Skip to main content

मी बी ढेकर देईन म्हणतो : हवाबाणी तडका

लेखक पगला गजोधर यांनी सोमवार, 25/07/2016 13:00 या दिवशी प्रकाशित केले.
कधी चवीची, कधी अगदीच पांचट, लाल तर्रीची मिसळ कधीतरी ओर्पीन म्हणतो मी बी ढेकर देईन म्हणतो...!! मिसळीवर तवंगतर्री भेटली काय, न भेटली काय मिपाकार्याला रवंथ करायची उपजत सवयच हाय जिलबीतून पाकरस सुटला काय, न सुटला काय मिपाकार्याला तोबरे भरायाची सवयच हाय शेवटच्या तुकड्यापर्यंत मी बी दाबून खाईन म्हणतो...!! चयापचयाची काळजी सोडून देईन म्हणतो मी बी हाटेलामधीच चूळ भरीन म्हणतो...!! अपचनाचे प्रश्न सुटलेत काय, न सुटलेत काय या हावऱ्या मिपाकर्‍याले उपास-तापास लंघनाची अक्कलच नाय त्रिफळाचे चूर्ण हॉलमधीच घेईन म्हणतो सगळीकडून ढेकर देईन म्हणतो...!! टोपाच्या रिकम्या खडखडाटशी प्रतारणा करून वळसेवाली जिलबी पडता येते मिसळीशी इमान राखणारा हॉटेलबाहेर जाते मिसळपावचे नाव फक्त कामापुरते घ्यावे जिलबी पाडून झाली की खुशाल सोडून द्यावे रेचक म्हणूनी लिंबू पिळावा तरच येते ढेकर ....!! एकमुखाने बोला भाऊ! खवैय्येगिरी की जय....!!! (इथे मिपाकर म्हणून उल्लेखलेले व्यक्तिमत्व म्हणजे अस्मादिक, उगा गैरसमज करून घेऊ नये)
लेखनविषय:
लेखनप्रकार

वाचने 3651
प्रतिक्रिया 19

प्रतिक्रिया

=))

In reply to by कविता१९७८

आम्ही हलकेच घेतो हो, फक्त आपणही हलकेच घ्यायला आणि मिपा इंजॉय करायला शिका एवढीच आपल्या त्या देवाकड़े मागणी आहे. कसंय आम्ही खोड़ी करू आणि मग तुम्ही तक्रार कराल असं नाय ना चालणार.... कळलं का विस्कटून सांगू... :) असो, ह्याव अ गुड्डे....! -दिलीप बिरुटे

आज काय खर नाही. पेटलेत एक एक जण. हे व्हर्जन पण आवडले पैजारबुवा,

लगे रहो गजदर भाई. h बहुधा हे सहावे विडंबन. c माझ्या मागे आता संख्या मोजायचंच काम उरलंय. b

=))

आवड्यास

भारीये हवाबाण तडका गजोधरजी, धौती योग चुर्णाच्या जाहीरातीची आठवण झाली. मळमळतोय मी , कळवळतोय मी, तळमळतोय मी, गरगरतोय मी, छळतय मला पोट मग घ्या ना धौती योग पोटात दंगा घालाल तर पंगा होईलच की

In reply to by नाखु

मिसळ खायच्या आधी मिसळीचे पातेलं पहा (असे आमचे एक भडजी मित्र म्हणतात). आणि नंतर हही हही हही (हे ही आमचे भडजी मित्रच म्हणतात)

लेख व प्रतिसादांवरुन पुर्वी ऐकलेला चाचा चौधरी आणी साबुचा किस्सा आठवला . चाचा चौधरी आणी साबु यांच्याकडे एक माणुस येतो आणी चाचा चौधरीला अपमानास्पद बोलतो . चिडलेला साबु त्या माणसाला पोटामध्ये एक जोरदार गुद्दा मारतो की तो माणुस उडुन दुरवर डोंगरापलिकडे पडतो . थोड्या वेळाने तोच माणुस हसतमुखाने येउन चाचा चौधरी आणी साबुला १०० रुपये देउन आभार मानतो आणी खुलासा करतो की "त्याला बरेच दिवस जो त्रास होता तो आज साबुच्या बुक्कीमुळे मोकळा झाला ."