Skip to main content

डॉ पटवर्धनांची केस

लेखक चलत मुसाफिर यांनी बुधवार, 27/07/2016 15:14 या दिवशी प्रकाशित केले.
लंडनमधील प्रथितयश स्त्रीरोगविशेषज्ञ डॉ. महेश पटवर्धन यांना तेथील न्यायालयाने चार लैंगिक गुन्ह्यांच्या खटल्यात दोषी ठरवून आठ वर्षे कारावासाची शिक्षा फर्मावली आहे. हे गुन्हे त्यांनी 2008 ते 2012 या कालखंडात केल्याचे म्हटले जाते. वैद्यकीय तपासणीच्या वेळी या गृहस्थांनी आपल्याशी गैरप्रकार केले अशी तक्रार एकूण सहा स्त्रियांनी केली होती. पैकी चार गुन्हे सिद्ध झाल्याचे कोर्टाने नमूद केले आहे. सदर डॉक्टरांचे स्वतःचे आंतरजालीय संकेतस्थळ आहे. त्यावरील माहितीनुसार हे साधेसुधे असामी नाहीत. मुंबईत जन्म, शिक्षण व उच्च शिक्षण झालेले हे डॉक्टर लंडनमधील अभिजनवर्तुळात वावरतात. लता-आशापासून सचिनपर्यंत सर्व थोरामोठ्यांसह त्यांची ऊठबस आहे. माझ्या वैद्यकीय क्षेत्रातील मित्रांनी दिलेल्या माहितीनुसार महाराष्ट्रातून लंडनला जाणाऱ्या सर्व चित्र-नाट्य कलावंतांचा मुक्काम डॉक्टरांकडे असतो. (संकेतस्थळावर अजय-अतुल ते मांजरेकर अशा अनेक नावांचा उल्लेख आहे). डॉक्टर स्वतः एक कलाकार असून आशा भोसलेंसोबत त्यांनी एक गीतसंच मुद्रित केलेला आहे असेही संकेतस्थळावर म्हटले आहे. त्यांच्या पत्नी समक्षेत्री व्यावसायिक (भूलतज्ञ) आहेत. निकाल वाचला जात असताना त्या आपल्या मुलांसह न्यायालयात उपस्थित होत्या. या गृहस्थांना प्रत्यक्ष-अप्रत्यक्ष पणे ओळखणारे माझे काही डॉक्टर मित्र म्हणतात की सदर गृहस्थ हे निर्दोष असून हा सरळ ईर्ष्याजन्य घातपाताचा प्रकार आहे. या खटल्याचे व साक्षीपुराव्यांचे तपशील डेली मेलसारख्या अनेक सनसनाटी वृत्तपत्रांत हातचे न राखता, रसभरित स्वरूपात छापण्यात आले असून ते वाचल्यावर आपण शक्ती कपूर किंवा रणजीत यांनी साकारलेल्या एखाद्या खलनायकाबाबत तर वाचत नाही ना, असा प्रश्न पडतो. या प्रकरणात खरेखोटे काय आहे? (अधिक माहितीकरिता डॉक्टरांचे नाव गुगलून पहावे.)

वाचने 3626
प्रतिक्रिया 8

प्रतिक्रिया

आत्ता धागा वाचून डॉ. महेश पटवर्धन असं गुगलून पाहिलं डेली मेल वर घटनेचं वर्णन वाचलं आणि आपण म्हणता तसं - "आपण शक्ती कपूर किंवा रणजीत यांनी साकारलेल्या एखाद्या खलनायकाबाबत तर वाचत नाही ना, असा प्रश्न पडतो" अगदी सहमत. आता सर्वच विश्वासाच्या क्षेत्रात अशा गोष्टी कमी जास्त प्रमाणात वाचतो, ऐकतो तेव्हा विश्वास ठेवावा कुठे असा प्रश्न पडतो. बाकी, डॉक्टर पवर्धनाच्या बाबतीत खरं खोटं त्यांना आणि रुग्णांनाच माहिती. :( -दिलीप बिरुटे -दिलीप बिरुटे

In reply to by प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

मान्य!

In reply to by प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

केवळ मराठी-भारतीय आहेत म्हणून अथवा अनेक कलाकारांशी संबंध आला म्हणून वैयक्तीक वर्तन कसे असेल हे सांगता येत नाही. डेली मेल कसे लिहीते यावर इंग्लंडचे कोर्ट काही ठरवेल असे वाटत नाही. तसेच सहा पैकी चार गुन्हे सिद्ध झाले आहेत. थोडक्यात गुन्ह्यांची योग्य शहानिशा केली गेली असण्याची शक्यता आहे. जे आहे ते दुर्दैवी आहे, इतकेच आपण म्हणून शकतो.

In reply to by विकास

लंडनवासी मिपाकरांच्या प्रतिसादांच्या प्रतीक्षेत

गूगल करुन पाहीले. एखाद दुसरा आरोप समजू शकतो पण सहा जणांनी तपशीलवार वर्णन केले आहे. त्यामुळे खरं वाटतंय... :( काय बोलायचं... लोकांना भरल्या संसारात अवदसा आठवते...

In reply to by खटपट्या

पण इतक्या नावाजलेल्या वैद्यकीय विशारदाने आपल्या रुग्णांशी असे गैरवर्तन करावे हे बुचकळ्यात टाकणारे वाटते. यशस्वी अनिवासी भारतीय या वर्णनाबरहुकूम असे हे दांपत्य वाटते. शिवाय "तशा" तलफी असल्याच तर त्या भागवण्यासाठी लंडन शहरात भरपूर सोयी आहेत. मग या गृहस्थांनी असे का केले असेल?

गोर्या कातडीची आस ,बाकी काही नाही.युरोपिय मराठी संमेलन हा आयोजित करतो ,केले आहे.एकदा फेसबुकवर भेटला होता.