अगदी भारतात नेऊन सोडलत आज सकाळी.
खूप खूप छान लेख आहे.
काही चिमटे आहेत तसेच सत्यता आहे.त्यामुळे आवडला.
भारतातली सकाळ म्हणजे सक्तीने उठवणारी सकाळ वाटते.म्हणजे दुस-याची सक्ती.
अमेरिकेत म्हणजे आपण उठू तेव्हा सकाळ.आपणच आपल्यावर केली तर सक्ती. नाहीतर पडून रहा की उबदार अंथरूणात कितीही वेळ.
मज्जा आली वाचताना लेख.
मीनल.
माझ्या बाबतीत उलटं आहे बॉ.....
भारतातली सकाळ म्हणजे आरामात ९ वाजता उठायचे.....चहा,नाष्ता सगळं रेडी मिळायचं.... :)
आरामात आवरुन ११ वाजेपर्यंत हपिसात चकाट्या पिटायला :)
इथे मात्र सक्तीने पहाटे ७ वाजता उठावं लागत :(
चहा नाष्ता स्वत: बनवावा लागतो......सक्तीने हपिसात जावं लागतं :(
अन् मुख्य म्हणजे हपिसात कामसुद्धा करावं लागतं :(
- टिंग्या
अंगात 'दम' असणं चांगलं.....पण तो सारखा लागणं वाईट!
ह्याच एकमेव चारपाच कारणामुळे मला आपला भारत देश प्रीय आहे.. ;)
*******
सध्या आम्ही ... ह्यावर लिहतो आहोत !!!
गाणी-न्युज्-सॉफ्टवेयर-गेम्स ! सगळे एकाच जागी
भारतात असो की अमेरिकेत, आपल्या मनासारखे कुठे आणि किती प्रमाणात वागायला मिळते ही गोष्ट प्रत्येकाच्या बाबतीत वेगवेगळी असते. मीनलताई अमेरिकेतल्या घरी स्वतंत्र आहेत , भारतात आल्यावर घरात वडीलधारी माणसे असतात. आपण अमेरिकेत नोकरी वा व्यवसायात गुंतलेले असता, भारतात सुटीवर येत असणार, त्यामुळे इकडे अधिक मोकळेपणा वाटणार.
आनंद घारे
मी या जागी चार ओळी खरडल्या आहेत, जमल्यास वाचून पहाव्यात.
http://360.yahoo.com/abghare
http://anandghan.blogspot.com/
काका, वृत्तपत्र मिळतं की इथ. आपल्याइथल्यासारखा 'पोरया' टाकून जातो - गाडितनं मात्र! आणि दुध तापवायच्या भानगडित पडत नाहीत हाही मोठ्ठा फरक. अजुन अनुभव जरूर लिहा.
मी अमेरिकेतल्या जॉर्जियामधल्या अल्फारेटा नांवाच्या लहानशा गांवात राहिलो होतो. तो भाग अफाट पसरलेल्या अमेरिकेचा प्रातिनिधिक नाहीच. त्या भागात मोटारीतून येऊन सरसकट सगळ्या पोस्टबॉक्सच्याजवळ स्थानिक लंगोटीपत्रांची चिटोरी टाकलेली पाहिली, पण जाडजूड प्रतिष्ठित वर्तमानपत्र मात्र पाहिले नाही.
आनंद घारे
मी या जागी चार ओळी खरडल्या आहेत, जमल्यास वाचून पहाव्यात.
http://360.yahoo.com/abghare
http://anandghan.blogspot.com/
पूर्वी उघडपणे आचरणात येणारा वर्णद्वेष पाहून अमेरिकेतल्या मूळच्या कावळ्यांनी तेथून पळ काढला असावा आणि कांही गौरवर्णीय लोकांच्या मनात तो अजून असल्याच्या शंकेमुळे भारतातील कावळ्यांनी अमेरिकेच्या ग्रीन कार्डसाठी अद्याप अर्ज केले नसावेत.
जीवंत कोंबडा माझ्या वास्तव्यात माझ्या नजरेला कधीच पडला नाही.
दोन्ही दुधे सारखीच बेचव लागली. त्यामुळे तिकडे असेपर्यंत मला दूध पिण्याची इच्छा कधी झाली नाही.
धारोष्ण दुधाची चंव..,
भटक्या कुत्र्यांना बिस्किटे खायला घालून पुण्यसंपादन करणारे पुण्यश्लोक तिकडे नसतात
शिळे झालेले अन्न उघड्या उकिरड्यावर टाकायची सोयसुध्दा तिकडे नाही.
तिला 'काऊ' म्हणजे गाय हेच माहीत होते.
इ इ इ सोडले तर लेख ठीकठाक.
आम्हाला ओळख असलेले घारेसर शास्त्रीय दृष्टीकोनातुन परिस्थीती समजुन घेउन सगळ्या गोष्टींवर व्यवस्थीत उपाय शोधतात. :-)
असो.
शास्त्रीय संशोधनात आयुष्य घालवून झाल्यावर आता सर्वसामान्य माणूस बनून मराठीत जमतील ते चार शब्द सुचतील तसे लिहायचा प्रयत्न चालला आहे. कधी कधी जुनी खोड न सुटल्यामुळे 'सर्र ' वगैरे होत असेन. तेंव्हासुद्धा विज्ञान व तंत्रज्ञान यातल्या जटिल वाटणार्या गोष्टी साध्यासोप्या भाषेत सांगायचा प्रयत्न मी करतो.
इ इ इ सोडले तर लेख ठीकठाक.
ते सोडल्यावर काय शिल्लक राहणार?
आनंद घारे
मी या जागी चार ओळी खरडल्या आहेत, जमल्यास वाचून पहाव्यात.
http://360.yahoo.com/abghare
http://anandghan.blogspot.com/
मस्त लिहिलं आहेत काका! मला आवडलं. आत्ता कुठे सकाळ झाली आहे ... तेव्हा आणखीही लिहाच.
अदिती
आमच्यात बौद्धीक संपदेचा कॉपीराईट घेण्याची पद्धत नाही आणि मी त्याला अपवादही नाही.
घारे काका,
अगदी भारतात नेऊन सोडलंत. धारोष्ण दूध मी भारतात असतानाही कधी प्याले नाही आणि आता तर संबंधच नाही.
पण सकाळी दूध वाले पेपरवाले यांचा चालणार हवाहवासा गोंधळ ... चिमण्यांची, कावळ्यांची शाळा हे मात्र खूप आठवत राहतं.
- (सर्वव्यापी)प्राजु
http://praaju.blogspot.com/
तिकडे ज्या गोष्टी चांगल्या वाटल्या त्यांना त्या चांगल्या आहेत असे कोणी म्हंटले की "तंकडचं सगळं लय भारी हाय हे आयकून आमाला आत्ता कंट्टाला आला हाये!" अशी प्रतिक्रिया एकाद्याकडून येते ... तिकडले जे आवडले नाही त्याला कोणी नांवे ठेवली की "याला त्यातलं कांही कळतंय् का ?" असा भाव तोंडावर आणून आणि 'कोल्ह्याला द्राक्षे आंबट' किंवा 'गाढवाला गुळाची चंव काय?' या म्हणीसकट ...
असे असते खरे.
पण "घरोघरी मातीच्या चुली" असे वर्णन केले तर "काय हा बोअर माणूस" म्हणून संभावना होते. काहीच बोलले नाही तर "काहीतरी पाणी मुरते आहे" अशी संशयी नजर...
हे सर्व टाळून आनंद घारे यांनी मनोरंजक, माहितीपूर्ण वर्णन केले आहे.
भारतातल्या मोठ्या शहरातल्या गजबजीतून आणि कोलाहलातून अमेरिकेत आलेला माणूस हा शांततेमुळे आधी हरखून जातो आणि थोड्याच दिवसात त्याला करमेनासे होते!
कारण कानांवर काही आवाजच नाहीत. तुम्ही उठून वावरायला लागाल तेव्हा दिवस सुरु, तुम्ही थांबलात की सगळे थांबले!
ह्या उलट भारतातल्या दिवसाची सुरुवात चांगलीच 'जिवंत' असते. ते तुम्ही अगदी सहज रंगवले आहेत. धन्यवाद!
चतुरंग
मस्त लिहीलेय घारेकाका! खूप आवडलं!
मी इथे आल्यावर सकाळची ती लगबग, आणि गडबड गोंधळ खूप मिस केली होती..
इथे खरंच तुम्ही उठाल तेव्हा सकाळ!
आणि हो, रोजचा पेपरही नाही.. मी एकदा क्वार्टर डॉलर टाकून आणला एलेटाईम्स, तर महीना भर वाचत होते तो एकच पेपर! इतका प्रचंड! :|
http://bhagyashreee.blogspot.com/
छान झालाय लेख. अ़जून अशा तुलनात्मक गोष्टी येऊद्यात,
तुमचे गाव कदाचित आयसोलेटेड असल्याने तुम्हाला जे जाणवले ते तुम्ही लिहीले. पण अगदीच सरसकट सर्वत्र असे नाहिये.
मी रहातो त्या वेस्टकोस्टातल्या भागात (वीकडेला) सकाळ झालेली बर्यापैकी जाणवते.
सकाळी सातसाडेसातपासून रस्त्यावर कामावर जाणार्यांची, शाळा कॉलेजला जाणार्या मुलांची गर्दी वाढू लागलेली असते. पिवळ्या रंगाच्या स्कूल बसेस रस्त्यावर धावू लागतात. आमच्या भागात मिडल स्कूल आणि हायस्कूल साडेसात आणि एलिमेंटरी स्कूल साडेआठ ला सुरू होते. मुलांना बसस्टॉप वर सोडायला पालक आणि मुले आलेले असतात. तिथे त्यांचा चिवचिवाट चालू असतो. स्टॉप वर स्कूलबस थांबली की मागील सर्व गाड्या थांबतात. स्कूलबस ला ओव्हरटेक करता येत नाही हा नियम आहे. त्यामुळे बर्यापैकी ट्रॅफिक जॅम होते. (पण हॉर्न चा कर्कश आवाज मात्र नाही.) शाळेला चालत जाणारी पण बरीच मुले दिसतात. (ज्यांची घरे शाळेपासून खूपच जवळ आहेत ते स्कूलबस वापरू शकत नाहीत.). कडाक्याच्या थंडीत ही चालत जातात फक्त पाऊस असेल तर मात्र नाही.
पेपरवाला पोर्या ही घरोघरी (अर्थात ज्यांनी पेपर लावला आहे त्यांच्याकडेच..काहींकडे तर फक्त रविवारचा पेपर येतो) जाउन पेपर टाकतो. फक्त तो सायकलने न येता कार मधून येतो.
बर्याच जवळपासच्या भागात दूधाची गाडी पण येते. येथील काही स्थानिक डेअरीज ताज्या दूधाची डिलीव्हरी देतात. ताजे म्हटले तरी ते प्रक्रिया केलेलेच असते. दूधाबरोबर क्रिम , चिझ, पाव हे पण सप्लाय करतात. अर्थात सुपरमार्केट मधील दूधापेक्षा हे दूध महाग असते..जवळपास दुप्पट भाव . त्यामुळे हे दूध घेणार्यांची संख्या फार जास्त नाहीये.
आठवड्यातून एकदा कचरा गोळा करायला गाडी येते..सहा- साडे सहालाच. प्रत्येक घरासमोर गाडी थांबून घरासमोर ठेवलेल्या कचर्याच्या कॅन मधील कचरा ट्रक मध्ये ओतला जातो. त्यामुळे ही गाडी जाईपर्यत तिचे अस्तित्व जाणवत रहाते.
एक मात्र खरे की सकाळ झाली हे डोळ्यांनाच जाणवते...कानांना फारसे नाही कारण कसले आवाजच नाहीत. गाड्यांच्या इंजिन चा एक आवाज सोडल्यास.
तुमचे गाव कदाचित आयसोलेटेड असल्याने तुम्हाला जे जाणवले ते तुम्ही लिहीले. पण अगदीच सरसकट सर्वत्र असे नाहिये.
मी रहातो त्या वेस्टकोस्टातल्या भागात (वीकडेला) सकाळ झालेली बर्यापैकी जाणवते.
मी जॉर्जियातल्या अल्फारेटा शहराच्या उपनगरातल्य एका कम्युनिटीत खूप खोलवर असलेल्या घरात राहिलो. ती जागा प्रातिनिधिक नव्हतीच.
आनंद घारे
मी या जागी चार ओळी खरडल्या आहेत, जमल्यास वाचून पहाव्यात.
http://360.yahoo.com/abghare
http://anandghan.blogspot.com/
नेहेमीप्रमाणे परदेशवारी करून आल्यानंतर ज्या प्रकारचे लेख येतात, त्यापेक्षा वेगळा लेख. आवडला.
धारोष्ण दूध - लहानपणची आठवण आली. गावी सकाळी दूघ काढतेवेळी आजी आम्हा नातवांच्या हातात एकेक ग्लास घेऊन गोठ्यात पाठवत असे. आचळातून थेट ग्लासात आलेले दूध काय चवदार लागत असे!!
Doing what you like is freedom. Liking what you do is happiness.
घारेकाका,
सुंदर निरीक्षणे.
माझे म्हणाल, तर मला भारतात सकाळ नकोशी वाटायची (शाळेत असताना), आणि आता हवीहवीशी वाटते.
आणि अमेरिकेत सकाळ आधी हवीहवीशी वाटायची (फारशी जबाबदारी नसताना. यू नो व्हाय, नसल्यास विनायक प्रभूंना विचारा) आता नकोनकोशी वाटते.
-- सर्किट
प्रतिक्रिया
:)
खूप खूप छान
अरेच्चा!
+१
प्रश्न स्वातंत्र्याचा आहे.
वृत्तपत्र मिळतं की
प्रातिनिधिक नाही
जराशी निराशा
घारे 'सर्र्'
मस्त
काका... सहज
सहज आणि छान.
वेगळे आणि मनोरंजक प्रवासवर्णन
छान ! लेख
ही तुलना आवडली!
मस्त
आणि इतका मोठा पेपर
छान झालाय लेख
मान्य आहे
छान लेख
जबरा !