कधी चवीची, कधी अगदीच पांचट,
लाल तर्रीची मिसळ कधीतरी ओर्पीन म्हणतो
मी बी ढेकर देईन म्हणतो...!!
मिसळीवर तवंगतर्री
भेटली काय, न भेटली काय
मिपाकार्याला रवंथ करायची
उपजत सवयच हाय
जिलबीतून पाकरस
सुटला काय, न सुटला काय
मिपाकार्याला तोबरे भरायाची
सवयच हाय
शेवटच्या तुकड्यापर्यंत
मी बी दाबून खाईन म्हणतो...!!
चयापचयाची काळजी
सोडून देईन म्हणतो
मी बी हाटेलामधीच
चूळ भरीन म्हणतो...!!
अपचनाचे प्रश्न
सुटलेत काय, न सुटलेत काय
या हावऱ्या मिपाकर्याले
उपास-तापास लंघनाची अक्कलच नाय
त्रिफळाचे चूर्ण हॉलमधीच घेईन म्हणतो
सगळीकडून ढेकर देईन म्हणतो...!!
टोपाच्या रिकम्या
खडखडाटशी प्रतारणा करून
वळसेवाली जिलबी पडता येते
मिसळीशी इमान राखणारा
हॉटेलबाहेर जाते
मिसळपावचे नाव फक्त
कामापुरते घ्यावे
जिलबी पाडून झाली की
खुशाल सोडून द्यावे
रेचक म्हणूनी लिंबू
पिळावा तरच येते ढेकर ....!!
एकमुखाने बोला भाऊ!
खवैय्येगिरी की जय....!!!
(इथे मिपाकर म्हणून उल्लेखलेले व्यक्तिमत्व म्हणजे अस्मादिक, उगा गैरसमज करून घेऊ नये)
वाचने
3651
प्रतिक्रिया
19
मिसळपाव
प्रतिक्रिया
=))
अच्छा म्हणजे अस कनेक्शन आहे
(No subject)
In reply to अच्छा म्हणजे अस कनेक्शन आहे by प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
हलके घ्या :)
In reply to (No subject) by कविता१९७८
माझ्या इतकं मिपा कोणी हल्केच घेत नाय...
In reply to हलके घ्या :) by कविता१९७८
अच्छा म्हणजे अस कनेक्शन आहे
In reply to माझ्या इतकं मिपा कोणी हल्केच घेत नाय... by प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
अरे मिपा सुखसारकवटी, देतंय
In reply to हलके घ्या :) by कविता१९७८
ज्जे बात मस्त कवीता
मस्त...
लगे रहो गजदर भाई.
=))
1+
भारीये हवाबाण तडका गजोधरजी,
मस्त जमलंय. तुम्ही एकदा
त्यापुर्वी
In reply to मस्त जमलंय. तुम्ही एकदा by सतिश गावडे
मिसळ खायच्या आधी मिसळीचे
In reply to त्यापुर्वी by नाखु
ल्ल्युल्लुल्ल्ल्ल्लु
In reply to मिसळ खायच्या आधी मिसळीचे by सतिश गावडे
चाचा चौधरी आणी साबुचा किस्सा
चाचा चौधरी आणी साबु