शोभिवंत होळी
शोभिवंत होळी
निरव शांततेच्या मिट्ट रात्र वेळी,
आली झोपडीत माझ्या 'लाघवी' लुटारुंची टोळी
वदले नकोत चिंता आता तुझ्या कपाळी,
खाऊन भाजलेली माझीच गोड पोळी
पाहुन तारका ते भलतेच तृप्त झाले,
श्रीमंत पामराची झोपडी चंद्रमोळी
करुनी दानधर्म ते पुण्यवंत झाले,
परी पापसमुच्चयाने फाटली दीन झोळी
जखमा करुन ताज्या ते दाविती जगाला,
चितेचीही माझ्या केली शोभिवंत होळी
विझले जसे 'निखारे' झाले पसार सारे,
तीच तीच दुःखे कोणी कशा ऊगाळी
भोगले जे ही होते लिहीले माझ्याच भाळी,
सावध असा गड्यांनो येता आपुली पाळी...
आशिष
वर्गीकरण
काव्य आवडले.
In reply to काव्य आवडले. by एस
धन्यवाद!!
नाही समजले
In reply to नाही समजले by ज्योति अळवणी
परिस्थितीने पिचलेल्या
कडक!!
In reply to कडक!! by जव्हेरगंज
मोठ्या लोकांकडून तारीफ!!