लेखनविषय (Tags)
लेखनप्रकार (Writing Type)
भारतरत्न सचिन.... या धाग्यावर संदीप डांगे याच्या http://www.misalpav.com/comment/860347#comment-860347 या प्रतिसादावर चाललेल्या पॉप्युलॅरिटी, स्टार व्हॅल्यु आणि ब्रँड व्हॅल्यु यांच्या चर्चेसंदर्भात प्रतिसाद द्यावा म्हणुन इन्स्टिस्ट्युशनालायझेशनवर (institutionalization) काही लिहिले. ते जरा लांबत गेले. त्या धाग्यावर फार अवांतर होऊ नये यासाठी ते दोन पैश्याचे नाणे इथे स्वतंत्रपणे प्रसिद्ध केले आहे.
==========================================================
इन्स्टिस्ट्युशनालायझेशन (institutionalization)
पॉप्युलॅरिटी, स्टार व्हॅल्यु आणि ब्रँड व्हॅल्यु यांच्या संदर्भात इन्स्टिस्ट्युशनालायझेशन ही अत्युच्च पायरी (स्टेज) समजली जाते. ही पायरी गाठलेल्या व्यक्ती / संस्थेशी संबंधीत असलेल्या सर्वच (माणसे, विचार, सेवा, उत्पादन, इ) गोष्टींच्या उच्च प्रतीवर व विश्वासूपणावर लोकांचा डोळे मिटून विश्वास बसतो... व स्वीकार करण्याचा निर्णय करण्यापूर्वी त्याबाबतीत सखोल माहिती घेऊन विचार करण्याची गरज वाटेनाशी होते.
दुसर्या शब्दांत सांगायचे तर, इन्स्टिस्ट्युशनालायझेशन झालेल्या व्यक्ती/संस्थेशी संबांधित सेवा/उत्पादन स्वीकार करण्याचा निर्णय घेताना, लोकांच्या मनात त्या "व्यक्ती/संस्थेच्या तयार झालेच्या प्रतिमेलाच केवळ" महत्व असते... ती व्यक्ती/संस्था कोणती सेवा/उत्पादन देते/बनवते/विकते/प्रायोजित करते या संबंधीचा विचार दुय्यम किंवा बिनमहत्वाचा होतो.
उदा १ : शैक्षणिक क्षेत्रांतल्या आयआयटी, एमआयटी, ऑक्सफर्ड, केंब्रिज सारख्या संस्था :
"वरच्यापैकी एखाद्या संस्थेत प्रवेश मिळतोय, तो घ्यावा का?" असे विचारले तर; कोणत्याही आयआयटी कँपसवर एकदाही पायही ठेवला नाही, तिथे नेमके कोणकोणते विषय शिकविले जातात हे माहित नाही, कोणकोणते प्राध्यापक तेथे शिकवितात हे माहित नाही, असा माणुसही विचारणार्याला "हे काय विचारणं झाल?" असे म्हणून वेड्यात काढतो.
उदा २ : उद्योगजगत :
एक काळ तरी असा होता (अजूनही असू शकेल, पण मला अद्ययावत माहिती नाही) टाटा समूहात नोकरी करणे ही अभिमानाची आणि वंशपरंपरागत चालणारी गोष्ट होती.
संगणकिय क्षेत्राच्या सुरुवातीच्या कालात इन्फोसिसमध्ये नोकरी मिळणे "अल्टिमेट" होते, ती कोणत्या प्रकारची नोकरी आहे हे दुय्यम होते.
टाटा समूहाच्या उत्पादनांवर डोळे मिटून विश्वास ठेवला जात असे (बहुतेक आजही बर्याच अंशी असावा), आणि त्यात विद्युत उत्पादन, वाहने, मीठ, एअर कंडिशनर... असे विभिन्न प्रकार सामील होतात (टाटा समूहात शंभराच्या आसपास कंपन्या आहेत)... ठप्पा (ब्रँडवरचे नाव) महत्वाचा.
"बॉस, चारचाकी म्हणजे मर्सिडिस, बीएमडब्ल्यु, फेरारी, लंबॉर्घिनी." असे म्हणणार्यांपैकी किती जणांनी त्या चालवलेल्या असतात, किंवा त्यांना हात तरी लावलेला असतो, किंवा किमान जालावरून तरी त्यांची स्पेसिफिकेशन्स ताडून पाहिली असतात ?
उगाच नाही, "मर्सिडिस ही गाडी नाही, तर मनाची अवस्था आहे (Mercedes is not a car, but a state of mind !)" अशी ती कंपनी अभिमानाने स्वतःची जाहिरात करत असते !
आयफोनच्या प्रेमात असलेल्या किती ग्राहकांनी स्वतःच्या आयफोनची स्पेसिफिकेशन्स / युजर एक्सपेरियन्स बाजारातल्या इतर असंख्य ब्रँडपैकी एकदोन महत्वाच्या फोन्सच्या स्पेसिफिकेशन्सशी / युजर एक्सपेरियन्सशी ताडून पाहिलेली असतात ? किंबहुना, तसे करायचे म्ह्टले तर किती जणांना ते खरेच नीट करता येईल इतपत त्या टेक्नॉलोजीचे ज्ञान असते ?
बर्याचदा, कोणत्याही ब्रँडच्या नूडल्स "मॅगी"च असतात, टूथपेस्ट "कोलगेट"च असते, इ, इ, इ.
(हे शेवटचे उदाहरण, "ग्राहकांच्या अज्ञानामुळे कधी कधी इन्स्टिस्ट्युशनालायझेशन हे मूळ कंपनीलाच कसे घातक ठरू शकते" यासाठी दिले जाते ! ... म्हणजे मानसिक प्रतिमा मूळ कंपनीची, पण खप दुसर्याच्याच कंपनीचा :) )
उदा ३ : मिडिया, क्रिकेट, इत्यादींमधील सर्वसामान्य लोकांसमोर सतत प्रसिद्धिच्या झोतात राहणार्या व्यक्ती :
टॉलिवूड सुपरस्टार रजनिकांत याने मोबाईल, टेलिव्हिजन यांचीच नव्हे तर मातीची जाहिरात केली तरी ती मोठ्या भक्तीभावाने आणि चढ्या भावाने विकत घेऊन रोज कपाळाला लावणारे लोक कोटींच्या संख्येने मिळतील.
पश्चिम भारतात इतकी व्यक्तीपूजा दुर्मिळ असली तरी बॉलिवूड सुपरस्टार अमिताभ, शेतीतला पाण्याचा पंप, एखादे राज्य (ब्रँड अँबॅसॅडर या नात्याने), पोलिओची लस, इतक्या विविध आणि त्याच्या व्यवसायाशी व एकमेकाशीही असंबंधित असलेल्या गोष्टींची जाहिरात परिणामकारकपणे करू शकतो.
जाहिरातीत सर्वप्रथम दिसलेला क्रिकेटचा लिटिल् मास्टर सुनिल गावसकर रवी शास्त्री, व्हिवियन रिचर्डस् आणि अॅलन बोर्डर हे "विमल" ब्रँडच्या कापडाची जाहिरात करत असत. क्रिकेटचा आणि कापडाचा तसा अर्थाअर्थी काहीच संबंध नाही हे अडाण्यातल्या अडाण्यालाही माहीत असते... पण त्या जाहिराती त्यांचे काम करून गेल्याच, नाही का ?
याला व्यक्तीपूजा म्हणा की बिनडोकपणा, पण हे वास्तव आहे तोपर्यंत त्या व्यक्तींच्या/संस्थांच्या इन्स्टिस्ट्युशनालायझेशनचा फायदा उठवला जाणारच ! ...till they keep the point of sell ticking !
ग्राहकाचा दीर्घकालीन सर्वोत्तम पर्याय होण्यासाठी प्रथम ग्राहकाच्या मनात भरणे महत्वाचे... आणि ही प्रक्रिया टेक्निकल नाही, तार्किकही नाही, तर मानसशास्त्रिय आहे...
इन्स्टिस्ट्युशनालायझेशची पायरी गाठली गेली की, ग्राहक नकळत सेवा/उत्पादनापेक्षा त्या मागच्या (इन्स्टिस्ट्युशनालायझेशन झालेल्या) व्यक्ती/संस्थेच्या मानसिक प्रतिमेकडे पाहून निर्णय घेऊ लागतो.
असे मानसिक संबंध एकदा प्रस्थापित झाले आणि ते बराच काळ टिकले की मग, काही कारणाने त्या प्रतिमेला धक्का पोहोचला तरी तो धक्का खूप सबळ असल्याशिवाय (काही ग्राहकांच्या बाबतीत तो धक्का सबळ असला तरी) मानसिक प्रतिमेचे त्वरीत/मोठे/दीर्घकालीन नुकसान होत नाही.
प्रतिक्रिया
तुमचा प्रोजेक्ट कशावर होता
नवनीत.
मिनिमम अॅड मॅक्झीमम ब्रॅन्ड
सेलेब्रिटीचा व्यवसाय आणि
सेलेब्रिटीमध्ये पण अजून एक
त्याचं एक कारण हेही आहे
डव्हचा युएसपी वेगळा आहे.
हे आपण आत्ता बोलतोय अभ्याभौ
नाही पटत.कारण या कंपन्यांचा
???
सहमत आहे. एफएमसीजी
Wrong info Kaka. Pan kahise
असहमत काका.
ओगिलवी & Mathar कोठल्या डाइरेक्टरांच्या खासगी मालकीची आहे ?
David Ogilvy जाहिरात
Interesting point kaka. Will
बरीच नवीन माहिती मिळाली.
खूप छान लेख. आवडला.
कळप संस्कृती आहे तोपर्यंत असं होणारच....
फार छान लेख
अगदी थेट संबंध सापडणार नाही
कंकाका, डोन्ट माईंड पण
संध्याकाळी रजनिकान्त बद्दल
ह्या धाग्यावर इतके प्रतिसाद व
एक्का काका धन्यवाद सुंदर
एक अतीअवांतर - टूथपेस्टच्या
गायगुरांचा डॅाक्तर कसा
Pagination