✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव
मिसळपाव मराठी साहित्य

Main navigation

  • मुख्य पान
  • नवे लेखन
  • पाककृती
  • कविता
  • भटकंती

भूतकथा - कर्णपिशाच्च !

म
मंदार कात्रे यांनी
गुरुवार, 07/14/2016 - 22:37  ·  लेख
लेख
कर्ण पिशाच्च बांदिवडे गावात रामाचे जुने मंदिर होते. मूर्ती अतिशय प्राचीन आणि सुंदर होत्या . गावातील बाबू मेस्त्री हा सुतारकाम करायचा . त्याची रामावर फार भक्ति होती. पण त्याला मटक्याचा देखील नाद होता . रोज सकाळी रामाचे दर्शन घेवून बाबू कामावर जायला निघे आणि मग रस्त्यात समोर येणार्याो मुलांना थांबवून खाऊ /चॉकलेट द्यायचा अन विचारायचा की तुमचा आवडता अंक सांगा ... मग मुले जो अंक सांगतील तो आकडा तो लांज्याला मटक्याच्या अड्ड्यावर जाऊन लावायचा ... जर आकडा लागला ,तर स्वारी खुशीत असायची .... मग रात्री राम मंदिरात भजन काय अन गाव जेवण काय ? सगळी धूमधमाल असायची .... तर एक दिवस बाबू मंदिरातून दर्शन घेवून बाहेर पडला आणि त्याला कानात कोणीतरी बोलल्यासारख वाटलं ... त्याने आजूबाजूला पाहिलं ,कोणीच नव्हते ... म्हणून तो भास झाला असेल म्हणून दुर्लक्ष करून निघाला तेव्हा पुन्हा जोरात कानात आवाज आला की “आज सात नंबर लाव” ... मग मात्र बाबू ला वाटले की साक्षात रामप्रभूचा आदेश आहे, तर लावूया आज सात आकडा ... मग बाबूने अड्ड्यावर जाऊन सात आकडा लावला , आश्चर्य म्हणजे त्या दिवशी नेमका सात नंबर लागला आणि बाबू ला चक्क दहा हजार रुपये मिळाले ! बाबू मेस्त्री जाम खुश होता .... त्याच रात्री बाबूने गावातील भजन बोलावले ... आणि राम मंदिरात रात्रभर भजनाचे स्वर घुमत राहिले .... त्याच रात्री पुन्हा बाबू ला कानात आवाज आला ,”उद्या एक्का हाय बरका “...... बाबू एकदम खुश ..... दुसर्याब दिवशी लांज्याला जावून पुन्हा एक नंबर लावला ............. दुपारी एक नंबरच आला आणि पुन्हा बाबूला पाच हजार रुपये मिळाले ..... मग रोज बाबूला स्वप्नात किंवा कानात आकडे दिसू लागले.... नेमके तेच आकडे मटक्यात फुटत होते आणि बाबू ला रोज हजारात मिळकत होत होती.... मटक्या वाला रंगा सुद्धा आश्चर्यचकित झाला होता ... साल्या ह्या बाबूला रोज नंबर कसा लागतोय ? पण कुणालाच कोडे उलगडत नव्हते .... बाबूला विचारले तर तो “प्रभू रामाची कृपा “ म्हणून मोकळा होई.... बघता बघता बाबू लाखोपती झाला .... मग त्याला कानातल्या आवाजाने दारूचा गुत्ता चालू करायचा आदेश दिला ... मग त्याने गावात मोक्याच्या ठिकाणी एक बार चालू केला . आता बाबू चा बाबूशेठ झाला होता ... बार चांगलाच चालत होता कारण आसपास 10 गावात दारूचे दुकानाच नव्हते . पण तेवढ्यात एक घटना घडली.... एक उनाड बैल रामाच्या मंदिरात घुसला आणि त्याने मंदिरातील मूर्ती ची नासधूस केली .... लगेच रात्री गावाने बैठक घेतली ... आणि मंदिरात नवीन मूर्ती बसवण्याचा विधी करण्याचा निर्णय झाला . बाबूने नवीन मंदिराला 5 लाख रुपये देणगी देण्याचे जाहीर केले . सगळ्या गावाने वाहवा केली ... त्याच रात्री बाबू ला एक विचित्र स्वप्न पडले . स्वप्नात एक माकड आले आणि म्हणाले , अरे मी रामभक्त हनुमानाच्या आदेशाने आलोय . तुला कानात जो आकड्याचा नंबर ऐकू येत होता ना, तो काही रामप्रभूचा आदेश नव्हता . भगवान रामप्रभू कधीच असे मटका लॉटरी खेळांनार्यांजवर कृपा नाही करत , तुला जो आवाज येतो ते एक भूत आहे... करणपिशाच्च आहे ... आता तर तू लोकांना दारू प्यायला बार पण चालू केलास ...चांगले नव्हे हे ....लक्षात ठेव याचे परिणाम चांगले होणार नाहीत ............ बाबू एकदम जागा झाला , अंग घामाने ओलेचिंब झाले होते ....... त्या रात्री काही त्याला झोप लागली नाही .... म्हणून तसाच बार मध्ये जावून एक बाटली घेवून बसला ..... बघता बघता बाटली संपवली आणि तिथेच आडवा झाला .... त्या प्रसंगानंतर बाबूचे चित्त थार्या.वर नव्हते...त्या दिवसापासून तो कानात येणार्याल आवाजाकडे दुर्लक्ष करू लागला ... पण कानठळे आवाज वाढतच गेले .... त्यामुळे त्याचे कशातच लक्ष लागेना .... मग त्याला दारू प्याविशी वाटू लागली .......सारखा दारू दारू अन दारू ... 24 तास नशेत असायचा ... वर्षभरात लिव्हर डॅमेज झाल्यामुळे हॉस्पिटल मध्ये अॅडमिट करावे लागले . डॉक्टर नी टेस्ट केल्यावर सांगितले की दारुमुळे हार्ट ला पण धोका आहे... बाबूची बायको ज्याम घाबरली . अनेक ज्योतीशांकडे जाऊन तिने बाबूची पत्रिका पाहिली ,पण उपाय सापडेना . मग शेवटी धामापूर गावचा प्रसिद्ध मांत्रिक धावजी बाबा याच्याकडे गेली आणि आपली सगळी रामकहाणी ऐकवली . धावजीबाबाने मग ध्यान लावून पाहिले आणि सांगितले की ,बाबुरावच्या पाठी जे भूत होते ते साधे सुधे नाही, एक कर्णपिशाच्छ आहे . त्याने तुम्हाला मदत केली त्यापाठी त्याचा काहीतरी स्वार्थ असणार ... आपल्याला मोठा कालिका देवीचा होम करून बलिदान करावे लागेल . भरपूर खर्च येईल .....बाबूची बायको म्हणाली कितीही खर्च येवूदे ,मी करीन .पण ही भानगड मिटवा .... मग पन्नास हजार खर्च करून धावजी बाबाने होम केला . रेड्याचा बळी कालिका मातेला दिला . होम पूर्ण होताना धावजीसमोर कर्णपिशाछ उभे राहिले .... बोल तुला काय पाहिजे? का धरले बाबूशेठ ला? त्यावर ते भूत बोलले की माझे श्राद्ध करा . मी या गावात 100 वर्षापूर्वी होतो ....माझे नाव वामन ..... मला दारू प्यायचा शौक होता , पण बायको दारू पीवू देईना म्हणून मी आत्महत्या केली ..... मग भूत झालो आणि रामाच्या देवळाजवळ च्या पिंपळावर राहू लागलो ... हा बाबू माझ्या चुलत्याचा नातू .... त्याला मदत करावी म्हणून मी त्याला मटक्याचे नंबर सांगितले ... पण नंतर हा मला विसरला ... आणि म्हणून मी त्याच्या शरीराचा ताबा घेवून दारू प्यायला लागलो .......... मला मोक्ष हवा आहे ... नाशिक ला जावून माझे श्राद्ध करा म्हणजे मी मुक्त होईन........... मग बाबूला घेवून बायको नाशिक ला गेली व तिथे विधिनुसार श्राद्ध घातले .... वामन ला मोक्ष मिळाला .... बाबू च्या प्रकृतीत फरक पडला आणि दारूची सवय सुटली ..... ! गावात नवीन राम मंदिर उभे राहिले आणि बाबूशेठ रोज संध्याकाळी मंदिरात भजन आरती ला जाऊ लागला .....आणि पुढे रामभक्त बनला ! (*"भुताटकी" या सुप्रसिद्ध फेसबुक पेज वर पूर्वप्रकाशित !)
वर्गीकरण
लेखनविषय (Tags)
कथा
लेखनप्रकार (Writing Type)
विरंगुळा

प्रतिक्रिया द्या
12376 वाचन

💬 प्रतिसाद (30)

प्रतिक्रिया

हीः हीः हीः. कर्णपिशाच्च

एस
गुरुवार, 07/14/2016 - 23:45 नवीन
हीः हीः हीः. कर्णपिशाच्च बेवडं निघालं. भारी कथा.
  • Log in or register to post comments

मस्त

viraj thale
गुरुवार, 07/14/2016 - 23:46 नवीन
मस्त
  • Log in or register to post comments

चांगलीय

खटपट्या
Fri, 07/15/2016 - 01:07 नवीन
चांगलीय
  • Log in or register to post comments

हे झालंय. किती वेळा तेच झाड़??

धनंजय माने
Fri, 07/15/2016 - 01:42 नवीन
हे झालंय. किती वेळा तेच झाड़??? -पार्वती ढ माने
  • Log in or register to post comments

कात्रे साहेबांच्या विनोदी कथा

स्पा
Fri, 07/15/2016 - 07:27 नवीन
कात्रे साहेबांच्या विनोदी कथा ज्याम आवडतात
  • Log in or register to post comments

ते

सामान्य वाचक
गुरुवार, 07/21/2016 - 14:34 नवीन
पूर्ण करा बर आधी
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: स्पा

आकडे कोकणाच्या मानाने अवास्तव

कंजूस
Fri, 07/15/2016 - 10:41 नवीन
आकडे कोकणाच्या मानाने अवास्तव वाटले पण शेवटच्या खुलाशाने जीव पारंबीवरून खालती भांड्यात पडला.
  • Log in or register to post comments

वेळकाळ न पाहता कानात

कैलासवासी सोन्याबापु
Fri, 07/15/2016 - 10:49 नवीन
वेळकाळ न पाहता कानात बोलणाऱ्या भुताला कर्णपिशाच म्हणतात होय! आज क्लिअर झाले! आजवर असे कानात बोलणाऱ्या भुताला आम्ही बायको म्हणायचो अन समजायचो!! =))
  • Log in or register to post comments

=))

संजय पाटिल
Fri, 07/15/2016 - 11:24 नवीन
=))
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: कैलासवासी सोन्याबापु

मिपावर बायकांच्या विरोधात

टवाळ कार्टा
Fri, 07/15/2016 - 11:55 नवीन
मिपावर बायकांच्या विरोधात लिहिणारे आयडी हेवनवासी होतात...
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: कैलासवासी सोन्याबापु

बापूंचा हा प्रतिसाद सौ.

चिनार
Fri, 07/15/2016 - 12:58 नवीन
बापूंचा हा प्रतिसाद सौ. सोन्याबापू ह्यांच्यापर्यंत पोहोचला तर बापूंना मिपावरून वेगळं हेवनवासी करण्याची गरजच पडणार नाही !! बापू...कृ.ह.घ्या
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: टवाळ कार्टा

मग कानात फक्त एकच वाक्य घुमत

अभ्या..
Fri, 07/15/2016 - 15:15 नवीन
मग कानात फक्त एकच वाक्य घुमत राहील "तरी मी सांगत होते" . . (बापू, टेकलाईट)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: चिनार

लगा घाम फुटला गारठ्यात!

कैलासवासी सोन्याबापु
Fri, 07/15/2016 - 15:50 नवीन
लगा घाम फुटला गारठ्यात!
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: अभ्या..

असल्या शक्यता वर्तवणारे

कैलासवासी सोन्याबापु
Fri, 07/15/2016 - 15:49 नवीन
असल्या शक्यता वर्तवणारे तुमच्यासारखे हलकट मित्र आहेत हे आमच्या मागील जन्मातील पापाचे कर्मफळ बरंका चिनार भाऊ !! =)) =))
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: चिनार

आमचा हलकटपणा जाऊ द्या हो बापू

चिनार
Fri, 07/15/2016 - 16:05 नवीन
आमचा हलकटपणा जाऊ द्या हो बापू, तो दिवसेंदिवस वाढतच जाणार :-)...पण शक्यता चुकीची वर्तवली असल्यास जोड्यानं हाना..:-)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: कैलासवासी सोन्याबापु

इतरांच्या बायकांबद्दल नाही हो

कैलासवासी सोन्याबापु
Fri, 07/15/2016 - 15:52 नवीन
इतरांच्या बायकांबद्दल नाही हो लिहलं , माझ्या लग्नाच्या बाईली बद्दल बोलतोय (दोघांच्या घरच्यांनी अर्धा अर्धा खर्च वाटून लग्न लावले होते) तरीही हेवनवासी होण्याची शक्यता असतेच!
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: टवाळ कार्टा

सुधारणा

ट्रेड मार्क
Sat, 07/16/2016 - 02:27 नवीन
मिपावर बायकांच्या विरोधात लिहिणारे आयडी हे वनवासी होतात. असे पाहिजे का?
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: टवाळ कार्टा

हा हा हा :))

राजाभाउ
Fri, 07/15/2016 - 12:00 नवीन
हा हा हा :))
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: कैलासवासी सोन्याबापु

हा हा हा :D

John McClain
Fri, 07/15/2016 - 15:42 नवीन
हा हा हा :D
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: कैलासवासी सोन्याबापु

फरक आहे बापू, आपला कथानायक

स्रुजा
Fri, 07/15/2016 - 19:30 नवीन
फरक आहे बापू, आपला कथानायक त्या पिशाच्चाचं सगळं ऐकत होता :प
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: कैलासवासी सोन्याबापु

आम्ही मटके खेळत नाही स्रुजा

कैलासवासी सोन्याबापु
Sat, 07/16/2016 - 01:51 नवीन
आम्ही मटके खेळत नाही स्रुजा ताई पण आम्हीही कथानायकच आहोत (मनःपूर्वक का मारूनमुटकून ह्या बाबतीत मात्र आमची झाकली मूठ सवा लाख बरंका)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: स्रुजा

हाहा, गुड सेव्ह हां बापू.

स्रुजा
Sat, 07/16/2016 - 02:33 नवीन
हाहा, गुड सेव्ह हां बापू. (स्वगतः मनःपूर्वक असतं तर कशाला बापूंनी (रिडः नवरे लोकांनी) गुलदस्त्यात ठेवलं असतं ? :प सांगायची गरज नाही पण ह.घ्या ;)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: कैलासवासी सोन्याबापु

एक

नाखु
Fri, 07/15/2016 - 11:47 नवीन

कात्रीशीर

कथा
  • Log in or register to post comments

नको

समाधान राऊत
Sat, 07/16/2016 - 13:55 नवीन
राहु द्या
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: नाखु

तुमच्या दैनिकात स्थान कथेला.

महासंग्राम
गुरुवार, 07/21/2016 - 12:12 नवीन
तुमच्या दैनिकात स्थान कथेला...
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: नाखु

तुमच्या दैनिकात स्थान द्या या

महासंग्राम
गुरुवार, 07/21/2016 - 12:13 नवीन
तुमच्या दैनिकात स्थान द्या या कथेला.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: नाखु

कथा आवडली...

मुक्त विहारि
Fri, 07/15/2016 - 13:05 नवीन
बादवे. नहमी कर्ण पिशाच्च का असते? कर्ण हडळ का नाही? किंवा, ब्रह्म संमंध असतो, तशी ब्रह्म कुमारिका का नाही? जाणकारांनी प्रकाश टाकावा.
  • Log in or register to post comments

पिशाच्च असले तर कर्णाचेच. हडळ

अभ्या..
Fri, 07/15/2016 - 15:18 नवीन
पिशाच्च असले तर कर्णाचेच. हडळ ती कोणतरी मिसेस कर्ण असेल तिची. बाकी ब्रम्हाकुमारी कुठेतरी वाचल्यासारखे वाटतेय.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: मुक्त विहारि

ब्रम्हाकुमारी

मुक्त विहारि
Fri, 07/15/2016 - 17:31 नवीन
वेगळ्या. आणि हे ब्रह्मसंमंध वेगळे.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: अभ्या..

हिही ह्ही ह्ही!

अत्रुप्त आत्मा
Fri, 07/15/2016 - 19:36 नवीन
हिही ह्ही ह्ही!
  • Log in or register to post comments

लेखन करा

लेखन करा

मिसळपाव वर स्वागत आहे.

प्रवेश करा

  • नवीन खाते बनवा
  • Reset your password
मिसळपाव.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Misalpav.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा