आमचे स्वप्न होते भेट द्यावी युरोपला
16.4.2016 ला तो सुवर्ण योग जुळुन आला
"वीणा वर्ल्ड" तर्फे केली युरोपची टूर
अद्भूत रम्य् देश, हिरवळ सर्व दूर
प्रथम पाहिले लंडन शहर
आखिव रेखिव स्वंच्छ सुंदर
साहेबाचा देश पाहिला "लंडन आय" मधुन
"कोहिनुर" मात्र नेला त्यांनी भारता मधुन
वॅक्सचे पुतळे, थेम्स नदी आणि राजवाडा राणीचा
युरोस्टार ने उघडला दरवाजा फ्रान्स शहराचा
जगातले एक आश्चर्य आयफेल टॉवर
लूर म्युझियम, आर्च द ट्रॅम्प आणि कॉनकर्ड स्केअर
लहान मुले होउन भेट दिली "डिस्ने लँडला"
क्षणात होउन मोठे, गेलो "नाईट शोला"
फ्रान्स आहे युरोपमधील सगळयात श्रीमंत देश
पण पॅरिस शहराचा पसंत नाही आला वेष
मनमुराद स्वातंत्र्य आणि वागण मोकळ ढाकळ
चकचकीत पणाच्या बुरख्या खालचे पितळ मात्र पडत उघड
जर्मनीच्या ब्लॅक फॉरेस्ट मध्ये डोळयाचे पारणे फिटले
कूकू क्लॉक फॅक्टरीत घड्याळाचे टोले वाजले
नेदरलॅन्ड कुकेनहॉफ मध्ये पाहिले टयुलिप गार्डन
जणु असंख्य फुलांनी केली रंगाची उधळण
कुठे किती आणि काय काय बघु, अस गेल होउन
मन तृप्त होईना, पण डोळे गेले रंगानी माखुन
निसर्ग सौंदर्याचा बादशहा म्हणून ओळख स्विझरलँडची
हिरव्यागार कुरणांवर डोलतात पिवळी फुले मोहरीची
स्वी्स कडे जातानाच बदलू लागतो रंग डोंगरांचा
जणू हिरव्यारगार शालूवर शेला पांघरला बर्फाचा
सरळ, सुंदर रस्ते, आणि असंख्य टनेल
काय बिशाद, तुमच्या पोटातले पाणी हलेल
-हाईन फॉल्स वाटतो जणू मिनी नायगारा
फेसाळते पाणी, अंगे भिजवीती या जलधारा
दहा हजार फुटांवर आहे माउंट टिटलीस
जणू एका तपस्यावने बर्फाची चादर पांघरलीस
बर्फात मनसोक्त खेळताना भान गेले हरपून
एक स्वाप्न झाले साकार मनात "वीणा" झंकारून
ट्युमलबर्ग वॉटर फॉल आहे मानव निर्मित
दहा पहाडांमधुन पाणी पडते, पाहुन होतो स्तिमीत
भेट दिली आम्ही युंगफ्राउ-जगातल्याी सर्वात उंच स्टेशनला
अचंबीत झाले मन, पाहुन माणसाच्या पॅशनला
नजर जाईल तिथे अप्रतिम निसर्ग सौंदर्य दिसते
जणू निसर्गाचा कॅलिडोस्कोिप रोज नवनवीन दृश्य दाखवते
जड अंत:करणाने घेतला निरोप स्वीसचा
रीता केला निसर्गाने खजिना, वेचाल तितका वेचा
ऑस्ट्रीया आणि स्वीस, शर्यत निसर्ग सौंदर्याची
कोण आहे सरस ? ही तुलना काय कामाची !
दोघे शोभतात जणू राजा आणि राणी
दोघांकडे आहेत सृष्टी सौंदर्याच्या अनंत खाणी
ऑस्ट्रीेयात झाडांनी घातली होती टोपी बर्फाची
इथेच अनुभवली आम्ही मजा स्नो फॉलची
अगणित रूपे निसर्गाची, दोन डोळे अपुरे पडतात
कॅमेराच्या डोळयांनी बघताना, असंख्य फोटो पण कमीच वाटतात
"स्वरोस्की" म्हणजे क्रिस्टलची दुनीयादारी
महिलांनी केली इथे भरपुर खरीदारी
इटली हा देश मिरवतो ऐतिहासीक वारसा
चोरांपासुन जपा मंडळी, पासपोर्ट आणि खिसा
व्हेनिस म्हणजे प्रदेश आहे कालव्यांचा
नावलौकिक आहे त्याचा तरंगत्याे शहराचा
पीसाचा आहे हा मनोरा झुकता
फसलेल्या वास्तुशास्त्रांचा पुरावा हा कलता
व्हीक्टर ईमान्युअल दोन, कधी वेडींग केक वर मिरवतो
कोलोसियम आहे भव्य थिएटर, ऐंशी हजार प्रेक्षकांना सामावतो
ग्लॅडिएटर शो म्हणजे योध्यांची मारामारी
इथेच दाखवायची शौर्याची कलाकुसरी
मायकेल एंजेलोचे पेंटिगस् आहेत अनमोल
कला त्यांची जपली गेली, झाली नाही माती मोल
ट्रेव्हीे फाउंटन मधे आहे नेपोलियनचा पुतळा
एक नाणे पाण्याेत टाका, परत याल रोमला पुढच्या वेळा
रोमलसच्या नावाने रोम प्रसिद्ध झाले
व्हॅटिकन म्युझियम बघताना मन डोलू लागले
"वीणा वर्ल्ड" ने केली आमची उत्तम सरबराई
परतीच्या ह्या वाटेवर मात्र आठवते आपली आई
स्वच्छ व सुंदर युरोप मधे जीव रमला खरा
पण, तरीही वाटते गड्या अपुला देशच बरा
सौ. सुमेधा पिटकर
| लेखनविषय: |
|---|
वाचने
4109
प्रतिक्रिया
22
मिसळपाव
प्रतिक्रिया
भारीच वेगळा प्रयत्न...
अगदि
In reply to भारीच वेगळा प्रयत्न... by चौकटराजा
अरे वा!
+1 मस्तं!
In reply to अरे वा! by पैसा
+१
In reply to +1 मस्तं! by पद्मावति
:) छान झाली की टूर कवितेतून!
युरोप टूर
फ्रान्स आहे युरोपमधील सगळयात
आपण देखील प्यारिस (लोकल
In reply to फ्रान्स आहे युरोपमधील सगळयात by गवि
हा क्षीण हलकटपणा आहे माने..!!
In reply to आपण देखील प्यारिस (लोकल by धनंजय माने
O no
In reply to हा क्षीण हलकटपणा आहे माने..!! by गवि
आमचा तीनोळी हायकू !
उत्तम काव्य आहे,थोडक्यात
बाकी
युरोप टूर
तुम्ही जे लिहिताय ते सगळेच
In reply to युरोप टूर by जयन्त बा शिम्पि
भारतातही शेजारचे, नातेवाईक
In reply to युरोप टूर by जयन्त बा शिम्पि
काव्य छान जमले आहे पण पॅरिस
कवितेतूत केलेले प्रवासवर्णन आवडले...
कविता आवडली.
चकचकीत पणाच्या बुरख्या खालचे पितळ मात्र पडत उघड
एकेका वर्षाच्या अंतराने पॅरिस
In reply to चकचकीत पणाच्या बुरख्या खालचे पितळ मात्र पडत उघड by सुमेधा पिट्कर