मी बी मंत्री होईन म्हणतो : नागपुरी तडका

गंगाधर मुटे's picture
गंगाधर मुटे in जे न देखे रवी...
9 Jul 2016 - 12:48 pm

मी बी मंत्री होईन म्हणतो : नागपुरी तडका

लाल दिव्याची चमक पाहीन म्हणतो
मी बी मंत्री होईन म्हणतो...!!

शेतमालाला रास्त भाव
भेटला काय, न भेटला काय
शेतकर्‍याला दारिद्रीत जगायची
उपजत सवयच हाय
मी तरी आपलं जमवून
घेईन म्हणतो
मी बी मंत्री होईन म्हणतो...!!

शेतकर्‍याला कर्जमुक्ती
भेटली काय, न भेटली काय
शेतकर्‍याला कर्जात जगायची
उपजत सवयच हाय
मी तरी आपला खिसा भरून
घेईन म्हणतो
मी बी मंत्री होईन म्हणतो...!!

शेतीचे प्रश्न
सुटलेत काय, न सुटलेत काय
या बैताडबेलण्या शेतकर्‍याले
उपजत अक्कलच नाय
संघटनेची सीडी करून
सत्तेच्या बोहल्यावर चढेन म्हणतो
मी बी मंत्री होईन म्हणतो...!!

शेतीशी प्रतारणा करून
सत्तेत येता येते
शेतकर्‍याशी इमान राखणारा
खड्ड्यामधी जाते
शेतकर्‍याचे नाव फक्त
कामापुरते घ्यावे
सीडी चढून झाली की
खुशाल सोडून द्यावे
सत्ताकारण करावे
तरच मिळते अभय....!!
एकमुखाने बोला भाऊ!
सत्तासुंदरी की जय....!!!

                     - गंगाधर मुटे "अभय"
~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~

नागपुरी तडकाकविता

प्रतिक्रिया

मी बी कृषि मंत्री होईन म्हणतो

अशी एक किरकोळ दुरूस्ती केलीत तर कविता सत्याच्या अधिक जवळ जाईल असे वाटते.

गंगाधर मुटे's picture

10 Jul 2016 - 2:03 pm | गंगाधर मुटे

मंत्री म्हटल्यावर त्यात कृषिमंत्रीही आपोआपच येतो.

नाखु's picture

9 Jul 2016 - 2:04 pm | नाखु

एकूण असा प्रकार आहे तर !!!

गंगाधर मुटे's picture

10 Jul 2016 - 2:03 pm | गंगाधर मुटे

:)

अभ्या..'s picture

9 Jul 2016 - 2:45 pm | अभ्या..

मा. सदाभाऊ खोत यांची मंत्रीपदी निवड झाल्याबद्दल हार्दिक अभिनंदन.

गंगाधर मुटे's picture

10 Jul 2016 - 2:04 pm | गंगाधर मुटे

हार्दीक अभिनंदन!

विवेकपटाईत's picture

9 Jul 2016 - 5:04 pm | विवेकपटाईत

राजनीती मंत्री कुणाच्याही नावाने का होईना, मंत्री, प्रधानमंत्री होण्यासाठीच असते. त्यात गैर काय..मला कुणी मंत्री बनविले मी पण नकार देणार नाही (या जन्मात तरी शक्यता दिसत नाही, पण आपला पुनर्जन्मावर विश्वास आहे).

गंगाधर मुटे's picture

10 Jul 2016 - 2:06 pm | गंगाधर मुटे

दुर्दैव हे आहे की शेतकर्‍याचे नाव घेऊन सत्तेपर्यंत पोचणारे शेतकर्‍याच घात करत असते. शल्य आहे ते एवढेच!

दुर्दैव हे आहे की शेतकर्‍याचे नाव घेऊन सत्तेपर्यंत पोचणारे शेतकर्‍याच घात करत असते

हा घात करणे प्रकार मे २०१४ पासून सुरू झाला आहे की गेले कांही वर्षांपासून (समजा १०-१५ वर्षे) सुरूच आहे?

गंगाधर मुटे's picture

10 Jul 2016 - 7:59 pm | गंगाधर मुटे

अव्याहत सुरू आहे.

१६ ऑगस्ट १९४८ पासून का?

माफी असावी १६ ऑगस्ट १९४७ असे वाचावे.

किंवा संपादकांनी प्रतिसाद संपादित केला तरी चालेल.

विवेकपटाईत's picture

10 Jul 2016 - 6:56 pm | विवेकपटाईत

मुटे साहेब मंत्री बनण्याणे शेतकर्यांचा घात कसा काय होतो, हे मला तरी समजत नाही. किंवा या सरकारला तुम्ही शेतकरी विरोधी समजता आहात का? तर हा पूर्वग्रह आहे. त्यांना कार्य करू द्या. कमीत कमी या सरकारने जल शिवारांचे कार्य चांगले केले आहे. युरियाची चोरबाजारी काही अर्थी थांबविली आहे. DFCचे कार्य पूर्ण झाल्यावर भाज्यांच्या गाड्या हि सुरु होण्याची शक्यता आहे. हरियाना पासून थेट भाजी २४ तासांत मुंबईला पोहचेल. शेतकरी ग्राहक दोघांना फायदा होईल. रस्त्यांच्या रुंदीकरण्याचा कामाला वेग आला आहे. त्याचा फायदा हि शेतकर्याला होईल. एवढी काही वाईट सरकार नाही आहे. बाकी शेतमालाला योग्य भाव मिळाला पाहिजे, या संबंधित शेतकरी संघटना किती जोमाने आपली बाजू मांडतात? या बाबतीत लोकाना जागृत करण्याचे किती कार्य झाले? 'कांदे आणि भाजी महाग का' या वर मिसळपाव मध्ये मी लेख लिहिले आहे, किमान मुटे साहेबांनी 'डाळीला ग्राहकांनी काय भाव द्यावा आणि का' असा लेख मिसळपाव वर लिहायला पाहिजे. पण सबसिडी आणि लोन माफीच्या पुढे नेते काहीच बोलत नाही. कारण यातच सर्व मलाई आहे.

गंगाधर मुटे's picture

10 Jul 2016 - 8:02 pm | गंगाधर मुटे

विकास झालाच नाही असे थोडेच आहे? गेल्या ५० वर्षात विकास खूप झालाय पण त्याचा फायदा शेतकर्‍याला होत नाही, ही वस्तुस्थिती आहे.

ज्योति अळवणी's picture

23 Jul 2016 - 8:16 pm | ज्योति अळवणी

तुमचा प्रतिसाद अगदी मान्य

कविता१९७८'s picture

9 Jul 2016 - 5:09 pm | कविता१९७८

मुटे जी तुम्हाला मन्त्रीपद मिळाल तर तुम्ही स्वीकारणार नाही का??

गंगाधर मुटे's picture

10 Jul 2016 - 2:08 pm | गंगाधर मुटे

अवश्य स्विकारेन. पण शेतीचे प्रश्न त्यातून सुटत नाही हेही प्रांजळपणे कबूल करण्याचे धैर्य दाखवेन.

टवाळ कार्टा's picture

10 Jul 2016 - 2:42 pm | टवाळ कार्टा

पण शेतीचे प्रश्न त्यातून सुटत नाही

असे असेल तर जे आत्ता खुर्चीत आहेत त्यांच्यावर टिका कशाला?

कविता१९७८'s picture

10 Jul 2016 - 2:48 pm | कविता१९७८

हेच विचारणार होते

गंगाधर मुटे's picture

10 Jul 2016 - 8:04 pm | गंगाधर मुटे

सत्तेच्या खुर्चीतून शेतकर्‍यांच्या समस्या निर्माण होत आहे म्हणून.

कविता१९७८'s picture

10 Jul 2016 - 2:51 pm | कविता१९७८

म्हणजे सत्तेची हाव तुम्हालाही आहे पण उगाच ज्याच्या हाती सत्ता आहे त्यावर टीका करावी ही तुमची सवय आहे असे दिसते.

गंगाधर मुटे's picture

10 Jul 2016 - 8:05 pm | गंगाधर मुटे

तुमचे मत तुम्हाला लखलाभ. तुमच्या मताचा आदर आहे.

अनुप ढेरे's picture

10 Jul 2016 - 2:37 pm | अनुप ढेरे

मुटेजी अशा कविता पाडण्यापेक्षा आत्ता बाजारसमितीबाबत झालेल्या बदलांबद्दल तुमचं मत लिव्हा की! त्यात काय चांगलं काय वाईट ते.

गंगाधर मुटे's picture

10 Jul 2016 - 8:05 pm | गंगाधर मुटे

कविता पाडण्यापेक्षा .....

जावई's picture

10 Jul 2016 - 5:08 pm | जावई

मुलूख मैदानी तोफ फुसकी निघाली...उगाचच आम्ही मोटारसायकलीला ऊस बांधून यांच्यासाठी बेंबीच्या देठापासून बोंब मारत होतो..पोलीसांचा मार पण खाल्ला पोटभरुन...

गंगाधर मुटे's picture

22 Jul 2016 - 4:53 am | गंगाधर मुटे

आपल्या आस्वादासाठी माझा एक शेर;

दावा मला कुणीही कुठलाय एक मंत्री
निर्मोह-त्याग-करुणा ज्याच्या कथेत आहे

(मिसळपाववर पूर्वप्रकाशित)

गंगाधर मुटे's picture

10 Jul 2016 - 8:09 pm | गंगाधर मुटे

हा धागा महाप्रलयाच्या दिशेने वाटचाल करू नये म्हणून प्रतिसादांना या धाग्यावर मी उपप्रतिसाद देण्याचे यानंतर टाळणार आहे.

कवितेवर वाचक आपापल्या आकलनानुसार मत नोंदवू शकतात. तो त्यांचा अधिकार आहे हे मी मान्य करतो.

गंगाधर मुटे's picture

18 Jul 2016 - 7:32 pm | गंगाधर मुटे

१६ ऑगस्ट १९४७ पासून का?

१६ ऑगस्ट १९४७ च्या आधीपासून.
लढाया कशासाठी होत होत होत्या? इंग्रज भारतात कशासाठी आले होते?

लुटायसाठीच ना? की सातव्या वेतना अयोगाची खैरात करायला, पुढार्‍यांना मंत्रीपदे वाटायला आले होते?

भारतात खनीजद्रव्ये, जंगली संपत्ती आणि शेतीमाल सोडून लुटण्यासारखं दुसरं होतंच काय?

इंग्रज शेतकर्‍याचे नांव घेवून भारत लुटायला आले होते का?

तुमचा नक्की काय मुद्दा आहे?

गंगाधर मुटे's picture

18 Jul 2016 - 7:54 pm | गंगाधर मुटे

भारत लुटायला म्हणजे काय? हे समजाऊन सांगा जरा.

वरचा प्रतिसाद तुम्हीच लिहिला आहे की मला भास होत आहेत?

गंगाधर मुटे's picture

18 Jul 2016 - 10:57 pm | गंगाधर मुटे

इंग्रज शेतकर्‍याचे नांव घेवून भारत लुटायला आले होते का?

हे मी लिहिलं आहे?

इंग्रज शेतकर्‍याचे नांव घेवून भारत लुटायला आले होते का? हे मी लिहिलं आहे?

हो. हे वाचा.

***************************

गंगाधर मुटे - दुर्दैव हे आहे की शेतकर्‍याचे नाव घेऊन सत्तेपर्यंत पोचणारे शेतकर्‍याच घात करत असते

मोदक - हा घात करणे प्रकार मे २०१४ पासून सुरू झाला आहे की गेले कांही वर्षांपासून (समजा १०-१५ वर्षे) सुरूच आहे?

गंगाधर मुटे - अव्याहत सुरू आहे.

मोदक - १६ ऑगस्ट १९४७ पासून का?

गंगाधर मुटे - १६ ऑगस्ट १९४७ च्या आधीपासून. लढाया कशासाठी होत होत होत्या? इंग्रज भारतात कशासाठी आले होते? लुटायसाठीच ना? (या वाक्यापुढेही प्रतिसाद आहे)

मोदक - इंग्रज शेतकर्‍याचे नांव घेवून भारत लुटायला आले होते का?

गंगाधर मुटे - भारत लुटायला म्हणजे काय? हे समजाऊन सांगा जरा.

मोदक - वरचा प्रतिसाद तुम्हीच लिहिला आहे की मला भास होत आहेत?

***************************

गंगाधर मुटे's picture

19 Jul 2016 - 12:31 pm | गंगाधर मुटे

अरे व्वा! हे तुम्हाला नीट वाचून लिहिता आलं. अजिबात भास झालेला नाही.
मग माझा मुद्दा इतका स्पष्ट असताना

तुमचा नक्की काय मुद्दा आहे? हा प्रश्न कशाला विचारला आहे?

उगीच गुर्‍हाळ लांबवायच. बोटायलाही त्रास आणि कीबोर्डलाही त्रास.

तुमचा नक्की काय मुद्दा आहे?

सगळ्या सरकारांनी शेतकर्‍याचा घात केला तो कसा केला ते बोला.

तुमचा मुद्दा (तुम्हाला) स्पष्ट असेल तर त्याचे पुरावे द्या. माहिती द्या. कोणती सरकारची पॉलिसी कशी चुकली आणि ती कशी सुधारावी याचा अभ्यास केला असला तर त्याची माहिती द्या. मिपावर अनेक तज्ञ लोक आहेत ते सांगतील सरकारशी कसा लढा द्यायचा. त्यांची मदत घ्या आणि तुमचे जे काही असेल ते उद्दिष्ट पूर्ण करा.

..आणि तुम्हाला उगाच गोल गोल गफ्फा हाणायच्या असल्या तर तसे सांगा. तुम्ही शेती करता म्हणजे जगावेगळे काम करत नाही आहात. लाखो करोडो शेतकरी आहेत भारतात. परिस्थीतीमुळे आत्महत्या करतात ही दुर्दैवी बाब आहे पण त्या आत्महत्यांना ठेवी बनवून रडगाणे गायचे असेल तर खुशाल गा.

गंगाधर मुटे's picture

19 Jul 2016 - 4:17 pm | गंगाधर मुटे

जे काही लिहायचे ते कवितेत लिहिलेच आहे. ते पुरेसे आहे. ते समजले तरच पुढे बोलण्यात अर्थ.

आणि ही कविता आहे. ती काही तुम्हाला उद्देशून लिहिलेली नाही आहे.

दुर्दैव हे आहे की शेतकर्‍याचे नाव घेऊन सत्तेपर्यंत पोचणारे शेतकर्‍याच घात करत असते. शल्य आहे ते एवढेच!

हे तुम्हीच लिहिले आहे ना? मग "हे कसे?" असे विचारल्यावर कशाला गोल गोल फिरताय?

तुम्ही लिहिले ते वाचले. सगळ्याच सरकारांनी कसा घात केला ते समजले नाही म्हणून तुम्हाला विचारत आहे.

एखादी कविता मला उद्देशून लिहिली तरी हरकत नाही. पण तुम्ही केलेले दावे सिद्ध करण्याची जबाबदारी तुमचीच असते.

सिरुसेरि's picture

19 Jul 2016 - 8:19 am | सिरुसेरि

मी बी मंत्री होईन म्हणतो
नागपुरची संत्री खाईन म्हणतो .

गंगाधर मुटे's picture

19 Jul 2016 - 12:50 pm | गंगाधर मुटे

धन्यवाद

सुबोध खरे's picture

19 Jul 2016 - 9:32 am | सुबोध खरे

संघटनेची सीडी करून
सत्तेच्या बोहल्यावर चढेन म्हणतो

हांगाश्शी
आता कसा बरोबर बोललात.
नाही तरी त्या शेतकरी संघटनेत आहेच काय?

गंगाधर मुटे's picture

19 Jul 2016 - 12:49 pm | गंगाधर मुटे

मी खरे किंवा खोटे लिहित नाही. नेहमी वस्तुस्थिती जशी असेल तशी मांडतो. त्यात बेईमानी करत नाही. कुणाला काय वाटेल याचाही विचार करत नाही. माझ्यासाठी गैरसोईचं ठरणारं असेल तरीही चिंता करत नाही.

वाचताना तुमच्यासारख्यांना तुमच्या सोईचं असेल ठीक वाटतं, गैरसोईच असेल तर माझी चामडी सोलून काढावी, असे वाटते.

यावर माझ्याजवळच काय निसर्गाजवळही इलाज नाही.

सामान्य वाचक's picture

19 Jul 2016 - 3:57 pm | सामान्य वाचक

जर मोदक राव ना उत्तर द्या बरे आधी

गंगाधर मुटे's picture

19 Jul 2016 - 4:20 pm | गंगाधर मुटे

तुय्म्ही प्राथमिक शाळेत शिक्षत होते काय? तुमच्या प्रतिसादावरून तसे वाटले म्हणून विचारले बुवा. उगीच काहीच्याबाही गैरसमज नको.

गंगाधर मुटे's picture

19 Jul 2016 - 4:20 pm | गंगाधर मुटे

तुय्म्ही प्राथमिक शाळेत शिक्षत होते काय? तुमच्या प्रतिसादावरून तसे वाटले म्हणून विचारले बुवा. उगीच काहीच्याबाही गैरसमज नको.

हो तुम्हालाही काहीच्याबाही वाटत असतं हे तुमच्या कविता आणि प्रतिसादांवरनं कळतंच!! कोणी बोललं की पुन्हा मुस्कटदाबी वैगरे बोलायला मोकळे तुम्ही.

सामान्य वाचक's picture

19 Jul 2016 - 5:16 pm | सामान्य वाचक

मी स्वयंघोषित शिक्षक आहे
काही लोक स्वयंघोषित तारणहार असतात, तसेच

सामान्य वाचक's picture

19 Jul 2016 - 5:18 pm | सामान्य वाचक

'काहीच्याबाही' गैरसमज झाला ते सुद्धा लिहा
उगीच कोडी घालत बसू नका

अस्वस्थामा's picture

19 Jul 2016 - 5:01 pm | अस्वस्थामा

मुटे साहेब, तुमच्या कविता आणि नागपुरी तडके उत्तमच आहेत लिखाण म्हणून.
पण, हा पण महत्त्वाचा आहे आणि तुमच्या वाटचालीबद्दल कल्पना आहे म्हणून मांडतोय (अन्यथा प्रयत्न केला नसता),
पण आपण इतर शेतीविषयक जे कळकळीचे लिखाण (उदा. नाखूंचे धागे, मुविंचा शेतीचा प्रयत्न इ. इ.) जे की जेन्युइन आहे यावर भाष्य का करत नाही ?
शेतकरी संघटनेच्या पलिकडेही आहे आणि फक्त विद्रोही अथवा आम्हीच कसे "शोषित" या आविर्भावामुळे इथे तुम्हाला थोड्या अनपेक्षित प्रतिसादास सामोरे जावे लागतेय हे तुमच्या लक्षात येतेय का ?

भारताततरी शेतकरी आणि इतर अशी इतकी सहज विभागणी सोपी नाहीय. इथल्या बर्‍याच जणांचे कोणी ना कोणी शेतीशी निगडीत आहेत. बरेचजण कोरडवाहू अथवा पडीक शेतीमुळे शहराकडे वळालेले आहेत. त्यांना मातीची, शेताची ओढ आहे. त्या सर्वांना एकाच तराजूत तोलून कुठेतरी तुम्ही लोकांना दुखावण्यापलिकडे काही साध्य करता का मग ?

माणसं जोडणं, मुविसारख्या नव्याने शेतीकडे वळू पाहणार्‍यांना मदत, प्रोत्साहन देणं हे जास्त महत्वाचं आहे ना. मग तुमच्यासारख्या जाणकार आणि संघटनेच्या व्यक्तीकडून ती अपेक्षा केली तर काय गैर ?

तुम्ही एकदातरी तुमचा अप्रोच बदलण्याचा प्रयत्न करून तर पहा ना. इथे सगळे सामान्यच लोक आहेत, जर तुम्ही त्यांच्याशी ही नेहमीच फटकून वागणार असाल तर ते कसे योग्य राहील? तुम्हीच विचार करुन पहा.

लोकांचे तुमच्याशी वागणं हे बर्‍याचदा तुमच्या त्यांच्याशी वागण्याचे प्रतिबिंब असतं (खासकरुन जेव्हा त्या लोकांशी तुम्हाला कसलेच घेणं-देणं (obligations) नसतेय) आणि किमान त्याच्यावर विचार तरी व्हावा असं वाटतं.

असो.

महासंग्राम's picture

19 Jul 2016 - 5:23 pm | महासंग्राम

जबर आणि विचार करायला लावणारा प्रतिसाद

+११

झणझणीत प्रतिसाद आहे.

शलभ's picture

19 Jul 2016 - 5:48 pm | शलभ

+१११
मुटे सर..आतातरी प्रतिसाद देणार का उंटावरचे शहाणे म्हणून इग्नोर मारणार..

यशोधरा's picture

19 Jul 2016 - 5:31 pm | यशोधरा

उत्तम प्रतिसाद.

कपिलमुनी's picture

19 Jul 2016 - 5:48 pm | कपिलमुनी

काहीतरी पॉझिटीव्ह येउ द्या !
शेती करायला प्रोत्साहित होइल असमाहिती,, माहिती, यशस्वी शेतकर्‍यांनी केलेले प्रयोग येउ द्या !

@अस्वस्थामा : उत्तम प्रतिसाद

गंगाधर मुटे's picture

19 Jul 2016 - 6:27 pm | गंगाधर मुटे

काहीतरी पॉझिटीव्ह येउ द्या !

ही अपेक्षाच चुकीची आहे. ज्याला जसे व्यक्त होता येते तसे तो व्यक्त होत असतो.

कैलासवासी सोन्याबापु's picture

19 Jul 2016 - 6:37 pm | कैलासवासी सोन्याबापु

अच्छा म्हणजे तुम्ही नकारात्मक(च) लिहिता/लिहु शकता हे आपण कबूल करताय तर एकंदरीत, विषय संपला मग

गंगाधर मुटे's picture

19 Jul 2016 - 6:44 pm | गंगाधर मुटे

नकारात्मक आणि सकारात्मक आपापल्या सोईने ठरवले जात नाही. ते ठरवायला दृष्टी लागते, अभ्यास लागतो, तारतम्य लागते, विवेक लागतो.... आणखी बरेच काही लागते.

एखादा शब्द मुखोद्गत करून लिहिता आला म्हणजे त्याला त्या शब्दाची गहनता समजतेच असे नाही.

कैलासवासी सोन्याबापु's picture

19 Jul 2016 - 6:46 pm | कैलासवासी सोन्याबापु

आपणही हे लक्षात घेतले तर बरे पडेल बरंका मुटे साहेब

जय हिंद

गंगाधर मुटे's picture

19 Jul 2016 - 6:50 pm | गंगाधर मुटे

नकारात्मक आणि सकारात्मक असले शब्दच मी वापरत नाही, तरीही मला लक्षात घ्यायला सांगण्यात एक प्रतिसाद वाढवण्यापलिकडे याला काय अर्थ आहे?

कैलासवासी सोन्याबापु's picture

19 Jul 2016 - 6:53 pm | कैलासवासी सोन्याबापु

तुम्ही किती आडमुठे अन नकारात्मक आहात हे समजून घेण्यात मदत झाली, असो.

गंगाधर मुटे's picture

19 Jul 2016 - 6:58 pm | गंगाधर मुटे

मग इतके वर्ष काया केले? इतकं क्षुल्लक समजायला इतका वेळ लागत असतो का?

सगळ्याच सरकारांनी शेतकर्‍यांचा कसा काय घात केला..?

अतिशय योग्य आणि संतुलित प्रतिसाद.

@गंमु: ऊगाच तुम्हि एकटे नागपुरकर आणि बाकी मिपाकर सगळे पुण्या मुंबईकडचे; या गैरसमजाच्या पुढे जा.

गंगाधर मुटे's picture

19 Jul 2016 - 6:10 pm | गंगाधर मुटे

अस्वस्थामा साहेब,
तुम्ही मिसळपाववर आहात : 4 years 7 months
मी मिसळपावर आहे : 6 years 6 months

त्याचा कागदोपत्री अर्थ इतकाच की, मी मिसळपावला चांगल्या तर्‍हेने ओळखतो.

माझे पूर्वीचे धागे आणि आताचे धागे मला माहीत आहे.

कोण आयडी काय प्रतिसाद लिहू शकते, हे मला प्रतिसाद वाचायच्या आधीच कळते. तुमचा हा प्रतिसाद कुणाकुणाला आवडला असेल याचीही मी यादी बनवून देऊ शकतो. :)

मिसळपाववर कुणी काहीही प्रतिसाद लिहिला तरी गेल्या काही वर्षापासून अजिबात वाईट वाटत नाही. आपणही वाईट वाटून नये.

आणखी एक मुद्दा लक्षात घ्या की माझे कौतुक करणारे प्रतिसाद यावे, यासाठी मी लेखन करत नाही.

फक्त दु:ख इतकेच आहे की सटरफटर लिहिण्यात आणि वाचण्यात आयुष्यातले काही क्षण व्यर्थ जात आहेत. त्याऐवजी दुसरे चांगले एखादे काम होऊ शकते.

मोदक's picture

19 Jul 2016 - 6:18 pm | मोदक

.

एक से इनका क्या होगा!! =))

गंगाधर मुटे's picture

19 Jul 2016 - 6:53 pm | गंगाधर मुटे

हजार से भी कुछ नही होनेवाला.

अत्यंत सज्जनप्रवृत्तीच्या तुकारामाचेच त्याकाळात कोणी काही बिङडवू शकले नाहीत. मी तर सज्जनच नाही आहे.

सूड's picture

19 Jul 2016 - 7:03 pm | सूड

सज्जनप्रवृत्तीच्या तुकारामाचेच त्याकाळात कोणी काही बिङडवू शकले नाहीत.

हा हा हा!! तुम्हाला असं का वाटतं की सगळे तुमच्या वाईटावर उठलेत. तुम्हाला मानसोपचारतज्ञाची प्रचंड गरज आहे.

गंगाधर मुटे's picture

19 Jul 2016 - 7:10 pm | गंगाधर मुटे

तुमचं नाव व पत्ता लिहा येथे. येतो तुमच्याकडे.
आपण दोघेही मिळून जाऊ मानसोपचारतज्ज्ञाकडे.

कुणावर उपचार करायचा याचा निर्णय ते घेतील तपासाअंती.

मान्य? मग लिहा पत्ता...!

सगळ्याच सरकारांनी शेतकर्‍यांचा कसा काय घात केला..?

गंगाधर मुटे's picture

19 Jul 2016 - 7:23 pm | गंगाधर मुटे

तुमचा पत्ता द्या इथे किंवा माझ्या विपूत किंवा ranmewa@gmail.com या विरोपावर मेल करा. सविस्तर उत्तर पाठवतो

कविता सोडून बाकी विषयावर या धाग्यावर चर्चा करणे योग्य नव्हे.

मिपावर व्यनीची सोय आहे, येथेच व्यनी करा.

कविता सोडून बाकी विषयांवर बोलणे योग्य असेल तर चर्चा करायला काय हरकत आहे?

गंगाधर मुटे's picture

19 Jul 2016 - 7:38 pm | गंगाधर मुटे

माझ्याकडे स्वतःचे ४ संकेतस्थळे आहेत.
www.baliraja.com
www.sharadjoshi.in
www.gangadharmute.com

कशा सुविधा असतात हे मला चांगल्या तर्‍हेने ठाऊक आहे. तुम्हीच मला तुमचा पोस्टाचा पत्ता व्यनी करा.
शक्य झाले तर "सूड" यांचाही पत्ता कळवा.

मीच येतो तिकडे. आपण तिघेही मिळून मानसोपचार तज्ज्ञाकडे जाऊ. नंतर चर्चा वगैरे करू.

मोदक's picture

19 Jul 2016 - 7:46 pm | मोदक

अहो... तुम्ही शेतात काम करताना दम लागला तर टेकायला म्हणून "मोत्याचे डोळे असलेले चांदीचे सिंह हातावर कोरलेले आहे असे सिंहासन" शोधता की खुर्ची, स्टूल किंवा डेरेदार वडाखालचा एखादा दगडही चालतो..?

उत्तर द्यायचे तर व्यनीवर द्या की... पत्ते बित्ते कशाला मागताय..?

गंगाधर मुटे's picture

19 Jul 2016 - 7:51 pm | गंगाधर मुटे

पत्ते बित्ते कशाला मागताय..?

जनावरांना पत्ते नसतात. माणसाला असतात. तिथपर्यंत पोस्टमेने पोचतो. म्हणून मागीतला.

गंगाधर मुटे's picture

19 Jul 2016 - 7:53 pm | गंगाधर मुटे

उत्तराची एवढी अपेक्षाच आहे तर सविस्तर उत्तर पाठवतो म्हटले तर पत्ता कळवायला एवढे आढेवेढे कशाला?

तुमचे सगळे उपप्रतिसाद लिहून झाले की सांगा. मी सगळ्याला एकदमच उत्तर देतो.

गंगाधर मुटे's picture

19 Jul 2016 - 8:19 pm | गंगाधर मुटे

अजिबात नाही. यावेळेस या धाग्याचा समारोप मीच करेन. तोपर्यंत तुमचा पता घेऊन येणार्‍या व्यनीची वाट पाहतो.

आदिजोशी's picture

19 Jul 2016 - 8:22 pm | आदिजोशी

तुम्ही बाकिच्या प्रश्नांची उत्तरं देऊन विषय संपवून टाका आणि धाग्याचा समारोप करा पाहू.

हेमन्त वाघे's picture

22 Jul 2016 - 1:46 pm | हेमन्त वाघे

माझ्याकडे स्वतःचे ४ संकेतस्थळे आहेत.
www.baliraja.com
www.sharadjoshi.in
www.gangadharmute.कॉम

आपण 4 संकेतस्थळे सांगून URL 3 चेच दिलेत ?

कि माझे काही चूल ?

मी जिकडे गणित शिकलो तेथे

1 EK
2 दोन
3 तीन
4 चार

असे शिकल्याचे आठवते .

असो संकेतस्थळे अतिशय जुनाट वाटतात ,आजिबात रेस्पॉन्सिव्ह ( मोबाइल साठी सुयोग्य) नाहीत ..

गंगाधर मुटे's picture

23 Jul 2016 - 2:43 pm | गंगाधर मुटे

www.baliraja.com
www.sharadjoshi.in
www.gangadharmute.com
www.shetkari.in

हे बघा ४
***************
आजिबात रेस्पॉन्सिव्ह ( मोबाइल साठी सुयोग्य) नाहीत हे खरंप पण अत्याधुनिक करणेही कठीण नाही.

ही सर्व संकेतस्थळे मी एकहाती तयार केली आहेत. डोमेन,स्पेस मिळवणे, डिझायनींग करून त्यावर लेखन करणे हे काम मी एकट्यानेच केलेले आहे व तेही स्वखर्चाने. कुणीही शारिरीक अथवा आर्थिक मदत केली आहे.
www.sharadjoshi.in हे शेतकरी संघटनेच्या कार्याला वाहिलेले स्थळही स्वखर्चानेच चालवतो. शेतकरी संघटना मदत करत नाही.

स्वाभाविकपणे मला संकेतस्थळे अत्याधुनिक करण्याला खर्च करण्याच्या मर्यादा पडतात.

गंगाधर मुटे's picture

23 Jul 2016 - 2:44 pm | गंगाधर मुटे

ही सर्व संकेतस्थळे मी एकहाती तयार केली आहेत. डोमेन,स्पेस मिळवणे, डिझायनींग करून त्यावर लेखन करणे हे काम मी एकट्यानेच केलेले आहे व तेही स्वखर्चाने. कुणीही शारिरीक अथवा आर्थिक मदत केलेली नाही.
www.sharadjoshi.in हे शेतकरी संघटनेच्या कार्याला वाहिलेले स्थळही स्वखर्चानेच चालवतो. शेतकरी संघटना मदत करत नाही.

असे वाचावे.

अस्वस्थामा's picture

19 Jul 2016 - 7:38 pm | अस्वस्थामा

मुटे, आमचे मिपा-वय काढून नक्की तुम्ही काय साध्य आणि सिद्ध केलंत ते तुम्हालाच माहीत.
किमान एकंदरीत आंतरजालीय वय काढून काही सिद्ध होत नाही हे मी तुम्हाला काय सांगायचं.

"कोण आयडी काय प्रतिसाद लिहू शकते, हे मला प्रतिसाद वाचायच्या आधीच कळते. तुमचा हा प्रतिसाद कुणाकुणाला आवडला असेल याचीही मी यादी बनवून देऊ शकतो." हे माझ्या प्रतिसादाबद्दल पण असेल तर धन्यच.

पण असो. इतका प्रतिसाद लिहिलात पण खालच्या एकाही मुद्द्याला स्पर्श केला नाहीत. सोपे व्हावे म्हणून नंबर टाकले आहेत. थोडक्यात (शंकांना धरुन) उत्तरं द्या. नपेक्षा उत्तरे नाही दिलीत तरी चालतील, किमान विचार तरी कराल अशी आशा. :)

१.

पण आपण इतर शेतीविषयक जे कळकळीचे लिखाण (उदा. नाखूंचे धागे, मुविंचा शेतीचा प्रयत्न इ. इ.) जे की जेन्युइन आहे यावर भाष्य का करत नाही ?

२.

शेतकरी, संघटनेच्या पलिकडेही आहे आणि फक्त विद्रोही अथवा आम्हीच कसे "शोषित" या आविर्भावामुळे इथे तुम्हाला थोड्या अनपेक्षित प्रतिसादास सामोरे जावे लागतेय हे तुमच्या लक्षात येतेय का ?

३.

भारताततरी शेतकरी आणि इतर अशी इतकी सहज विभागणी सोपी नाहीय. इथल्या बर्‍याच जणांचे कोणी ना कोणी शेतीशी निगडीत आहेत. बरेचजण कोरडवाहू अथवा पडीक शेतीमुळे शहराकडे वळालेले आहेत. त्यांना मातीची, शेताची ओढ आहे. त्या सर्वांना एकाच तराजूत तोलून कुठेतरी तुम्ही लोकांना दुखावण्यापलिकडे काही साध्य करता का मग ?

४.

माणसं जोडणं, मुविसारख्या नव्याने शेतीकडे वळू पाहणार्‍यांना मदत, प्रोत्साहन देणं हे जास्त महत्वाचं आहे ना. मग तुमच्यासारख्या जाणकार आणि संघटनेच्या व्यक्तीकडून ती अपेक्षा केली तर काय गैर ?

आणि हो, दु:ख इतकेच आहे की सटरफटर लिहिण्यात आणि वाचण्यात आयुष्यातले काही क्षण व्यर्थ जात आहेत. त्याऐवजी दुसरे चांगले एखादे काम होऊ शकते.

आम्हाला पण असंच वाटायला लागलंय, त्यामुळे आमचा __/\__ .

वयाबद्दल म्हणाल तर एक इंग्रजी सुभाषित आठवले.
Walt Disney — 'Growing Old is Mandatory, Growing up is Optional'

डॉ सुहास म्हात्रे's picture

20 Jul 2016 - 4:36 am | डॉ सुहास म्हात्रे

सत्य परिस्थिती सांगणारा संतुलित प्रतिसाद !

गंगाधर मुटे's picture

19 Jul 2016 - 7:48 pm | गंगाधर मुटे

एक थांबला की दुसरा येतो, दुसरा थांबला की तिसरा येतो, तिसरा थांबला की चवथा येतो.

तुमचं नियोजन सुंदर पण

मला काय दहा तोंडे आहेत का दहा लोकांशी दहा मुद्यावर बोलायला?

अहो इथे टायपायचे आहे.. ते तर बोलण्यापेक्षा एकदम सोपे.

आमचा बळीराजा बघा.. एकाच वेळी सरकार, हवामान, कुटुंब, आडते, दलाल, वाहतूक, शेतातली वेगवेगळी कामे, शेती कसणारे साथीदार, सावकार आणि शेतकरी संघटना अशा अनेक आघाड्यांवर आयुष्याची लढाई लढत असतो.

गंगाधर मुटे's picture

19 Jul 2016 - 7:58 pm | गंगाधर मुटे

पोस्टाच्या पत्त्याचं काय झालं?

मी कधी म्हणालो की पत्ता देतो म्हणून..?

तुमचे बँक खात्याचे मागच्या तीन महिन्याचे विवरण येथे द्या म्हटल्यावर द्याल का.?

गंगाधर मुटे's picture

19 Jul 2016 - 8:11 pm | गंगाधर मुटे

मोदक म्हणजे जीताजगता मनुष्य आहे की एखादा व्हायरस आहे याची खात्री करून घ्यायची म्हटले तर पत्ता देण्यात काय अडचण आहे.

स्वतःचा परिचय जो देऊ शकत नाही, जाहीर नव्हे तर खाजगी व्यनी करून त्याने एखाद्या सजीवाशी बोलण्याचा अट्टाहास का धरावा?

आणि दुसर्‍या सजीव मानसाने एखाद्या व्हायरसचा हट्ट तरी का पुरवावा.

मोदक म्हणजे बँक खात्याचे विवरण नव्हे.

गरज भासल्यास मी बँक खात्याचे मागच्या तीन महिन्याचे विवरण येथे देऊ शकतो.