, 07/30/2016 - 17:59 नवीन
नक्की, मासे तर आपले आवडते, अर्थात सर्व मांसाहार करतो तरी काही अडचण नाही येणार
  • Log in or register to post comments

चेनैमधले वातावरण कसे आहे ते

कानडाऊ योगेशु
Sat, 07/30/2016 - 18:11 नवीन
चेनैमधले वातावरण कसे आहे ते कळविणे. मी येत्या दोन तीन महीन्यात तिथे जायचा विचार करतो आहे. मागच्या वर्षे पावसाळ्यात चेनैत प्रलयसदृश परिस्थिती झाली होती.
  • Log in or register to post comments

नक्की

उमेश पाटील
Sun, 07/31/2016 - 19:34 नवीन
नक्की कळवितो
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: कानडाऊ योगेशु

चेन्नई मध्ये वातावरण

उमेश पाटील
Mon, 08/08/2016 - 19:46 नवीन
चेन्नई मध्ये वातावरण साधेपण आहे, दुपारी चटके बसतात उन्हाचे.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: कानडाऊ योगेशु

चेन्नई - पुणे

विनटूविन
Tue, 01/22/2019 - 14:32 नवीन
मुलगा 2015 पासून चेन्नईत (थिरुनिन्रावूर) ला शिकायला असतो. नेहमी आम्ही प्लान करून विमानाचे तिकिट काढतो. पण यावर्षी परिक्षेने दगा दिला आहे. तारीख लांबली आहे आणि ती कोणती हे कळत नाही. तरीही साधारण आठ दिवस मिळत आहेत. विमान प्रवास तातडीच्या बुकिंग साठी भलताच महाग आहे. अशा परिस्थितीत बसने प्रवास करून येऊन आठ दिवस राहून जाता येईल का अशा शक्यतेस अजमावून पाहतो आहोत. कुणाला चेन्नई पुणे बसेस बद्दल काही माहिती असेल तर प्लीज इथे शेअर करा.
  • Log in or register to post comments

लेखन करा

लेखन करा

मिसळपाव वर स्वागत आहे.

प्रवेश करा

  • नवीन खाते बनवा
  • Reset your password
मिसळपाव.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Misalpav.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा