Skip to main content

Seezens (seasons)

लेखक चतुरंग
Published on मंगळवार, 27/01/2009
"बाबा मी एक कविता म्हणून दाखवू?"काल रात्री आमच्या चिरंजिवांनी (वय वर्षे ७) एक विचारणा केली. मी विचारले की शाळेत शिकवली का तर म्हणाला, "नाही, मीच केली." मी चकित! त्याला म्हणालो लिहून काढ. "मला कोणीही स्पेलिंग सांगू नका मला येईल तसे मी लिहीन नंतर सांगा." अशी आज्ञा करुन चिरंजीव लिहायला बसले. आता हा काय लिहिणार अशा आश्चर्यात मी होतो. त्याने झटपट लिहून ती मला दाखवलीन. "बाबा त्यांची कविता 'मिपा'वर (होय त्याला 'मिपा' चांगले माहीत आहे!) टाकतात तर माझीही कविता त्यांनी टाकायला पाहिजे." असा आग्रहवजा हुकूम शिरसावंद्य मानून त्याची कविता इथे देतोय. (त्याला सुचतील तशी 'फोनेटिक स्पेलिंग्ज' त्याने केली आहेत कंसातल्या 'दुरुस्त्या(?)' ह्या माझ्या आहेत. शुद्धलेखनाला फाट्यावर मारण्याचे त्याने एवढ्या लवकर मनावर घेतले असेल असे मला वाटले नव्हते! ;) पण गमतीची गोष्ट अशी की त्याने लिहिलेली मूळ स्पेलिंग्ज तशीच ठेवली तरी अर्थ समजण्यात काही कमी होत नाही! ) Seezens (seasons) In summer the sunshine is hot, we go to the beach and swim in the swiming (swimming) pools. In fall the leaves chaeng (change) colors, and they fall of the trees, the mother lets the children out. वरच्या कडव्यातल्या अधोरेखित ओळीचा अर्थ मला समजला नाही. त्याला विचारले तेव्हा म्हणाला "आई जशी मुलांना जन्म देते, त्यांना आपल्या शरीरापासून वेगळे होऊन जाऊ देते, तसे झाड पानांना जाऊ देते. त्यामुळे झाडाला आई आणि पानांना मुले असं म्हटलं आहे!" मी ऐकत राहिलो. दंग झालो. अशा कल्पना मुलांना सुचू शकतात ह्या कल्पनेने क्षणभर थरारून गेलो! In winter snow falls down to the ground you need to waer (wear) snow boots. In spring all the snow melts flowers grow its the rainee seezen (season). चतुरंग
लेखनविषय:

वाचन संख्या 8562
प्रतिक्रिया 35

प्रतिक्रिया

कमाल केली मुकुल ने शाब्बास पट्ठ्या !!!

In fall the leaves chaeng (change) colors, and they fall of the trees, the mother lets the children out. वरच्या कडव्यातल्या अधोरेखित ओळीचा अर्थ मला समजला नाही. त्याला विचारले तेव्हा म्हणाला "आई जशी मुलांना जन्म देते, त्यांना आपल्या शरीरापासून वेगळे होऊन जाऊ देते, तसे झाड पानांना जाऊ देते. त्यामुळे झाडाला आई आणि पानांना मुले असं म्हटलं आहे!" मी ऐकत राहिलो. दंग झालो.
वा वा .. तुमच्या मुलाची काव्य प्रतिभा अशीच फुलुदे ! त्याला शुभेच्छा ! -- लिखाळ.

In reply to by लिखाळ

चांगला खुराक आहे (आणि असावा हे उत्तमच!) तुमच्या डोक्याला!!

the mother lets the children out. मजा आली चतुरंगराव ! तुमच्या मुलाला अनेक शुभेच्छा ! :-)

प्रचंड कल्पना शक्ती आहे मुकुलकडे. अभिनंदन.. - (सर्वव्यापी)प्राजु http://praaju.blogspot.com/

In reply to by मनस्वी

अगदी मस्तचं.... अभिनंदन ---वल्लरी

धी ऍपील डज नॉट फॉल फार फ्राम द ट्री!!! अभिनंदन! चिरंजीवांना सांगा मिपावरच्या काका लोकांनी कौतुक केले आहे. अवांतर - वय वर्ष ७ पर्यंत स्पेलिंग वरुन चिडायचे नाही ह्या धड्याबद्दल धन्यु.

In reply to by सहज

अभिनंदन! चिरंजीवांना सांगा मिपावरच्या काका लोकांनी कौतुक केले आहे.
का हो का? काका, दादा सर्वांनी ..असे म्हणा :) -- लिखाळ.

In reply to by लिखाळ

आणि काक्या-मावश्यांनी देखील.. मुकुलने मस्त केली आहे कविता. अभिनंदन!

In reply to by चित्रा

चित्रताई, लिखाळदादा मुकुलला लहान भावंड समजताहेत. मग तुम्ही मुकुलची ताई व्हायला काहीच हरकत नाही. -- (वयाने मुकुलचा काका, पण मनाने त्याचा लहान भाऊ) सर्किट

>> "आई जशी मुलांना जन्म देते, त्यांना आपल्या शरीरापासून वेगळे होऊन जाऊ देते, तसे झाड पानांना जाऊ देते. त्यामुळे झाडाला आई आणि पानांना मुले असं म्हटलं आहे!" काय भन्नाट कल्पनाशक्ती आहे मुकुलची... जियो ! त्याला खूप खूप शुभेच्छा सांग :)

In reply to by संदीप चित्रे

काय भन्नाट कल्पनाशक्ती आहे मुकुलची... जियो ! त्याला खूप खूप शुभेच्छा सांगा :) - टिंग्या अंगात 'दम' असणं चांगलं.....पण तो सारखा लागणं वाईट!

Chip of the old Block and bloke

७ वर्षाच्या मुलाकडुन इतकी सुंदर कविता. अभिनंदन. रसास्वाद घेत रहा, अनेक भन्नाट कल्पना सांगेल तो. पुढच्या मिपा कट्ट्यावर त्याचे काव्यवाचन ठेवता येईल. बढे रहो.

In fall the leaves chaeng (change) colors, and they fall of the trees, the mother lets the children out. सुंदर कल्पना!!! तुमच्या मुलाचे अभिनंदन आणि शाबासकी!! (खुद के साथ बातां: विडंबनं न करता एकदम ओरिजिनल कविता? मुलगा आईच्या वळणावर गेलाय तर!!!!!:))

In reply to by पिवळा डांबिस

>>(खुद के साथ बातां: विडंबनं न करता एकदम ओरिजिनल कविता? मुलगा आईच्या वळणावर गेलाय तर!!!!!) =)) बाकी छोट्याची कविता छानच!!

In reply to by पिवळा डांबिस

तुमच्या मुलाचे अभिनंदन आणि शाबासकी!! हेच म्हणतो (खुद के साथ बातां: विडंबनं न करता एकदम ओरिजिनल कविता? मुलगा आईच्या वळणावर गेलाय तर!!!!!) =)) ******* सध्या आम्ही ... ह्यावर लिहतो आहोत !!! गाणी-न्युज्-सॉफ्टवेयर-गेम्स ! सगळे एकाच जागी

रंगा, कविता मस्तच आहे !!! (आता ह्याचे विडंबन करू नकोस, म्हणजे झाले :-)) -- सर्किट

In reply to by सर्किट (verified= न पडताळणी केलेला)

कविता एकदम मस्त आहे आणि कौतुकास्पद आहे. आता ह्याचे विडंबन करू नकोस, म्हणजे झाले नाहीतर, 'बच्चे तो बच्चे बाप रे बाप,' म्हणावे लागेल :-)

मस्तच कविता! In fall the leaves chaeng (change) colors, and they fall of the trees, the mother lets the children out. हे वाचुन मला फॉल मध्ये पानं गळतात आणि आई मुलांना खेळायला बाहेर जाऊ देते असा काहीतरी अर्थ वाटला. पण तुमचे चिरंजीव भन्नाटच निघाले की. रसग्रहण केल्यावरच समजली कविता. (तुमच्या मुलाचे नावही धनंजय आहे का? .. ह.घ्या)

अशा भन्नाट कल्पना मुलांनाच सुचू शकतात.आपण त्याला प्रोत्साहन द्यावे.(तो प्रोत्साहनाला फाट्यावर मारण्याच्या वयाचा होईपर्यंत)ह.घ्या.सां.न.

छोट्या दोस्ताचे अभिनंदन !!!
कविता आवडली.
प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

झाड आणि पानाची उपमा जबराच! क्या केहेने भैय्या! रंगा, तुझ्या लेकाचं कौतुक वाटलं! शुद्धलेखनाला फाट्यावर मारण्याचे त्याने एवढ्या लवकर मनावर घेतले असेल असे मला वाटले नव्हते! ये हुऊ ना बात! जियो..! या बाबतीत त्याला आमचा फुल्लसपोर्ट! :) तात्यामामा.

क्या बात है.. माझ्या कडून त्याला आवडणारे चॉकलेट द्या. :) --मधु मलुष्टे ज्यु.बी.ए.

मिपाकरांनो मी आपले आभार मानत नाही कारण ते योग्य वाटत नाही. आपल्या सदिच्छा आणि शुभेच्छा मात्र मुकुलपर्यंत पोचवीन. त्याला काल सांगितले की तुझी कविता मिपावर आली आहे आणि त्याला हेही सांगितले की मिपावरच्या काका-काकू, दादा-ताई, मामा-मामी (ह्यात प्रत्येकाने आपापला क्लास ओळखावा! ;) ) ह्या सगळ्यांची शाबासकी तुला आहे! चतुरंग

In reply to by चतुरंग

सुंदर कविता. मुक्त कल्पनाशक्तीचा धाडसी अविष्कार्. मुकुलला माझा, अर्थात त्याच्या मित्राचा, कौतुकभरा सलाम... निष्कर्ष म्हणजे मेंदू थकल्याचे लक्षण!

बापसे बेटा सवाई निघाला. In fall the leaves chaeng (change) colors, and they fall of the trees, the mother lets the children out. नाविन्यपूर्ण कल्पना. वाचून कौतुक वाटले. छोट्याला म्हणावं असेच लिहीत राहा.

मुकुलची सही आताच घेऊन ठेवली पाहिजे लेकराला चांगलीच प्रतिभा लाभलेली आहे. :) चतुरंगजी मुकुलला सांगा शितल काकुला कविता आवडली. :) मुकुलशी बोलेनच.

उत्तम कल्पना. बापसे बेटा सवाई असे म्हणायची वेळ आली तर तुम्हालाही आनंदच होईल!! :) बाकी, काका, दादा सर्वांनी ..असे म्हणा लिखाळदादांशी सहमत! मुमुक्षु (रंगा स्टाईल) खुद के साथ बातां: लेका तुला "कविता म्हंजे काय?" हे तरी समजत होते काय रे धा वर्षापर्यंत?? :? :SS

सात वर्षाच्या मुलाच्या कल्पनेची भरारी इतकी उंच..... क्या बात है....!! तुमच्या मुलाचं खूप कौतुक :)

तुमच्या मुलाचे खरच कौतुक आहे. त्याला सांगा खुप सुंदर झालीय कविता

छान कविता, उत्तम कल्पनाशक्ती तुमच्या मुलाचे अभिनंदन. साती