Skip to main content

चॅाकलेट आणि काजू लाडू

लेखक Bhagyashri satish vasane यांनी मंगळवार, 19/07/2016 22:31 या दिवशी प्रकाशित केले.
साहित्य:२०० ग्रॅम किसलेले चॅाकलेट,२०० ग्रॅम काजूची पावडर, ३ टेबलस्पुन साखर, १ टीस्पुन कोमट दुध, थोडस केशर, पाव कप तूप,५ हिरव्या वेलायचीची पावडर, ८-१० पिस्ताचे उभे काप कृती:एका पैन मध्ये ५० मिलीलिटर पाण्यात साखर विरघळवा, याचा एकतारी पाक तयार करा, केशर एक चमचा कोमट दुधात खलून घ्या. आता साखरेच्या पाकात काजूची पावडर घाला, गैसवर ठेवून हे मिश्रण एकजीव झालं की गैस बंद करा, यामध्ये दूधमिश्रित केशर घाला, या मिश्रणाच्या गुठळ्या होउ देऊ नका, हे मिश्रण पुन्हा गैसवर ठेवून यामध्ये तूप आणि वेलचीपूड घाला यातील तूप वितळलं की गैस बंद करा, हे मिश्रण थंड होउ द्या आता हाताला तूप लावून घ्या मिश्रणाचे एकसमान भाग करा आणि त्यांना लाडवाचा आकार द्या हे लाडू किसलेल्या चॅाकलेट मध्ये घोळवा, वरुन पिस्त्याचे काप लावून सुशोभित करा. झटपट होणारे लाडू लहान मुलांच्या वाढदिवसाला सोयिस्कर आणि मुलांना आवडतील असे असतात.

वाचने 9116
प्रतिक्रिया 17

प्रतिक्रिया

In reply to by Bhagyashri sat…

@फोटो टाकायला शिल्लक नाही राहिले लाडू! ››› पुन्यांदा य़ेक डाव करा. आनी टाका हितं फोटू!

थोडे अवांतर मी सतिश तुकाराम वासने मी मिसळपावाचा २०१० पासुन वाचक आहे.पण माझी मुलगी सदस्य झाली.त्यामुळे मी देखील प्रतिक्रिया देऊ शकतो.इथे आपल्या माहितीत भरच पडते.सर्व मिपाकरांचे मनापासुन धन्यवाद

In reply to by Bhagyashri sat…

सतीशराव तुम्ही पण व्हा सदस्य स्वतंत्र नावाने. १२ वीतली मुलगी लिहितेय म्हणून आधी एका कथेबद्दल सांगितले गेले. ती लिहित असेल अन आवड असेल तर आता तिला हे अकाउंट वापरु द्या. तुम्ही पण लिखाणाचे वाचनाचे चाहते असाल तर सेपरेट अकाउंट तयार करुन या. स्वागत करु तुमचे पण.

In reply to by Bhagyashri sat…

त्यांच्या काय डोक्यावर शिंगं असतात का मागे शेपट्या ? माणसासारखी माणसं ती...दिसतील तुम्हाला... जरा धीर धरा...!

In reply to by Bhagyashri sat…

काही मिपाकर अवसेच्या रात्री हरणटोळ, मांजर, ड्रॅक्युला असे कायापालट करतात. त्यामुळे जरा सावध!!

फोटो टाका madam. बाकी पाककृती छान लिहिली आहे. करून बघावे लागेल.