Skip to main content

मी बी बियर बार काढीन म्हणतो : सामान्य मानव

लेखक मुक्त विहारि यांनी बुधवार, 20/07/2016 11:51 या दिवशी प्रकाशित केले.
हजारांच्या नोटेची चमक पाहीन म्हणतो मी बी बियर बार काढीन म्हणतो...!! बियरला रास्त भाव भेटला काय, न भेटला काय पिणार्‍यांच्या मनांत असल्या भूक्कड गोष्टी येतच नाय मी पण थोडे फार कमवीन म्हणतो मी बी बियर बार काढीन म्हणतो...!! पिणार्‍यांना नशा चढली काय, न चढली काय पिणार्‍यांना भरपुर रिचवायची सवयच हाय मी पण थोडे फार कमवीन म्हणतो मी बी बियर बार काढीन म्हणतो...!! अन्नाचे भाव आणि दूधाचे भाव वाढले काय, अन चकण्याचे भाव पण वाढले काय या पिणार्‍यांना उपजत अक्कलच नाय बियरच्या साथीने वाईन पण विकीन म्हणतो मी बी बियर बार काढीन म्हणतो...!! बियर विकून सत्तेत येता येते बियर पिणार्‍यांना उधार देणारा खड्ड्यामधी जाते बियर पिणार्‍याचे नाव फक्त कागदोपत्री घ्यावे बियर शॉपीचे, वाईन शॉप झाले की भाव अजुन वाढवावे सतत भाव वाढ करतच रहावे तरच मिळतो भरपूर मलिदा "चियर्स" करून बियर वर बियर पिऊ! आणि म्हणू... मदिराक्षीचा विजय असो....!!!
लेखनविषय:

वाचने 17796
प्रतिक्रिया 64

प्रतिक्रिया

In reply to by माझीही शॅम्पेन

कधी बियर बार काढलाच तर... तुम्हाला आमच्या तर्फे किंगफिशरचे कॅलेंडर फ्री (पण त्याच बरोबर एक क्रेट बियर मात्र विकत घेणे कंप्लसरी)

In reply to by मुक्त विहारि

तुमच्याच बार मधे बीयर पीत पत्ते खेळु :) बेस्ट जमलं आहे हे काव्य (प्रतिसादात काव्याविषयी एक ओळ तरि लिहिली आहे, सो मला झब्बु देउ नका पत्ते खेळताना)

मारता का काय बाकी कविता भारी अवांतर : विडंबन असे म्हणून परत कुणाचा रोष पत्कारायला नको म्हणून कविता

आरारारारा! =)) मुटे परेंत मारणार अता लोक!

कविता --आय माय स्वारी -- मला त्यातील "क"सुद्धा कळत नाही म्हणून विडंबन म्हणतो विडंबन छान आहे.

तुमच्या बारचा पत्ता द्या. ५००-६०० पानी आमंत्रण पत्रिका चापून देईन म्हणतो. प्रवासखर्च पाठवून द्या. आणि हो, आम्ही तिकडे आल्यावर कटोर्‍यात बिअर पाजलीत तरी चालेल.

In reply to by स्वच्छंदी_मनोज

कटोरा आधी तपासून घेणे, नंतर त्याला खालून छिद्र होते ही तक्रार चालणार नाही.. सहाय्यक व्य्वस्थापक मुवी आर्य बीअर मदीरा मंडळ

In reply to by संदीप डांगे

+ १ पण नुसत्या बियर शॉपीत जास्त पैसा नाही, त्याच्या बरोबर वाईन शॉप पण हवेच.

In reply to by स्वच्छंदी_मनोज

आयला, कुठे कुठे धागाकर्ते पत्ते मागतात, तर आमच्या बारचे आणि त्या अनुशंगाने असणार्‍या बर्‍याच गोष्टींचे पत्ते, वाचकांना हवे आहेत. बार, हॉटेल आणि पानाची टपरी उघडले की लगेच पत्ता देतो. बादवे, पानाची टपरी हा एकदम मस्त धंदा आहे. ओन्ली इन्कम, नो इन्कम टॅक्स. शेतीचा व्यवसाय नसता केला तर, पानाची टपरी टाकायचाच विचार होता.

In reply to by मोदक

टिळकनगर शाळे जवळ. सध्या त्या भागांत एक पण पान-टपरी नाही. तुमचा पत्ता न मागता, आम्ही पत्ता दिलेला आहे. ह्याची जरा नोंद घ्यावी.

In reply to by मुक्त विहारि

शेतीत पानमळा करा आणि पानाची टपरी पण टाका... अपवर्ड आणि डाऊनवर्ड इंटिग्रेशन होईल, हाकानाका !

बिअरची चव चाखून पाहीन म्हणतो.. म्यापण दारु प्यायला शिकावं म्हणतो..! बाई,बाटली..अन् मटणाची ताटली..यांच्या नादी लागावं म्हणतो! म्यापण दारु प्यायला शिकावं म्हणतो...!

In reply to by जावई

मादक गोष्टींपासून जितके दूर राहता येईल तितके रहा. (ह्या विडंबनांत मुद्दामच "मादक" पदार्थ वापरला आहे. सत्तेचे आणि पैशाचे व्यसन ह्या अशा मादक गोष्टीं पेक्षा जास्त हानीकारक असते. जमल्यास "वूल्फ ऑफ वॉल स्ट्रीट" हा सिनेमा किंवा गेला बाजार आपला "सामना" हा सिनेमा बघीतलात तर मी "बियर"चा उल्लेख का केला ते समजेल.)

In reply to by मुक्त विहारि

"मादक गोष्टींपासून जितके दूर राहता येईल तितके रहा." यासाठी लिहिलेले ते =))

In reply to by मुक्त विहारि

'मोदक' पोस्टींपासून जितके दूर राहता येईल तितके दूर राहा, असेही म्हणता येईल का?

In reply to by स्वामी संकेतानंद

...अजिबात नाही. आम्हाला गूळ-खोबरे घातलेले, उकडीचे मोदक आवडत नाहीत. पण हे मिपाचे "मोदक" आणि "खिमा-मोदक" आवडतात.

In reply to by मुक्त विहारि

उकडीचे मोदक आवडत नाहीत.
आता कधी कट्टा ठरला तर मेनु ठरवायला बरं!! अजून कोणाकोणाला आवडत नाहीत पटापट सांगा. =))

In reply to by मुक्त विहारि

मायला! हा माणूस बाटवणार आम्हाला! ( प्रामाणिक प्रश्न- खीमा कोणत्या प्राण्यापासून करतात? )

In reply to by सूड

अरेरे अरेरे अरेरे... हे देवा, काही लोकं वांग्याच्या भाजीत पण सोडे घालत नाहीत, त्यांना माफ कर. बादवे, सोडे हे बोलण्याचे प्रकरण नाही.ती एक मैफिल आहे.

In reply to by स्वामी संकेतानंद

आम्ही "जो जे वांछिल, तो ते लाहो." ह्या पंथातील. त्यामुळे तुम्ही मांसाहार करत नसाल तर एखादा बटाटे-वडा कट्टा पण करू. वाटल्यास चिंचेची चटणी पण खाऊ. खीमा कोणत्या प्राण्यापासून करतात? आमच्याकडे बोकडापासून किंवा कोंबडी पासून. मला व्यक्तीशः कोंबडी-खिमा आवडत नाही.बोकडाचा खिमा उत्तम लागतो.

In reply to by मुक्त विहारि

मला व्यक्तीशः कोंबडी-खिमा आवडत नाही.बोकडाचा खिमा उत्तम लागतो. मुवि.. तुम्ही माझाच डुआयडी असल्यासारखे वाटत आहे. बोकडाचा खिम झक्कास लागतो. तुम्ही ससा खाल्ला आहे का हो?

अजून माझं वरील गोष्टींनी हाड बाटलं नाही.या गोष्टींपासून चार हात दूर आहे,अन् दूरच राहीन.

बार चा पत्ता द्या. बार बाहेर अंडा आम्लेट भुर्जीची गाडी टाकावी म्हणतो

In reply to by जेपी

आणि फक्त गाडी नको टाकूस, त्या जोडीला पानाची टपरी पण टाक. तुला पानाची टपरी नको असेल तर, दुसर्‍या कुणा मिपाकराला देईन म्हणतो.

In reply to by स्वामी संकेतानंद

ओके. आता तुम्ही म्हणताच आहात देवू या की. पण मग त्याच्या शेतीचे काय?

In reply to by मुक्त विहारि

ती तो कार्यक्षम आणि आवश्यक ती साधने असलेल्या शेतकऱ्याला भाड्याने देईल.

तुमच्या बारमध्ये कांप्लीमेंटरी काय मिळणार चकना म्ह्णून. चकली, काकडी... आजकाल काम्प्लिमेंटरी चाकना बंद केलाय बार वाल्यांनी, आणि मी फक्त त्यासाठीच मित्रांबरोबर जात असल्यामुळे आजकाल बीयर बारमधे फेर्‍या कमी हैत.

आता टकाने पुढील प्रमाणे धागा काढावा राव! "मी बी यंदा बार काढीन म्हणतो" ००टकेश, हल्केच घेणे का भौ, तुला सुवर्णपेयाची शपथ००

In reply to by संदीप डांगे

टक्या नुसताच चखणा खात बसला तर बसून बसून बारच काढणार. त्याला असल्या शपथा काय घालताय? उपेगाच्या नाहीत.

In reply to by टवाळ कार्टा

हजार बार देखो.....की ना देखने की चीज है...... अश्या मैफीलीत अनुपस्थीत असलेला नाखु

सोता पिनार्‍याने हा धंदा करु नये. जो सोता न पिता दुसर्‍यांना प्यायला लावतो तो लई भारी धंदा करतोय!

मी बी मंत्री होईन म्हणतो : नागपुरी तडका या कवितेचे विडंबन केल्याबद्दल धन्यवाद! एखाद्या कवितेचे विडंबन होणे किंवा विडंबन करावेसे वाटणे हे त्या कवीचे आणि कवितेचे फार मोठे यश असते. कवितेचा आशय किंवा आकृतीबंध म्हणजे दोन किंवा एक किंवा दोन्हीही जेव्हा रसिकाच्या थेट हृदयाच्या आरपार जाते, रसिकाला खुणावते किंवा वेड लावते तेव्हाच ती कविता सफल होते, असे मला वाटते. आणि अशीच सफल कविता विडंबनाला पात्र ठरत असते. कवितेचे विडंबन म्हणजे रसिकाने कवीच्या कौशल्याला दिलखुलास दाद असते. आता या कवितेच्या विडंबनकाराला असेही वाटेल की मी जे वर लिहिले ते खोटे आहे. मी तर मूळ कवीची चेष्टा करण्यासाठी, टर उडवण्यासाठी हे विडंबन केले आहे, हे निखालस असत्य असून त्या विडंनकाराने करून घेतलेली स्वतःची फसगत आहे. विडंबनकाराने आता हे लक्षात घ्यावे; मूळ कवितेच्या कविचे आणि विडंबनकाराचे कवितेच्या आकृतीबंधाशी मतभेद नसून कवितेतल्या आशयाशी मतभेद आहे किंवा कवितेबाहेरच्या व्यक्तीगत आकसाशी निगडीत आहे. पण या विडंबनाने मूळ कवितेच्या आशयाला कुठेही धक्का लागलेला नाही किंवा कवीच्या व्यक्तीगत विचारधारेलाही धक्का लागलेला नाही. कवितेच्या आकृतीबंधाने विडंबनकारावर मोहिनी घातली, असा त्याचा अर्थ असल्याने मूळ कविता ही कवीची अत्यंत सफल कलाकृती असल्याचे सिद्ध होत आहे. मात्र विडंबनाच्या खाली किंवा वर मूळ कवितेची लिंक आणि कवीचा उल्लेख यायला हवा होता. पण मानवी मनाचा कोतेपणा लक्षात घेतला तर त्यातही काही वावगे वाटून घेण्याची आवश्यकता उरत नाही. (ही पोस्ट लिहिताना मी प्रताधिकाराच्या बाबीकडे दुर्ल्क्ष केले आहे) - गंगाधर मुटे

विडंबनाबद्दल खास नजराना म्हणून एक शेर पेश करतो. विडंबनकाराने सहर्ष स्विकार करावा, अशी अपेक्षा आहे. घमासान आधी महायुद्ध होते पुढे माणसांचे यशू-बुद्ध होते (मिसळपाववर पूर्वप्रकाशित)