Skip to main content

साद

लेखक सुचेता यांनी बुधवार, 28/01/2009 13:03 या दिवशी प्रकाशित केले.
घालावी तुज साद अव्याहत हाच नाद आवरता आवरेना थोपवू कसे मना क्शणोक्शणी तुझे भास भेटायाचे हिच आस कसाबसा सरे दिस रात उरे स्मरणास पुसण्यास नाही कोणी गालावर सुकले पाणी एकदाच तुज भेटावे मनीचे भाव जुळावे हिच शेवटली आस जिवाने घेतला ध्यास सुचेता सुळे
लेखनविषय:

वाचने 1918
प्रतिक्रिया 8

प्रतिक्रिया

एकदाच तुज भेटावे मनीचे भाव जुळावे हिच शेवटली आस जिवाने घेतला ध्यास छान ! --मधु मलुष्टे ज्यु. बी. ए.

हिच शेवटली आस शेवटली आस आहे म्हणजे समस्या काय आहे हेच कळले नाही . ..............सुन्या कोकणी

फार सुंदर रचना , एकदाच तुज भेटावे मनीचे भाव जुळावे हेच समारोपाचे कडवे असते तरिही चालले असते.

मंगळ्सूत्रात फार वेळ गुंतल्याने कविता वाचायला उशीर झाला. कविता छान. छोट्या ओळी. साधा सरळ अर्थ. छान खराटा (येथे उत्तम काथ्या बारीक कुटून मिळेल)

मंगळ्सूत्रात फार वेळ गुंतल्याने कविता वाचायला उशीर झाला. कविता छान. छोट्या ओळी. साधा सरळ अर्थ. छान खराटा (येथे उत्तम काथ्या बारीक कुटून मिळेल)

एकदाच तुज भेटावे मनीचे भाव जुळावे व्वा.. मदनबाण..... Each work has to pass through these stages—Ridicule, Opposition, and then Acceptance. Those who think ahead of their time are sure to be Misunderstood. Swami Vivekananda.

छोट्या ओळीतून छान व्यक्त झाली आहे कविता. - (सर्वव्यापी)प्राजु http://praaju.blogspot.com/

प्रतीसाद देणार्या सगळ्यांचे मनापासुन आभार याने नवीन लिहणार्या माझ्या सारख्यांचा उत्साह नक्कीच वाढेल. सुचेता