Skip to main content

त्या भज्याच्या पिठांमध्ये सांग तू आहेस का?

लेखक अविनाशकुलकर्णी यांनी मंगळवार, 12/07/2016 21:37 या दिवशी प्रकाशित केले.
त्या भज्याच्या पिठांमध्ये सांग तू आहेस का? भरल्या वांग्याच्या भाजीत ओतिशी तू चव का? मिसळीच्या रश्शांत सांग तू तरंगतोस का?? ओनियन उत्तप्यास सांग तुझ्याशिवाय चव का? भाजी रस्सा वरण सांबाराचा प्राण तू आहेस का? चिरताना तुला अश्रू चे घोर ते तू रूप का? शेव चिवड्यात वर्षणारा चवीचा तू मेघ का? कोथिंबीर मिरची खोबरे वाटणात नेमका हवा का? सामिष असो वा मत्स्य आहारातला प्राण तू आहेस का? कष्टणार्‍या बांधवांच्या भाकरीचा मित्र तू आहेस का? सुगरिणीच्या व्यंजना चा सांग तू अविभाज्य भाग का? असो सामिष वा शाक पाकात तिथे रे, सांग तू आहेस का
लेखनविषय:

वाचने 6476
प्रतिक्रिया 21

प्रतिक्रिया

अकुनी घाणा बदललेला दिसतोय... जिलबीच्या जागी भजी टाकलेली दिसत आहेत ! =)

मदनबाण.....

आजची स्वाक्षरी :-ये जवानी हद कर दे, बूढ़े जवां को मस्त कर दे, कोई न जाने कल क्या हो, आने वाला पल क्या हो, ले मज़ा ले ज़िंदगी का ज़िंदगी का ज़िंदगी का... ;) :- Sarfarosh

In reply to by चिनार

एकदा वाचल्यावर माझ्याच नाका पुढे कांदा धरावा लागला (लोकांना.... वाचता वाचता पडलो म्हणुन). एका दुष्ट मित्राने कोल्हापुरी चप्पल देखिल काढली होती. पण आम्हाला काही करण्या आधी त्याचे लक्ष चुकुन माझ्या काम्युटराच्या पडद्यावर गेले आणि तो पण आमच्या शेजारी आडवा झाला. त्याची चप्पल त्यालाच हुंगवावी लागली. तुमच्या विनंतीला मान देउन आम्ही यात हात घातला आणि काही बाही झाले तर आम्हाला त्यातुन बाहेर काढायला आमचे "मांत्रिक" बुवाही हल्ली मिपावर येत नाहित. पैजारबुवा,

In reply to by ज्ञानोबाचे पैजार

विनंतीला मान दिल्याबद्दल धन्यवाद ! पण तुमच्या लेखणीतून काही वाचायला मिळाले असते तर मजा आली असती बुवा... असो. पण अकुकाकांना या कवितेसाठी 'भजेपीठ' पुरस्कार' आपल्या शुभहस्ते द्यावा अशी प्रार्थना करतो.

पुढले कडवे, भजी खाऊन झाल्यावर सकाळी सहाच्या एक्सप्रेस मध्ये सांग तू आहेस काय!

In reply to by कैलासवासी सोन्याबापु

ते विचारायची गरज नाही. ते तर तुम्ही पलिकडच्या डब्यात बसुन देखिल सहज ओळखू शकता. पैजारबुवा,

नाखुकाका तुम्ही उगाचच तिकडे शेतीविषयक लांबलचक धागे काढता... ही कविता वाटा जागोजागी उभे राहून...कांद्याचे मागणी वाढून भाव गगनाला भिडतील..

In reply to by बोका-ए-आझम

डोक्यात जाणे, हे आपले डोक्यात बसणे महत्वाचे!