इन्स्टिस्ट्युशनालायझेशन (institutionalization)
भारतरत्न सचिन.... या धाग्यावर संदीप डांगे याच्या http://www.misalpav.com/comment/860347#comment-860347 या प्रतिसादावर चाललेल्या पॉप्युलॅरिटी, स्टार व्हॅल्यु आणि ब्रँड व्हॅल्यु यांच्या चर्चेसंदर्भात प्रतिसाद द्यावा म्हणुन इन्स्टिस्ट्युशनालायझेशनवर (institutionalization) काही लिहिले. ते जरा लांबत गेले. त्या धाग्यावर फार अवांतर होऊ नये यासाठी ते दोन पैश्याचे नाणे इथे स्वतंत्रपणे प्रसिद्ध केले आहे.
==========================================================
इन्स्टिस्ट्युशनालायझेशन (institutionalization)
पॉप्युलॅरिटी, स्टार व्हॅल्यु आणि ब्रँड व्हॅल्यु यांच्या संदर्भात इन्स्टिस्ट्युशनालायझेशन ही अत्युच्च पायरी (स्टेज) समजली जाते. ही पायरी गाठलेल्या व्यक्ती / संस्थेशी संबंधीत असलेल्या सर्वच (माणसे, विचार, सेवा, उत्पादन, इ) गोष्टींच्या उच्च प्रतीवर व विश्वासूपणावर लोकांचा डोळे मिटून विश्वास बसतो... व स्वीकार करण्याचा निर्णय करण्यापूर्वी त्याबाबतीत सखोल माहिती घेऊन विचार करण्याची गरज वाटेनाशी होते.
दुसर्या शब्दांत सांगायचे तर, इन्स्टिस्ट्युशनालायझेशन झालेल्या व्यक्ती/संस्थेशी संबांधित सेवा/उत्पादन स्वीकार करण्याचा निर्णय घेताना, लोकांच्या मनात त्या "व्यक्ती/संस्थेच्या तयार झालेच्या प्रतिमेलाच केवळ" महत्व असते... ती व्यक्ती/संस्था कोणती सेवा/उत्पादन देते/बनवते/विकते/प्रायोजित करते या संबंधीचा विचार दुय्यम किंवा बिनमहत्वाचा होतो.
उदा १ : शैक्षणिक क्षेत्रांतल्या आयआयटी, एमआयटी, ऑक्सफर्ड, केंब्रिज सारख्या संस्था :
"वरच्यापैकी एखाद्या संस्थेत प्रवेश मिळतोय, तो घ्यावा का?" असे विचारले तर; कोणत्याही आयआयटी कँपसवर एकदाही पायही ठेवला नाही, तिथे नेमके कोणकोणते विषय शिकविले जातात हे माहित नाही, कोणकोणते प्राध्यापक तेथे शिकवितात हे माहित नाही, असा माणुसही विचारणार्याला "हे काय विचारणं झाल?" असे म्हणून वेड्यात काढतो.
उदा २ : उद्योगजगत :
एक काळ तरी असा होता (अजूनही असू शकेल, पण मला अद्ययावत माहिती नाही) टाटा समूहात नोकरी करणे ही अभिमानाची आणि वंशपरंपरागत चालणारी गोष्ट होती.
संगणकिय क्षेत्राच्या सुरुवातीच्या कालात इन्फोसिसमध्ये नोकरी मिळणे "अल्टिमेट" होते, ती कोणत्या प्रकारची नोकरी आहे हे दुय्यम होते.
टाटा समूहाच्या उत्पादनांवर डोळे मिटून विश्वास ठेवला जात असे (बहुतेक आजही बर्याच अंशी असावा), आणि त्यात विद्युत उत्पादन, वाहने, मीठ, एअर कंडिशनर... असे विभिन्न प्रकार सामील होतात (टाटा समूहात शंभराच्या आसपास कंपन्या आहेत)... ठप्पा (ब्रँडवरचे नाव) महत्वाचा.
"बॉस, चारचाकी म्हणजे मर्सिडिस, बीएमडब्ल्यु, फेरारी, लंबॉर्घिनी." असे म्हणणार्यांपैकी किती जणांनी त्या चालवलेल्या असतात, किंवा त्यांना हात तरी लावलेला असतो, किंवा किमान जालावरून तरी त्यांची स्पेसिफिकेशन्स ताडून पाहिली असतात ?
उगाच नाही, "मर्सिडिस ही गाडी नाही, तर मनाची अवस्था आहे (Mercedes is not a car, but a state of mind !)" अशी ती कंपनी अभिमानाने स्वतःची जाहिरात करत असते !
आयफोनच्या प्रेमात असलेल्या किती ग्राहकांनी स्वतःच्या आयफोनची स्पेसिफिकेशन्स / युजर एक्सपेरियन्स बाजारातल्या इतर असंख्य ब्रँडपैकी एकदोन महत्वाच्या फोन्सच्या स्पेसिफिकेशन्सशी / युजर एक्सपेरियन्सशी ताडून पाहिलेली असतात ? किंबहुना, तसे करायचे म्ह्टले तर किती जणांना ते खरेच नीट करता येईल इतपत त्या टेक्नॉलोजीचे ज्ञान असते ?
बर्याचदा, कोणत्याही ब्रँडच्या नूडल्स "मॅगी"च असतात, टूथपेस्ट "कोलगेट"च असते, इ, इ, इ.
(हे शेवटचे उदाहरण, "ग्राहकांच्या अज्ञानामुळे कधी कधी इन्स्टिस्ट्युशनालायझेशन हे मूळ कंपनीलाच कसे घातक ठरू शकते" यासाठी दिले जाते ! ... म्हणजे मानसिक प्रतिमा मूळ कंपनीची, पण खप दुसर्याच्याच कंपनीचा :) )
उदा ३ : मिडिया, क्रिकेट, इत्यादींमधील सर्वसामान्य लोकांसमोर सतत प्रसिद्धिच्या झोतात राहणार्या व्यक्ती :
टॉलिवूड सुपरस्टार रजनिकांत याने मोबाईल, टेलिव्हिजन यांचीच नव्हे तर मातीची जाहिरात केली तरी ती मोठ्या भक्तीभावाने आणि चढ्या भावाने विकत घेऊन रोज कपाळाला लावणारे लोक कोटींच्या संख्येने मिळतील.
पश्चिम भारतात इतकी व्यक्तीपूजा दुर्मिळ असली तरी बॉलिवूड सुपरस्टार अमिताभ, शेतीतला पाण्याचा पंप, एखादे राज्य (ब्रँड अँबॅसॅडर या नात्याने), पोलिओची लस, इतक्या विविध आणि त्याच्या व्यवसायाशी व एकमेकाशीही असंबंधित असलेल्या गोष्टींची जाहिरात परिणामकारकपणे करू शकतो.
जाहिरातीत सर्वप्रथम दिसलेला क्रिकेटचा लिटिल् मास्टर सुनिल गावसकर रवी शास्त्री, व्हिवियन रिचर्डस् आणि अॅलन बोर्डर हे "विमल" ब्रँडच्या कापडाची जाहिरात करत असत. क्रिकेटचा आणि कापडाचा तसा अर्थाअर्थी काहीच संबंध नाही हे अडाण्यातल्या अडाण्यालाही माहीत असते... पण त्या जाहिराती त्यांचे काम करून गेल्याच, नाही का ?
याला व्यक्तीपूजा म्हणा की बिनडोकपणा, पण हे वास्तव आहे तोपर्यंत त्या व्यक्तींच्या/संस्थांच्या इन्स्टिस्ट्युशनालायझेशनचा फायदा उठवला जाणारच ! ...till they keep the point of sell ticking !
ग्राहकाचा दीर्घकालीन सर्वोत्तम पर्याय होण्यासाठी प्रथम ग्राहकाच्या मनात भरणे महत्वाचे... आणि ही प्रक्रिया टेक्निकल नाही, तार्किकही नाही, तर मानसशास्त्रिय आहे...
इन्स्टिस्ट्युशनालायझेशची पायरी गाठली गेली की, ग्राहक नकळत सेवा/उत्पादनापेक्षा त्या मागच्या (इन्स्टिस्ट्युशनालायझेशन झालेल्या) व्यक्ती/संस्थेच्या मानसिक प्रतिमेकडे पाहून निर्णय घेऊ लागतो.
असे मानसिक संबंध एकदा प्रस्थापित झाले आणि ते बराच काळ टिकले की मग, काही कारणाने त्या प्रतिमेला धक्का पोहोचला तरी तो धक्का खूप सबळ असल्याशिवाय (काही ग्राहकांच्या बाबतीत तो धक्का सबळ असला तरी) मानसिक प्रतिमेचे त्वरीत/मोठे/दीर्घकालीन नुकसान होत नाही.
वर्गीकरण
लेखनविषय (Tags)
लेखनप्रकार (Writing Type)
प्रतिक्रिया
+१
तांत्रिक बाबी चांगल्या
उत्तम लेख. ज्या प्रतिसादावरुन
अगदी अगदी!
मस्त लेख
लेख आवडला डांगेंचा प्रतिसादही आवडला
=))
+ १
मुवि साहेब, तुमचे म्हणणे सोळा
:)
मारवा'जी, प्रतिसाद आवडला.
लेख आणि मारवांचा प्रतिसाद
असे असले तरी...
शाब्बास
उघडपणे द्युप्लिकेट सोनी कॅसेट ??
अर्थात मी ऐकलेली गोष्ट
सोनीने license दिलं असेल इतर कंपन्यांना.
अश्या लायसेंस घेऊन ठरविक
हम्म.
अश्या लायसेंस घेऊन ठरविक प्रतीचे उत्पादन करून ते मूळ कंपनीला पुरवणार्या कंपन्यांना "ओरिजिनल इक्विपमेंट मॅन्युफॅक्चरर्स (OEM)" म्हणतात.माझ्या मते ते Tier 1, Tier 2. "ओरिजिनल इक्विपमेंट मॅन्युफॅक्चरर्स (OEM)" म्हणजे मारुती, व्हिडिओकॉन, टाटा, व याला ओरिजनल पुरवणारे Bosch , Magneti , हे सर्व Tier 1 , 2चांगला वेगळा लेख आणलात यात
काका, टकाच्या त्या
लेखी टीका टक्यावर अथवा
आवडला !
मारुती आणि टाटा
माझे सोडा,
सहमत! मारूती/ह्युंदाई/होंडा
गाडी चांगली पण सेवा ??
माझं निरीक्षण
धंदा ??
या अशा धाग्यावर कॉपी पेस्ट
हा काय प्रश्न झाला?
शब्दाशब्दाशी सहमत !
अतीसहमत
एकूणच समाजाच्या मानसिकतेवर 'इमेज'चा पगडा जास्त असतो. 'महाजन' जातील त्या पंथात सगळे सामील होत असतात. इतकेच नव्हे तर, त्यापेक्षा वेगळा मार्ग धरणाऱ्याचे हसू होते.अतीसहमत एकदा एका व्यक्तीची इमेज काही वर्षांच्या सतत एकांगी मार्याने ठसली चांगली / वाईट की त्या विरोधात बोलतांना फारच मोठा विरोधाचा सामना करावा लागतो पुराव्यांची आग्रही मागणी, दिलेल्या पुराव्यांना नाकारण्याची ओढ, अविश्वसनीयता, हेतु वर संशय वगैरे सगळच होत. कॉग्नीटीव्ह डिसोनन्स चा प्रभाव. पण मग सत्य कुठे तरी झाकोळल जात. त्यामुळे दिखावे पे मत जाओ ती एक जाहीरात होती हे लक्षात ठेवाव लागत मागे एक अॅड होती " फॉलो युवर इन्स्टींकट्स" ची तसे. आणि एक टॅग लाइन " इम्पॉसीबल इज नथींग " अंडर द सन काहीही शक्य आहे याचे भान बाळगले पाहीजे.सविस्तर लेख अन तसेच प्रतिसाद
येस. टेक द वर्ल्ड इन योर
अजित वाडेकर नसावे, बहुतेक अ
बरोबर आहे तुमचे. लिहिण्याच्या
थोडसं आवांतर -
१९८७ च्या वर्ल्ड कपच्या वेळी.
डिश टिव्हीची जाहिरात शारुख
करू द्या ओ कंकाका, त्याला
कंजूस साहेब,
एक्काकाका
१००% टक्के वेळेला सेलेब्रिटी
सहमत आहे.
अगदी फंडामेंटल युटीलीटी मेरीट वर मॅक्स्सीमम टिकुन
गाय छाप
गाय छाप >> लोल
अरे हो की गाय छाप जबरदस्त एकदम
येस्स. परफेक्त. आणि मला