
एयर फ्रायर पाककृती बद्दल माहितीचा दुवा
इथे वाचा
साहित्य
२ माध्यम आकाराचे पापलेट, साफ करून, दोन्ही बाजूने सारण/मसाला आत भरता येईल अश्या चिरा मारून
२ चमचे तेल किंवा स्प्रे
माश्याचा वास कमी करायला
१ लिंबाचा रस
२ चमचे बेसन
माश्याला लावायचा मसाला
1 चमचा हळद
१ चमचा मिरची पावडर
१/२ चमचा मीठ
भरायचा हिरवा मसाला
१ कप किसलेले खोबरं
१ इंच आल्याचं बोट
३ ते ५ हिरव्या मिरच्या
८ ते १० लसूण पाकळ्या
१ मोठी मूठ कोथिंबीर
मीठ, चवीनुसार
कृती
बऱ्याच लोकांना मासे खायचे असतात, पण माश्यांचा वास सहन होत नाही किंवा चालत नाही. मुंबई किंवा कोंकण सोडलं तर इतर ठिकाणी (देशावर) ताजे फडफडीत मासे (समुद्रातले, गोड्या पाण्याचे मासे मी फारसे खात नाही) मिळणं तसं कठीण. मग बर्फावर ठेवलेल्या "ताज्या" माश्यांवर भागवावं लागतं. पण ह्या अश्या मासळीला बऱ्याचदा एक विशिष्ट वास येतो. खरं तर मासे ताजे आहेत हे ओळखायचे एक उत्तम पद्धत म्हणजे त्यांचा वास घेणे. इंग्रजीत म्हणतात तसे "A fish is fresh when it smells like the sea!". (हा अनुभव मी हर्णै बंदरावर घेतला आहे. ताज्या मासळीला अजिबात वास येत नाही).
तर ह्या बर्फावरच्या मासळीचा तो वास घालवायला ही पद्धत एकदा वापरून बघा. ह्याला इंग्रजीत "deodorizing" म्हणतात.
मासे संपूर्ण बुडतील एवढ्या पाण्यात एका लिंबाचा रस घाला. असे मासे लिंबाच्या पाण्यात साधारण ३० ते ४५ मिनिटे ठेवा. मासे स्वच्छ पाण्यात साफ करून घ्या. आता माश्यांना आतून बाहेरून बेसन लावून अजून ३० ते ४५ मिनिटे ठेवा. ह्या नंतर मासे नळाखाली धुऊन कोरडे करून घ्या.
माश्यांना हळद, तिखट आणि मीठ लावून घ्या. मासे मुरत असे पर्येंत हिरवा मसाला/वाटण करून घ्या. हिरव्या मसाल्याचे सगळे साहित्य मिक्सर मधून बारीक करून घ्या. शक्यतो पाणी वापरू नका.

माश्यांमध्ये दोन्ही बाजूने हिरवा मसाला भरून घ्या. एयर फ्रायर २०० डिग्री वरती ३ ते ४ मिनिटे प्रि -हिट करून घ्या. माश्यांना दोन्ही बाजूने ब्रशने तेल (किंवा ऑईल स्प्रे) मारून, मासे एयर फ्रायर मध्ये ठेऊन (बास्केटला तेल लावायला विसरू नका, नाहीतर मासा चिकटेल), साधारण १० ते १५ मिनिटे फ्राय करून घ्या. ७ ते ८ मिनिटांनी एकदा मासा अलगद पलटून घ्या म्हणजे दोन्ही बाजूने शिजेल.

लिंबाच्या फोडी बरोबर हा भरलेला पापलेट सर्व करा!
एयर फ्रायर नसेल तर ओव्हन मध्य बेक करून घ्या, किंवा तव्यावर तेल टाकून दोन्ही बाजूने खरपूस भाजून घ्या.
प्रतिक्रिया
केडी सर... अहो कशाला अत्याचार
मोदकराव अहो अत्याचार कसले
In reply to केडी सर... अहो कशाला अत्याचार by मोदक
निव्वळ जळजळ!!
पापलेट ना घालता हि पाककृती कशी करावी
पनीर / सोयाबीन वापरा..
In reply to पापलेट ना घालता हि पाककृती कशी करावी by सामान्य वाचक
छान माहिती
केडी, बेसनाएवजी तांदळाचे पीठ
पिंगूशेठ, तांदळाची पिठी मासे तळताना वापरतो, एकदा तुम्ही ....
In reply to केडी, बेसनाएवजी तांदळाचे पीठ by पिंगू
पावसाळ्यात "जळवा"
हाहाहा....
In reply to पावसाळ्यात "जळवा" by किरण कुमार
मस्त... कधी बोलवता जेवायला ?
छान पाक कृती. :) तोंपासु :)
थोड्या वेळाने ?
In reply to छान पाक कृती. :) तोंपासु :) by बाप्पू
+१
In reply to थोड्या वेळाने ? by कपिलमुनी
वॉव. तोंडाला पाणी सुटले.
धन्यवाद.....
In reply to वॉव. तोंडाला पाणी सुटले. by जागु
मासे ताजे आहेत हे ओळखायचे एक
धन्यवाद.....
In reply to मासे ताजे आहेत हे ओळखायचे एक by यशोधरा
के डी सर, एक नंबर पाककृती आहे
आभारी आहे
In reply to के डी सर, एक नंबर पाककृती आहे by कैलासवासी सोन्याबापु
मस्तच...ताजे पापलेट मिळायला
धन्यवाद.....
In reply to मस्तच...ताजे पापलेट मिळायला by शिद
मस्त पा.कृ.
धन्यवाद!
In reply to मस्त पा.कृ. by मुक्त विहारि
तुमच्यामुळे एकदम प्रेरित होऊन
सप्तरंगी
In reply to तुमच्यामुळे एकदम प्रेरित होऊन by सप्तरंगी
मी PHILIPS Airfryer Viva
In reply to सप्तरंगी by सुबोध खरे
एक नंबर!
In reply to तुमच्यामुळे एकदम प्रेरित होऊन by सप्तरंगी
पापड फ़ुललेच नाहीत व्यवस्थित,
In reply to एक नंबर! by केडी