चेन्नई च्या महाराष्ट्र मंडळ ला भेट द्या. मी तिथे 6 महिने राहिलो होतो. शांत, निवांत ठिकाण आहे. आणि हो, रात्री जेवायला तिकडे गेलात तर पोळी खायला मिळेल :)
चेन्नई महाराष्ट्र मंडळ हे चेन्नई मध्यवर्ती ( सेंट्रल ) रेल्वे स्थानकापासुन रिक्षाने साधारणपणे २० मिनीटावर आहे . रिक्षाने ३० ते ४० रुपये होतात जे आधीच ठरवावे लागतात . चेन्नई महाराष्ट्र मंडळ हे वेपेरी या भागात आहे . पत्ता सांगताना " जी व्ही के संपत रोड , वेपेरी " असे सांगावे . या मंडळाचे बहुतेक संचालक मंडळ , सभासद हे जरी मराठी असले , तरी अॅडमिन स्टाफ हा नॉन मराठी आहे . पण त्यांना हिंदी येते . तुम्हाला तिथे राहायचे असल्यास आधीच बुकिंग करुन ठेवणे बरे पडेल .
चेनै स्टेशन पासून "बीच" स्टेशनला चालत यायचे. वेळ ५ ते ६ मिनिटे.
"बीच" स्टेशन पासून तांबारम लोकल पकडायची. २रे किंवा ३रे स्टेशन म्हणजे "एगमोर". ५ रु. तिकीट आहे.
एगमोर स्टेशन पासून चालत ३-४ मिनिटे आहे.
रेल्वे नको असेल तर, चेनै स्टेशन पासून एग्मोरला जायला दर ५ मिनिटांनी बस आहे.
बादवे,
विमानाने जाणार असाल तर,
विमानतळ ते "त्रिशूलम" स्टेशन चालत, १०-१२ मिनिटे.
तिशूलम ते बीच लोकल पकडायची (ही लोकल तांबारम हून येते.) आणि एगमोरला उतरायचे.
१० रुपयात जाल.
रिक्षा आणि टॅक्सी चालकांसाठी मी माझा घाम गाळत नाही.
गूगल मॅप देत आहे.
https://www.google.co.in/maps/place/Maharashtra+Mandal,+Mahaveer+Colony+Rd,+Mahaveer+Colony,+Periyamet,+Chennai,+Tamil+Nadu+600007/@13.0874616,80.2552008,15z/data=!4m5!3m4!1s0x3a5265e2108d8db5:0xc104b7f05dd2fd69!8m2!3d13.082712!4d80.2608013
कधीही फोन करा.
आता चेनैला जाणारच आहात तर,
चेनैच्या आसपासची आणि खूद्द चेनै मधली, जमतील तितकी ठिकाणे पाहून या आणि इथे पण त्याची माहिती दिलीत तर उत्तम.
ही लिंक बघीतलीत तर उत्तम. (http://www.trawell.in/chennai/200kms?more=2)
चेनै रेल्वे स्टेशन पण बघण्यासारखे आहे, अगदी आपल्या बोरीबंदर सारखेच.
सिरुसेरीजी तुम्हाला कशी हो ईतकी माहीती? उपरोधाने नव्हे तर खरेच उत्सुकतेने विचारतोय.
तमिळ गाणी, मुव्हीज सगळ्या माहीत असतात, कोल्हापूर, सोलापूर, उस्मानाबाद पण माहीती आहे, अगदी डिट्टेल खदाड्या आणि पत्ते पण माहीती असतात, कन्नड, तेलुगु पण माहीत असते. खूप फिरला आहात का कामानिमित्त? सिरुसेरी हे चैन्नैच्या सबर्बचेच नाव आहे ना?
धन्यवाद . सिरुसेरि या नावामुळे मी तामिळनाडु/तंजावुरी भागातला आहे असा कोणाचाही समज होणे साहजिक आहे . सिरुसेरी येथे चेन्नईमधील एक आयटी पार्क (सेझ) आहे . तिथे कामानिमित्त होतो . तेव्हाच मिपाचा आयडी या नावाने मिळाला . मी साधारण ३ वर्षांसाठी (त्यापेक्षा जास्त नाही) कामानिमित्ताने चेन्नई , हैदराबाद , बंगलोर या ठिकाणी राहिलो आहे . त्यामुळे वाण नाही पण गुण लागला आहे . हि ३ वर्षे सोडली तर बाकी सर्व वर्षे मी महाराष्ट्रामध्येच राहिलो आहे . राहत आहे. तंजावुरी मराठीबद्दल मी ऐकुन आहे . पण माझा फारसा त्या भाषेशी संबंध आला नाही . एके काळी सोलापुरच्या भागवत थिएटरला रविवारी रात्री ९ ते १२ चा शो बघायचा आणी मग हैद्राबादला जाणारी बस पकडायची असे टाईम टेबल होते. त्यामुळे सोलापुरला जाणे येणे होते .
सरावांना भवन ला अल्पउपाहार जरुर करा.
मांसाहारी असाल तर चेन्नई मध्ये बऱ्याच हॉटेल मध्ये रॅबिट (ससा) मसाला भेटतो जरुर खा.
चेन्नई मध्ये संग्रहालय हि खूप छान आहे. मरिना बीच ला तर जाल च जवळचं विवेकानंद हौस ( आईस हौस) ला सुद्धा जा आणि टी नगर ला खरेदी तर झालीच पाहिजे.
टीप:- भात चमच्याने खायचा टाळा.
बाकी एग्मोर ला पण फिश छान मिळत वेळ असला जरूर जा ...तिथून पुढे अंदमान ला बोटी जातात आमचे कामगार असायचे मग त्यांचा उपडेट घेणं आणि ७०mm नावाचा बार होता तिथे रोज बसणं .. हा कार्यक्रम होता ..फिश जरूर खा खात असलात तर
चेनैमधले वातावरण कसे आहे ते कळविणे. मी येत्या दोन तीन महीन्यात तिथे जायचा विचार करतो आहे. मागच्या वर्षे पावसाळ्यात चेनैत प्रलयसदृश परिस्थिती झाली होती.
मुलगा 2015 पासून चेन्नईत (थिरुनिन्रावूर) ला शिकायला असतो.
नेहमी आम्ही प्लान करून विमानाचे तिकिट काढतो.
पण यावर्षी परिक्षेने दगा दिला आहे. तारीख लांबली आहे आणि ती कोणती हे कळत नाही. तरीही साधारण आठ दिवस मिळत आहेत. विमान प्रवास तातडीच्या बुकिंग साठी भलताच महाग आहे.
अशा परिस्थितीत बसने प्रवास करून येऊन आठ दिवस राहून जाता येईल का अशा शक्यतेस अजमावून पाहतो आहोत.
कुणाला चेन्नई पुणे बसेस बद्दल काही माहिती असेल तर प्लीज इथे शेअर करा.
प्रतिक्रिया
तुमचा मो. न. भारी हाय भौ.
छहात्तर ?
म्हणजे 'चुक' बरोबर होती
हाहाहाहा
चेन्नई च्या महाराष्ट्र मंडळ
धन्यवाद
चेन्नई महाराष्ट्र मंडळ
कशाला रिक्षाला पैसे घालवता?
वरील प्रतिसाद...
धन्यवाद
खास करून फोनवर उत्तम मार्गदर्शन मिळाले....
इतकी मोठी लिंक देण्यापेक्षा
धन्यवाद
तामसिक आहार करत असाल तर
+11. लौट आए हम वो गलिया..
धन्यवाद,
धन्यवाद,
सिरुसेरीजी तुम्हाला कशी हो
धन्यवाद,
हो. सिरुसेरी हे चैन्नैच्या सबर्बचेच नाव आहे .
भारीच.
मद्रासेत आता रिक्षा मीटर ने
चेन्नई भेट
धन्यवाद,
T नगर ला शॉपिंग +१
धन्यवाद,
चेनैमधले वातावरण कसे आहे ते
नक्की
चेन्नई मध्ये वातावरण
चेन्नई - पुणे