साहित्य:२०० ग्रॅम किसलेले चॅाकलेट,२०० ग्रॅम काजूची पावडर, ३ टेबलस्पुन साखर, १ टीस्पुन कोमट दुध, थोडस केशर, पाव कप तूप,५ हिरव्या वेलायचीची पावडर, ८-१० पिस्ताचे उभे काप
कृती:एका पैन मध्ये ५० मिलीलिटर पाण्यात साखर विरघळवा, याचा एकतारी पाक तयार करा, केशर एक चमचा कोमट दुधात खलून घ्या.
आता साखरेच्या पाकात काजूची पावडर घाला, गैसवर ठेवून हे मिश्रण एकजीव झालं की गैस बंद करा, यामध्ये दूधमिश्रित केशर घाला, या मिश्रणाच्या गुठळ्या होउ देऊ नका, हे मिश्रण पुन्हा गैसवर ठेवून यामध्ये तूप आणि वेलचीपूड घाला यातील तूप वितळलं की गैस बंद करा, हे मिश्रण थंड होउ द्या आता हाताला तूप लावून घ्या मिश्रणाचे एकसमान भाग करा आणि त्यांना लाडवाचा आकार द्या हे लाडू किसलेल्या चॅाकलेट मध्ये घोळवा, वरुन पिस्त्याचे काप लावून सुशोभित करा. झटपट होणारे लाडू लहान मुलांच्या वाढदिवसाला सोयिस्कर आणि मुलांना आवडतील असे असतात.
वाचने
9116
प्रतिक्रिया
17
मिसळपाव
प्रतिक्रिया
फाऊल!!!
इ का ? फोटो किधर कु है ?
मदनबाण.....
आजची स्वाक्षरी :- Hello (Adele) - Indian Classical Versionफोटूऊऊऊऊऊऊऊऊऊ!
फोटो टाकायला शिल्लक नाही
अजून थोडे करा पण फोटो हवाच, कसे?
In reply to फोटो टाकायला शिल्लक नाही by Bhagyashri sat…
बरोबर! आता परत लाडू करा,
In reply to अजून थोडे करा पण फोटो हवाच, कसे? by विद्यार्थी
@फोटो टाकायला शिल्लक नाही
In reply to फोटो टाकायला शिल्लक नाही by Bhagyashri sat…
फोटू शिवाय मजा नाय
फटू पायजे म्हणजे पायजे....
आमची आज्जी असती तर म्हणली
थोडे अवांतर मी सतिश तुकाराम
सतीशराव तुम्ही पण व्हा सदस्य
In reply to थोडे अवांतर मी सतिश तुकाराम by Bhagyashri sat…
सर्व मिपाकर कसे दिसत असतील
काय तरी हौस तुमची.....
In reply to सर्व मिपाकर कसे दिसत असतील by Bhagyashri sat…
काही मिपाकर अवसेच्या रात्री
In reply to सर्व मिपाकर कसे दिसत असतील by Bhagyashri sat…
तसं नाहीं हो, मागे कधीतरी
फोटो टाका madam.